Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Latur413531

लातूर में चार दिन की भारी बारिश के बाद राहत: ट्रैफिक फिर से चालू

VBVAIBHAV BALKUNDE
Sept 20, 2025 06:18:21
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज.... स्किप्ट ::- चार दिवसांच्या मुसळधार पावसानंतर अखेर पावसाने विश्रांती.... AC ::- लातूर जिल्ह्यात सुरू असलेल्या चार दिवसांच्या मुसळधार पावसानंतर अखेर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे दिलासा मिळाला आहे... लातूर जिल्ह्यातील 27 पूल पाण्याखाली जाऊन वाहतूक ठप्प झाली होती. आता पाणी ओसरायला सुरुवात झाल्याने वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. औसा, निलंगा, देवणी तालुक्यातील प्रत्येकी 6 पूल तसेच इतर भागातील पूलांवरून वाहतूक सुरळीत झाली आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील तीन गावांचा पाण्याचा वेढा हटला आहे. त्यामुळे जनजीवन आता पूर्ववत होऊ लागले आहे....
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MKManoj Kulkarni
Sept 20, 2025 08:52:00
Mumbai, Maharashtra:अँकर -- दादर शिवाजी पार्क या ठिकाणी असलेल्या मीना ताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग टाकून विटंबना करण्यात आली होती. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला त्यात आरोपी उपेंद्र पावसकर याला अटक करण्यात आले होती.पोलिसांनी १८ तारखेला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसाची पोलिस कोठडी दिली होती.आज पुन्हा न्यायालयात हजर करून पोलिसांनी पुन्हा दोन दिवसाची कोठडी मागितली होती पण न्यायालयाने मात्र आरोपीला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली.यावेळी न्यायालयात काय झालं ते पाहुया. सरकारी वकील पुतळ्यावर रंग टाकला कोणाच्या अख्तत्यारीत काम करतोय का? कोणाच्या सांगण्यावरून काम केलंय का याचा तपास करायचा आहे ज्या पुतळ्यावर रंग टाकला ते महाराष्ट्राचे दैवत आहे नक्की हेतू काय? याचा तपास करायचा आहे त्यासाठी दोन दिवस पोलीस कोठडी द्या  सरकार वकील यांच्याकडून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती.न्यायालयाने कोणी या घटनेचा साक्षीदार आहे का? अस तपास अधिकाऱ्यांना विचारलं असता नाही म्हणून सांगण्यात आलं. सरकारी वकील सुमेधा कोकाटे. जो वेळ दिला होता तो पुरेसा आहे त्याला न्यायालयीन कोठडी नेण्यात यावी. न्यायालयाने आरोपीच्या वकिलाची बाजी एकूण  आरोपीला १४ दिवसाची ३ सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी दिली. Byte -- सुमेधा कोकाटे,आरोपी वकील मनोज कुळकर्णी  Feed send TVU 82 Slug-- Shivadi court
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Sept 20, 2025 08:49:39
Amravati, Maharashtra:Feed slug :– AMT_CONG_ANDOLAN दोन फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील 60 पेक्षा अधिक डॉक्टर 25 दिवसांपासून संपावर; 200 पेक्षा अधिक रुग्णांच्या शस्त्रक्रिया रखडल्या, रुग्णांचे हाल अँकर :– अमरावती सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील 60 पेक्षा अधिक डॉक्टर गेल्या 25 दिवसांपासून संपावर आहे. त्यामुळे 200 पेक्षा अधिक रुग्णांच्या शस्त्रक्रिया रखडल्या आहे. डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत असून या संपावर शासनाने अजूनही कुठलाही तोडगा न काढल्याने काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयासमोर काँग्रेस पक्षाने आंदोलन सुरू केले असून सरकारकडे डॉक्टरांचे नऊ कोटी रुपयांचे मानधन थकल्याने डॉक्टर संपावर गेले आहे. डॉक्टरांच्या संपावर सरकारने तोडगा काढण्याची रुग्णांची आणि काँग्रेसची मागणी आहे.
3
comment0
Report
KJKunal Jamdade
Sept 20, 2025 08:48:20
Shirdi, Maharashtra:Anc - अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील पेरू उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत..लाखोंची गुंतवणूक करून उभारलेले पेरूचे उत्पादन आज बाजारात शेतकऱ्यांना परवडत नाहीय.पेरूची आवक दिवसेंदिवस वाढत असली , तरी बाजारात पेरूची मागणी कमी झालीय.परिणामी, दर गडगडले असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय.प्रती किलो अवघे १५ ते २० रुपयेच भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च भागवणेदेखील कठीण झालंय.दर कोसळल्यामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान होत असून , पुढील हंगामासाठी लागणारी गुंतवणूक करण्याचंही संकट शेतकऱ्यांपुढे उभं राहिलंय.शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट दाटलं असून, पेरू उत्पादनासाठी सरकारी पातळीवर तातडीने उपाययोजना व्हाव्यात, अशी मागणी राहता तालुक्यातील शेतकरी करत आहेत.. शेतकऱ्यांशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी..... wkt - kunal jamdade with shetkari
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 20, 2025 08:47:39
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 20, 2025 08:33:53
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : संजय राऊत यांची फाटली का? - ज्योती वाघमारे LIVE LINK ((( https://www.youtube.com/live/dwLHUT4mric?si=ZmoHzheTtZGyyeMo ))) *- शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांची संजय राऊत, उद्धव ठाकरेंवर टीका* सोलापूर ब्रेकिंग : - आमचं काय होईल ते महाराष्ट्राची जनता पाहून घेईल मात्र - उभाटा गट काँग्रेसमध्ये विलीन झाला आहे त्याचं काय? - संजय राऊत हे मक्कार आहेत. त्यांची मक्कारी गांजा सारखी नसानसात भिनली आहे. - त्यामुळे महाराष्ट्राला प्रश्न पडतो की हा संज्या राऊत आहे की गांजा राऊत आहे. - आम्हाला बाळासाहेब आनंद दिघे समजले नाहीत असं संजय राऊत म्हणाले. - पण संजय राऊत यांना बाळासाहेब आनंद दिघे समजले नाही त्यामुळे ते काँग्रेसचे भांडी घासत आहेत - त्यामुळे आमच्या 40 आमदारांच्या जीवावर निवडून जाणाऱ्या संजय राऊत ने जास्त फणफण करू नये. - कारण विषारी सापाचा फणा कसा ठेचायचा हे महाराष्ट्र आणि शिवसेनेला चांगलं माहिती आहे. *सांजय राऊत हा अंडू पांडु त्याच्याबद्दल बोलून मला माझी जीभ विटाळून घ्यायची नाही* *- ऑन संजय राऊत :* - संज्या राऊत आहे की गांज्या राऊत आहे हे समजत नाही. - आमच्या पक्षाच जे होईल ते होईल पण उबाठा आताच काँग्रेस मध्ये विलीन झालं आहे - नेहमी गुटखा, ब्रँडी असा अमली पदार्थच्या उपमा यांना सुचतात - संजय राऊत आहे की गांजा राऊत? - कायम बाळासाहेब काँग्रेस बद्दल बोलायचे तुम्ही त्यांच्या सोबत युती केली - विषारी सापाचा फणा कसा ठेचायचा हे आम्हाला चांगलं माहिती - संजय राऊत सारख्या नाथाळाला कसं ठीकणावर आणायचं माहिती - संजय राऊत यांची फाटली का? का सुरक्षा घेता तुम्ही? - बाळासाहेब यांचे शिवसैनिक आहात ना फिरा एकटे - *ऑन आनंद दिघे :* - संजय राऊत दिघे साहेबांसारख्या व्यक्तीवर बोलतो तेव्हा वाईट वाटते. मला रात्रभर झोप लागली नाही - दिघे साहेबांनी आयुष्यभर शिवसेना हेच माझे माहेर म्हणून शिवसेना वाढवली मात्र संजय राऊत सांगतो आनंद दिघे साहेबांचा फोटो सोबत का लावता. - रोज माईकपुढं भुंकण्यापेक्षा संजय राऊतने स्वतःच्या खासदारकीचा निधी कुठे आणि किती खर्च केला. *- ऑन संजय राऊत दम :* *- संजय राऊतात दम असेल तर घराबाहेर पडून दाखवावे.* - संजय राऊत हे रोज आर्थर रोड जेलमध्ये संडासच्या रांगेत रोज भांडत होते. - त्यामुळे या संडासविरांनी आम्हाला बोलू नये. *- ऑन संदीप देशपांडे इंदोरी हॉटेल :* - जी माणसं स्वतःच्या हॉटेल मध्ये परप्रांती आचारी ठेवत आहेत. - ते मराठीच्या बद्दल बोलतील का आणि त्यांचं बोलणं हे पूतना मावशीचे प्रेम आहे. का हे मगरीचे अश्रू गाळ तात. - एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना स्वतःचं राज्य गीत मिळाला जय जय महाराष्ट्र माझा. - मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला - बाकीच्यांच गळा काढणं हे मगरीचे अश्रू आहेत. *- ऑन जिल्हा परिषद निवडणूक :* - येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या नगरपालिका महापालिकेच्या निवडणुकांच्या मध्ये एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेत जसे कमपिंग मेजॉरिटी मिळाली. त्याच प्रमाणे भगवं वादळ महायुतीचे भगव वादळ आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळाले. *- ऑन उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौरा :* - कोव्हीड मध्ये जनता अगदी किडा मुंग्यासारखे तडफडत असताना सुद्धा जे माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणून फेसबुक लाईव्ह करत बसले. ही व्यक्ती जर आज घराच्या बाहेर पडत असेल त्यांच्या गळ्याचा पट्टा निघत असेल. - मानेचा बेल्ट निघत असेल कमरेचा बेल्ट निघत असेल. तर माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी गुहाटीला जाऊन जी हिंदुत्वाची जडीबुटी त्यांना दिलेली आहे. त्यामुळेच ते ठणठणीत बरे झालेले आहेत. - एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांना जे इंजेक्शन केलेलं आहे त्यामुळे त्यांचे सगळे रोग गेलेले आहेत. - त्यामुळे ते आता फिरतात त्यांनी फिरावं आतापर्यंत ते फक्त हेलिकॉप्टर मधून फिरून एरियल फोटोग्राफीज त्यांनी केलेली आहे. - त्यांनी जनतेची दुःख कधी जमिनीवरनं समजून घेतलेली नाही त्यामुळे आता ते जमिनीवर आले आहेत असं म्हटलं. *- ऑन दसरा मेळावा :* - शिवसेनेचा दसरा अतिशय पांचट विनोद करून उभा त्यांनी त्या दसरा मेळाव्याचा हसरा मेळावा करून टाकला. - संजय राऊत यांची जीभ रोज ज्या पद्धतीने घसरती आहे त्यामुळे लवकरच उबाट्याला घसरा मेळावा साजरा करावा लागेल असं मला वाटतं. *- ऑन सॅम पित्रोदा :* - त्यांनी तिकडेच राहावं आणि सोबत राहुल गांधींचा पार्सल सुद्धा घेऊन जाव. मग त्यांचा बाप पाकिस्तानी असेल त्यांचा डीएनए पाकिस्तानचा असेल त्याच्यामुळे बोलत असतील. - हे तेच सॅम पित्रोदा, आहेत देशाच्या साधन संपत्ती वरती पहिला हक्क अल्पसंख्यांकांचा आहे,वगैरे अशा पद्धतीने बोलत होते. - त्यामुळे सॅम पित्रोदा सारख्या नालायक माणसाची भारताला गरज नाही. त्यांनी कायमस्वरूपी पाकिस्तानामध्ये पाकिस्तानचा पासपोर्ट काढून ठेवा. - आणि त्याच्यासोबत आपले नेते राहुलजी गांधीजींचे सुद्धा पार्सल आणि घेऊन जावं. - कारण अलीकडे पाकिस्तान मध्ये राहुल गांधींचे लोकप्रियता पाकिस्तान मध्ये वाढली आहे. Byte : ज्योती वाघमारे (प्रवक्त्या, शिवसेना शिंदे गट)
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 20, 2025 08:22:15
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 2009ZT_CHP_TRIBAL_FRAUD ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील कोलाम आदिवासी शेतकऱ्यांची पीक कर्जाच्या नावावर फसवणूक, किमान 100 शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज, माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी उघडकीस आणलं हे प्रकरण    अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यातील  जिवती तालुक्यातील कोलाम आदिवासी शेतकऱ्यांची पीक कर्जाच्या नावावर फसवणूक झाली आहे. तीही चक्क बँकेकडुन. किमान 100 शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज असून माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी हे प्रकरण उघडकीस आणलं आहे. शोभाताई फडणवीस या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सख्ख्या काकू असून चंद्रपूर जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर शहरातील विदर्भ -कोकण ग्रामीण बँक शाखेतून या कोलाम आदिवासी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात आलं.  धक्कादायक म्हणजे या फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांकडे शेतीचा कुठलाही सात-बारा नसताना बनावट सातबारा तयार करून काही दलाल आणि बँकेशी संबंधित अधिकाऱ्यांनी ही फसवणूक केल्याचा संशय आहे.  2022 मध्ये एकाच दिवशी पीक कर्जाची सर्व प्रक्रिया पूर्ण करून प्रत्येक शेतकऱ्याच्या नावावर कर्ज वाटप करण्यात आलं. दीड लाख ते एक लाख 65 हजार रु. पर्यंत हे पीक कर्ज वाटण्यात आलं असून पीडित शेतकऱ्यांना मात्र हातात अवघे दहा ते पंधरा हजार दिले गेले. या प्रकरणात गडचांदूर पोलीस स्टेशनमध्ये सध्या 33 पीडित शेतकऱ्यांच्या वतीने तक्रार  दाखल करण्यात आली आहे. ही सरकारची नवी योजना आहे असे 2022 च्या या प्रकरणात सर्वांना सांगण्यात आले. सरकारने पीडित शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यासोबतच या प्रकरणातील दलाल आणि बैंकेच्या दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी शोभाताई फडणवीस यांनी केली आहे. बाईट १) शोभाताई फडणवीस, माजी मंत्री बाईट २) पिडीत कोलाम आदिवासी आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Sept 20, 2025 08:21:50
Mumbai, Maharashtra:Sanjay raut गद्दार आमच्यावर येतील .. राजेश मोरे कोण आहेत ते आम्हाला माहित नाही … प्रताप सरनाईक , एकनाथ शिंदे याचं कर्तुत्व आहे का .. राजन विचारे हे आगोदर पक्षात आहेत … राजन विचारे आमचे निशितवात आह .. राजन विचारे नसते तर एकनाथ शिंदे नसते … हे खोटे आहे का .. सतीश प्रधान तिकिट कोणी दिलं .. हे सांगा …. कोणत्या पद्दतीने केलं होतं … सतीश प्रधान ज्येष्ठ नेते आहेत .. त्यांना उमेदवारी बाळासाहेबांनी दिली होती ..तेव्हा एकनाथ शिंदे यांनी काय केलं .. त्याची वृती हे उरबादून घेण्यासारखं आहे .. त्याच्यावर हा विषय संपला आहे .. शिवसेना प्रमुख यांचेसोबत आम्ही कोणाचा फोटो लावला नाही . अरे मोदी पेक्षा मोठा वापरा ना फोटो आंनंद दिघेचा .. त्यांना भाजपाचं विलिन होऊ लागेल हे मी सांगितलं आहे … हे धमक्या मला देऊ नका … मला Ed Amit shah यांनी धमकी दिली तेव्हा मी पळून गेलो नाही … मी ठाणेत जाणार का .. अरे हे काय प्रश्न आहे का .. मी काल ठाणेत जाऊन आलो .. माध्यमासोबत सरकारी बंदोबस्त वेगेरे नाही .. मी शिवसेनेचा नेता आहे आणि एकता जातो सगळीकडे .. मी कुठे म्हणालो दिघे साहेबांच कौतुक नाही केलं … ते जिल्हा प्रमुख असला तरीही ते निषे्ठावंत नेते होते .. शंभु राज देसाई तुमच्या माहितीसाठी सांगतो … जेव्हा दिघे साहेबांना बाळासाहेब म्हणाले की तुम्ही आता महाराष्ट्रात काम करा .. तेव्हा त्यांनी ठाणे निवडला .. इतका महान माणूस होता … असे निषेठावंत माणसावर तुम्ही काय आंदोलन करता ..तुम्ही गद्दार आहेत … बुलेट ट्रेन होऊ द्या … आमचा विरोध आहे … आम्ही मागणी केली नव्हती … तुम्हाला दिल्ली ते मुंबई का नाही केली .. तुम्हाला फक्त गुजरातसोबत मुंबई जोड्यांची आहे … अनेक वाहतूक कोंबडी आहे .. मुंबईत ही समस्या मोठी आहे याचं उत्तर आहे का … मनसे अध्यक्ष राज ठाकरे देवंद्र फडणवीस. यांना भेटले होते त्यांनी पुन्हा भेटूया .. ४ ओकटोबर उद्धव ठाकरे पुणे आणि मराठवाडा दौरा करणार आहेत … भाजपचे लोक बाप काढतां … अरे पण ही सुरूवात नारायण राणे यांचा मुलांनी केली .. तुम्ही आमदार आहेत हे लक्षात ठेवा ..ज्या व्यक्तींचा बद्दल बोलता .. ही टीम फडणवीस आहेत का ? त्यांची पहिली शाळा घ्या .. कोणा विषयी बोलता तुम्ही .. टिका करा ना .. तुम्ही विधानसभा मारामार्या करता … देवेंद्र फडवीस यांनी १२ ते १३ वेळा पाठीशी घातले आहे .. जंयत राव तुमच्या पक्षात याला त्यार नाही म्हणून के हे करता आहेत का ? ….. यांचा लोकांनी काय केलं … हे तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करतात … बाकी काही नाही ..
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 20, 2025 08:02:53
Raigad, Maharashtra:स्लग- भटक्या कुत्र्याचा तीन ग्रामस्थांवर हल्ला .......... तरूणाच्‍या ओठाचा लचकाच तोडला .......... महाड तालुक्‍यातील कुर्ले गावातील घटना .......... जखमींमध्ये दोन महिला आणि एका तरुणाचा समावेश .......... तरुणावर प्लास्टिक सर्जरीची गरज .......... अँकर - महाडमध्‍ये भटक्‍या कुत्रयांनी अक्षरशः हैदोस घातलाय. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तीन जण गंभीर झाल्याची घटना महाड तालुक्यातील कुर्ले गावातून समोर आली आहे. कुत्र्याने एका तरूणाच्‍या ओठाचा लचकाच तोडलाय, दुसऱ्या एका महिलेच्या हाताला, पायाला आणि डोक्याला चावा घेतला आहे दुसरया एका महिलेला किरकोळ दुखापत झाली आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या या तीघांवर माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तरुणाच्या तोंडाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला प्लास्टिक सर्जरीची गरज भासणार असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. कुत्र्यांनी केलेल्या या हल्ल्याच्या घटनेनंतर या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे. बाईट - डॉ. अरुणा पोहरा, अधीक्षक माणगाव उपजिल्‍हा रूग्‍णालय
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 20, 2025 08:00:58
Navi Mumbai, Maharashtra:story slug - घणसोली ते शीलफाटा बुलेट ट्रेन बोगदा चे काम पूर्ण FTP slug - nm bullet train byet- central minister shots- reporter - swati naik navi mumbai Navi mumbai anchor- मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉर या प्रकल्पामुळे देशातील आर्थिकदृष्ट्या दोन महत्वाची शहरे जोडली जाणार आहेत. या प्रकल्पातील घणसोली ते शिळफाटा बोगद्याचा ब्रेकथ्रू कार्यक्रम आज केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला, या प्रकल्पातील बोगद्याचे अंतर 21 किलोमीटर आहे. तर घणसोली ते शिळफाटा 4.8 किलोमीटर बोगदा आहे.याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी । बाईट - wkt vo1- यावेळी केंद्रीय मंत्री आश्विन वैष्णव यांनी प्रकल्पबद्दल माहिती दिली ,मुंबई अहमदाबाद हा भारताचा पहिला 508 किलोमीटर चा कॉरिडॉर असून यात बिकेसी ते शीळफाटा दरम्यान 21 किलोमीटर चा समुद्रखालून बोगदा आहे, यात घणसोली ते शीलफाट हा डोंगराच्या मधून पाच किलोमीटर काम पूर्ण झालं आहे। वैष्णव बाईट पॉइंटर्स समुद्राच्या खालून बोगद्या निर्माण करण्यात येत आहे, घणसोली ते शीळफाटा या ४.८ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचा ब्रेकथ्रू झालेला आहे अहमदाबाद मुंबई या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा जपानच्या टीम ने पाहणी केली व कामाचे कौतुक केले ठाकरे सरकार काळात प्रकल्पाला परवानगी दिली नव्हती त्यामुळे प्रकल्पाला उशीर झाला मात्र आता लवकरात लवकर हे काम पूर्ण केले जात आहे हा खूप महत्वाचा प्रकल्प आहे, पहिला टप्पा प्रकल्पाचा हा मध्ये चालू होणार आहे , आणि प्रवास सुरू होणार ऑन ठाकरे ठाकरे सरकारमध्ये अडीच वर्षांचा लॉस झाला व निधीचा पण तोटा झाला होता २१ किलोमीटर समुद्राच्या आतमध्ये आहे बोगदा आहे तर सध्या ४.८ किलोमीटरचा काम सुरू झाले आहे तसेच आज ब्रेकथ्रू करण्यात आले बाईट- आश्विनी वैष्णव - केंद्रीय मंत्री
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 20, 2025 08:00:08
Pandharpur, Maharashtra:200925 Slug - PPR_MADHA_RAIN_VISIT file 01 Anchor- माढा तालुक्यातील सेना नदीकाठच्या गावांमध्ये पुराचे पाणी पिकात शिरल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आमदार अभिजीत पाटील यांनी पाहणी करून सरसकट पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहे. निमगाव ,दारफळ, राहुल नगर उंदरगाव, केवड ,वाकाव या गावांमध्ये अतिवृष्टी व पुरांमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी तहसीलदार आणि कृषी अधिकारी यांना सोबत घेऊन केली. रांजणी रोपळे म्हैसगाव कुर्डवाडी या चार मंडळात 65 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न करण्याचा आश्वासन आमदार पाटील यांनी दिला आहे
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 20, 2025 07:47:17
Parbhani, Maharashtra:अँकर- सततच्या पावसामुळे परभणी जिल्ह्यातील सर्व धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणांत येत असलेला अतिरिक्त पाणीसाठा नदीमध्ये सोडण्यात येत आहे. सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातून मागच्या आठ दिवसांपासून दुधना नदीमध्ये पाण्याचा विसर्ग केला जातोय, यामुळे दुधना नदी दुथडी भरून वाहत आहे, याविसर्गामुळे नीलवर्ण टाकळी या गाव परिसरात असलेल्या पूलावरून पाणी वाहत आहे, त्यामुळे नीलवर्ण टाकळीचा इतर गावांशी संपर्क सतत तुटतोय,त्यामुळे येथे अधिक उंचीचा पूल उभारावा अशी मागणी केली जात आहे. शिवाय नदीकाठची सगळी पिकं पाण्याखाली असल्याने पीक सडून जाऊन शेतकऱ्यांच मोठं नुकसान होणार आहे...
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Sept 20, 2025 07:47:06
Pimpri-Chinchwad, Maharashtra:महापालिकेत प्रशासक राज असल्याने नागरिकांची कामे होत नाही,स्थानिक पुढाऱ्यांना समस्या सोडवण्यासाठी मर्यादा येत असतात आगामी महापालिका निवडणुकीत जनसंवाद जास्त फायदा होईल-स्थानिक पदाधिकारी Anchor - पुण्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये ही अजित पवारांनी जनता दरबार घेतलाय. पण अजित दादांना हा जनता दरबार घेण्याची वेळ का आली? आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने हा जनता दरबार राष्ट्रवादीसाठी किती महत्वाचा ठरेल? प्रशासक म्हणून पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी तुमचे प्रश्न सोडवले का? पालिका आयुक्तांचा कल कोणाच्या बाजूनं आहे? पिंपरी चिंचवड मधील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय कैलास पुरी यांनी....! kailas चौपाल पदाधिकारी
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 20, 2025 07:46:00
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:Sng_dugdhabhishek स्लग - गोपीचंद पडळकरांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक घालून परकर समर्थकांनी केला प्रति आंदोलन अँकर - गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राज्यभर तीव्र संताप आणि आंदोलन सुरू असताना सांगलीमध्ये पडळकर समर्थकांकडून प्रति आंदोलन करण्यात आले आहे.गोपीचंद पडळकर यांच्या तीस फुटी पोस्टरला दुग्धभिषेक घालून गोपीचंद पडळकर यांचे समर्थन करण्यात आले आहे. शहरातील राम मंदिर येथे गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांकडून हे आंदोलन करण्यात आले आहे.राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर आमदार गोपीचंद पडळकरांकडुन जहरी टीका करण्यात आली,त्यानंतर राज्यभर तीव्र पडसाद उमटतं आहेत,त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि जयंत पाटील समर्थकांकडून पडळकरांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून पडळकर समर्थकांनी आजच सांगलीमध्ये पडळकर यांच्या समर्थनाचा आंदोलन केलं आहे. बाईट - राहुल पुजारी - पडळकर समर्थक - सांगली.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 20, 2025 07:17:06
Sangli Miraj Kupwad, Maharashtra: Sng_zatapat स्लग - पडकरांच्या विरोधात रास्ता रोको दरम्यान जयंत पाटील समर्थक आणि पोलिसांच्या मध्ये झटापट अँकर - भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ सांगलीच्या इस्लामपूर मध्ये जॉईंट पाटील समर्थकांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं.हा रस्ता रोको दरम्यान आंदोलकांना ताब्यात घेताना पोलिस व जयंत पाटील समर्थकां मध्ये झटापटीचा प्रकार घडला आहे. जयंत पाटील यांच्या वर करण्यात आलेला टीकेचा निषेध म्हणून गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात इस्लामपूर -पेठ महामार्गावर जयंत पाटील समर्थकांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले,यामुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती,दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलकांनी रस्त्यावरून हटणार नाह,अशी ठाम भूमिका घेतल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू केला,यावेळी आंदोलकांना ताब्यात घेत असताना पोलीस आणि आंदोलकांच्या मध्ये झटपटीचा प्रकार घडला आहे,त्यामुळे काही काळ या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
0
comment0
Report
Advertisement
Back to top