Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Dhule424001
तोरणमाळ घाटात दरड कोसळली! वाहतूक ठप्प, गावांचा संपर्क तुटला!
PPPRASHANT PARDESHI
Sept 06, 2025 04:45:47
Dhule, Maharashtra
ANCHOR - थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ घाटात दरळ कोसळली. तोरणमाळचा सातपायरी घाटात मोठी दगड मुख्य रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने सातपायरी घाट बंद आहे. सात पायरी घाटात दरड कोसळल्याने तोरणमाळ सह परिसरातील दहा ते पंधरा गावांचा संपर्क तुटला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सतत मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याचा घटनेत वाढ झाली आहे. तोरणमाळ घाटात कायमस्वरूपी दरड प्रतिबंधित उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक आदिवासी बांधवानी केली आहे. प्रशांत परदेशी, नंदुरबार.
13
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Sept 07, 2025 18:00:39
Dhule, Maharashtra:
ANCHOR - धुळ्यात इरशाद जहांगीरदार यांनी 'एमआयएम' पक्षात प्रवेश करणार आहेत. यां पक्ष प्रवेशामुळे स्थानिक राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. शहरातील समाजसेवक आणि समाजवादी पक्षाचे नेते इरशाद जहांगीरदार यांनी अखेर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाचे प्रमुख खासदार असुद्दिन ओवेसी यांची भेट घेतली आहे. तसेच पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांची भेट घेत, ऑक्टोबर महिन्यामध्ये धुळ्यात जाहीर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याचं जहागीरदार यांनी सांगितले आहे. नुकत्या पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये धुळे शहर मतदार संघामधून इर्शाद जागीदार उमेदवार होते. समाजवादी पक्षाकडून त्यांनी उमेदवारी केली होती. पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव स्वतः त्यांच्या पक्षप्रवेशासाठी धुळ्यात आले होते. शहरातील उच्चशिक्षित राजकारणी म्हणून इर्षात जहागीरदार यांच्याकडे पाहिले जाते. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये जहागीरदार यांच्या नेतृत्वाचा फायदा एम आय एम होणार आहे. प्रशांत परदेशी, धुळे.
13
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Sept 07, 2025 17:15:12
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_HALLA सात फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 जुन्या वादातून अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरमध्ये चाकू आणि दगडांनी हल्ला; गणपती विसर्जन सुरू असताना मुख्य चौकातील धक्कादायक प्रकार अँकर :– जुन्या वादातून अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरमध्ये चाकू आणि दगडांनी हल्ला करण्यात आला असून या हल्ल्याप्रकरणी २ आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील बाभळी टी पॉइंटवरील ही घटना असून जुन्या वादातून रजत जाधव यांच्यावर चाकू, तलवार आणि दगडांनी करण्यात हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे. शहरात गणपती विसर्जन सुरू असताना मुख्य चौकात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. जखमी रजत जाधव यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी अकोल्याला हलवण्यात आले आहे.
8
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 07, 2025 16:00:42
Akola, Maharashtra:
Anchor : महिला पोलीस अधिकारी अंजना कृष्णा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामधील झालेल्या संभाषणानंतर राजकीय वातावरण चांगला तापला आहे.अंजना कृष्णा प्रकरणावरून निर्माण झालेल्या चर्चेबाबत आमदार मेटकरी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मिटकरी म्हणाले की, “विधिमंडळाचा सदस्य म्हणून अंजना कृष्णा यांच्या कागदपत्रांची तपासणी संदर्भात केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे मी विनंती केली होती. मात्र ही भूमिका पक्षाची नसून माझी वैयक्तिक होती. अंजना कृष्णा यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोण आहेत हे माहीत नसल्यामुळे माझ्या मनात शंका निर्माण झाली आणि चौकशीची मागणी केली. पण यामागे पक्षाची अधिकृत भूमिका नव्हती.”त्यांनी पुढे सांगितलं की, या संदर्भात पक्षावर अनाठायी टीका होत असली तरी ती चुकीची आहे. “ही माझी वैयक्तिक भूमिका होती आणि त्याबद्दल मी दिलगिरीही व्यक्त केली आहे. वेगवेगळ्या पक्षातील फालतू लोक केवळ राजकारणासाठी टीका करत आहेत. अजित पवारांमुळे आम्ही गप्प आहे , मात्र योग्य वेळी उत्तर देऊ,” असा इशारा मिटकरी यांनी विरोधकांना दिला. या वक्तव्यामुळे विरोधकांकडून सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप आता अधिक चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. Byte : अमोल मिटकरी , आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस ( अ . प )
13
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 07, 2025 15:47:20
Raigad, Maharashtra:
स्लग - लक्ष्मण हाके आधी मुख्यमंत्र्यांचा उदो उदो करत होते ..... मुख्यमंत्र्यांना बॅलन्स भूमिका घ्यावी लागते ...... कोण काय बोलतं यापेक्षा वस्तुस्थिती काय आहे हे समजून घ्या ...... इति प्रवीण दरेकर ......... अँकर - लक्ष्मण हाके यापूर्वी मुख्यमंत्र्यांचा उदो उदो करत होते. मुख्यमंत्री कुठल्या समाजाचे नसतात ते सर्व समाजाचे असतात त्यामुले त्यांना बॅलन्स भूमिका घ्यावी लागते असं भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. आता आम्ही दंडुका हाती घेतलाय आता जबाबदारी सरकारची आहे असा इशारा लक्ष्मण हाके यांनी सरकारला दिलायं त्यावर ते बोलत होते. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजासाठी घेतलेला हा निर्णय आहे त्यामुळे कोण काय बोलतं यापेक्षा वस्तुस्थिती काय आहे हे समजून घेतलं पाहिजे असं दरेकर म्हणाले. बाईट - प्रवीण दरेकर
14
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 07, 2025 15:46:57
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0709ZT_GAD_NAXAL_ARREST ( single file sent on 2C)  टायटल:-- खुनाच्या गुन्ह्रात सक्रीय सहभागी असलेल्या एका जहाल नक्षल्यास गडचिरोली पोलीस दलाने केली अटक, हैद्राबाद येथून विशेष पथकाने सापळा रचून घेतले ताब्यात, नोव्हेंबर 2023 मध्ये कापेवंचा येथे झालेल्या ग्रामस्थ रामजी आत्राम यांच्या हत्येमध्ये होता सक्रिय सहभाग, शासनाने जाहीर केले होते दोन लाखांचे बक्षीस अँकर:-- गडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त जिल्हा आहे. नक्षली सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे आदी देशविघातक कृत्य करत असतात. सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक कृत्यात सक्रिय सहभाग असलेल्या नक्षल्यास गडचिरोली पोलीस दलाने जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 108 नक्षल्याना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश आले आहे. नक्षल्याचे नाव शंकर ऊर्फ अरुण येर्रा मिच्चा, वय 25 वर्षे, रा. बांदेपारा, ता. भोपालपट्टनम, जि. बीजापूर (छ.ग.) आहे. त्याला हैद्राबाद येथून ताब्यात घेण्यात आले. तो सप्टेबर 2018 मध्ये नॅशनल पार्क एरीया मधील मद्देड दलममध्ये सदस्य पदावर भरती झाला. त्याचा 4 चकमकीत सहभाग होता. महाराष्ट्र शासनाने शंकर ऊर्फ अरुण येर्रा मिच्चा याच्या अटकेवर 02 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते. आशीष अम्बाडे झी मीडिया गडचिरोली
14
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 07, 2025 15:46:33
Raigad, Maharashtra:
स्लग - चांगले काम करेल त्याला रायगडचे पालकमंत्री पद मिळेल ..... भाजप नेते प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य ........ अँकर - जो चांगले काम करेल त्याला रायगडचे पालकमंत्री पद मिळेल असं भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. माध्यमं त्यावर जास्त बोलतात त्यामुळे तो विषय लांबत जातो. माध्यमांनी बोलायचे थांबवले तर चांगलं काम करणाऱ्याला पालकमंत्री पद मिळेल असं दरेकर म्हणाले. बाईट - प्रवीण दरेकर
13
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 07, 2025 15:46:00
Ambernath, Maharashtra:
उल्हासनगरात कलानी आणि शिवसेना एकत्र , पुन्हा 'दोस्ती का गठबंधन' उल्हासनगरात विरोधी पक्ष उरणार नाही - खासदार श्रीकांत शिंदे आगामी महापालिका निवडणुकीत टीम ओमी कलानीचा शिवसेनेला जाहीर पाठिंबा Ulh sena kalani Anchor  शिवसेना आणि टीम ओमी कलानी यांची युती अबाधित आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि टीम ओमी कलानी यांच्यात 'दोस्ती का गठबंधन' जाहीर करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे संसदीय गटनेते आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी उल्हासनगरात भेट दिली. यावेळी टीम ओमी कलानीचे सर्वेसर्वा ओमी कलानी आणि त्यांच्या सदस्यांना पेढा भरवत आनंद व्यक्त करण्यात आला. आगामी उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीम ओमी कलानीचा शिवसेनेला जाहीर पाठिंबा असल्याचे यावेळी ओमी कलानी यांनी स्पष्ट केले. तसेच आगामी निवडणुका शिवसेना समवेत एकत्रित लढण्याची इच्छा ही यावेळी ओमी कलानी यांनी व्यक्त केली,उल्हासनगरात विरोधी पक्ष उरणार नाही अस समीकरण होत असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिलीय Byte ओमी कलानी  Byte गोपाळ लांडगे , जिल्हाप्रमुख सेना चंद्रशेखर भुयार ,उल्हासनगर
14
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 07, 2025 15:30:10
Raigad, Maharashtra:
स्लग - राजकारणात नेते पक्ष एकत्र येतच असतात त्यात काय मोठं ? ...... प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य ...... शिवसेना दसरा मेळाव्यात राज ठाकरे यांना मान दिला जाणार ......... सचिन अहिर यांच्या संकेतावर दरेकर यांची प्रतिक्रिया ....... अँकर - शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरे यांना मान दिला जाण्याचे संकेत सचिन अहिर यांनी दिले होते. त्यावर राजकारणात पक्ष एकत्र येत असतात , नेते एकत्र येत असतात त्यात काय मोठं अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. मिडियाला त्याचं अप्रूप आहे बघूया काय होतंय ते असं दरेकर म्हणाले. बाईट - प्रवीण दरेकर, भाजप नेते
14
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Sept 07, 2025 15:01:29
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव धाराशिव मध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत राजकीय रंग मिरवणुकीत कट्टर विरोधक निंबाळकर -पाटील आले आमने-सामने. पाटील -निंबाळकर घराण्याचे वैर तिसऱ्या पिढीपर्यंत सुरूच. DHARA_PATIL_OMRJE Anchor धाराशिव जिल्ह्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान राजकीय रंग चढलेला एक प्रकार घडला आहे. शिवसेना उबाठा गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांच्यात आमने सामने झाले. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान मल्हार पाटील समर्थकांच्या गराड्यात असल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले. समर्थकांकडून खासदार ओमराजेंना दंड थोपटून आव्हान दिल्याचे दिसून आले. सोबतच, “नादी नको लागू माझ्या तुला चांगलाच रडविन, ढोलकीला बांधून तुला बदाबदा बडविन” या गाण्यावर मल्हार पाटलांचे रील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. दरम्यान या सर्व प्रकारावर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्मित हास्य करत भाजप कार्यकर्त्यांना प्रतिसाद दिला. यामुळे जिल्ह्यात राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
14
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Sept 07, 2025 14:48:20
Ratnagiri, Maharashtra:
श्री रत्नागिरीचा राजा विसर्जन मिरवणुकीमध्ये शिवसेना नेते राजन साळवी आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यात ढोल वाजवण्याची जुगलबंदी पाहायला मिळाली. सध्या हे दोन्ही नेते एकाच पक्षात असले तरी यापूर्वी विरोधी पक्षात असताना या दोघांनी एकमेकांवर टीका केली होती. अर्थात विसर्जन मिरवणुकीत रंगलेली जुगलबंदी उपस्थितांची मने जिंकणारी होती. कोकणातले सण आणि संस्कृती यामध्ये केवळ सर्वसामान्यच नाही तर राजकीय नेते आणि पुढारी देखील देहभान विसरून सहभागी होतात. त्याचं हे उत्तम उदाहरण म्हणावं लागेल.
14
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 07, 2025 14:47:24
Nashik, Maharashtra:
Breaking News - नाशिकमधील चांदवडच्या राहुड घाटात भीषण अपघात - राहुड घाटात क्रेन उलटल्याची माहिती - घाट रस्त्याच्या मधील डिव्हायडरही तुटला - अपघातानंतर झालीये मोठी वाहतूक कोंडी - एकेरी मार्गाने वाहतूक केली सुरू - अपघातामागील कारण अद्याप अस्पष्ट
14
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 07, 2025 14:46:50
Nashik, Maharashtra:
ब्रेकिंग गणेश विसर्जनावेळी नाशिक जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यू, एक बेपत्ता विसर्जनासह विविध कारणांनी शहरात दोन, तर ग्रामीण भागात चार जण गेले वाहून गोदावरी प्रवाहात प्रवीण शांताराम चव्हाण , बोरगडमध्ये दगडी तलावात चंदर नथू माळेकर , सिन्नर सरदवाडी धरणात ओमप्रकाश सुंदरलाल लिल्हारे कळवणमध्ये नदीत दिनेश बाबूराव राजभोज तर गोवर्धनमध्ये विष्णू डगळे गणपती विसर्जन वेळी मृत्यू यंदा सर्वच धरणे, तलाव तुडुंब भरलेले असल्याने प्रशासनाने गणेश भक्तांनी विसर्जन करू नये असा दिला होता सल्ला
14
comment0
Report
Sept 07, 2025 14:37:07
Yavatmal, Maharashtra:
यवतमाळ शहरात यंदा प्रथमच प्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक संकलन करण्यात आले. नगर परिषद आणि विविध सेवाभावी संस्थांच्या पुढाकाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विसर्जनाऐवजी ३२५ मूर्ती भक्तांनी दान दिल्या व बदल्यात त्यांना रोपटी देऊन स्वागत करण्यात आले. हा उपक्रम "माझी वसुंधरा अभियान" अंतर्गत राबविण्यात आला असून संकलित मूर्तींच्या पुनर्वापरातून पुढील वर्षी दिव्यांगांना रोजगार उपलब्ध होणार आहे. शहरातील ४० केंद्रांपैकी सहा ठिकाणी मूर्तीदान स्वीकारण्यात आले. उपक्रमाचे समन्वयन प्रा. घनश्याम दरणे आदींनी केले तर नगर परिषद मुख्याधिकारी शुभम क्यातमवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी झाला.
14
comment0
Report
KJKunal Jamdade
Sept 07, 2025 14:30:55
Shirdi, Maharashtra:
Shirdi News Flash *- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बाईट पॉईंटर -* *ऑन बाळासाहेब थोरात -* काँग्रेसच्या पुढाऱ्यांचं आश्चर्य वाटतं... स्वतःला भावी मुख्यमंत्री म्हणून मिरवत होते... देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आरक्षण कोर्टात तुम्ही घालवलं... हे तुमचं पाप... आरक्षणाबद्दल तुम्हाला काहीही सोईर सुतक नव्हतं... मराठा आरक्षण मिळू शकत नाही असे तुमचे जाणते राजे सांगायचे... काही लोक राजकीय सदम्यातून सावरलेले नाहीत... त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज... या पराभूत झालेल्या लोकांना काही आरक्षण देता येईल का..?असा विचार करतोय... विखे पाटलांचा बाळासाहेब थोरातांना खोचक टोला... *ऑन लक्ष्मण हाके ओबीसी यात्रा -* ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हा सरकारचा शब्द आहे... हाकेंनी विनाकारण मराठा समाजावर टीका करण्याची आवश्यकता नाही... हाकेंनी मुक्ताफळे उधळायची बंद करावीत... समाजाचे पुढारपण करायला बंदी नाही, मात्र दुसऱ्या समाजावर टीका करण्याचा अधिकार नाही... *ऑन हाके कार्यकर्ते कराड घोषणाबाजी -* राजकारणात असे जे नवीन पुढारी आहेत त्यांचे समाजासाठी काहीही योगदान नाही... प्रसिद्धीच्या झोतात येऊन स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न... ओबीसींना आरक्षण देताना मराठा समाजाने विरोध केल्याचे एकही उदाहरण नाही... मराठा समाज जेव्हा स्वतःच्या हक्कासाठी भांडतोय, त्यात आक्षेप असण्याचे कारण काय?... अपघाताने पुढारी झालेले लोक अशा पद्धतीने राजकारण करताय... त्यांच्याबाबत काय बोलावे हा प्रश्न... *ऑन हाके अपशब्द ऑन अजित पवार आणि अमोल मिटकरी -* काही लोक थिल्लरपणा करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करताय... राजकीय व्यवस्थेला हे मान्य, याचे दुःख... *ऑन मनोज जरांगे मागणी आणि इशारा-* पुन्हा आंदोलनाची आवश्यकता नाही... गाव पातळीवर समिती नेमली आहे... जशी माहिती पुढे येईल त्यानुसार दाखले देण्याची कारवाई सुरू होईल...
13
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 07, 2025 14:30:27
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0709ZT_CHP_TIGER_CAGED_1_2 ( 2 file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील सावली परिसरातल्या पाथरी शेतीशिवारात धुमाकूळ घालणारी हल्लेखोर वाघीण अखेर जेरबंद,  दोन दिवसापूर्वी शेतकऱ्याला केले होते ठार      अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातल्या पाथरी परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या हल्लेखोर वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. दोन दिवसांपूर्वी वाघिणीच्या हल्ल्यात पाथरी येथे एका शेतकऱ्याच्या मृत्यू झाला होता.  या वाघिणीच्या हल्ल्यांमुळे परिसरात मोठया प्रमाणात दहशत निर्माण झाली होती. वाघीणीला जेरबंद करण्यासाठी मोहीम आखली होती.  वाघीणला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आले व जेरबंद करण्यात यश आले असून नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. वाघिणीची तपासणी करून तिला चंद्रपूरच्या वन्यजीव शुश्रूषा केंद्रात रवाना करण्यात आले आहे.   आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
15
comment0
Report
Advertisement
Back to top