Back
कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता: बाजारभाव 900-1000 रुपयांपर्यंत कोसळला!
SKSudarshan Khillare
Jul 26, 2025 07:15:49
Yeola, Maharashtra
अँकर :- गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून पावसाळी व ढगाळ वातावरणामुळे साठवणूक केलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडत असताना दुसरीकडे येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात घसरण व कांद्याचे सरासरी बाजार भाव 900 ते 1000 रुपयांपर्यंत कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे चिंतेत वाढ झाली आहे विक्री झालेल्या कांद्याला व विक्री होणाऱ्या कांद्याला प्रतिक्विंटल ला एक हजार रुपये अनुदान द्या तसेच तीन हजार रुपये हमीभावाने कांद्याची खरेदी करा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करत आहे
बाईट :- एकनाथ गायकवाड (कांदा उत्पादक शेतकरी )
बाईट :- नवनाथ बरशिले ( कांदा उत्पादक शेतकरी सावरगाव, तालुका येवला )
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowJul 26, 2025 16:32:06Pandharpur, Maharashtra:
26072025
Slug - PPR_CORRIDOR_MAP
feed on 2c
file 01
--
Anchor:- पंढरपुरातील चर्चेतील कॉरिडॉर हा रद्द करण्यासाठी आता नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. मंदिर परिसरातील स्थानिक राहिवाशी व्यापारी यांनी आज रस्त्यावर उतरून एक जिद्द कॉरिडॉर रद्दच्या घोषणा देत विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा घातली. मंदिराच्या प्रदक्षिणेला कॉरिडॉर विरोधी घोषणेने एक प्रकारे मोर्चाचे स्वरूप आले होते. तसेच कॉरिडॉरचा प्रस्तावित असणाऱ्या आराखड्याच्या तथा नकाशाच्या प्रती ह्या चंद्रभागेत विसर्जनही करण्यात आल्या. मंदिर परिसरातून कॉरिडॉर विरोधाची मोहिम अधिक तीव्र होताना दिसत आहे. पंढरपूर कॉरिडॉर सोबतच मंदिरे अधिग्रहणाचा 1973 चा कायदा रद्द करून मंदिर सरकार मुक्त करावे. अशी ही मागणी आता मंदिर परिसरातील स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून होताना दिसत आहे. एकंदर देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्ट ला पंढरपुरातून थेट नागरिक विरोध करत आहेत
0
Report
PPPRANAV POLEKAR
FollowJul 26, 2025 16:30:55Ratnagiri, Maharashtra:
हिंजवडी येथे अजित पवार जे काही बोलले ते तुम्ही मागचं पुढचं न एकदा मधलं सांगत असल्याचं राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान रत्नागिरी मध्ये संरक्षण शास्त्र सामग्री बनवण्याच्या प्रकल्पाला कुणाचा विरोध असल्यास त्या सर्वांशी मी संवाद साधायला तयार आहे. शेत जमीन किंवा कुणाचं घरही जाणार नाही असं आश्वासन मी देतो. शिवाय, सदरचा प्रकल्प हा प्रदूषण करणारा नाहीय. कंपनीने जमिनीचा ताबा घेऊन प्रकल्प वेळेत न सुरू केल्यास त्या संदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधून पुढे निर्णय घेतला जाईल असूदेखील उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
0
Report
PPPRANAV POLEKAR
FollowJul 26, 2025 16:30:35Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी
उदय सामंत
कोकण हा अतिशय चिकित्सक भाग आहे
पण खरं काय खोटं काय हे देखील आपण पाहिलं पाहिजे
ज्या जिल्हा परिषद गटाने मला साडेपाच हजाराचं मताधिक्य दिलं त्यांचं आयुष्य सुखकर व्हावं यासाठी या midcचा घाट
300 एकर मध्ये प्रकल्प होईल, पण बफर झोन असल्याने 1000 एकर जागा संपादित केली जाणार आहे
शेतकऱ्यांना जागेचा दर महाराष्ट्रात सर्वाधिक असेल
विरोधक माझे वैरी नाहीत, काही गैरसमज झाले असतील तर मी त्यांच्या बरोबरही चर्चा करेन
चर्चेला सर्व दारं खुली आहेत
त्यांची देखील समजूत काढू
प्रकल्प लादणार नाही, सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन प्रकल्प करू
RRP नावाची कंपनी जी सोलारचे सेल बनवणारी कंपनी आहे, तसेच निवेंडीमध्ये ड्रोन बनवणारा कारखाना येतोय
तुमचं वाईट होणार नाही, नुकसान होणार नाही ही दक्षता मी घेईन
बंदुकीचा कारखाना सर्वात चांगला कुठे आहे तर वाटदमध्ये आहे असं चार वर्षांनी तुम्हीच आदराने सांगाल
येणारा प्रकल्प प्रदूषण विरहित प्रकल्प असेल ही जाहीर करतो
लोकांच्या या मागण्या मान्य केल्याचा निर्णय
वस्तीची ठिकाणं राहतं घर वगळली जातील
नैसर्गिक पाण्याचे स्रोत, धार्मिक स्थळे वगळली जातील
प्रशिक्षण केंद्र सुरू केलं जाईल
जमिनीचा जास्तीत जास्त मोबदला देऊ
2 गुंठे जमीन उद्योगासाठी शेतकऱ्यांना देऊ
शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही, विश्वासात घेतल्याशिवाय पुढे जाणार नाही
0
Report
PNPratap Naik1
FollowJul 26, 2025 16:16:37Kolhapur, Maharashtra:
Kop Congress Melava
Feed :- Live U & 2C
Anc :- ऐन निवडणुकीच्या काळात कोणी दगा फटका केल्यास त्याचा करेक्ट कार्यक्रम करू असा गर्भित इशारा विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेता आमदार सतेज पाटील यांनी दिला आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणसिंग फुंकण्यात आले आहे.. कोल्हापूर शहरातील काँग्रेस कमिटी मध्ये कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील त्यांच्या उपस्थितीत 81 वार्डमधील प्रमुख पदाधिकारी आणि नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी पूर्ण ताकतीनिशी कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवण्याचे जाहीर केलं. पण हे जाहीर करत असताना ऐन निवडणुकीच्या काळात कोणी दगा फटका केल्यास त्याचा करेक्ट कार्यक्रम करू असा इशारा दिलाय.. निवडणुकीच्या काळात खांद्याला खांदा लावून काम करायचं आणि ऐनवेळी पलटी मारायचं असं जर कोणी केलं तर वार्ड मध्ये ठाण मांडून संबंधिताचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल असा गर्भित इशारा दिलाय. पाहूया सतेज पाटील यांनी नेमकं काय म्हटलय.
Play Sound Byte :-
आमदार सतेज पाटील
3
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowJul 26, 2025 15:21:13Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज...
AC ::- छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आता तपासाला वेग आला आहे. काल घाडगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी हल्ल्याची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर अजित पवार यांनी थेट लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्याशी फोनवर चर्चा करत काही स्पष्ट सूचना दिल्या. यानंतर विजयकुमार घाडगे पाटील हे लातूरला परतले आणि एका खासगी रुग्णालयात दाखल झाले. दरम्यान पोलिसांनी रुग्णालयात जाऊन त्यांचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याऐवजी घाडगे पाटील यांनी नोटीस स्वीकारून उद्या अधिकृत जबाब देणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे उद्या या प्रकरणात त्यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. या हल्ल्याप्रकरणी पोलीस तपास आता निर्णायक टप्प्यावर पोहोचतोय का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
11
Report
UPUmesh Parab
FollowJul 26, 2025 15:02:44Oros, Maharashtra:
अँकर ---- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून वंचित समाजाच्या लोकांच्या अडीअडचणी दूर जाणून घेण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन सिंधुदुर्गनगरी येथे करण्यात आले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात असंख्य वंचित समाज बांधवांनी या जनता दरबारात हजेरी लावत आपल्या समस्या मांडल्या. मंत्री नितेश राणे यांनी त्या समस्या जाणून घेत त्याचे निवारण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. राज्यातील पहिला वंचित समाजाचा मेळावा भरवून सिंधुदुर्ग जिल्ह्याने आदर्श राज्यासमोर ठेवला असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
Byte --- पालकमंत्री --- नितेश राणे
14
Report
JMJAVED MULANI
FollowJul 26, 2025 15:00:18Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG BARAMATIFORAM
FILE 5
BYTE 1
एन्व्हॉर्यमेंटल फोरमच्या वतीने बारामतीत दोन दिवस ‘हॅपी स्ट्रीटस बारामती’ चे आयोजन,,,,,,,,, राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा अजित पवार
ANCHOR:-
नागरिकांनी मोकळ्या हवेत, मोबाईलपासून दूर राहत खेळ, संगीत, कला आणि पर्यावरणाच्या माध्यमातून वेगळा आनंद अनुभवावा, या उद्देशाने एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने दोन दिवस ‘हॅपी स्ट्रीट बारामती’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेय. याचे उद्घाटन खासदार सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थित करण्यात आले.
शनिवारी संध्याकाळी चार ते रात्री दहा, रविवारी सकाळी सहा ते दहा या वेळेत विद्या कॉर्नरनजिक जळोची कॉर्नर ते गदिमा पर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा हॅपी स्ट्रीट उपक्रम आयोजित केला आहे दोन्हीही दिवसांचा हा उपक्रम नागरिकांना विनामूल्य अनुभवता येणार आहे.
या उपक्रमाअंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा आर्ट, म्युझिक, नेचर अँड सफारी, गेम्स, हेल्थ अँड फिटनेस आणि पर्यावरण असे विविध झोन तयार करण्यात आला आहे.
आर्ट झोनमध्ये मेंदी, टॅटू, फेस पेंटिंग, पोर्ट्रेट, कॅरिकेचर, कॅलिग्राफी, वारली पेंटिंग यांचा समावेश आहे.
सफारी झोनमध्ये नक्षत्र उद्यान परिसरात घोडेस्वारी, उंट सफारी, बैलगाडीतून फेरफटका मारता येईल,.
हेल्थ अँड फिटनेस झोनमध्ये योगा, मल्लखांब व मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात येत आहेत
गेम झोनमध्ये पारंपरिक व आधुनिक खेळांचा संगम असलेले विविध खेळ मोफत खेळता येणार आहेत. यात सापशिडी, लगोरी, लुडो, गोट्या, कॅरम, बुध्दीबळ, बलून शूट, बास्केटबॉल, आर्चरी यांचा समावेश आहे.
9
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 26, 2025 14:48:00Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2607ZT_CHP_RAIN_CONTINUE
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार, जिल्ह्यातील आठ पैकी चार मध्यम सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले, चिमूर आणि नागभीड या दोन तालुक्यात घरे ढासळण्याच्या घटना, पुढील 24 तासातही चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची शक्यता
अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची सततधार सुरूच आहे. जिल्ह्यातील आठ पैकी चार मध्यम सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार पैनगंगा, वर्धा, वैनगंगा, इरई या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सततच्या पावसाने चिमूर आणि नागभीड या दोन तालुक्यात घरे ढासळल्याच्या घटना झाल्या आहेत. पुढील 24 तासातही चंद्रपूर जिल्ह्यात हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे. अतिवृष्टीमुळे बंद झालेल्या जिल्हयांतर्गत रस्त्यांची संख्या 15 झाली आहे. सध्या परीस्थिती सामान्य आहे. आकस्मिक स्थितीवर नियंत्रण ठेवण्याकरीता सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आलेले आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
11
Report
UPUmesh Parab
FollowJul 26, 2025 14:17:54Oros, Maharashtra:
सिंधुदुर्ग -- पालकमंत्री नितेश राणे पत्रकार परिषद मुद्दे
ऑन रत्नागिरी जिल्हा स्थानिक स्वराज्य निवडणुका -- स्वबळावर लढावं म्हणून कार्यकर्त्यांचा दबाव वाढत चालला आहे. कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर त्यांच्या मतांचा आदर केलाच पाहिजे. रत्नागिरी मध्ये आमचा एकही विधानसभा जिल्हा परिषदचा लोकप्रतिनिधी नाही. सावंतवाडी जिल्हाप्रमुखांनी तर आपली 60 टक्के ताकद असल्याचे जाहीर केलेय त्यामुळे आमची ताकद आजमावयाची संधी मिळाली पाहिजे. लोकसभेच्या वेळी रत्नागिरीमध्ये तिन्ही मतदार संघात आमची पिछेहाट होती शिंदे गटाची मते आम्हाला मिळाली नाही. दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे मैत्री पूर्ण लढू
ऑन लाडकी बहीण योजना --- अशा चुका कोणी केल्या असतील तर आमच्या अदिती तटकरे ताई त्या चुका सुधारतील.
On कोकण रेल्वे रोरो सेवा --- केंद्राकडे बाजू मांडून ती गाडी आपल्या कोकणात कशी थांबेल यासाठी प्रयत्न करू मार्ग काढू
ऑन संजय राऊत मंत्री टीका --- सर्किफिकेट देणाऱ्या माणसाच चारित्र्य काय आहे. खिचडी चोरीत भ्रष्टाचार केल्या प्रकरणी तो आणि त्याच कुटुंब आरोपी आहे. भांडुपच्या ४२० नी घरात बसून हवेत गोळीबार करू नये
ऑन राहुल गांधी --- कोणाचा तमाशा झालाय हे भारताच्या जनतेला माहीत आहे. सर्वात लोकप्रिय पंतप्रधान म्हणून मोदी साहेब उच्चांक गाठत आहेत तर दुसऱ्या बाजूला सर्वात जास्त निवडणुका हरण्यात राहुल गांधी उच्चांक गाठत आहे. कोणी कोणावर टिपणी करावी ह्याला मर्यादा राहिल्या पाहिजेत.
वैभव नाईक / विनायक राऊत गटबाजी -- निष्ठावान विरुद्ध ब्लॅकमेलर असा सध्या सुरू आहे. उपरकर आणि वैभव नाईक हे बंटी बबली आहेत. पक्षप्रमुखांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला जायला वेळ नसेल नाईक निवेदन देत बसले होते. विनायक राऊत यांच्या पराभवात वैभव नाईक यांची भूमिका काय होती ते राऊत ना समजलं असेल . अजून कपडे फाडणं बाकी आहे.
वैभव नाईक यांनी उबाठा ही नाईक प्राइवेट लिमिटेड कंपनी केली आहे.
ऑन कार्यकर्ते धमकी --- कार्यकर्त्यांना धमकावून महायुती टिकेल का ?? उबाठा पक्षाला टार्गेट कराव.. शिवसेनेचे कार्यकर्ते आमच्याकडे येण्यास इच्छुक आहेत मात्र आम्हाला वातावरण बिघडवायचं नाही
ऑन उदय सामंत ( संख्याबळ ) --- ते एवढे ताकतीचे लोक असतील तर आम्ही काय गोटया खेळत आहोत का ?? एवढे मातब्बर असतील तर त्यांनी एकट लढाव..आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आणि कोण आलं तर सोडत नाही
byte --- नितेश राणे, पालकमंत्री सिंधुदुर्ग
feed on desk
14
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 26, 2025 14:17:49Raigad, Maharashtra:
स्लग - अलिबाग जवळ समुद्रात मच्छीमार बोट बुडाली ...... पाच खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा ...... उर्वरित तीन बेपत्ता खलाशांचा शोध सुरू ....... 5 खलाशांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू ......... मासेमारीवरील बंदी उठण्यापूर्वीच बोटी समुद्रात .........
अँकर - अलिबागजवळ खांदेरी किल्ल्याजवळ एक मच्छीमार बोट बुडाली असून त्यावरील 5 खलाशांनी पोहत समुद्र किनारा गाठला आहे. त्या पाचही जणांना अलीबागच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत . बोटीवर एकूण आठ खलाशी होते. उर्वरित तीन खलाशांचा शोध सुरू आहे. आज सकाळी 7 वाजता करंजा येथील मच्छीमार बोट समुद्रात मासेमारी साठी निघाली. सकाळी आठ वाजता खांदेरी किल्ल्याजवळ आली असता ही बोट लाटांच्या जोरदार माऱ्याने बुडाली. बोटीवरील 5 खलाशांनी खवळलेल्या समुद्रात तब्बल 9 तास पोहून ते दिघोडी किनाऱ्यावर लागले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात आणले. मासेमारीवरील बंदी उठायला आणखी आठवडा बाकी असतानाच मच्छीमार बोटी समुद्रात गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
14
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 26, 2025 14:16:02Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणी जिल्ह्यात आज सकाळ पासूनच पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून यामुळे सखल भागात पाणी साचलय, अनेक दिवसापासून शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत होते. आज झालेल्या या पावसामुळे पिकांना पोटभर पाणी मिळणार असून जिल्ह्यातील ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. पिंगळी लिमला रोडवरील ओढ्याला पूर आल्याने नागरिकांचा जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून प्रवास सुरु आहे. पुलाच्या पलीकडे महामंडळची बस सुद्धा अडकून पडलीय. तर सेलू तालुक्यातील वालूर मोरेगाव मार्गावरील साळेगाव परिसरातील खडकी आणि हातनूर येथील भट्टी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग दोन तासापासून वाहतुकीसाठी बंद पडलाय...
बाईट- नागरिक
14
Report
MNMAYUR NIKAM
FollowJul 26, 2025 14:15:20Buldhana, Maharashtra:
बुलढाणा ब्रेकींग ..
महिला पुरात वाहून जाताना युवकांनी वाचविले ..
लोणार तालुक्यातील सावरगाव तेली येथील घटना ..
शेतातून घरी परतत असताना घडली घटना ..
पावसामुळे सावरगाव तेली नदीला आला पूर ..
यशोदा चव्हाण महिलेचे नाव .
14
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 26, 2025 14:01:53Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2607ZT_CHP_TALAV_BREAKK
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या शिरपूर गावात शिरले तलावाच्या सांडव्याचे पाणी, चिमूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शिरपूर गावाजवळ असलेला तलाव झाला ओव्हर फ्लो
अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या सिरपूर गावात तलावाच्या सांडव्याचे पाणी शिरले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. सततच्या पावसामुळे शिरपूर गावाजवळ असलेला तलाव ओव्हर फ्लो झाला. तलावाच्या सांडव्याचे पाणी गावात शिरल्याने घरांना फटका बसलाय.सध्या महसूल प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. प्रभावित गावकऱ्यांना आणि त्यांचं सामान सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
14
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 26, 2025 13:32:16Dhule, Maharashtra:
ANCHOR - मुंबई आग्रा महामार्गावर धुळ्याच्या शिरपूर नजीक असलेल्या पळासनेर जवळ ट्रॉला आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. स्पीड ब्रेकर जवळ वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे मोठा ट्रॉला थेट सफरचंदाने भरलेल्या ट्रकवर आदळल्याने हा अपघात झाला आहे. अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना शिरपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची तीव्रता CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अपघातांनंतर सर्वत्र पळापळ झाली. अपघाताच्या आवाजाने कणखल्या बसल्या होत्या. मालवाहतूक वहाणामाचा हा अपघात झालायने मोठी जीवित हानी टाळली. यां मार्गांवर अनेक सुरक्षा उपाय करणे गरजेचे आहे.
प्रशांत परदेशी, धुळे.
14
Report
AKAMAR KANE
FollowJul 26, 2025 13:16:41kolhapur, Maharashtra:
2c ला व्हिडिओ जोडला आहे
--=----
नागपूर
साउंड बाईट - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री.
नागपुरात 300 स्टेडियम खेळासाठी उभारायचे माझी खूप इच्छा आहे...पण मागील चार वर्षांच्य जीवनातील अनुभवातून एवढं लक्षात आलंय की, सरकार म्हणजे निक्कमी यंत्रणा आहे... (सरकार बहुत निकम्मी चीज होती है)... अशा शब्दात गडकरी यांनी सरकारी यंत्रणेवर टीका केली...एनआयटी, महापालिका, किंवा इतर शासकीय यंत्रणांवर कामाचा पद्धतीवर बोलताना यांच्याकडे चालती गाडी पंचर करायचा अनुभव आहे...असा खरमरीत टोला गडकरींनी प्रशासकीय यंत्रणेचा कामावर लगावला...
- सुरेश भट सभागृहात आयोजित खेळावर आधारित करिअर या विषयावर व्याख्यानावर नितीन गडकरी बोलत होते...
14
Report