Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur416005
नागपूरच्या मारबत उत्सवात QR मॅपने वाढवला अनुभव!
AKAMAR KANE
Aug 22, 2025 12:47:28
kolhapur, Maharashtra
Ngp Qr Map marbat live u ने फीड पाठव ------------- नागपूर मारबत- बडग्या उत्सव परंपरेने नागपूरला जागतिक स्तरावर वेगळी ओळख निर्माण करून दिलीय... देशा विदेशातून अनेक जण हा मारबतोत्सव आणि त्यासोबत निघणारे प्रतिकात्मक बडगे पाहण्याकरता नागपुरात पोहोचत असतात.... मात्र दाटी-वटीची वस्ती असलेला महाल, इतवारी, मस्कासाथ परीसर तिथल्या निमुळत्या गल्ल्या यामध्ये तिथे असलेले बडग्या, मारबत हे पाहण्यासाठी परिसराची जाण नसलेल्या बाहेरील लोकांना अनेकदा बराच त्रास होतो.... हेच लक्षात घेऊन नागपूरातील मारबत व बडग्याची ठिकाणे आणि बदललेला मिरवणुकीचा मार्ग नागरिकांना सोप्या पद्धतीने समजावा यासाठी तरुण युवाकांकडून QR लोकेशन गाईड तयार करण्यात आलेय. नागरिकांनी फक्त Google Lens ने QR कोड स्कॅन करावा आणि नकाशावर थेट मार्ग व ठिकाणे पाहता येतील. कोणत्याही बडग्या उत्सव मंडळ व मारबत उत्सवाच्या ठिकाणी गेल्यानंतर हे Qr मॅप लोकेशन त्यांना उपलब्ध होईल.तसेच,मारबत-बडग्या उत्सवाला अमूर्त सांस्कृतिक वारशामध्ये (Unesco Intangible Cultural Heritage) आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळावी यासाठी तरुण युवक यांच्या पुढाकारातून मोहीम सुरु आहे. या मोहिमेत प्रत्येक मारबत व बडग्या समितीकडून जनजागृती अभियान व ठराव (Resolution) पारित केला जात आहे. या पारंपारिक उत्सवाला तरुणाईने दिलेली टेक्नॉलॉजी ची साथ नक्कीच उल्लेखनीय आहे... याबाबत त्यांच्याकडून जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी ------- बाईट श्रेयश सोमकुंवर स्वराज अंबुलकर आभा पांडे, काळी मारबत उत्सव समिती
7
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
Aug 22, 2025 14:19:55
Parbhani, Maharashtra:
अँकर -आज शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या सर्जा राजांचा बैलपोळा हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत असतांना परभणीच्या सोनपेठ मध्ये मात्र शेतकऱ्यांनी संघर्षाचा पोळा साजरा केलाय. येथील शेतकऱ्यांनी आपल्या बैलांच्या पाठीवर झुलीवर शेतकयांचा सातबारा कोरा करा अशी मागणी लावून धरीत शेतकऱ्यांची परिस्थिती रेखाटण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी शेतकऱ्यांनी सोनपेठ तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील शेतीचे पंचनामे करून अनुदान देण्याची मागणी करणारे निवेदन देत माजी मंत्री बच्चू कडू यांनी केलेल्या कर्जमाफीच्या मागणीला पाठिंबा दर्शवला. बाईट- शेतकरी
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Aug 22, 2025 14:19:48
Yavatmal, Maharashtra:
शेतकऱ्यांच्या मागण्याचे फलक घेऊन आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या नेतृत्वात शहर काँग्रेसने शहरातील प्रसिद्ध पोळ्याच्या यात्रेत निदर्शने केली. शेतकरी कर्जमाफी, कृषी मालाला योग्य हमीभाव, अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत अशा विविध मागण्यांसाठी यावेळी जोरदार निदर्शने करण्यात आली.
4
comment0
Report
GMGANESH MOHALE
Aug 22, 2025 14:19:40
Washim, Maharashtra:
वाशिम: File:2208ZT_WSM_POLA_FESTVAL रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर:भारतीय कृषी प्रधान संस्कृतीत शेतकऱ्याचा पोळा हा महत्वाचा उत्सव आहे.शेतकऱ्यांचा जिवा भावाचा सोबती असलेल्या बैल वर्षभर राब-राब शेतीत राबतात त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे बैल पोळा. राज्यात विविध भागात वेगवेगळ्या प्रथा परंपरेनुसार हा सण साजरा केला जातो.तर वाशिम जिल्ह्यातील ग्रामिण भागात बैलपोळा सण मोठ्या उत्साहात शेतकऱ्यांनी आज साजरा केला. बैलांची छान सजावट करुन रंगीबेरंगी झुली अंगावर टाकून गावातून वाजतगाजत मिरवणूक काढली आल्या.आज त्यांच्यासाठी पुरणपोळीचा नैवेद्य देत परंपरेप्रमाणे आज त्याचा विवाह उत्सव साजरा करण्यात आला.
1
comment0
Report
MAMILIND ANDE
Aug 22, 2025 14:17:58
Wardha, Maharashtra:
वर्धा स्टोरी SLUG- 2208_WARDHA_POLA - शासनाचे लक्ष वेधण्यासाठी थेट बैलाच्या पाठीवर गाऱ्हाने - बैलाच्या पाठीवर रंगवीला कर्जमाफीचा संदेश - वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील घोराड येथील पोळ्यात बैलजोड्या अँकर : वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील घोराड येथे आयोजित पारंपरिक बैलपोळा उत्सवात यावर्षी शेतकऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी थेट बैलांच्या पाठीवर घोषवाक्ये रंगवून संताप व व्यथा मांडल्याय. आश्वासन दिले कर्जमाफीचे भारी, पण शेतकरी फिरतो दारोदारी..."पिकाला भाव द्या, माझ्या मालकाला न्याय द्या...", असे संदेश बैलाच्या पाठीवर रंगवून लक्ष वेधण्यात आले आहेय..अशा तीव्र घोषणांनी शासनाच्या धोरणांवर ताशेरे ओढले गेले...शेतकऱ्यांचा मुख्य रोष कर्जमाफी, पिकाला हमीभाव (एमएसपी) आणि सरकारकडून मिळणाऱ्या केवळ आश्वासनांवर केंद्रित होता. "एमएसपीचा खरा भाव कधी मिळणार?" हा सवाल पोळ्यामध्ये अशाप्रकारे जोड्या रंगवून नेत  ठामपणे मांडण्यात आलाय.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Aug 22, 2025 14:03:34
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2208ZT_CHP_BAIL_POLA ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यात बैलपोळा उत्साहात साजरा ,वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना सुबकरीत्या सजवून चंद्रपूर शहरालगतच्या घोडपेठ येथे मंदिराच्या प्रांगणात भरला पोळा      अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यात बैलपोळा उत्साहात साजरा झाला.  वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना सुबकरीत्या सजवून ,गोडधोड खाऊ घालून त्यांची साग्रसंगीत पूजा केली जाते. चंद्रपूर शहरालगतच्या घोडपेठ येथे मंदिराच्या प्रांगणात सजविलेल्या बैलजोड्यांचे  एकत्रीकरण झाले. महागाईच्या मारामुळे सजावटीच्या साहित्याच्या दरात वाढ झाली आहे. दुसरीकडे बैलपोळा श्रद्धेने साजरा होत असला तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी बळीराजाच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. बारा कोरा करा असे बैलांच्या पाठीवर रंगवून शेतकऱ्यांनी ही मागणी रेटून धरली. बैलपोळ्याच्या सणाला शेतकऱ्याला समृद्ध करण्यासाठी सरकारने तातडीने पावलं उचलण्याची मागणी केली. बाईट १) सहभागी ग्रामस्थ आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
2
comment0
Report
ABATISH BHOIR
Aug 22, 2025 14:01:29
Kalyan, Maharashtra:
कल्याण डोंबिवली मध्ये अनेक रस्त्यावरती खड्ड्यांचे साम्राज्य.. डोंबिवलीच्या काही तरुणांनी खड्ड्यांवरती व्हिडिओ बनवून केले व्हायरल.. डोंबिवली च्या गाण्यावर दुचाकी स्वाराचा खड्ड्यांचा बनवला व्हिडिओ.. डोंबिवलीतील खड्डे सोशल मीडियावर ट्रेंडिंग डोंबिवली मधील खड्ड्यांवर सोशल मीडियावर तुफान व्हिडियो व्हायरल
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Aug 22, 2025 14:01:21
Nashik, Maharashtra:
nsk_polaprotest अँकर पोळ्याच्या निमित्ताने ग्रामीण भागामध्ये आपल्या शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न काही शेतकऱ्यांनी केला बैलांना सजवताना त्यांची पूजा करताना त्यांच्या पोटावर आपल्या मागण्या मांडल्या शेतकऱ्यांना कांद्याला भाव तीन हजार रुपये मिळावा कर्जमाफी केली जावी अशा विविध मागण्यांनी बैलपोळा साजरा करण्यात आला शेतकऱ्यांचा जिल्हा असलेल्या नाशिकमध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाल्यामुळे शेतकरी नेहा मार्ग निवडला
0
comment0
Report
PNPratap Naik1
Aug 22, 2025 13:33:25
Kolhapur, Maharashtra:
Kolhapur Breaking स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते किनी टोल नाक्यावर. रस्ते खराब असतील तर टोल वसूल करता येणार - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची भूमिका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे कोल्हापूर ते पुणे रस्ता खराब असल्याने टोल वसुली बंद करावी अशी केली मागणी. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी शेकडो गाड्या विना टोल सोडल्या.
9
comment0
Report
SKSudarshan Khillare
Aug 22, 2025 13:17:27
Yeola, Maharashtra:
अँकर :- येवला तालुक्यातील अंदरसुल येथे बैलपोळा सण पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांचा सखा असलेल्या बैलांची पुजा करून त्यांना सजवून गावातून मिरवणूक काढण्यात आली. या दिवशी सकाळपासूनच गावामध्ये उत्सवाचे वातावरण होते. शेतकऱ्यांनी आपले बैल तेल-उटणं घालून, रंगीबेरंगी शाली, झुल, घंटा व मोरपीसाने सजवले होते. सायंकाळी बैलांची गावातील प्रमुख रस्त्यांवरून पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.. या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
3
comment0
Report
JMJAVED MULANI
Aug 22, 2025 13:16:59
Baramati, Maharashtra:
JAVED MUALNI SLUG 2208ZT_INDAPURINCROCHMENT FILE 5 इंदापूर नगर परिषदेची केवळ एकाच अनधिकृत टपरीवर कारवाई.... इतर अतिक्रमण आहे असं ठेवल्याने नागरिकांकडून कारभारावर नाराजी व्यक्त.... Anchor _ इंदापूर नगर परिषदेने न्यायालयासमोर असणाऱ्या अनधिकृत चहाच्या टपरीवर कारवाई केली आहे. मात्र इतर ठिकाणची अतिक्रमण आहे अशी ठेवल्याने इंदापूर नगर परिषदेच्या कामकाजावर नागरिकांमधून नाराज व्यक्त केली जातेय. त्यामुळे अतिक्रमण विरोधी करण्यात आलेली ही कारवाई पुढे सुरू राहणार की इंदापूरकरांचा गुदमरलेला श्वास असाच कायम राहणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
5
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Aug 22, 2025 13:16:50
Parbhani, Maharashtra:
अँकर- शेतकऱ्यांच्या सर्जा राजाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा आज बैलपोळा हा सण आहे. मोठ्या उत्साहात शेतकरी आपल्या बैलांना एकत्र मारोती मंदिरासमोर जमवून त्यांचं लग्न लावून बैलपोळा सण साजरा करीत असतात. पण परभणी जिल्ह्यात लम्पिचा संसर्ग असल्याने काही गावातील शेतकऱ्यांनी एकत्र बैल न जमवता आपआपल्या घरीच बैलांची पूजा करून बैल पोळा सण साजरा केलाय. पूर्णा तालुक्यातील मुंबर येथील शेतकर्यांनी लम्पिचा वाढता धोका बघता घरीच बैलांची पूजा करून आपल्या सर्जा राजा प्रति कृतज्ञता व्यक्त केली.
2
comment0
Report
KJKunal Jamdade
Aug 22, 2025 13:05:30
Shirdi, Maharashtra:
Newasa News Flash *अहिल्यानगर जिह्यात आणखी एका शेतकऱ्याने संपले जीवन...* कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल... *नेवासा तालुक्यातील गोयगव्हाण येथील नानासाहेब केशव ठोबळ या 45 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या...* विषारी औषध पिऊन केली आत्महत्या... *कर्जाचा डोंगर आणि कपाशीसाठी खते, औषधे घ्यायला पैसे नसल्याने टोकाचे पाऊल...* *अहिल्यानगर जिह्यात गेल्या आठ दिवसात दुसरी शेतकरी आत्महत्या...* 17 ऑगस्ट रोजी नेवासाच्या वडूले गावातील बाबासाहेब सरोदे या शेतकऱ्याची आत्महत्या... तर काल 21 ऑगस्ट रोजी नानासाहेब ठोबळ या शेतकऱ्याने संपवले जीवन... ठोबळ यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी आणि वृद्ध आई असा परिवार... *ठोबळ यांच्या अंत्यविधीसाठी कुटुंबीयांकडे पैसे नसल्याने ग्रामस्थांनी केली वर्गणी...* प्रहार संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष पांडुरंग औताडे यांची माहिती... *या आत्महत्या नाही तर सरकारी धोरणाने घेतलेले बळी...* प्रहार संघटनेचा आरोप... Byte - सुरेखा नानासाहेब ठोबल, पत्नी Byte - दत्तात्रेय खाटीक, ग्रामस्थ Byte - पांडुरंग औताडे, युवक जिल्हाध्यक्ष प्रहार संघटना
1
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Aug 22, 2025 12:48:12
Akola, Maharashtra:
Anchor : वर्षभर शेतकऱ्यासोबत राब-राब राबत रक्ताचे पाणी करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजेच पोळा... महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पोळा म्हणजे अनेक परंपरांनी समृद्ध झालेला..अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये मात्र चक्क गाढवांचा पोळा भरला होताय. सजून-धजून आलेली गाढवं अन लोकांनी केलेल्या गर्दीमूळं अकोटमधील हा पोळा हटके ठरलाय.चला पाहूयात अकोटमधील हा हटके पोळा.... Vo 1 : गाढव... नेहमीच सर्वांच्या तिरस्काराचा विषय... परंतू हीच गाढवं सुंदर असतात काय?, असं तूम्हाला कुणी विचारलं तर याचं उत्तर 'होय' असं आहेय. कारण, अकोटमधील ही द्रूष्य तूमचं असं मत बनविण्यासाठी पूरेसी आहेयेत. बरं पोळा म्हटलं की बैलच आपल्या डोळ्यासमोर येतील.. पण अकोटमध्ये आज चक्क गाढवांचा पोळा भरलाय. आज अकोटमधील रामटेकपूरा येथे गाढवांचा पोळा भरला होताय. पोळ्याच्या दिवशी आणि दुसर्या दिवशी सुद्धा हा पोळा भरतोय.या गावातील भोई समाजानं गेल्या ५० वर्षांपासून ही परंपरा जपलीये...अकोट शहरातील अनेक कुटूंबांचा उदरनिर्वाह गाढवांवर चालतोय. वर्षभर या गाढवांवर माती, दगड, वाळू आणि लाकडं वाहण्याचं काम हे लोक करतात. Byte : श्रीराम कंडाळे, गाढव मालक.. Vo 2 : गाढवावर सुरू असलेल्या या समाजाचा व्यवसाय आता शेवटचे घटक मोजत आहेत आणि त्यामुळे भविष्यात हा गाढवाचा पोळा भरणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. Byte : दीपाली कंडाळे Final Vo : आपल्या भारतीय संस्क्रूतीनं नेहमीच श्रमाला प्रतिष्ठा दिलीय. अकोटमधील गाढवांचा हा पोळा नेमका याच संस्कृतीला उजाळा देणारा आहेय, असं म्हणता येईल... जयेश जगड, झी मिडिया, अकोला.
6
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Aug 22, 2025 12:46:44
Chakan, Maharashtra:
Feed 2C Slug: Chakan Accident File:02 Rep: Hemant Chapude(Chakan) ब्रेकिंग – चाकण, पुणे Anc :- पुणे-नाशिक महामार्गावर चाकण चौकात प्रवासी रिक्षाचा अपघात झालाय Vo :- पुणे नाशिक महामार्गालगत चाकण चौकात साचलेल्या पाण्याच्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने रिक्षा थेट पाण्यात घसरली. या रिक्षामध्ये प्रवासी असल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी प्रवाशांच्या जिवाशी सरळसरळ खेळ सुरू असल्याचे चित्र आहे. महामार्गावर साचलेले पाणी, खड्डे आणि वाहतूककोंडी यामुळे अपघातांची मालिका सुरू असून प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याची संतापजनक प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया चाकण पुणे...
4
comment0
Report
Advertisement
Back to top