Back
मनोज जरांगे पाटील यांचा खोपोलीत भव्य स्वागत, मराठा समाजाचा उत्साह!
PPPRAFULLA PAWAR
Aug 29, 2025 01:30:34
Raigad, Maharashtra
स्लग - मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्याचे खोपोलीत स्वागत .......
अँकर - मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा ताफा पहाटे सव्वातीन वाजता खोपोली शहरात पोहोचला. खोपोलीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजाच्या वतीने त्यांच्या ताफ्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी जरांगे पाटील गाडीतच आराम करत होते. त्यामुळे खोपोलीतील समर्थकांचे अभिवादन ते स्वीकारू शकले नाहीत. जुन्या मुंबई पुणे हायवेने त्यांचा ताफा मुंबईकडे रवाना झाला. रायगडकर मराठा बांधव देखील या आंदोलनात सहभागी होत असून यावेळी आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा निर्धार सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक सुनील पाटील यांनी व्यक्त केला.
बाईट - सुनील पाटील, राज्य समन्वयक, सकल मराठा समाज
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
LBLAILESH BARGAJE
FollowAug 29, 2025 10:52:52Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- अजित पवार शेतकरी कर्जमाफी
फीड 2C
Anc:-
शेतकरी कर्जमाफीपासून आमचे सरकार बाजूला गेलेलं नाही, योग्य वेळ आल्यानंतर आम्ही शेतकरी कर्जमाफी देऊ असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी श्रीगोंदा येथे शेतकरी मेळाव्यात बोलताना केले...मात्र जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत निदान शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाचे व्याज तरी भरले पाहिजे असं अजित पवार म्हणाले... कर्जमाफीबाबत अभ्यास करण्यासाठी एक कमिटी नेमली असून सातत्याने कर्जमाफीवरच आपले चालेल असं शेतकऱ्यांनी समजू नये असंही अजित पवारांनी म्हंटलंय.
साऊंड बाईट:- अजित पवार, उपमुख्यमंत्री
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 29, 2025 10:48:34Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात गणेशोत्सवात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांना अनोख्या पद्धतीने पाठिंबा ( 1 to 1 )
- सोलापुरात मराठा समाजाच्या आरक्षणाला अनोख्या पद्धतीने पाठिंबा
- गणपती बाप्पाच्या सजावटी मध्ये संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचे लावण्यात आले पोस्टर
- मुंबईत आंदोलनाला न पोहचता आल्याने जाधव कुटूंबियांचा अनोखा पाठिंबा
- आरक्षण घेऊनच आमचा बाप्पा घरी पोहचण्याची व्यक्त केली अपेक्षा
याविषयीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी.... ( WKT )
4
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 29, 2025 10:48:24Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2908ZT_CHP_SPORTS_DAY_1_2
( 2 file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपुरात मेजर ध्यानचंद जयंती दिनानिमित्त क्रीडा दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन, शहरातील सरदार पटेल महाविद्यालयात विद्यापीठ स्तरीय खेळाडूंचा सत्कार, हँडबॉलचे देशाचे माजी राष्ट्रीय कर्णधार इंद्रजीत सिंग रंधावा यांची उपस्थिती
अँकर:-- हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंती दिनानिमित्त अर्थात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त चंद्रपुरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शहरातील सरदार पटेल महाविद्यालयात यानिमित्त हँडबॉलचे देशाचे माजी राष्ट्रीय कर्णधार डॉ. इंद्रजीतसिंग रंधावा यांच्या उपस्थितीत विशेष सोहळा आयोजित करण्यात आला. गेल्या दोन वर्षात विद्यापीठस्तरीय विविध क्रीडा प्रकार खेळलेल्या महाविद्यालयाच्या खेळाडूंचा कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आपले विचार व्यक्त करताना डॉ. रंधावा यांनी मोबाईल बाजूला सारत आपल्या ध्येयाप्रती उत्तम डायटसह तयारी करत कोणताही क्रीडा प्रकार सहज आत्मसात करता येतो असे विचार मांडले. खेळाच्या सफलतेसाठी कुठलाही शॉर्टकट नाही यावर त्यांनी भर दिला.
बाईट १) डॉ. इंद्रजितसिंग रंधावा, आंतरराष्ट्रीय हँडबॉलपटू
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
2
Report
SMSATISH MOHITE
FollowAug 29, 2025 10:45:56Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Dam
Feed on - 2C
----------------------------
Anchor - नांदेड शहरातील गोदावरी नदीवर असलेल्या विष्णुपुरी प्रकल्पाचे अकरा दरवाजे उघडण्यात आले आहेत. नांदेड जिल्हयात गेल्या दोन दिवसापासुन मुसळधार पाऊस सुरु आहे. आज पहाटेपासुन तुफान पावसाने थैमान घातले असून अतिवृष्टीची नोंद झालीये. पावसामुळे गोदावरी नदीत पाण्याची आवक वाढली आहे. गोदावरी नदीला पूर देखील आलाय. पाण्याची आवक सुरूच असल्याने विष्णुपुरी धरणाचे अकरा दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून 1 लाख 30 हजार क्युसेस इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सूरू आहे. विष्णुपुरी धरणाला एकूण अठरा दरवाजे आहेत. त्यापैकी अकरा दरवाजे उघडण्यात आले. यावर्षी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. गोदावरी नदीला पुर आल्याने नदिकाठच्या गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
---------------------------
4
Report
MAMILIND ANDE
FollowAug 29, 2025 10:32:42Wardha, Maharashtra:
वर्धा ब्रेकींग
SLUG- 2908_WARDHA_DEATH
वर्ध्याच्या जैतापुर येथे विजेच्या धक्क्याने 29 बकऱ्यांचा मृत्यु
जोरदार पावसात विजांचाही कडकडाट 29 बकऱ्यांचा जीव घेऊन गेला
पशुपालकांचे 5 लाख 80 हजारांचे नुकसान
बकऱ्या शेतशिवारात चरत असतांना बाजूला आकाशातून पडलेल्या विजेच्या जोरदार धक्क्याने बकऱ्या मृत
बकऱ्यांचा रखवालंदार थोडक्यात बचावले
4
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 29, 2025 10:30:34Jalna, Maharashtra:
FEED NAME : 2908ZT_JALNA_WAGHMARE(3FILES)
जालना :जरांगेंच्या आंदोलनात नियम पाळले जात नसतील तर कारवाई करा
जरांगे यांच्या आंदोनात सर्व झुंडशाही करणारे आंदोलक
कधीही,कुठेही आंदोलन करण्याचा यांचा ईतिहास
आम्ही आंदोलनात नियम पाळले नसतील तर आमच्यावरही कारवाई करा
मराठ्यांनी ओबीसीत घुसखोरी करून प्रमाणपत्र काढले
ओबीसीतील राजकीय आरक्षण लाटण्याचा यांचा राजकिय कट
राज्य अस्थिर करण्याचं यांचं षड्यंत्र
अँकर : ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थामधील राजकीय आरक्षण संपवण्याचा जरांगे यांनी राजकीय घाट घातलेला असून जरांगे यांना पाठिंबा देणाऱ्या राजकीय नेत्यांना ओबीसी संपवल्याशीवाय राहणार नाही असा निर्धार ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी बोलून दाखवला आहे.ते जालन्यात बोलत होते.जरांगेंच्या आंदोलनात नियम पाळले जात नसतील तर कारवाई करा अशी मागणीही वाघमारे यांनी केली आहस.
जरांगे यांच्या आंदोनात सर्व झुंडशाही करणारे आंदोलक असून कधीही,कुठेही आंदोलन करण्याचा यांचा ईतिहास असल्याचा हल्लाबोल वाघमारे यांनी केला आहे.आम्ही आंदोलनात नियम पाळले नसतील तर आमच्यावरही कारवाई करा अशीही मागणी वाघमारे यांनी केली आहे.मराठ्यांनी ओबीसीत घुसखोरी करून प्रमाणपत्र काढले असा आरोप देखील त्यांनी केला.ओबीसीतील राजकीय आरक्षण लाटण्याचा यांचा राजकिय कट असून
राज्य अस्थिर करण्याचं यांचं षड्यंत्र असल्याचं वाघमारे यांनी म्हटलं आहे.
बाईट : नवनाथ वाघमारे, ओबीसी आंदोलक
2
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 29, 2025 10:08:56Washim, Maharashtra:
वाशीम :
File:2908ZT_WSM_BRIDGE_CRACK
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशीम
अँकर : वाशिमच्या मानोरा तालुक्यातील शेंदोना गावाजवळचा पूल पुरामुळं खचल्यानं पोहरादेवी ते शेंदोना या मार्गावरील वाहतूक पूर्ण बंद झाली असून शेंदोना येथील गावाकऱ्यांना तालुक्याला येणं कठीण झालय. काल सायंकाळी या भागात मुसळधार पाऊस झाला होता त्यामुळं नाल्याला पूर येऊन पूल पूर्णपणे खचला. गावाकऱ्यांना आता यवतमाळ जिल्ह्यातून ये जा करावी लागतेय. या पुलाची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी गावाकऱ्यांनी केलीये.
8
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowAug 29, 2025 09:18:59Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_MP_BYTE एक फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं पाहिजे; काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांची मागणी
अँकर :– मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले असून जरांगे पाटील यांनी मुंबईत आमरण उपोषण सुरू केले आहे यावर अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं पाहिजे अशी मागणी काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी केली आहे. येणाऱ्या काळात मनोज जरांगे पाटील यांच आंदोलन दडपल्या जाईल असाही संशय खासदार बळवंत वानखडे यांनी केला आहे. दुसऱ्याचा आरक्षण काढून मराठ्यांना आरक्षण नको मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या केंद्र सरकारने आंदोलनाची पार्श्वभूमी पाहता स्पेशल अधिवेशन घेतलं पाहिजे व मराठ्यांचा प्रश्न निकाली काढला पाहिजे भाजपने काँग्रेसवर आरोप करू नये भाजपचीच स्पष्ट भूमिका असली पाहिजे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी खाली आणी वर त्यांच सरकार आहे त्यामुळे त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावे असेही बळवंत वानखडे म्हणाले आहे.
बाईट :– बळवंत वानखडे, खासदार
14
Report
Yavatmal, Maharashtra:
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्या विविध मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात बेमुदत आंदोलनाला सुरुवात झाली आहे. शासन निर्णय दि.१४ मार्च २०२४ नुसार नियमित शासन सेवेत समायोजन,बदली धोरण,वेतनवाढ, आरोग्य व अपघातविमा यांसह इतर मागण्यांकरीता हे आंदोलन छेडण्यात आले आहे.
१९ ऑगस्टपासून जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयासमोर आंदोलन सुरू झाले.आज आंदोलनकर्त्यांनी संविधान चौकातून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले. त्यानंतर जिल्हाधिकारी यवतमाळ यांनाही संघटनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.
14
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowAug 29, 2025 08:03:38Parbhani, Maharashtra:
अँकर- हिंगोली जिल्ह्यातील विविध भागात आज जोरदार मुसळधार पाऊस झालाय, यामुळे जिल्ह्यातील अनेक नदी ओढे नाले प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे अनेक भागातील गावांचा संपर्क तुटलाय. कळमनुरी आणि वसमत तालुक्याला तर पावसाचा चांगलाच तडाखा बसलाय,कळमनुरी शहरात झालेल्या पावसाचे पाणी नालीत बसत नसल्याने अनेकांच्या घरात शिरले आहेत. यामुळे नागरिकांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू भिजून खराब झाल्याची माहिती आहे.
14
Report
KJKunal Jamdade
FollowAug 29, 2025 08:02:37Shirdi, Maharashtra:
Sangmner News Flash
*काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात प्रतिक्रिया ऑन मनोज जरांगे आंदोलन, ओबीसी मागणी -*
मनोज जरांगेंचे आंदोलन गरजवंत मराठ्यांसाठी...
*सरकारने तातडीने या आंदोलनाची दखल घेतली पाहिजे...*
*मात्र ज्यांना अध्यक्ष केले त्यांना वेळ नाही...*
*ते मतदारसंघातच छोटी मोठी कामे करत फिरताय...*
ज्यांना अध्यक्ष केले त्यांनी गेलं पाहिजे, आंदोलकांशी बोललं पाहिजे...
मात्र अजून त्यांना वेळ मिळालेला दिसत नाही...
*बाळासाहेब थोरात यांची विखे पाटलांवर टीका...*
*ऑन ओबीसीतून आरक्षण, जरांगेंची मागणी -*
*ओबीसींना धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देणे शक्य, ते दिलं पाहिजे...*
केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार...
हा लोकांच्या हिताचा विषय, केंद्राने ठरवलं तर आरक्षण मिळू शकते...
14
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 29, 2025 07:32:24Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2908ZT_CHP_OBC_ANGRY
( single file sent on 2C)
टायटल:-- मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील उपोषणाच्या मुद्द्यावर ओबीसी नेत्यांची संतप्त प्रतिक्रिया, घटनाबाह्य मागण्या अशाच सुरू राहिल्या तर आम्हीही रस्त्यावर उतरून संघर्ष करू, ओबीसी नेते प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे यांचा इशारा
अँकर:--मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील उपोषणाच्या मुद्द्यावर ओबीसी नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. घटनाबाह्य मागण्या अशाच सुरू राहिल्या तर आम्हीही रस्त्यावर उतरून संघर्ष करू असा इशारा ओबीसी नेते प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे यांनी दिला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांना लक्ष्य करणे हे चुकीचे असून जरांगे यांनी केलेल्या वैयक्तीक टीकेचा ओबीसी नेत्यांनी निषेध केलाय. फडणवीस यांनीच 10 टक्के आरक्षण दिले आहे मात्र आता मराठ्यांचा ओबीसी प्रवर्गात सरसकट समावेश हे चुकीचे आहे असे सांगत हे दबावाचे राजकारण आहे,कोण करतंय सर्वांना माहीत आहे असा टोला डॉ. जीवतोडे यांनी लगावला. याआधीच्या मराठा मुख्यमंत्र्यांना हे शक्य झाले नाही. कोणत्याही कोर्टात हे टिकणार नाही असेही भाजपच्या ओबीसी राज्य सेलचे उपाध्यक्ष असलेल्या जिवतोडे यांनी म्हटले आहे.
बाईट १) प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे, ओबीसी नेते
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
14
Report
PNPratap Naik1
FollowAug 29, 2025 07:32:06Kolhapur, Maharashtra:
Kop Maratha Andolan WT
Feed:- Live U
Anc :- कोल्हापुरात देखील सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आल. कोल्हापुरातील दसरा चौक इथं मराठा समाजाच्या वतीने एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आलं. यावेळी सरकारने कोणत्याही परिस्थितीत सरसकट आरक्षण द्यावे अन्यथा आम्ही देखील मुंबईकडे कूच करू अशी भूमिका मराठा समाजाच्या सदस्याने व्यक्त केली आहे.
Play WT
14
Report
AKAMAR KANE
FollowAug 29, 2025 07:03:42kolhapur, Maharashtra:
Ngp Bawankule Byte
live u ने फीड पाठवले
----------
On MVA भूमिका
* देशात विविध आंदोलने होत असताना, ews दहा टक्के आरक्षण मिळाले, आज नोकरी, शिक्षण मध्ये त्याचा देशभर फायदा मिळतो आहे.. फडणवीस सरकारने ews आरक्षण आणि सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाला सर्वाधिक लाभ मिळवून दिले..
* obc चे 1 टक्के आरक्षण ही जाऊ द्यायचे नाही, ही भाजपची भूमिका आहे.. मराठा समाजाला ही न्याय देण्याची भाजपची भूमिका आहे.. मात्र काँग्रेसची भूमिका काय, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या या संदर्भात काँग्रेसची भूमिका काय?? नाना पटोले, वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण या काँग्रेस नेत्यांनी त्याबद्दल भूमिका स्पष्ट करावी.
On काँग्रेस भूमिका
* काँग्रेस नेहमीच ओबीसींच्या विरोधात राहिली आहे.. त्यांनी कधीच ओबीसींना न्याय दिलेले नाही.. आज जर काँग्रेस खुला पाठिंबा जरांगेच्या आंदोलनाला देत असेल तर त्या आंदोलनाची भूमिका काय हे ही त्यांनी लक्षात घ्याव?? आधीच ओबीसी च्या 353 जातींना असलेले आरक्षण कमी आहे, अशात ओबीसीचे आरक्षण काढून मराठा समाजाला देणे योग्य ठरणार नाही, ते अन्यायकारक होईल..
On महायुती भूमिका
* आमच्या सरकारची भूमिका राहिली आहे, कुठल्याही समाजाचा आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देऊ नये. ओबीसीचा आरक्षण मराठ्यांना देणे किंवा मराठ्यांचा आरक्षण ओबीसींना देणे योग्य ठरणार नाही.. भाजप आणि आमचे सरकार सर्व समाजासोबत एकसारखेपणाने उभी आहे..
* काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे.. जरांगेच्या आंदोलनाला समर्थन देताना त्यांची भूमिका काय हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे..
On शरद पवार भूमिका
* शरद पवार यांनी त्यांचा म्हणणं मांडलं पाहिजे, एवढं मोठं आंदोलन सुरू असताना शरद पवार गप्प का आहे..??
* आम्ही आमची भूमिका मांडली आहे की मराठ्यांना न्याय देताना ओबीसी वर अन्याय करू नका किंवा मराठ्यांवर ही अन्याय होऊ देऊ नका.. काँग्रेस आणि मविआ ने आपली भूमिका स्पष्ट करावी...
On सरसकट मागणी
* या संदर्भात जे सर्वेक्षण झाले.. त्यामध्ये जेवढ्या ओबीसीकडे पिढ्यां पिढ्या आवश्यक डॉक्युमेंट्स आहे, मात्र त्यांच्याकडे जात प्रमाणपत्र नव्हते, त्यांना ओबीसी मध्ये घेण्यात आलं.. अजूनही सर्वेक्षण सुरू आहे.. ती सतत चालणारी प्रक्रिया आहे..
* पण सरसकट हा जो शब्द आहे, या शब्दाला आमचा विरोध आहे.. सरसकट होऊ शकत नाही.. संपूर्ण 353 जातीमध्ये आधीच आरक्षण कमी आहे.. त्यामुळे असं सरसकट न मागता ज्यांच्याकडे आवश्यक दस्तावेज आहे, त्यांना ओबीसी चे आरक्षण दिले जाईल. त्याला कोणीही नाही म्हणत नाही. सर्वेक्षण सुरूच आहे...
On शरद पवार पक्ष मौन ( कोणीही बोलू नये असे आदेश)
* न बोलणे म्हणजे काय? न बोलण्याचे अर्थ महाराष्ट्र समजतो. इतर सर्व मुद्द्यांवर तर तुम्ही बोलताना मग ही चुप्पी कशासाठी आहे?? मनोज जरांगेच्या आंदोलनाबद्दल तुम्ही बोलले पाहिजे.. तुमची भूमिका राज्याला कळली पाहिजे.. ओबीसींना, मराठ्यांना तुमची भूमिका कळली पाहिजे.. शरद पवार आणि काँग्रेसची भूमिका काय हे कळलं पाहिजे.. टीका करण्यापेक्षा राजकीय भूमिका घ्या मात्र ते भूमिका घेत नाही आहे...
On जरांगे परवानगी वाढवण्याची मागणी..
* हे उच्च न्यायालय आणि आंदोलकांमधील बाब आहे. त्यामध्ये मी बोलणार नाही. आंदोलकांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. उच्च न्यायालयाचे अधिकार उच्च न्यायालयाला आहे. त्यामध्ये आम्ही बोलणे योग्य नाही. त्याबद्दल उच्च न्यायालय निर्णय घेईल...
On ओबीसी महासंघ आंदोलन -
* या राज्यात ओबीसी आणि मराठी गुण्यागोविंदाने राहत आहे... राज्याचा सर्वसाधारण मराठा समाज वेगळ्या भूमिकेत नाही आहे. मराठा समाजाने आम्हाला साथ दिली आहे, मतदान केलं आहे. ओबीसी समाजानेही आम्हाला मतदान केलं आहे. त्यामुळे आमचं सरकार सर्व समाजासोबत आहे. मात्र एकाच्या ताटातला काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणं ही भूमिका कोणालाही मान्य नाही...
On जरांगे सोबत चर्चा
* सरकारची आधीपासूनच आंदोलनकर्त्यांशी सहकार्याची भूमिका आहे आणि मंत्री, खासदार, आमदार त्यांच्या सोबत चर्चा करत आहे.. मुख्यमंत्र्यांची भूमिका नेहमी सहकार्याची आहे. आंदोलनकर्ते जी मागणी करत आहे, आणि जे नियमात बसत आहे त्या संदर्भात सरकार विचार करत आली आहे.. मराठ्यांना सर्वाधिक न्याय देण्याचा काम फडणवीस आणि शिंदे सरकारने केलं आहे.. आमचंच सरकार मराठा समाजाला न्याय देत आहे.. पन्नास वर्षे शरद पवार आणि काँग्रेसने कधीच केलं नाही..
14
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowAug 29, 2025 07:00:50Parbhani, Maharashtra:
अँकर- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी मराठा योद्धा मनोज रंगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीला आपला पाठिंबा दर्शवलाय. मनोज जरांगे पाटील हे स्वतःसाठी तुमच्याकडे काही मागत नाहीयेत,ते समाजासाठी गौर गरीब मराठ्यांसाठी आरक्षण मागत आहेत. मराठा समाजाची वाईट परिस्थिती झाली असून मराठा समाजाला आरक्षण देऊन समाजाच पुण्य वाटुन घेण्याची मागणी खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केलीय. सरकारने अगोदर काही भूमिका घेतली असती आज ही परिस्थिती उद्भवली नसती. कदाचित जरांगे पाटलांनी तुमची विंनती मान्य केली असती. पण तुम्ही काही बोलायलाच तयार नव्हते,तुम्ही म्हणत होते पोलीस बघून घेतील.आंदोलक निघणार म्हटलं की तुम्ही कोर्टात जाता,कोर्ट तुम्हाला एका दिवसात आदेश देते,पार्टीला शोकास्ट सुद्धा दिलं जात नाही,राजा बोले अन हले अशी परिस्थिती सरकारची सुरू असल्याचा आरोप परभणीचे खासदार संजय जाधव यांनी केलाय. त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी...
121 संजय जाधव
13
Report