Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

नवरात्र में कोटमगाव देवस्थान पर लाखों भक्त, 9 दिन स्वास्थ्य चेक-अप कैंप

SKSudarshan Khillare
Sept 24, 2025 01:03:46
Yeola, Maharashtra
अँकर:-नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या कोटमगाव देवस्थान या ठिकाणी नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून लाखो भावीक या उत्सवात भेट देत असतात या ठिकाणी घटी बसणाऱ्या भाविकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात असून या भाविकांसाठी येवला तालुका मेडिकल प्रॅक्टिशनस असोसिएशन यांच्या वतीने नऊ दिवस सलग आरोग्य तपासणी शिबिर ठेवण्यात आले असून याशिवरात आबाल वृद्ध तथा ज्येष्ठ नागरिकांच्या विविध तपासण्या डॉक्टरांच्या मार्फत होणार आहे
7
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HCHEMANT CHAPUDE
Sept 24, 2025 09:25:24
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 24, 2025 08:32:44
Kalyan, Maharashtra:आत्मनिर्भर भारत उपक्रमाची सुरुवात डोंबिवलीतून फक्त स्वदेशी वस्तूच वापरण्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आपला देश निरंतर वाटचाल करत आहे. या वाटचालीला गती देण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाचे योगदान आवश्यक आहे. यासाठीच प्रत्येक भारतीयाने स्वदेशी वस्तू वापरण्याचे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनीही केले. Vo..हे आवाहन प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी 'प्रत्येक घरी स्वदेशी, घरोघरी स्वदेशी' या आवाहनानुसार आकाशात झेपावलेला भव्य फुगा डोंबिवलीतील घारडा सर्कल येथील 'नमो रमो नवरात्री'च्या परिसरात लावण्यात आला आहे. यासोबतच याठिकाणी स्वदेशी वस्तू वापरण्याचा संदेश देणारे फलकही लावण्यात आले आहेत. भव्य फुगा आणि फलक बघून प्रत्येकाच्या मनातील फक्त स्वदेशी वस्तू वापरण्याचा संकल्प आणखी दृढ होईल असा विश्वासही प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. भाजपाच्या वतीने देशभरात 'आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान' राबवले जाणार आहे. आपणही या अभियानात सामील होऊन आत्मनिर्भर भारताचा संकल्प करूया, फक्त स्वदेशी वस्तूच वापरूया असे आवाहन चव्हाण यांनी यावेळी केले. Byte... रवींद्र चव्हाण भाजपा प्रदेशअध्यक्ष
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 24, 2025 08:17:21
Hingoli, Maharashtra: हिंगोली - काही दिवसापासून हिंगोली जिल्ह्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याच्या नंतर राज्यातील अनेक मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले त्यांनी शेत पिकाच्या नुकसानीची पाहणी केली अनेक शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेली कोणाची घर वाहून गेले. हिंगोली जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर काढणीस आलेली सोयाबीन,कपाशी,हळद,केळी आदी पीके जमीनदोस्त झाली हाती आलेला तोंडचा घास निसर्गाने हिरावून नेला मात्र पीक विमा कंपनीचा एकही प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर फिरकला नाही याचा जाब विचारण्या करीता रविकांत तुपकर यांचे समर्थक क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते(AIC) पिक विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये पोहोचले पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी उडवा- उडवीची उत्तर दिल्याच्या नंतर कंपनीच्या साहित्याची तोडफोड केली . बाईट- नामदेव पतंगे- शेतकरी नेता
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 24, 2025 08:02:22
Ambernath, Maharashtra:वांगणी-बदलापूर दरम्यान लोकलखाली दोन म्हशी अडकल्याने अप मार्गावरील वाहतूक ठप्प कर्जतहुन मुंबईकडे निघालेली लोकल तासभर खोळंबली  लोकल खाली अडकलेल्या दोन्ही म्हशी काढल्या नंतर रेल्वे वाहतूक सुरू Bdl train Anchor - वांगणी बदलापूर दरम्यान लोकल खाली दोन म्हशी अडकल्यामुळे बदलापूर ते कर्जत दरम्यानची अप दिशेवरील वाहतूक ठप्प झाली आहे. गेल्या तासाभरापासून मुंबईकडे जाणारी लोकल वांगणी बदलापूर दरम्यान गोरेगाव येथे खोळंबली होती. अकरा वाजून सात मिनिटांनी ही लोकल वांगणीहुन मुंबईच्या दिशेने रवाना झाली होती. त्याचवेळी काही म्हशी रेल्वे ट्रॅकवरून जात होत्या. यातील दोन म्हशी लोकल खाली सापडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. सध्या या म्हशी बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते , अखेर रेल्वे प्रशासनाने या म अडकलेल्या म्हशी बाहेर काढल्यानंतर रेल्वे वाहतूक सुरू झाली चंद्रशेखर भुयार  , बदलापूर
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 24, 2025 07:34:43
Solapur, Maharashtra:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषण मुद्दे काही गावांना मी आता भेटी दिल्या आहेत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आता आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणची पूर्ण एक वसाहत पाण्याखाली बुडाली होती. 22 लोकांना NDRF ने रेस्क्यू केलं होतं NDRF ने चांगल्या प्रकारे रेस्क्यू ऑपरेशन राबवले राज्य सरकारच्या वतीने आम्ही तातडीने मदत सुरू केली आहे राज्य सरकारने 2000 कोटी रुपये रिलीज केली आहे शेतकऱ्यांना आम्ही मदत करणार आहोत ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं त्यांना आम्ही मदत करणार आहोत कोणत्याही अधिकचे निकष न लावता निकष स्थितील करून नागरिक केंद्रित मदत करणार आहोत नियमावर बोट ठेवून मदत डावली जाणार नाही दिवाळीची पूर्वी आम्ही सर्वांना मदत करणार आहोत ओला दुष्काळ ही बोली भाषेतील टर्म आहे .. पण त्याहीपेक्षा जास्त आम्ही मदत शेतकऱ्यांना करणार आहोत. आता पहिल्यांदा तातडीची मदत हा पहिल्यांदा महत्त्वाचा विषय आहे.. केंद्र सरकार देखील मदत करणार आहे एन डी आर एफ मध्ये काही ऍडव्हान्स पैसे केंद्राने दिले आहेत. त्यांच्या नॉर्मनुसार जे बसतात त्यांना मदत देऊ.. जे बसत नाहीत त्यांना आम्ही मदत देऊ. कॅचमेंट एरिया सोडून पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे ज्या शेतकऱ्यांची जमीन खरवटून गेली त्यांना देखील आम्ही मदत करू..
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Sept 24, 2025 07:34:26
Wardha, Maharashtra:वर्धा SLUG- 2309_WARDHA_DRAGANFRUIT मेकॅनिकल इंजिनीअर असलेल्या युवकाने  ड्रॅगन फ्रुट ची शेती करत कमवाले लाखो रुपये अँकर : मनात जिद्द असली की कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे दाखवून दिले आहे वर्ध्याच्या आर्वी येथील एका होतकरू युवकाने. मेकॅनिकल इंजिनिअरिंग चे उच्च शिक्षण घेतल्यानंतर ही छोट्याशा पगाराच्या चौकटीत न राहता स्वतःच शेतीमध्ये नियोजन बद्ध काम करत तो लाखो रुपये कमवत आहे. व्हीवो- तुषार नंदनवार ह्या युवकाने पारंपरिक शेतीला फाटा देत काहीतरी वेगळे करून दाखवले आहे.त्याने सततच्या नापिकी ला कंटाळून काहीतरी वेगळे करत आपल्या अर्धा एकर शेतीत ड्रॅगन फ्रुट लावत एक अनोखा प्रयोग केला.आनी तो यशस्वी सुद्धा केला.आज त्याने 5000 नवीन झाडांची लागवड केली असुन येणाऱ्या काळात त्याची कमाई लाखोंच्या घरात असणार आहे बाईट- तुषार नंदनवार,शेतकरी
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 24, 2025 07:31:57
Nanded, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_DamGate Feed on - 2C --------------------------- Anchor - जायकवाडीसह इतर धारणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने गोदावरी नदीला पुर आला आहे. नांदेड जिल्हयात सद्या पाऊस नाही तरी परभणी आणि वरच्या भागात अतिवृष्टी झाल्याने गोदावरी नदीत पाण्याची आवक वाढली आहे. मोठया प्रमाणात पाण्याची आवक वाढल्याने नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाचे सोळा दरवाजे उघडण्यात आले. त्यातून 1 लाख 25 हजार क्युसेस इतक्या वेगाने गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तब्बल 25 वर्षानंतर 16 दरवाजे उघडण्यात आले आहेत. गोदावरी नदीला पुर आला असून धोक्याची पातळी ओलांडली जाण्याची शक्यता आहे. त्यामूळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुरामुळे नांदेड शहराची मुख्य स्मशानाभूमी असलेली गोवर्धन घाट शांतिधाम स्मशानाभूमी पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. सिडको येथील स्मशानाभूमीत अंत्यसंस्कार करावेत असे आवाहन महापालिकेने केले आहे. --------------------
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 24, 2025 07:30:39
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - आपली लायकी त्या संविधानात, संभाजी भिडेंचे उद्विग्न विधान ! अँकर - जगात 187 देश आहेत, आपली लायकी काय,तर आपली लायकी त्या संविधानात,आणि पोटात मुरड आल्या प्रमाणे विद्वान लोक बोलतात संविधान,अरे कसलं संविधान बोलता ? अश्या शब्दात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी संविधाना बाबत उद्विग्नात व्यक्त केली आहे.तसेच 1300 वर्ष मुस्लिम,युरोपियनांच्या पारतंत्र्यात एखादा जीव खितपत पडलेल्या लोकांचा देश असून ज्यांना लाज वाटत नाही, ज्यांना पारतंत्र्याची गुलामीची लाज वाटत नसलेला निर्लज्ज लोकांचा देश आहे.आम्हाला फक्त स्वराज्य , स्वातंत्र्य नको आहे,हिंदवी स्वातंत्र्य हवे आहे,असे विधान देखील संभाजी भिडे यांनी केले आहे, ते सांगलीत शिवप्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दुर्गामाता दौड प्रसंगी बोलत होते. साऊंड बाईट - संभाजी भिडे गुरुजी - संस्थापक अध्यक्ष - शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 24, 2025 07:05:37
Dhule, Maharashtra:ANCHOR - नंदुरबार शहरात १६ सप्टेंबर रोजी दोन युवकांमधील वादातून झालेल्या हल्ल्यात एका युवकाचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या निषेधार्थान नंदुरबार शहर बंदचे हाक देण्यात आले होती. या बंदला सर्वव्यापी प्रतिसाद मिळाला. नंदुरबार शहरातील व्यापारी संस्था कडकडीत बंद ठेवण्यात आली होती. सूर्यकांत मराठे आणि जय वळवी यांच्यात झालेल्या वादातून जयेश वळवी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्व आदिवासी संघटना आणि आदिवासी समाज आक्रमक झाल्या आहेत. जय वळवी यांच्या खुनातील आरोपींवर कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आज नंदुरबार शहर बंद ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व संघटना व आदिवासी बांधवांनी या बंदला पाठिंबा दर्शवला आहे. आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी सर्व आदिवासी संघटना आणि बांधवांच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. नेहरू चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मूक मोर्चा काढण्यात आला. आहे.अत्यावश्यक सेवा वगळता सर्व खाजगी आस्थापना बंद ठेवण्यात आल्या आहेत. बंद आणि मोर्चा शांततेत पार पडावा यासाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 24, 2025 06:50:36
Jalna, Maharashtra: FEED NAME | 2409ZT_JALNA_TOPE(4 FILES) जालना : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते राजेश टोपे यांच्याकडूनही नुकसान पाहणी जुलै ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या यादीतून जालना जिल्हा वगळला-टोपे नेर,विरेगाव मंडळात ढगफुटी होऊनही मंडळ मदतीतून वगळले हेक्टरी 50 हजार मदत द्या मदतीकडे सरकारचे दुर्लक्ष,10 आणि 15 हजार मदत चालणार नाही दुष्काळाचे स्थायी आदेश लागू करा अँकर :राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते राजेश टोपे यांच्याकडूनही नुकसान पाहणी करण्यात आली आहे.जालना तालुक्यातील विरेगाव भागात पाहणी केली.यावेळी शेतकऱ्यांशी देखील संवाद साधत झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.दरम्यान जुलै ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या यादीतून जालना जिल्हा वगळला असल्याचा आरोप टोपे यांनी केला आहे.पंचनामे न करता सरसकट 10 ते 15 हजारांची हेक्टरी मदत न देता हेक्टरी 50 हजारांची मदत शेतकऱ्यांना द्या अशी मागणी टोपे यांनी केली आहे बाईट राजेश टोपे
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top