Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ratnagiri415612

उदय सामंत: रत्नागिरी प्रकल्पावर संवादासाठी मी तयार, विरोधकांना दिले आश्वासन!

PPPRANAV POLEKAR
Jul 26, 2025 16:30:55
Ratnagiri, Maharashtra
हिंजवडी येथे अजित पवार जे काही बोलले ते तुम्ही मागचं पुढचं न एकदा मधलं सांगत असल्याचं राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. दरम्यान रत्नागिरी मध्ये संरक्षण शास्त्र सामग्री बनवण्याच्या प्रकल्पाला कुणाचा विरोध असल्यास त्या सर्वांशी मी संवाद साधायला तयार आहे. शेत जमीन किंवा कुणाचं घरही जाणार नाही असं आश्वासन मी देतो. शिवाय, सदरचा प्रकल्प हा प्रदूषण करणारा नाहीय. कंपनीने जमिनीचा ताबा घेऊन प्रकल्प वेळेत न सुरू केल्यास त्या संदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधून पुढे निर्णय घेतला जाईल असूदेखील उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Jul 27, 2025 03:02:55
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2707ZT_JALNA_GODAWARI(1 FILE) जालना | जायकवाडीतून गोदावरीत पाण्याच्या विसर्ग होण्याची शक्यता, जालन्यातील गोदावरी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा अँकर | पैठणच्या जायकवाडी धरणात ऊर्ध्व भागांतून येणारी पाण्याची आवक वाढली आहे. यामुळे जायकवाडीतील पाणीसाठा 80 टक्क्यांपेक्षा अधिक झालाय.धरणातील आवक पाहता कधीही जायकवाडीतून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. यामुळे जालन्यातील गोदावरी नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा ईशारा दिला आहे.
0
Report
KPKAILAS PURI
Jul 27, 2025 03:02:46
Pune, Maharashtra:
pimpri arrest kailas puri Pune 27-7-25 feed by 2c Anchor - ..... पिंपरी चिंचवडच्या निगडी परिसरात उद्योजकाला डांबून बंदुकीचा धाक दाखवत दरोडा टाकण्याप्रकरणी मालमत्ता विरोधी गुन्हे पथकातील पोलिसांनी मुख्य सूत्रधाराला पर राज्यातून अटक केली आहे. निगडी मध्ये 19 जुलैला पाच संशयीतांनी एका उद्योजकाच्या बंगल्यामध्ये प्रवेश करत त्याचे हातपाय बांधत त्याला डांबून ठेवून घरातील सहा लाखाहून अधिक किमतीचा ऐवज लुटला होता. मालमत्ता विरोधी गुन्हे पथकातील पोलिसांनी सीसीटीव्हीचा आधार घेत संशयताला अटक केली असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.
0
Report
SRSHRIKANT RAUT
Jul 27, 2025 03:02:39
Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील अंजी नाईक गावात एका घराभोवती करंट देऊन कुटुंबच संपविण्याचा कट रचण्यात आला. यात एक महिला ठार झाली आहे. तर तिचा पती थोडक्यात बचावला. परंपरागत राजकीय वैमनस्यातून वचपा काढण्यासाठी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपीनीं चक्क विरोधकाच्या घराभोवती तारा बांधून त्यात वीज प्रवाह सोडला. यात ३७ वर्षीय महिलेचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला तर तिचा पती थोडक्यात बचावला. सविता पवार असे मृत महिलेचे नाव आहे. पवार कुटुंब घरी झोपले असताना, पहाटेच्या सुमारास सविता लघुशंकेसाठी उठली. घराबाहेर पडल्यानंतर चप्पल घालत असतानाच अचानक जागेवर कोसळली. आवाज आल्याने पती मनेश बाहेर आला. त्यालाही जोरदार विजेचा धक्का बसला. आरडाओरडा केल्यानंतर शेजाऱ्यांनी दोघांनाही आर्णी रुग्णालयात हलविले. तेथे डॉक्टरांनी सविताला वीज तारेचा स्पर्श होऊन मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणी मनेश पवार याच्या तक्रारीवरून घाटंजी पोलिसांनी इंदल राठोड, सुदाम चव्हाण, गणेश राठोड, विनोद चव्हाण, राजू जाधव, चेतन चव्हाण या सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0
Report
HCHEMANT CHAPUDE
Jul 27, 2025 03:02:29
Junnar, Maharashtra:
Feed 2C Slug: Malshej Kalu Rescue File:03 Rep: Hemant Chapude(Malshej) ब्रेकींग न्युज माळशेज पुणे..... काळू धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 50 ते 60 पर्यटकांना सुखरूप वाचवण्यात टोकवडे पोलीस वन कर्मच्यारी ग्रामस्थांना यश....रात्री उशीरा पर्यंत सुरू होते रेस्क्यु ऑपरेशन... धबधब्याच्या परिसरात फिरण्यासाठी आल्यानंतर अचानक पावसाचे प्रमाण वाढल्याने काळू धबधब्याच्या परिसरात धबधब्याचे पाणी वाढल्याने अडकले होते पर्यटक....सर्व पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश...माळशेज घाटात सुरू आहे मुसळधार पाऊस... मुसळधार पावसाने काळू नदीलाही आला पूर.... प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया माळशेज पुणे...
0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Jul 27, 2025 03:02:04
Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File name : 2707ZT_MAVAL_LON_CRIME Total files : 03 Headline -लोणावळ्यात स्थानिक तरुणीवर अत्याचार, गाडीत केली अमानुषता -लोणावळा बलात्कार प्रकरणाचा तपास वेगात -तरुणीवर अत्याचार करणारा आरोपी १२ तासांत अटकेत Anchor: लोणावळा शहरात मानवतेला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. लोणावळ्यातील एका तरुणीचा कारमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडित तरुणीला लोणावळा परिसरातून जबरदस्तीने कारमध्ये बसवून तिच्यावर गाडी थांबवत वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार करण्यात आले. नंतर आरोपीने तिला सामसूम असलेल्या रस्त्याच्या कडेला टाकून दिलं. याबाबत लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून, आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. ही घटना फक्त कायद्याचं नव्हे, तर संपूर्ण समाजाला ही जागं करणारी आहे. कारण महिला मुली समाजात सुरक्षित नाही हे पुन्हा एकदा लोणावळ्यात घडलेल्या या अत्याचार घटनेनंतर अधोरेखीत झालंय.. बाईट : राजेश रामाघरे, पोलीस निरीक्षक, लोणावळा (file no.03)
0
Report
MKManoj Kulkarni
Jul 27, 2025 03:01:57
Mumbai, Maharashtra:
अँकर -- परळ टीटी पुलाच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. ऑक्टोबर मध्ये सुरुवात करण्यात येणार आहे.वारंवार खड्डे पडणाऱ्या य पुलाचे आता काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे.  एक मार्गिका बंद ठेवून काम केले जाणार असल्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यास मदत होणार आहे. हा पूल हा शहर आणि पूर्व उपनगराला जोडणारा महत्त्वाचा पूल आहे. या पुलावरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहने जात असल्यामुळे त्यावर वारंवार खड्डे पडतात. त्यामुळे या पुलाची वारंवार दुरुस्ती करावी लागते. या पुलावर मोठ्या संख्येने जोडसांधे असल्यामुळे वाहनांना वारंवार झटके बसतात. त्यामुळे या पुलाची दुरुस्ती करण्याची गरज आहे. परंतु, गेल्या काही वर्षांपासून या पुलाची मोठी दुरुस्तीची कामे हाती घेता आली नव्हती.आत ही काम करण्यात येणार आहे.याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुळकर्णी यांनी Wkt  मनोज कुळकर्णी  Feed send TVU 43  Slug-- Paral TT wkt
0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Jul 27, 2025 03:01:13
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara Slug - 2707_BHA_ROAD_DAMAGE FILE - 4 VIDEO वरठी-पांढराबोडी-भंडारा मार्गाची दुरावस्था..... 800 मीटरचा रस्ता रखडल्याने..... विद्यार्थी व नागरिकांचा जीवघेणा प्रवास..... मार्ग तात्काळ तयार करण्याची मागणी..... ANCHOR :- भंडारा जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे स्थानक असलेल्या वरठी येथील मार्गाची दुरावस्था झाली असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. वरठी ते पांढराबोडी - केसलवाडा व भंडाऱ्याला जाणारा हा कमी अंतराचा मार्ग आहे.....त्यामुळे या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते..... मात्र या मार्गाची दुरावस्था झाली असून मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. पावसाळ्यात त्यामध्ये पाणी साचून खड्ड्यांचा अंदाज येत नाही. अशात वाहन चालकांना मात्र कसरतीचा प्रवास करावा लागतो. आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या माध्यमातून हा मार्ग नव्याने तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली मात्र जवळपास एक किलोमीटरचा हा रस्ता बांधकाम झालेला नाही त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे जीवघेणे ठरत आहे. त्यामुळे तात्काळ या मार्गाची दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत...... BYTE :- अमित सार्वे, स्थानिक नागरिक
0
Report
KPKAILAS PURI
Jul 27, 2025 03:00:33
Pune, Maharashtra:
pimpri murder kailas puri Pune 27-7-25 feed by 2c Anchor - ... पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाकड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या बेपत्ता व्यक्तीच्या हत्तीचा गुन्हा उघडकीस आणण्यात गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांना यश आलं आहे. शानू रफिक मोहम्मद शेख असं हत्या झालेल्या ४५ वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. ताथवडे मध्ये एका कंपनीत रुजू होण्यासाठी ते आले असता बेपत्ता झाले होते. याप्रकरणी वाकड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाला मरकळ इथं एक मृतदेह शेख यांचा असल्याचा समजलं. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी काळेवाडी इथल्या शरद गौतम घरद या 36 वर्षीय आरोपीला अटक केले. त्याचा साथीदार गिरीधर रेडे हा फरार आहे.
0
Report
NMNITESH MAHAJAN
Jul 27, 2025 02:47:30
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2707ZT_JALNA_PRTR_MARKET(5 FILES) जालना : परतुरमध्ये चिखलातच भरला आठवडी बाजार,नगर परिषदेकडून स्वच्छता होत नसल्यानं नागरीकांचा संताप,बाजार गल्लीत ओटे नसल्यानं भाजीपाला विक्रेत्यांचे हाल अँकर |  जालन्यातील परतुरच्या आठवडी बाजारात भाजीपाला विक्रेत्यांना चिखलातच बसून भाजीपाला विक्री करण्याची वेळ आलीय.बाजार गल्लीत ओटे बांधलेले नसल्यानं भाजीपाला विक्रेत्यांनी पावसामुळे झालेल्या चिखलात बसून भाज्यांची विक्री केली.या प्रकारामुळे बाजार करण्यासाठी आलेल्या ग्राहक आणि भाजीपाला विक्रेत्यांमध्ये संताप पाहायला मिळाला.विशेष म्हणजे परतूर नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे या भागात नियमित स्वच्छता होत नसल्यानं भाजीपाला विक्रेत्यांना देखील चिखलात बसूनच भाजीपाल्याची विक्री करावी लागली या प्रकारामुळे नगर परिषदेच्या विरोधात संतापाची लाट पाहायला मिळाली. बाईट: भाजीपाला विक्रेते बाईट : अर्जुन पडेवार,सामाजिक कार्यकर्ते परतूर(काळा शर्ट)
5
Report
PTPRAVIN TANDEKAR
Jul 27, 2025 02:47:19
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara Slug - 2707_BHA_GANJA FILE - 2 VIDEO 1 IMAGE 6 किलो गांजा हस्तगत.... 1.27 लाखांचा मुद्देमाल जप्त रेल्वे पोलिसांची कारवाई Anchor :- पुरी-गांधीधाम साप्ताहिक एक्स्प्रेसमधून गांजाची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दलाच्या भंडारा रोड पथकाने मोठी कारवाई केली. संध्याकाळच्या सुमारास केलेल्या या कारवाईत 6 किलो 348 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. या अंमली पदार्थाची बाजारातील किंमत 1 लाख 26 हजार 960 रुपये असल्याचे समजते. ही कारवाई गाडी क्रमांक 12994 पुरी-गांधीधाम साप्ताहिक एक्स्प्रेसच्या S/03 स्लीपर कोचमधील बर्थ क्रमांक 33 मध्ये करण्यात आली. रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांना तपासणीदरम्यान तपकिरी - रंगाची पिट्ट बॅग बेवारस अवस्थेत आढळून आली. बॅगेत गांजासदृश पदार्थ आढळून आल्यानंतर त्याचे वजन करण्यात आले. त्यात तब्बल 6.348 किलो गांजा असल्याचे स्पष्ट झाले. या रेल्वेगाडीचा भंडारा स्थानकावर थांबा नसल्यामुळे ही बॅग नागपूर स्थानकात उतरवून तपासणी करण्यात आली.
5
Report
ADANIRUDHA DAWALE
Jul 27, 2025 02:47:09
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_ACCIDENT दोन फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात, 600 फूट खोल दरीत कोसडली चार चाकी कार; दरीत पडलेल्या गाडीमधून सहा पर्यटकांना जिवंत वाचविले अँकर :-अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. अशातच चिखलदरा घाट रस्त्यामध्ये शहापूर येथून अर्धा किलोमीटर पुढे एक पर्यटकाची गाडी वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने 600 फूट खोल दरीतून खाली पडून अपघात झाला या गाडीमध्ये एकूण सहा व्यक्ती होते यामध्ये ४ व्यक्ती व २ मुलांचा समावेश होता. घटनेची माहिती मिळताच डी डी आर एफ अमरावती येथील टीमने आपल्या जीवाची पर्वा न करता सर्व व्यक्तींना दरीतून सुखरूप बाहेर काढले त्यांचे प्राण वाचवले, खोल दरीत पडलेल्या लोकांना दोराच्या सहाय्याने रेस्क्यू करण्यात आले. हे सर्व पर्यटक किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
7
Report
SKSudarshan Khillare
Jul 27, 2025 02:45:26
Niphad, Maharashtra:
अँकर:- गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात पावसाची पुन्हा जोरदार बॅटिंग सुरू झाल्याने दारणा आणि कादवा नदीतून पूर पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणलोट पाणी दाखल होत असल्याने शनिवारी संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान धरणाच्या पाच व प्रकार गेटमधून 15 हजार 775 क्यूसेक पाण्याचा विसर्ग जायकवाडी च्या दिशेने गोदावरी नदी पात्रात करण्यात येत आहे या पावसाच्या हंगामात नांदूरमदमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने 34.33 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे
7
Report
PTPRAVIN TANDEKAR
Jul 27, 2025 02:30:47
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara Slug - 2707_BHA_POSHAN_AAHAR FILE - 1 VIDEO 2 IMAGE भंडारा जिल्ह्यात पोलिसांनी पकडलं पोषण आहाराचा तांदूळ.... लहान मुलांच्या पोषण आहारावर व्यापाऱ्यांचा डल्ला... तिघांवर गुन्हे दाखल Anchor :- भंडारा जिल्ह्यात अवैध शालेय पोषण आहाराचा ट्रक पोलिसांनी पकडला. भंडारा तालुक्यातील खरबी येथे साईबाबा राईस मिल समोर एक ट्रक संशयास्पद उभा होता. स्थानिक गुन्हे शाखेची टीम पेट्रोलिंग करीत असताना ट्रक चालकाला विचारपूस केली तेंव्हा त्याने उडवा उडविचे उत्तर दिले तसेच कुठलेही कागदपत्र सादर केले नाही. यामुळे सदर तांदूळ शाळेय पोषण आहाराचा असल्याच निष्पन्न होताच शिक्षण अधिकारी यांना घटनास्थळी बोलावून कारवाई करण्यात आली आहे. यात 210 तांदळाची पोती आहेत. तर या प्रकरणी राईस मिल मालक, आणि ट्रक मधील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा तांदूळ नागपूर येथे जिल्ह्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे गरीब मुलांच्या पोषण आहारावर व्यापारी डल्ला मारत असल्याच दिसून येत आहे.
7
Report
AAABHISHEK ADEPPA
Jul 27, 2025 02:18:18
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - शहर पोलीस आयुक्तांचा मोठा दणका, सालार गॅंग मधील सहा जणांवर एकाच वेळी लावण्यात आला मोक्का - पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचा गुन्हेगारांना मोठा दणका - शहरातील सालार गॅंग मधील सहा जणांवर एकाच वेळी मोक्का कायद्याअंतर्गत मोठी कारवाई - फैसल सालार, जाफर शेटे , सईद उर्फ टिपू सालार, अनिस अहमद उर्फ पापड्या रंगरेज, अक्रम उर्फ पैलवान सातखेड आणि वसीम उर्फ नोकरी सालार या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर करण्यात आली कारवाई - पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या दणक्यामुळे शहरातील शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी घेतला धसका - महापालिका निवडणुकांच्या अगोदर सोलापूर शहर पोलीस चांगलेच ॲक्शन मोडवर
4
Report
JJJAYESH JAGAD
Jul 27, 2025 02:18:08
Akola, Maharashtra:
1 फाईल 4 फोटो आहेत.. Anchor : अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील चिचपाणी येथील मधुकर बेलसरे हा युवक चिचपाणी धरणावर बैल चारण्यासाठी गेला असताना वन्यप्राण्याने त्याच्यावर हल्ला चढवला, यात हा युवक जखमी झाला आहेय. त्याच्यावर अकोट येथील रुग्णालयात उपचार केल्यावर त्याला एकलव्य आपत्कालीन पथकाने तातडीने अकोल्याला पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहेय..युवकावर हल्ला करणारा प्राणी पट्टेदार वाघ असल्याचं युवकाने सांगितलं आहेय..मात्र हल्ला करणारा प्राणी नेमका कोणता हे वनविभागाच्या तपासणी नंतरच कळू शकणार आहेय..या युवकावर वन्यप्राण्याने हल्ला केल्यामुळे परिसरातील शेतकरी व शेतमजुरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेय.
9
Report
Advertisement
Back to top