Back
मनोज जरांगे आंदोलन: बाळासाहेब थोरात यांची तीव्र टीका!
KJKunal Jamdade
Aug 29, 2025 08:02:37
Shirdi, Maharashtra
Sangmner News Flash
*काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात प्रतिक्रिया ऑन मनोज जरांगे आंदोलन, ओबीसी मागणी -*
मनोज जरांगेंचे आंदोलन गरजवंत मराठ्यांसाठी...
*सरकारने तातडीने या आंदोलनाची दखल घेतली पाहिजे...*
*मात्र ज्यांना अध्यक्ष केले त्यांना वेळ नाही...*
*ते मतदारसंघातच छोटी मोठी कामे करत फिरताय...*
ज्यांना अध्यक्ष केले त्यांनी गेलं पाहिजे, आंदोलकांशी बोललं पाहिजे...
मात्र अजून त्यांना वेळ मिळालेला दिसत नाही...
*बाळासाहेब थोरात यांची विखे पाटलांवर टीका...*
*ऑन ओबीसीतून आरक्षण, जरांगेंची मागणी -*
*ओबीसींना धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देणे शक्य, ते दिलं पाहिजे...*
केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार...
हा लोकांच्या हिताचा विषय, केंद्राने ठरवलं तर आरक्षण मिळू शकते...
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowAug 29, 2025 13:05:05Jalna, Maharashtra:
FEED NAME : 2908ZT_JALNA_JARANGE_PKG
जालना :जरांगे उपोषण पॅकेज
*पहिलं उपोषण*
२९ ऑगस्ट २०२३- जरांगे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले
1 सप्टेंबर - जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी दगडफेक आणि लाठीमार
14 सप्टेंबर - जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून शरब पिऊन पहिलं उपोषण सोडलं.
14 सप्टेंबर - शिंदेंना सरसकट मराठ्यांना कुणबी आरक्षण देण्यासाठी 40 दिवसांची मुदत दिली.
40 दिवसांत जरांगे यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन देण्यात आल्यानं जरांगे यांनी पहिलं उपोषण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सोडलं.
14 ऑक्टोबर रोजी 2023 रोजी जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे सर्वात मोठी ईशारा सभा घेतली आणि या सभेने सरकार हादरल
*दुसरे उपोषण*
२५ ऑक्टोबर २०२३ - सरकारने आरक्षणाबाबत कोणतीही हालचाल न केल्यामुळं पुन्हा उपोषण सुरू
३० ऑक्टोबर - माजलगाव आणि बीडमध्ये हिंसाचार आणि जाळपोळ
०२ नोव्हेंबर - जरांगेंचं दुसरं उपोषण मागे, न्यायमूर्ती एम जे गायकवाड, सुनील शुक्रे, उदय सामंत , धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत उपोषण मागे,
मुंडे आणि सामंत यांनी 2 जानेवारीपर्यत जरांगे यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं. त्यामुळे जरांगे यांनी दुसरं उपोषण सोडलं.
*तिसरे उपोषण*
मुंबईतील वाशी येथे मोर्चा आणि उपोषण करण्यात आलं
२० जानेवारी २०२४ - मराठा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना
अंतरवाली सराटी पासून पद यात्रेस सुरुवात...
२६ जानेवारी रोजी वाशी मार्केट मध्ये मराठा मोर्चाने धडक दिली
२७ जानेवारी रोजी वाशी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गिरीष महाजन यांच्या हातून सगे सोयरे अध्यादेशाचा मसुदा घेऊन जरांगे माघारी परतले आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उपोषण देखील सोडलं
सगे सोयरे कायद्याचा मसुदा जरांगेना सुपूर्द करण्यात आल्यानं जरांगे यांनी मुंबई शहरात न शिरता थेट मसुदा घेऊन माघार घेत अंतरवाली सराटी गाठली.
*चौथे उपोषण..*
१० फेब्रुवारी २०२४ - मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्रासाठी. सगे सोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी उपोषण
२० फेब्रुवारी - विधान सभेचे विशेष अधिवेशन
मराठ्यांना 10 टक्के आरक्षणाचं विधेयक विधानसभेत मंजूर
२५ फेब्रुवारी - मुंबईतील सागर बंगल्यावर निघालेल्या जरांगेंना रोखलं.
२६ फेब्रुवारी -17 व्या दिवशी महिलांच्या हस्ते सरबत पिऊन उपोषण सोडले.
मात्र या उपोषणात जरांगे यांनी सरकारला शिवीगाळ केल्याचा आरोप झाला.त्यामुळे सरकारने जरांगे यांच्याकडे शिष्टमंडळ पाठवलण्याची तसदी घेतली नाही.त्यामुळे जरांगे यांची तब्बेत खालावल्याच चित्र बघून ग्रामस्थ महिलांनीच जरांगे यांना हे उपोषण मागे घ्यायला भाग पाडलं. हे उपोषण सोडवताना जरांगे यांना कोणतही आश्वासन मिळालं नाही.
*पाचवे उपोषण*
४ जून २०२४ पासुन पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात
उपोषणाच्या सहाव्या दिवशी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली.
१० जून रोजी उपोषण सोडण्यासाठी मंत्री शंभूराजे देसाई यांची शिष्टाई यशस्वी झाली.
मनोज जरांगे यांनी सरकारला एक महिन्याचा वेळ देत उपोषण स्थगित केलं.
मंत्री शंभूराजे देसाई हे शब्दाचे पक्के असल्याचा जरांगे यांचा विश्वास होता.त्यामुळे शंभूराजे यांच्यावर विश्वास ठेवून जरांगे यांनी एक महिन्याची मुदत देऊन हे उपोषण स्थगित केलं.
*सहावे उपोषण*
२० जुलै २०२४ रोजी सहावे उपोषण सुरु
सरकारने उपोषणाकडे दुर्लक्ष केले. २४ जुलै रोजी
पाचव्या दिवशी अंतरवाली सरातील महिलांच्या हस्ते शरबत पिऊन मनोज जरांगे पाटील यानी आमरण उपोषण स्थगित केलं.
हे उपोषण सोडवण्यासाठी देखील एकही शिष्टमंडळ सरकार कडून आलं नाही.जरांगे यांची तब्बेत खालावत असल्यानं महिलांच्या आग्रहाने जरांगे यांनी कोणत्याही आश्वासनाशिवाय हे उपोषण मागे घेतल
*सातवे उपोषण*
प्रजासत्ताक दिवसापूर्वी २५ जानेवारी २०२५ रोजी मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उपोषणाला सुरवात.
सगेसोयरे अध्यादेश, सरसकट ओबीसी प्रमाणपत्र या जुन्या मागण्यासाठी मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत.मनोज जरांगेंचे हे ७ वे उपोषण आहे.
मनोज जरांगे यांचे ३० जानेवारी रोजी सहाव्या दिवशी उपोषण स्थगित.
जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ लेखी आश्वासन घेऊन या ठिकाणी आलेत.मनोज जरांगे यांनी ८ मागण्या केल्या होत्या,मुख्यमंत्री ४ मागण्यांबाबत सकारात्मक आहेत.आमदार सुरेश धस आणि मराठा उपोषण कर्त्यांना पाणी पाजून मनोज जरांगे यांनी इतर आंदोलकांचे उपोषण सोडले.
आमदार सुरेश धस यांनी जरांगे यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेण्याचं आश्वासन दिल्यानं हे उपोषण जरांगे यांनी धस यांच्यावर विश्वास ठेऊन मागे घेतल।
*आठवे उपोषण २९ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईत आझाद मैदानावर सुरू*
अंतर वाली सराटी येथे 7 उपोषण करूनही दोन वर्षात सरकारने कोणत्याही मागण्या पूर्ण केल्या नाहीत.त्यामुळे जरांगे मुंबईत धडकले आणि त्यांनी पहिल्यांदाच आझाद मैदान गाठत उपोषण सुरू केलं.
4
Report
JJJAYESH JAGAD
FollowAug 29, 2025 12:00:33Akola, Maharashtra:
Anchor : अकोल्यात आज सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काल सुद्धा सुमारे दोन तास मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. तर आजही पावसाने बरसून वातावरण आनंदी केले.सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे शहरात आणि ग्रामीण भागात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे.हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस अकोल्यात अधूनमधून पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. मात्र रोज बरसणाऱ्या या पावसाचा गणेशोत्सवावर मोठा परिणाम होत आहे.
10
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 29, 2025 11:51:48Washim, Maharashtra:
वाशीम:
File:2908ZT_WSM_ARUNAVATI_RIVER_FLOOD
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशीम
अँकर:वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना मोठा पूर आला आहे. कोडोली गावाजवळील अरुणावती नदीला मोठा पूर आला असून पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगाने वाहत आहे.नदीच्या पाण्याने दुधारी स्वरूप धारण केल्याने परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने कोडोली पुलावर जमले आहेत.
8
Report
KJKunal Jamdade
FollowAug 29, 2025 11:46:45Shirdi, Maharashtra:
Shirdi News Flash
*राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी विमानतळाहून मुंबईकडे रवाना...*
*राज्य सरकारकडून घडामोडींना वेग...*
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर घडामोडींना वेग..
*उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील मुंबईकडे जाण्यासाठी
शिर्डी विमानतळाहून रवाना..*
विशेष विमानाने जाणार मुंबईला...
*उपसमितीची आज तातडीची बैठक होण्याची शक्यता...*
सरकारच्या भुमिकेकडे सकल मराठा समाजाचे लक्ष...
बाईट मुद्दे - राधाकृष्ण विखे पाटील
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझी कुठलीही चर्चा नाही...
मी मुंबईत यासाठी चाललोय , उपोषण कर्त्यासोबत काही चर्चा होते का..? मी माध्यमातून बघितलं त्यांची चर्चेची तयारी...
मला कोणीही मुंबईला बोलावलं नाही , आणि जरांगे यांच्यासोबत माझी कुठलीही चर्चा नाही...
माझी आवश्यकता भासल्यास मी मुंबईत उपस्थित पाहिजे यासाठी मी मुंबईला चाललो..
विखे पाटलांची शिर्डी विमानतळावर प्रतिक्रिया...
उपसमितीची कुठलीही बैठक अद्याप मुंबईत ठरली नाही...
महाविकास आघाडीच्या नेत्यांना आरक्षणापेक्षा राजकारण महत्त्वाचे वाटते...
जरांगे पाटील सकाळी मुंबईत पोहचले आहेत माझा त्यांच्यासोबत संपर्क झाला तर मी त्याच्याशी चर्चा करेल...
ऑन जरांगे वेळ वाढवावा पत्र
हा निर्णय न्यायालयाचा...
वेळेची मुदतवाढ हा प्रशासनाचा विषय..
मुदतवाढ आणखी दिली तरी बसायचं काही कारण आहे असं मला वाटतं नाही...
ऑन पेच
जरांगे यांच्यासोबत अद्याप कुठलीही चर्चा झालेली नाही..
चर्चा झाली तर जरांगे पाटील यावर काय निर्णय घेतात त्यानंतर ठरेल...
त्यामुळे आता बोलण योग्य नाही...
ऑन हाके
लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नांबाबत लुडबूड करू नये..
त्यांना तो अधिकार नाही...
मराठा समाजाचे बांधव आंदोलन करत आहेत त्यांच्या मागण्या ते मांडत आहे त्यांना मांडूद्या...
इतर समाजाच्या लोकांनी मध्ये बोलू नये...
विखे पाटलांनी लक्ष्मण हाके यांचे टोचले कान...
11
Report
JJJAYESH JAGAD
FollowAug 29, 2025 11:38:32Akola, Maharashtra:
Anchor : ओबीसी नेत्यांच्या बैठकीत बोलावले नसल्यामुळे लक्ष्मण हाके आरोपांची सरबत्ती करीत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. हाके यांनी केलेले आरोप निराधार असून त्यांच्या नाराजीमुळेच अशी विधाने केली जात असल्याचे मिटकरी यांनी स्पष्ट केले.यावेळी खोचक शब्दांत प्रत्युत्तर देताना मिटकरी म्हणाले, “हाके जेवताना चटणी-भाकर खातात की काय हे पहावे लागणार आहे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.लक्ष्मण हाके आणि अमोल मिटकरी यांच्यातील या शब्दयुद्धामुळे ओबीसी राजकारणात नवीन वादंग निर्माण झाला आहे.
Byte : अमोल मिटकरी , आमदार राष्ट्रवादी काँग्रेस ( अ. प )
12
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 29, 2025 11:34:47Yavatmal, Maharashtra:
जग सुंदर आहे, जे आपल्यानंतरही कुणी बघू शकतो... त्यामुळे नेत्रदानाचा संकल्प करा आणि मारणोत्तर नेत्ररुपी जगा असा संदेश गणेशोत्सवनिमित्त साकारलेल्या देखव्यातून यवतमाळचे गणेशभक्त जगदीश शर्मा यांनी दिला आहे. सोबतच पर्यावरण संवर्धन करण्यासाठी टाकाऊ वस्तू, ई कचरा फेकून न देता त्याचा सुंदर रोपटे लावण्यासाठी वापर करता येऊ शकतो हे देखील जगदीश शर्मा यांनी आपल्या कल्पकतेतून प्रदर्शित केले आहे. त्यांनी बाप्पासमोर जगातील सात आश्चर्याच्या प्रतिकृती स्वतः थ्री डी प्रिंट करून मांडल्या आहेत. बाप्पांची छोटीशी मूर्ती उघडझाप करणाऱ्या नेत्रांच्या प्रतिकृतीवर स्थापित करण्यात आली असून नेत्रदान कोण आणि कसे करू शकतो, नेत्रदानाचे महत्व काय याबाबत माहिती देण्यात आली आहे.
बाप्पांच्या सभोवताल पर्यावरणाला हानी पोहचवितात अशा शेकडो टाकाऊ वस्तूंचा वृक्षलागवडीसाठी सुरेख पद्धतीने वापर केला आहे. जोडे, पिचकारी, टूथपेस्ट ट्यूब, कुल्हड, इलेक्ट्रिक बटण, बल्ब, मोबाईल, कॉइन बॉक्स, ईस्त्री, कॅसिओ, गिटार, पेन सह अनेक खेळणी, कमोड सीट आदी असंख्य टाकाऊ वस्तूंमध्ये त्यांनी फुलझाडांना वाढवून निसर्ग सौंदर्य खुलविले आहे. कचऱ्यातून कलात्मक पद्धतीने घराची परसबाग समृद्ध करता येते व पर्यावरण संवर्धन करता येते. हे देखील बाप्पांसाठी आकर्षक हँगिंग गार्डन सारखी सजावट करून जगदीश शर्मा यांनी सिद्ध करून दाखविले आहे. म्हणूनच विविध संदेश देणारा हा बाप्पां यवतमाळकरांना भावला आहे.
बाईट : जगदीश शर्मा
11
Report
SNSWATI NAIK
FollowAug 29, 2025 11:34:32Navi Mumbai, Maharashtra:
story slug - मराठा समर्थकांची रेल्वे मधून प्रवास
मराठा समर्थक का ट्रेन से प्रवास
ftp slug - nm maratha samrathak train traveling
shots- train
reporter - swati naik
navi mumbai
anchor - मनोज जारांगे पाटील गांच्या नेतृत्वात मुंबईला आंदोलनाला सुरुवात झाली असून गर्दीमुळे मोठी वाहतूक कोंडी झालेय.
सदर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी मराठा आंदोलकांना रेल्वेने आंदोलनस्थळी जाण्याची विंनती केली होती.
त्यानुसार मराठा आंदोलक रेल्वे ने मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.
आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रेल्वे ने निघाले आंदोलक.
वाशी रेल्वे स्थानकावर मुंबईला जाण्यासाठी लोकांची गर्दी
11
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 29, 2025 11:18:04Jalna, Maharashtra:
FEED NAME : 2908ZT_JALNA_ACCIDENT_UDT_R2(5 FILES)
जालना :ब्रेकिंग
मॉर्निग वाकला गेलेल्या नागरीकाला धडक देऊन पळून जाण्याच्या तयारीत असलेली कार विहिरीत कोसळली,कार मधील 5 जणांचा मृत्यू
राजुर -जाफ्राबाद महामार्गावर भरधाव कार विहिरीत कोसळली
कार मधील 5 जणांचा विहिरीत बुडून मृत्यू ,मृतदेह काढण्यास यश
अँकर : मॉर्निंग वाकला गेलेल्या एका नागरीकाला धडक देत पळून जाण्याच्या गडबडीत असलेली कार विहिरीचे कठडे तोडून विहीरीत कोसळली आहे.या अपघातात कारमधील 5 जणांचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. कारसह 5 जणांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात यश आलं आहे.राजूर-जाफ्राबाद रोडवरील गाढेगव्हाण फाट्यावर आज भल्या पहाटे ही घटना घडलीय.या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.मृत्युमुखी पडलेल्यामध्ये 2 महिलांसह 3 पुरुषांचा समावेश आहे.ज्ञानेश्वर डकले,निर्मला डकले,पद्मिनी भांबीरे,अजिनाथ भांबीरे आणि ज्ञानेश्वर भांबीरे अशी मयतांची नावं आहेत.मयत सर्व गुंगी गेवराई जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि भोकरदन तालुक्यातील कोपरडा येथील रहिवासी असून हे सर्व कारने भल्या पहाटे सुलतानपूर येथे अर्धांगवायू वरील उपचारासाठी जात होते.मात्र गाढे गव्हाण शिवारात येताच कार चालकाने मॉर्निंग वाक साठी जाणाऱ्या दोघांपैकी एकाला धडक दिली.आणि पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना ही कार थेट शेतातील विहीरीत कोसळली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि ग्रामस्थ घटनास्थळी पोहचले आणि आज दुपारी विहिरीत कोसळलेली कार विहीरीबाहेर काढण्यात यश आलं.त्यानंतर मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले.
बाईट : आयुष नोपाणी, अप्पर पोलीस अधीक्षक,जालना
9
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowAug 29, 2025 11:16:34Beed, Maharashtra:
बीड:जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपोषणकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
Anc: बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एका उपोषणकर्त्याने अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलीस प्रशासनाने मध्यस्थी केल्याने वेळीच पुढील अनर्थ टळला. केज तालुक्यातील कासारी गावचे रहिवासी रामहरी महादेव वायबसे यांचे मागील पंधरा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण सुरू आहे. रामहरी वायबसे यांना त्यांचे सख्खे भाऊ डॉक्टर संभाजी वायबसे यांच्याकडून अनेकदा मारहाण झाली. आणि याच प्रकरणात डॉक्टर वायबसे यांच्यावर कारवाई केली जावी. या मागणीसाठी वायबसे यांचे जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर उपोषण सुरू होते. मात्र या उपोषणाची प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने आज संतप्त होत वायबसे यांनी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.
14
Report
SGSagar Gaikwad
FollowAug 29, 2025 11:16:27Nashik, Maharashtra:
Feed send by mozo
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_murder
*निमसे आणि धोत्रे हाणामारी प्रकरण,गंभीर जखमी राहुल धोत्रेचा उपचारादरम्यान मृत्यू...*
*भाजप नेते माजी नगरसेवक उद्धव निमसेना अटक होत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही धोत्रे कुटुंबाची भूमिका...*
अँकर:
पोळा सणाच्या दिवशी नाशिकच्या नांदूर नाका येथे माजी नगरसेवक भाजप नेते उद्धव निमसे आणि धोत्रे या दोन गटात हाणामारी झाली होती. यात निमसे यांच्या मारहाणीत गंभीर झालेल्या राहुल धोत्रेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या हाणामारीचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते. या प्रकरणात नाशिकच्या आडगाव नाका पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. निमसे यांच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक देखील केलेले आहेत तर मुख्य आरोपी असलेले उद्धव निमसे आणि त्यांचे काही साथीदार हे अद्याप फरार आहेत. मात्र त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी धोत्रे कुटुंबाकडून केली जात आहे. जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने या प्रकरणात खुनाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आडगाव पोलीस करत आहेत. नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील राहुल धोत्रेचा शवविच्छेदनासाठी आणण्यात आला असून नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे. उद्धव निमसे यांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी धोत्रे कुटुंबाने केली आहे तर पोलिसांकडून योग्य ती कारवाई सुरू असून गुन्ह्यातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे सांगत सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे. जोपर्यंत आरोपीला अटक करणार नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्र नातेवाईकांनी घेतला आहे...
बाईट- मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त युनिट 1
बाईट- आकाश धोत्रे, मयताचा भाऊ
13
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 29, 2025 11:16:19Jalna, Maharashtra:
FEED NAME : 2908ZT_JALNA_ACCIDENT_UDT(5 FILES)
जालना :ब्रेकिंग
मॉर्निग वाकला गेलेल्या नागरीकाला धडक देऊन पळून जाण्याच्या तयारीत असलेली कार विहिरीत कोसळली,कार मधील 5 जणांचा मृत्यू
राजुर -जाफ्राबाद महामार्गावर भरधाव कार विहिरीत कोसळली
कार मधील 5 जणांचा विहिरीत बुडून मृत्यू ,मृतदेह काढण्यास यश
अँकर : मॉर्निंग वाकला गेलेल्या एका नागरीकाला धडक देत पळून जाण्याच्या गडबडीत असलेली कार विहिरीचे कठडे तोडून विहीरीत कोसळली आहे.या अपघातात कारमधील 5 जणांचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. कारसह 5 जणांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात यश आलं आहे.राजूर-जाफ्राबाद रोडवरील गाढेगव्हाण फाट्यावर आज भल्या पहाटे ही घटना घडलीय.या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.मृत्युमुखी पडलेल्यामध्ये 2 महिलांसह 3 पुरुषांचा समावेश आहे.ज्ञानेश्वर डकले,निर्मला डकले,पद्मिनी भांबीरे,अजिनाथ भांबीरे आणि ज्ञानेश्वर भांबीरे अशी मयतांची नावं आहेत.मयत सर्व गुंगी गेवराई जिल्हा बिड येथील रहिवासी असून हे सर्व कारने भल्या पहाटे सुलतानपूर येथे अर्धांगवायू वरील उपचारासाठी जात होते.मात्र गाढे गव्हाण शिवारात येताच कार चालकाने मॉर्निंग वाक साठी जाणाऱ्या दोघांपैकी एकाला धडक दिली.आणि पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना ही कार थेट शेतातील विहीरीत कोसळली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि ग्रामस्थ घटनास्थळी पोहचले आणि आज दुपारी विहिरीत कोसळलेली कार विहीरीबाहेर काढण्यात यश आलं.त्यानंतर मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले.
बाईट : आयुष नोपाणी, अप्पर पोलीस अधीक्षक,जालना
14
Report
LBLAILESH BARGAJE
FollowAug 29, 2025 10:52:52Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- अजित पवार शेतकरी कर्जमाफी
फीड 2C
Anc:-
शेतकरी कर्जमाफीपासून आमचे सरकार बाजूला गेलेलं नाही, योग्य वेळ आल्यानंतर आम्ही शेतकरी कर्जमाफी देऊ असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी श्रीगोंदा येथे शेतकरी मेळाव्यात बोलताना केले...मात्र जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत निदान शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाचे व्याज तरी भरले पाहिजे असं अजित पवार म्हणाले... कर्जमाफीबाबत अभ्यास करण्यासाठी एक कमिटी नेमली असून सातत्याने कर्जमाफीवरच आपले चालेल असं शेतकऱ्यांनी समजू नये असंही अजित पवारांनी म्हंटलंय.
साऊंड बाईट:- अजित पवार, उपमुख्यमंत्री
11
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 29, 2025 10:48:34Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात गणेशोत्सवात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांना अनोख्या पद्धतीने पाठिंबा ( 1 to 1 )
- सोलापुरात मराठा समाजाच्या आरक्षणाला अनोख्या पद्धतीने पाठिंबा
- गणपती बाप्पाच्या सजावटी मध्ये संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचे लावण्यात आले पोस्टर
- मुंबईत आंदोलनाला न पोहचता आल्याने जाधव कुटूंबियांचा अनोखा पाठिंबा
- आरक्षण घेऊनच आमचा बाप्पा घरी पोहचण्याची व्यक्त केली अपेक्षा
याविषयीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी.... ( WKT )
13
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 29, 2025 10:48:24Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2908ZT_CHP_SPORTS_DAY_1_2
( 2 file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपुरात मेजर ध्यानचंद जयंती दिनानिमित्त क्रीडा दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन, शहरातील सरदार पटेल महाविद्यालयात विद्यापीठ स्तरीय खेळाडूंचा सत्कार, हँडबॉलचे देशाचे माजी राष्ट्रीय कर्णधार इंद्रजीत सिंग रंधावा यांची उपस्थिती
अँकर:-- हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंती दिनानिमित्त अर्थात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त चंद्रपुरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शहरातील सरदार पटेल महाविद्यालयात यानिमित्त हँडबॉलचे देशाचे माजी राष्ट्रीय कर्णधार डॉ. इंद्रजीतसिंग रंधावा यांच्या उपस्थितीत विशेष सोहळा आयोजित करण्यात आला. गेल्या दोन वर्षात विद्यापीठस्तरीय विविध क्रीडा प्रकार खेळलेल्या महाविद्यालयाच्या खेळाडूंचा कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आपले विचार व्यक्त करताना डॉ. रंधावा यांनी मोबाईल बाजूला सारत आपल्या ध्येयाप्रती उत्तम डायटसह तयारी करत कोणताही क्रीडा प्रकार सहज आत्मसात करता येतो असे विचार मांडले. खेळाच्या सफलतेसाठी कुठलाही शॉर्टकट नाही यावर त्यांनी भर दिला.
बाईट १) डॉ. इंद्रजितसिंग रंधावा, आंतरराष्ट्रीय हँडबॉलपटू
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
11
Report
SMSATISH MOHITE
FollowAug 29, 2025 10:45:56Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Dam
Feed on - 2C
----------------------------
Anchor - नांदेड शहरातील गोदावरी नदीवर असलेल्या विष्णुपुरी प्रकल्पाचे अकरा दरवाजे उघडण्यात आले आहेत. नांदेड जिल्हयात गेल्या दोन दिवसापासुन मुसळधार पाऊस सुरु आहे. आज पहाटेपासुन तुफान पावसाने थैमान घातले असून अतिवृष्टीची नोंद झालीये. पावसामुळे गोदावरी नदीत पाण्याची आवक वाढली आहे. गोदावरी नदीला पूर देखील आलाय. पाण्याची आवक सुरूच असल्याने विष्णुपुरी धरणाचे अकरा दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून 1 लाख 30 हजार क्युसेस इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सूरू आहे. विष्णुपुरी धरणाला एकूण अठरा दरवाजे आहेत. त्यापैकी अकरा दरवाजे उघडण्यात आले. यावर्षी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. गोदावरी नदीला पुर आल्याने नदिकाठच्या गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
---------------------------
13
Report