Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442401

गणपती विसर्जनासाठी मुस्लिम समुदायाने सजावट काढली, एकोप्याचा संदेश!

AAASHISH AMBADE
Sept 06, 2025 10:48:24
Chandrapur, Maharashtra
Feed slug:--- 0609ZT_CHP_WELCOME_STEP ( File sent on 2C) टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातील मुस्लिम समुदायाने ईदची सजावट काढून गणपती विसर्जनाचा मार्ग केला सुरळीत केला, दिला एकोप्याचा अनोखा संदेश  अँकर:--- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात आज गणपती विसर्जनाच्या निमित्ताने सामाजिक सौहार्द आणि परस्पर सद्भावनेचे उदाहरण दिसून आले. काल ईद-ए-मिलादचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शहरातील मुख्य रस्त्यांवर मुस्लिम समुदायाकडून स्वागतद्वारे आणि सजावट करण्यात आली. सहसा ही सजावट अनेक दिवस ठेवली जाते. मात्र आज गणपती विसर्जनाचा दिवस असल्याने, मुस्लिम समुदायाने सामाजिक सौहार्द आणि परस्पर सद्भावना दाखवत एक विशेष निर्णय घेतला. बल्लारपूरच्या बस्ती विभागापासून गणपती विसर्जन घाटापर्यंतचा मुख्य रस्ता जामा मशिदीसमोरून जातो. या मार्गावर जामा मशिदी समितीने लावलेले स्वागतद्वार आणि सजावट विसर्जन मिरवणुकीत अडथळा ठरू शकली असती. हे लक्षात घेऊन, मुस्लिम समुदायाच्या तरुणांनी स्वेच्छेने सर्व सजावट आणि बॅनर काढून टाकले आणि गणेश मूर्ती विसर्जनाचा मार्ग मोकळा केला. या कामात पोलिस प्रशासन आणि बल्लारपूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलानेही सहकार्य केले.  बाइट १) इस्माईल ढाकवाला, जामा मस्जिद समिती सदस्य बाइट २) रामधन सोमाणी, गणेशभक्त आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
7
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
TTTUSHAR TAPASE
Sept 06, 2025 14:18:09
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE 2 FILES SLUG NAME -SAT_DESAI_MIRAVNUK सातारा शहरात गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून शहरातील मोठ्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने आणि नगरपालिका प्रशासनाने मोठी तयारी केली आहे. अनेक ठिकाणी कृत्रिम तलाव उभारले आहेत.याची पाहणी पालकमंत्री शंभूराज देसाई जिल्हाधिकारी संतोष पाटील पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी केली... यावेळी डॉल्बी मर्यादा पेक्षा जास्त लावल्यास कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या आहेत .यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांनी पारंपारिक वाद्य वाजवून विसर्जन करणाऱ्या गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत स्वतः ढोल वाजवून सहभागी झाले यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी देखील ढोल वाजवून या मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवला.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 06, 2025 14:02:12
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0609ZT_CHP_TWO_BJP ( single file sent on 2C)  टायटल:-- अखेर चंद्रपुरात विसर्जन मिरवणुकीत भाजपच्या पक्ष शिस्तीचेही विसर्जन, आ. मुनगंटीवार- आ. जोरगेवार वादात मिरवणुकीचे 2 स्वागत मंडप     अँकर:--अखेर चंद्रपुरात श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत भाजपच्या पक्ष शिस्तीचेही विसर्जन झाल्याचे बघायला मिळाले. चंद्रपुरात विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सर्वच गणेश मुर्त्या आणि मंडळ पदाधिकाऱ्यांचे विविध संस्था संघटनांच्या वतीने स्वागत करण्याची परंपरा आहे. चंद्रपुरात भाजपच्या वतीने दरवर्षी लोकमान्य शाळेपुढे मंडप घालून असे स्वागत केले जाते. मात्र यंदा आ. मुनगंटीवार गटाने आधी परवानगी घेत  आपला मंडप उभारला तर विरोधी आ. जोरगेवार  गटाने याला जोरदार हरकत घेतली. सुमारे तीन दिवस चंद्रपूर ते मुंबई असा हा संघर्ष चालला. शेवटी दोन्ही मंडप आजूबाजूला उभारले गेले .आ. मुनगंटीवार- आ. जोरगेवार वादात मिरवणुकीचे 2 स्वागत मंडप झालेत. अगदी खेटून उभ्या राहिलेल्या या 2 मंडपांनी सामान्य गणेशभक्त आणि चंद्रपूरकर मात्र आश्चर्य व्यक्त करत आहेत.  यावर प्रतिक्रिया देताना आ. जोरगेवार यांनी विरोधी गतालाही शुभेच्छा दिल्या. तर आ. मुनगंटीवार यांनी हा आमचा 35 वर्षांचा स्वागताचा प्रघात आहे. आम्ही करूच अशी भूमिका घेतली. बाईट १) आ. किशोर जोरगेवार, भाजप आमदार चंद्रपूर बाईट २) आ. सुधीर मुनगंटीवार, भाजप आमदार, बल्लारपूर आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 06, 2025 14:00:55
Raigad, Maharashtra:
स्लग - 11 दिवस सुरू असलेल्‍या चैतन्‍य सोहळयांची आज सांगता ....... रायगडात गणेश विसर्जन मिरवणूकांना सुरूवात ........... गणेश विसर्जन मिरवणुकीवर पावसाचे सावट ......... अधून मधून बरसताहेत पावसाच्या सरी ..........तरीही विसर्जन मिरवणुकीतील उत्साह कायम ............ नदी, तलाव, समुद्र या ठिकाणी केले जात आहे गणेश मूर्तींचे विसर्जन ....... 169 सार्वजनिक तर 18 हजार 42 खाजगी गणपतींना निरोप .......... अँकर - गेले 11 दिवस सुरू असलेल्‍या चैतन्‍य सोहळयाची आज अनंत चतुर्दशीच्‍या दिवशी सांगता होत आहे. आपल्‍या लाडक्‍या बाप्‍पांची मनोभावे पुजा आराधना केल्‍यानंतर रायगडकरांनी आज त्‍याला जड अंतकरणाने निरोप दिला. जिल्ह्यात संध्‍याकाळी ठिकठिकाणी विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. पारंपारिक खालू बाजा आणि ढोल ताशांच्या तालावर गणेशभक्त नाचताना पाहायला मिळताहेत. गणेश विसर्जन मिरवणुकावर पावसाचं सावट आहे. तरी भक्तांचा उत्साह कमी दिसत नाही. ग्रामीण भागात वाद्यांच्‍या तालावर शिस्‍तबदध मिरवणूका पहायला मिळत आहेत. तर शहरी भागात सार्वजनिक गणपतींच्‍या मिरवणूकांमध्‍ये गुलाल उधळत, ढोलताशांचा दणदणाट सुरू आहे. रायगड जिल्‍हयात आज 169 सार्वजनिक तर 18 हजार 42 खाजगी गणपतींना निरोप दिला जातोय. रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणूका सुरू राहणार आहेत.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 06, 2025 13:46:03
Yavatmal, Maharashtra:
यवतमाळ च्या पुसद येथील विद्यालंकार पोद्दार शाळेच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे श्री गणेशाची प्रतिमा साकार करून गणपती बाप्पाला निरोप दिला. १० दिवसांचा उत्सव साजरा केल्यानंतर बाप्पाला निरोप देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. उंचावरून पाहिल्यास, विद्यार्थ्यांची रचना एकता आणि भक्तीचे प्रतीक जाणवत होती. विद्यार्थ्यांनी भगवान गणेशाची एक विस्तृत आकृती तयार करण्यासाठी एक मोठी मानवी साखळी तयार केली होती. वेगवेगळ्या रंगांच्या पोशाखात, विद्यार्थ्यांनी देवतेचे रूप जिवंत करण्यासाठी उत्तम समन्वय साधला.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Sept 06, 2025 13:45:49
Yeola, Maharashtra:
अँकर :-दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज विसर्जनाच्या दिवशी येवल्यात घरगुती गणरायाला निरोप देण्यात आला येवला नगरपालिकेतर्फे अहिल्याबाई होळकर घाटासह एकूण पाच ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती अहिल्याबाई होळकर घाटावर येवला नगरपालिकेतर्फे विसर्जन करण्यासाठी खास पथकाची नेमणूक करण्यात आली असून गणपती सोबत असलेले निर्माल्य देखील संकलित करण्यात आले आहे अशी माहिती येवला नगरपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 06, 2025 12:30:50
Washim, Maharashtra:
वाशिम : File:0609ZT_WSM_BHALU_TATYA_VINCHU रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशीम अँकर: ढोल-ताशांच्या गजरात सुरू असलेल्या वाशीमच्या ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. बाप्पांना निरोप देण्यासाठी आले होते तात्या इंचु आणि भालू मिरवणुकीत डान्स करत,ढोलाच्या ठेक्यावर उड्या मारत तात्या इंचु आणि भालू यांनी अशी धमाल केली की पाहणाऱ्यांनी थाटून टाळ्या वाजवल्या.लहान मुलांनी तर त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी एकच झुंबड उडवली.गणेशभक्तांसोबत थिरकणारा भालू आणि त्याला साथ देणारा तात्या इंचु हे पाहून साऱ्यांच्याच चेहऱ्यावर हसू उमटलं.विसर्जन मिरवणुकीच्या गडबडीत हास्याचा हा डोस मिळाल्याने भक्तांना आनंदाची भर पडली.
3
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 06, 2025 12:30:28
Pandharpur, Maharashtra:
06092025 Slug - PPR_KURDU_BABARAJE file 01 ---- Anchor - उप मुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावून आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना देणाऱ्या माढा राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष बाबाराजे जगताप यांचा वादग्रस्त व्हिडिओ समोर आला आहे. एका ठिकाणी बसून बाबाराजे जगताप अंमली पदार्थांचे सेवन करताना दिसत आहे. अशा पद्धतीने व्हिडिओ चित्रित करून समाज माध्यमात पसरवण्याचा जगताप यांचा काय हेतू आहे हे मात्र कळू शकले नाही. सदर कार्यकर्ता आपण अजित पवारांच्या जवळचे असल्याचे सांगून समाजात वावरत आहे
2
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 06, 2025 12:30:21
kolhapur, Maharashtra:
Ngp OBC Wadetiwar live u ने feed पाठवले ---- विजय वडे्टीवार -- *आम्ही न्यायलयीन लढाई आणि रस्त्यावर लढाई लढू* -- *नागपुरात मोर्चा काढणार आहे.आमची कमिटी याबाबत निर्णय घेईल* -- आमचा लढा GR विरोधात -- 12 तारखेला मोर्चाबाबत कमिटी निर्णय घेईल ---छगन भुजबळ न्यायालयात जाणार आहे.. आम्ही त्यांच्यासोबत चर्चावं करू..आमची वकील संघटना न्यायलयात जाणार -------- *ओबीसींचा नागपुरात निघणार महामोर्चा* *मराठा आरक्षणासंदर्भातील शासन निर्णयावर विदर्भातील ओबीसी संघटनांचे पार पडली महत्वाची बैठक* *ओबीसी नेते तथा काँग्रेसचे विधानसभेतील पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची माहिती* नागपूर, दि.६ _ राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षण देण्यासाठी काढलेल्या पहिल्या शासन निर्णयात पात्र असा शब्द वापरला होता. नंतर दुसरा शासन निर्णय काढून हा शब्द वगळण्यात आला. याचा अर्थ मराठा समाजाला ओबीसींतून सरसकट आरक्षण देणार असा होतो. हा मूळ ओबीसी समाजावर अन्याय आहे. याविरोधात लढा देण्यासाठी २५ प्रमुख लोकांची एक समिती गठीत करून ऑक्टोबरमध्ये नागपुरात ओबीसींचा महामोर्चा काढणार, अशी माहिती ओबीसी नेते तथा काँग्रेसचे विधानसभेतील पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. नागपुरातील रवी भवन येथे शनिवारी विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यातील ओबीसी संघटनांची बैठक झाली. या बैठकीत मार्गदर्शन करीत असताना वडेट्टीवार बोलत होते. व्यासपीठावर आमदार अभिजित वंजारी, माजी खासदार खुशाल बोपचे, ओबीसी नेते शेखर सावरबांधे, ओबीसी अभ्यासक नागेश चौधरी, ओबीसी नेते ईश्वर बाळबुधे, ओबीसी नेते ज्ञानेश वाकुडकर, अॅड. किशोर लांबट, ओबीसी युवा अधिकार मंचचे उमेश कोर्राम यांची प्रमुख उपस्थिती होती. तीन तास चाललेल्या या मॅरेथॉन बैठकीत संघटनांच्या नेत्यांनी मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षण देण्यासंदर्भात स्पष्ट विरोध दर्शविला. विजय वडेट्टीवार म्हणाले, आज ओबीसींसाठी लढताना अनेकदा आर्थिक चणचण जाणवते. पण, नेत्यांना ओबीसींची भीती वाटू लागताच ही अडचण आपसूकच दूर होईल. ओबीसींच्या लढ्यासाठी प्रसंगी हात पसरू पण न्यायालयीन लढाईसाठी कुठेही आर्थिक अडचण येऊ देणार नाही, अशी ग्वाहीदेखील दिली. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने काढलेल्या शासन निर्णयातून ओबीसींचे नक्कीच नुकसान होणार आहे. २७ टक्के आरक्षणातून १३ टक्के आधीच वजा होते. उरलेल्या १९ टक्क्यांतही मराठा समाजाला आरक्षण दिल्यास ओबीसींना किती उरणार? ओबीसींचा हक्कच संपण्याची शक्यता आहे. कुणी कुठल्याही पक्षाचा असला तरी आपल्यासाठी झटणाऱ्याला साथ द्या, असे आवाहनही वडेट्टीवार यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आरक्षणाला विरोध आहे. त्यांच्या विचारसणीचे लोक सत्तेत आहेत. त्यांच्याकडून आपण ओबीसी आरक्षणाला धक्का न लागू देण्याची अपेक्षा कशी करू शकतो? आज आपण न्यायालयीन लढाई न लढल्यास ओबीसींना मोठा धक्का बसणार आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण संपविण्याचा त्यांचा डाव असल्याचा धोकाही वडेट्टीवार यांनी वर्तविला. *दोन पातळ्यांवर लढाई लढणार* नागपुरात येत्या १२ सप्टेंबरला प्रमुख ओबीसी नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात जाहीर शासन निर्णयावरील लढाईच्या अनुषंगाने व्यूहरचना निश्चित होईल. मात्र दोन स्तरावर लढाई लढण्याचे शनिवारच्या बैठकीत निश्चित करण्यात आले. पहिली लढाई न्यायालयीन स्तरावर लढली जाणार आहे. विदर्भातून वकील संघटना पूर्ण ताकदीने न्यायालयात बाजू मांडणार आहे. त्यांना ओबीसी संघटनांचा पाठिंबा असेल तर दुसरा लढा आंदोलनाच्या माध्यमातून केला जाईल असेही वडेट्टीवार स्पष्ट केले. कुणावरही अन्याय होऊ नये, ही आमची भूमिका आहे. सोबतच आमच्या हक्काचे संरक्षण होणेही आवश्यक आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, ही आमची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले.
2
comment0
Report
JMJAVED MULANI
Sept 06, 2025 12:30:10
Baramati, Maharashtra:
JAVED MULANI SLUG 0609ZT_INDAPURGANESH FILE 4 पुण्याच्या इंदापुरात गणेश विसर्जनाचा उत्साह....वाजत गाजत लाडक्या बाप्पाला निरोप....महिला वर्ग देखील उत्साहाने सहभागी Anchor _पुण्याच्या इंदापुरात लाडक्या गणपती बाप्पाला निरोप दिला गेला. इंदापूर शहरातील मानाचा पहिला गणपती असणारा सिद्धेश्वर मंदिरातील गणपतीच्या मिरवणुकीला सुरवात झाल्यानंतर त्यापाठोपाठ इतर गणपती बाप्पाच्या मिरवणुकीला सुरवात झाली.यात महिला वर्ग देखील मोठ्या संख्येने आणि उत्साहाने सहभागी झाला होता.
4
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 06, 2025 10:54:43
kolhapur, Maharashtra:
Ngp OBC Wadetiwar live u ने feed पाठवले ---- विजय वडे्टीवार -- *आम्ही न्यायलयीन लढाई आणि रस्त्यावर लढाई लढू* -- *नागपुरात मोर्चा काढणार आहे.आमची कमिटी याबाबत निर्णय घेईल* -- आमचा लढा GR विरोधात -- 12 तारखेला मोर्चाबाबत कमिटी निर्णय घेईल ---छगन भुजबळ न्यायालयात जाणार आहे.. आम्ही त्यांच्यासोबत चर्चावं करू..आमची वकील संघटना न्यायलयात जाणार
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 06, 2025 10:54:39
Kalyan, Maharashtra:
डोंबिवलीत दूषित पाणीपुरवठा नागरिक हैराण ! तीन महिन्यापासून तक्रार देऊन पालिका लक्ष देत नसल्याने उलटी-जुलाब-त्वचारोगांनी त्रस्त नागरिक उतरले रस्त्यावर Anc...डोंबिवली पश्चिमेकडील कैलासनगर परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून नळाला दूषित पाणी येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या दूषित पाण्यामुळे त्यांना उलट्या, जुलाब आणि त्वचेचे आजार होत आहेत. अनेक तक्रारी करूनही पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत रस्त्यावर उतरून अधिकाऱ्यांना जाब विचारला तर माजी नगरसेवकांनी पालिकेने लवकरात लवकर समस्या दूर केली नाही तर मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्याचा इशारा दिला तर या तक्रारीनंतर महानगरपालिकेने सध्या या ठिकाणी काम सुरू केले असून अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ड्रेनेजच् गाडीचा प्रॉब्लेम होता त्यामुळे ही परिस्थिती आहे लवकरच काम पूर्ण होऊन सगळ्यांना स्वच्छ पाणी मिळेल असे आश्वासन दिले Byte...वृषाली जोशी..माजी नगरसेविका Byte:- नागरिक Byte:- पी. सूर्यवंशी ( पाणीपुरवठा अधिकारी )
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 06, 2025 10:46:50
Dhule, Maharashtra:
ANCHOR - नंदुरबार शहरांमध्ये पारंपरिक पद्धतीने गणपती विसर्जन मिरवणुक सुरू आहे. यामध्ये लोकप्रतिनिधी देखील आपली उपस्थिती नोंदवत आहेत. आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यासह माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनीही बाप्पाच्या मिरवणूक विसर्जन मिरवणूक मध्ये सहभाग नोंदवला. यावेळेस माजी खासदार हिना गावित यांनी अन्य महिला भक्तांसह ठेका धरत बाप्पाला निरोप दिला. प्रथम मानाच्या दादा गणपतीच्या विसर्जनात हिना गावितांचा ढोल ताशावर ठेका धरला. हीना गावित दर वर्षी गणपती बाप्पाच्या मिरवाणुकीत सर्व सामान्य भक्तांसह मिरवाणुकीत पारंपरिक नृत्य करत बाप्पाला निरोप देतात. दादा गणपतीची विसर्जन मिरवणूकच्या उत्साहात हिना गावितांचे नृत्य सर्वांच्या आकर्षनाच केंद्र असत. प्रशांत परदेशी, नंदुरबार.
2
comment0
Report
Sept 06, 2025 10:43:01
Waghapur, Maharashtra:
यवतमाळ, दि. ६ सप्टेंबर – मार्च–एप्रिल महिन्यात उपचाराअभावी मृत्यू झालेल्या गर्भवती माकडीन प्रकरणी अजूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रा. पंढरी पाठे यांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणासाठी तत्कालीन रेंज फॉरेस्ट ऑफिसर अमर सिडाम जबाबदार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एसीएफ निलेश सोनवणे यांनी चौकशीचे आश्वासन दिले होते, मात्र सहा महिने उलटूनही कारवाई झाली नाही. उलट चौकशीची जबाबदारी नव्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आल्याने या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बाजारात पैसे घेतल्याच्या चर्चांना दुजोरा देत पाठे यांनी स्पष्ट केले की “मी कधीही पैशाच्या बदल्यात तडजोड करत नाही.” संपूर्ण चौकशी पारदर्शक होण्यासाठी ही जबाबदारी पुन्हा एसीएफ निलेश सोनवणे यांची
7
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 06, 2025 10:18:32
Washim, Maharashtra:
वाशिम: File:0609ZT_WSM_SHIVMAHIMA_DANCE_GROUP रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशीम अँकर: वाशीम शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला वर्षानुवर्षे एक वेगळेपण देणारे प्रमुख आकर्षण म्हणजे उत्तराखंड येथील ‘शिव महिमा’ हा नृत्य ऑर्केस्ट्रा कार्यक्रम. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी शहरातील दिघेवाडी परिसरात हेडा परिवाराच्या वतीने मोठ्या उत्साहात काढल्या जाणाऱ्या मिरवणुकीत हा सांस्कृतिक देखावा गणेशभक्तांचे विशेष लक्ष वेधून घेतो. शिवमहिमेवरील नृत्यरचना, भक्तिरसाने ओतप्रोत गीत-संगीत आणि दिमाखदार सादरीकरणामुळे संपूर्ण वातावरणात आध्यात्मिकता आणि सांस्कृतिक रंग भरले जातात.वर्षानुवर्षे या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची परंपरा हेडा परिवाराने जोपासली आहे. या कुटुंबाच्या वतीने विसर्जन मिरवणुकीत हजारो गणेशभक्तांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन केले जाते.भक्तीभाव, सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक जतन यांचा संगम या माध्यमातून साधला जातो. शहरातील नागरिक, तरुणाई तसेच लहान मुलांमध्ये ‘शिव महिमा’ नृत्य ऑर्केस्ट्राबाबत प्रचंड उत्सुकता असते. ढोल-ताशांच्या गजरात वाजणारे पारंपरिक सूर आणि आधुनिक प्रकाशयोजना यामुळे संपूर्ण मिरवणूक देखणी आणि अविस्मरणीय ठरते.
6
comment0
Report
Advertisement
Back to top