Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Kolhapur416005

कोल्हापुर दूध संघ चुनाव में ठराव लेकर हंगामा, किसके नाम पर होगा मतदान?

PNPratap Naik1
Sept 19, 2025 15:18:53
Kolhapur, Maharashtra
कोल्हापूर Anc:- कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाची निवडणूक पुढच्या वर्षी होणार आहे मात्र या निवडणुकीत दूध संस्थेसाठी ठराव कोणाच्या नावावरून द्यायचा यासाठी आता दूध संस्थांमध्ये चक्क हाणामारी होऊ लागल्याचे चित्र आहे.. पन्हाळा तालुक्यातील कळे इथल्या धर्मराज दूध संस्थेतील ठराव लिलाव पद्धतीने देण्याची मागणी करत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी झाली... सत्ताधारी आणि विरोधक यांचे समर्थक एकमेकांवर धावून गेल्यामुळे संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा चांगलीच वादग्रस्त ठरली आहे.. दरम्यान गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार ठराव धारकाला असतो... या ठराव भारताला चांगलाच भाव असतो त्यामुळे हा संस्थेचा ठराव नेमका कोणाच्या नावावर करायचा यावरून दूध संस्थेमध्ये झालेल्या या राड्याची चांगलीच चर्चा जिल्ह्यात रंगली आहे शिवाय गोकुळ दूध संघाच्या पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीची एक झलकच या निमित्ताने बघायला मिळाली
4
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKShubham Koli
Sept 19, 2025 15:35:31
Thane, Maharashtra:ठाणे ठाण्यातील हायलँड पार्क मधील बिल्डिंग येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून सचिन वसंत गुंडेकर पडून तळ मजल्यावरती असलेल्या लोखंडी परांची व दोरखंडमध्ये अडकले होते. सदर घटनास्थळी बाळकुम अग्निशमन केंद्राचे स्थानक अधिकारी वेताळ सो., कापूरबावडी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०१- पिकअप वाहनासह, अग्निशमन दलाचे जवान १ इमर्जन्सी वाहनासह व ०१- रुग्णवाहिका उपस्थित होते. सदर घटनास्थळी इमारतीवरून पडलेल्या व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सदर व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला होता. सदर व्यक्तीला अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढून कापूरबावडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर व्यक्तीचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी सिव्हिल रुग्णालय, ठाणे येथे दाखल केले आहे.
1
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Sept 19, 2025 14:24:49
Vasai-Virar, Maharashtra: Date-19sep2025 Rep-prathamesh tawade Loc-vasai Slug-VASAI FIRE Feed send by 2c Type-AV Slug- वसईत पुठ्ठा बनविणाऱ्या कंपनीला आग परिसरात मोठ मोठे आगीचेे लोळ अँकर - वसई तुंगारेश्वर फाटा येथील एका पुठ्ठा कंपनीला भीषण आग लागल्याची घटना सकाळी घडली ... इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती ... आग इतकी भयानक होती की आगीचे मोठे लोळ पसरले होते... सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही ... या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वसई पालिकेच्या अग्निशमन पथकाने घटनास्थळी धाव घेतली व कंपनीतील कामगारांना खाली करून सुरक्षेच्या दृष्टीने हालचाली केल्या.. सध्या अग्निशमन पदकाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे ही आग नेमकी कशामुळे लागली ते मात्र समजू शकलेले नाही...
2
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 19, 2025 14:01:29
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1909ZT_CHP_WASADE_DEATH ( single file sent on 2C)  टायटल:-- एड. बाबासाहेब वासाडे यांचे वयाच्या 84 व्या वर्षी अल्पशा आजाराने चंद्रपुरात राहत्या घरी झाले निधन,  रा. कॉ. शरद पवार पक्षाचे संस्थपक शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या एड. वासाडे यांना विदर्भात सहकार महर्षी रुपात होती ओळख      अँकर:-- एड. बाबासाहेब वासाडे यांचे वयाच्या 84 व्या वर्षी चंद्रपुरात राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले.  रा. कॉ. शरद पवार पक्षाचे संस्थपक शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या एड. वासाडे यांना विदर्भात सहकार महर्षी रुपात ओळख होती. एड. वासाडे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे दीर्घकाळ अध्यक्ष होते. त्यांच्या काळात बँकेने नेत्रदीपक प्रगती साधली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाळा- महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये उघडून त्यांनी जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीत वाटा उचलला होता. चंद्रपूरच्या शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक वर्तुळातील नागरिक नागपूर महामार्गावरील त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी दाखल होत आहेत.. उद्या  सकाळी चंद्रपुरात शांतिधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर त्यसंस्कार केले जाणार आहेत. बाईट १) संजय वासाडे, एड. वासाडे यांचे सुपुत्र आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 19, 2025 13:17:41
Ambernath, Maharashtra:कुलरचं पाणी पिऊन ऑर्डनन्स फॅक्टरीतील कर्मचाऱ्यांना त्रास कुलरची स्वच्छता झाली नसल्याचं उघड १८ ते १८ कर्मचाऱ्यांवर ऑर्डनन्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू Amb Jordan's factory Anchor : कुलरचं दूषित पाणी पिऊन १७ ते १८ कर्मचाऱ्यांना त्रास झाल्याची घटना अंबरनाथच्या ऑर्डनन्स मधील एमटीपीएफ कारखान्यात घडली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांवर सध्या ऑर्डनन्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. Vo3 : एमटीपीएफ कारखान्यातील कर्मचारी आज सकाळी नाश्ता केल्यानंतर कारखान्यातील कुलरचं पाणी प्यायले. यानंतर काही वेळातच १७ ते १८ कर्मचाऱ्यांना उलट्या, मळमळ, चक्कर असे त्रास सुरू झाले. या कर्मचाऱ्यांनी कारखान्यातील दवाखान्यात तपासणीसाठी धाव घेतली असता त्यांना ऑर्डनन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. या घटनेनंतर कुलर उघडून पाहणी केली असता फिल्टरमध्ये मोठ्या प्रमाणात माती साचलेली होती. तसंच कुलरची नियमित स्वच्छता झाली नव्हती, त्यामुळेच आपल्याला हा त्रास झाल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. अधिकाऱ्यांनी या कुलरची पाहणी केली असून वेळेच्या वेळी मेंटेनन्स होत नसल्यामुळे ही घटना घडल्याची कर्मचाऱ्यांची तक्रार आहे. Byte : रुग्णालयात दाखल कर्मचारी चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
3
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 19, 2025 12:54:14
Parbhani, Maharashtra:बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामधून आरक्षण द्यावे या मागणीसाठी आज हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा बांधवांनी मोर्चा काढला यावेळी बंजारा समाजाचे सर्व लोकप्रतिनिधी आक्रमक झाल्याचे बघायला मिळालं.आम्ही रोडवरचे आंदोलन करतोय,मोर्चे काढतोय,निवेदन देतोय,तरी सुद्धा आम्हाला सरकार आम्हाला आमच्या हक्काचं एसटी प्रवर्गातील आरक्षण देत नसेल तर आमदारकीचा राजीनामा देणार,शिवाय मी मंत्रीसंजय राठोड राज्यमंत्री इंद्रनील राठोड,भाजपचे आमदार तुषार राठोड,धर्मगुरू तथा विधानपरिषद सदस्य बाबू सिंग राठोड यांना ही राजीनामा देण्याचं आवाहन केलय, बंजारा समाजासाठी त्यांचं आणि माझं तेवढंच कर्तव्य आहे. उद्या जर बंजारा समाजाला आदिवासींचे प्रमाणपत्र नाही मिळाले तर लोक यांना रस्त्यावर फिरू देतील का, मी राजीनामा देतोय म्हटल्यावर यांना सुद्धा राजीनामा द्यावा लागेल असं काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार राजेश राठोड म्हणाले,जर सरकारने आम्हाला तात्काळ एसटी प्रवर्गातून आरक्षण दिलं नाही तर आम्ही बंजारा समाजाचे सर्व आमदार राजीनामा देऊ असा ईशाराच आमदार राठोड यांनी सरकारला दिलाय, त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी 121 राजेश राठोड- विधान परिषद सदस्य
3
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 19, 2025 12:52:43
Nashik, Maharashtra:nsk_callcenterpkg फीड by 2C अँकर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी सध्या अवैध कॉल सेंटरच प्रमुख केंद्र बनले आहे. हिल स्टेशन बनलेल्या या पर्यटन नगरीत दुसरे रॅकेट तर नाशिक शहरात एक रॅकेट चा पर्दाफाश वर छापा टाकत मोठा घोटाळा उघड केला आहे. इगतपुरीत कर्जदारांना धमकावून पैसे उकळणारे हे रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केले असून २४ लाख रुपयांची रोकड, संगणक, लॅपटॉप जप्त केले आहेत. Vo 1 इगतपुरीतील मीनाताई ठाकरे संकुलात सुरू असलेल्या अवैध कॉल सेंटरवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी बुधवारी छापा टाकला. या कारवाईत कॉल सेंटर चालक इगतपुरीचे नरेंद्र शशिकांत भोंडवे मुंबईचे पारस संजय भिसे यांना अटक करण्यात आलीये. पोलिसांनी २४ लाखांची रोकड, संगणक, लॅपटॉप, मोबाइल असा मोठा मुद्देमाल जप्त केला. प्राथमिक चौकशीत ४०-५० कर्मचारी कॉलर म्हणून काम करत असल्याचे समोर आले. हे रॅकेट कर्जदारांना बँक अधिकारी असल्याचे भासवून धमकावत असे. हप्ता भरला नाही तर कारवाई होईल अशा धमक्या देऊन पैसे वसूल केले जात होते. नातेवाईकांनाही धमकावले जात होते. Byte बाळासाहेब पाटील पोलिस अधीक्षक Vo 2 यापूर्वी स्वतः दिल्लीच्या सीबीआय पथकाने इगतपुरीत छापे टाकले होते. अशा आर्थिक घोटाळ्यात बँक व वित्तीय संस्थांच्या अधिकाऱ्यांचा डाटा पुरविण्यात आणि काही पोलिस अधिकारी पाठिंबा देत असल्याचं समोर आला आहे . अटकेतील दोघांना १९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यात अधिक तपासानंतर मोठे घोटाळे समोर येण्याची शक्यता आहे.
2
comment0
Report
KJKunal Jamdade
Sept 19, 2025 12:30:21
Shirdi, Maharashtra:Anc - आई-वडील विभक्त झाल्याने दूरच्या नातेवाईकांकडे सांभाळ करण्यासाठी दिलेल्या सख्ख्या 4 बहिणींवर पालनकर्त्यानेच लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी पोलिस ठाण्यात दाखल झालाय.. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून इतर तीन आरोपींचा शोध सुरू आहे.. गेल्या पाच वर्षांपासून मुलींवर लैंगिक अत्याचार सुरू होते असे फिर्यादीत म्हटलं आहे.. V/O - राहुरी तालुक्यात सख्ख्या 4 बहिणींवर नातेवाईकानेच वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.. चारही पीडित मुली नाशिक जिल्ह्यातील असून त्यातील एक मुलगी सज्ञान तर इतर 3 मुली अल्पवयीन आहेत.. सज्ञान झालेल्या मुलीचा चार महिन्यांपूर्वी विवाह झाला.. ती बहिणींना भेटण्यासाठी राहुरी तालुक्यात आल्यानंतर पुन्हा तिच्यावर अत्याचार करण्यात आला.. अल्पवयीन मुलींपैकी एक 16, दुसरी 14 आणि तिसरी 10 वर्षांची आहे.. मोठ्या बहिणीच्या फिर्यादीवरून आरोपी बजरंग कारभारी साळुंखे, इतर दोन पुरुष आणि एक महिला अशा चारजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. पोलिसांनी आरोपी बजरंग कारभारी साळुंखे याला तत्काळ ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून या घटनेबाबत राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी हे संबंधित मुलींचे नातेवाईक असल्याचं पोलिस तपासात समोर आलंय... मुलींवर गैरप्रकार केल्याचा गंभीर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांचा तपास सुरू असल्याचं पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी म्हणलंय... Bite - सोमनाथ घार्गे , पोलिस अधीक्षक
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 19, 2025 12:19:15
Parbhani, Maharashtra:बंजारा समाजाला एसटी प्रवर्गांमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा बांधवांच्या विराट मोर्चाला सुरुवात झालेली आहे . हिंगोली शहरातील जुनी जिल्हा परिषद मैदान परिसरातून सदर मोर्चा निघाला असून शहरातील मुख्य मार्गाने हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचणार आहे. यामध्ये महिलां तरुणांचा मोठा सहभाग पाहायला मिळतोय. बंजारा समाजाची जी परंपरागत वेशभूषा आहेत ही वेशभूषा परिधान करून अनेक महिला भगिनी या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. असं कसं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणा देत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला,जिल्हाधिकारी कार्यालया समोर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले आहे,माजी खासदार हरिभाऊ राठोड, काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार राजेश राठोड,मुखेडचे भाजपचे आमदार तुषार राठोड,विधान परिषद सदस्य महंत बाबूसिंग महाराज राठोड यांची मोर्चाला प्रमुख उपस्थित होती. शासनाने आमच्या मागण्यांची वेळीच दखल घेतली नाही,तर आम्ही मुंबईत येऊन दिवाळी साजरी करू असा ईशारा यावेळी बंजारा समाजाच्या नेत्यांनी दिला. बाईट- तुषार राठोड - आमदार,भाजप
3
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 19, 2025 12:02:25
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:Sng_gopichand स्लग - गोपीचंद पडळकर आणि त्यांची वादग्रस्त विधाने.. अँकर - भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे,गेले काही वर्षांपासून वादग्रस्त विधानासाठी चर्चेत राहिले आहेत,सातत्याने कडून वादग्रस्त विधानांची मालिका सुरूच आहे.गोपीचंद पडळकर आणि वादग्रस्त विधान असेल समीकरण बनले आहे. व्ही वो - भाजपाचे फायर ब्रँड नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर हे त्यांच्या आक्रमक भाषा शैलीसाठी ओळखले जातात, गेल्या काही वर्षात गोपीचंद पडळकरांकडून एकामागून एक वादग्रस्त विधान करण्यात आली आहेत,शरद पवारांपासून अजित पवार,सुप्रिया सुळे,जितेंद्र आव्हाड , संजय राऊत आणि जयंत पाटीलयांच्यावर पडळकरांकडुन प्रामुख्याने टीका करण्यात आली,ही टीका करताना अनेक वेळा गोपीचंद पडळकरांची तोल ढासळला सुद्धा आहे. आता याच गोपीचंद पडळकरांकडून पुन्हा एक वादग्रस्त विधान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटलांच्या बाबतीत सांगलीच्या जत मध्ये करण्यात आले आहे. ज्यामध्ये खालच्या पातळीला जाऊन गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांना लक्ष केलंय. पाहूया जयंत पाटलांवर टीका करताना गोपीचंद पडळकर काय म्हणाले. एकेरी भाषेत जयंत पाटलांचा उल्लेख करत जयंत पाटील हा बेअक्कल माणूस आहे, दर आठवड्याला तो सिद्ध करतोय,होय मी बे-अक्कल माणूस आहे. जयंत पाटील हा भिकारी औलाद आहे. जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांची औवलाद वाटत नाही,काही तर गडबड आहे ? अशा पद्धतीची खालच्या पातळीवरील टीका गोपीचंद पडळकरांकडून करण्यात आली आहे.त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एक वाद निर्माण झालाय.पण गोपीचंद पडळकर यांचे हे विधान पहिलंच नाही, आजपर्यंत त्यांच्याकडून अनेक वादग्रस्त विधान करण्यात आली आहेत. पाहूयात आजपर्यंतची त्यांच्याकडून करण्यात आलेली काही वादग्रस्त विधान. राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या वर टीका करताना,पडळकरांनी शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. मी लहान असल्यापासून पाहतोय शरद पवार हे भावी पंतप्रधान आहेत,पण ते काही होत नाही, बाळासाहेब ठाकरेंच्या एका विधानाचा पुनरुच्चार करत,कांदयाला दर मिळवण्यासाठी शरद पवारांच्या ढुंगणावर लाथा घाला,ते बेशुद्ध पडल्यावर त्यांच्यावर कांदा पिळा,मग कांद्याला दर मिळेल. कोल्हापूर येथील धनगर समाजाच्या आंदोलना दरम्यान त्यांचा एक विधान गाजलं होतं.धनगर समाजाने बकऱ्या राखायचं बंद केलं,तर महाराष्ट्राच्या जनतेला कुत्र्याचं मटन खावं लागेल असं विधान पडळकरांनी केले होते. संजय राऊत हा बिन बुडाचा लोटा आहे,खातोय उद्धव ठाकरेचे आणि चाकरी करतोय शरद पवाराची. पुण्यात एक कुटुंब मटण खाऊन दगडूशेठ गणपतीला जातंय.. ख्रिश्चन समाजाच्या पादरीबाबत बोलताना, धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केल्यास पदरींचा सैराट करा असं जाहीर वक्तव्य केले होते. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विधानसभेमध्ये प्रवेश करताना शिवीगाळ केल्याचा प्रकार. त्या घटनेनंतर विधानसभेच्या लॉबीमध्ये पडळकर आणि आव्हाड गटांमध्ये हाणामारीचा प्रकार घडला होता. राजकीय नेत्यांबरोबर पडळकरंकडून मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाच्या बाबतीत देखील वादग्रस्त विधान करण्यात येत आहेत. व्ही वो - भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने वादग्रस्त विधान करतात,यानंतर भाजपाकडून पडळकर यांना सबुरीचा सल्ला देखील दिला जातो.मात्र गोपीचंद पडळकरंकडून वारंवार भाजपा सल्ल्याचा-कल्ला करून वादग्रस्त विधानांची मालिका कायम ठेवण्यात धन्यात मानतात, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि फळकरांना पुन्हा एकदा सबुरीचा सल्ला दिलाय आणि तो पाळण्याचा आश्वासन पडळकर यांनी देखील दिलय.. मात्र ही सबुरी किती दिवस असणार हे मात्र अनिश्चित आहे,
3
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 19, 2025 12:01:41
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - बहुप्रतीक्षित सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-बंगळूरू विमानसेवा 15 ऑक्टोबर पासून होणार सुरु सोलापूरकरांची गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा अखेर पूर्ण होणार बहुप्रतीक्षित सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-बंगळूरू विमानसेवा 15 ऑक्टोबर पासून होणार सुरु केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची फेसबुक पोस्टद्वारे माहिती 15 ऑक्टोबर पासून दुपारी 12.55 मिनिटांनी सोलापूर-मुंबई आणि दुपारी 2.45 मुंबई-सोलापूर विमानसेवेस प्रारंभ तर सकाळी 11.10 वाजता बंगळूरू-सोलापूर आणि दुपारी 4.15 वाजता सोलापूर-बंगळूरू असणार विमानसेवा या दोन्ही शहरासाठी 20 सप्टेंबरपासून नागरिकांना विमान तिकीट बुकिंग करता येणार आहे काही दिवसांपूर्वीच सोलापूर-गोवा विमानसेवा सुरु झालीय, ज्याला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय त्यानंतर आता मुंबई आणि बंगळूरू साठी देखील विमानसेवा सुरु होतं असल्याने सोलापूरकरामध्ये आनंद
1
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 19, 2025 11:51:23
Navi Mumbai, Maharashtra:story slug - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ची उद्घाटन साठी तयारी nm airport opening prparation FTP slug - nm airport preparation shots- reporter - swati naik navi mumbai anchor - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाची तयारी अंतिम टप्प्यात रस्त्यांचे डांबरीकरण, रंगरंगोटी, फुटपाथांचे सुशोभीकरण या कामांना आला वेग. येत्या 30 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होण्यास जवळपास शिक्कामोर्तब. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे होणार उद्घाटन. उद्घाटन झाल्यानंतर नोव्हेंबर किंवा डिसेंम्बर मद्ये प्रवासी वाहतूक होणार सुरू. उद्घाटन निश्चित असलं तरी नामांतराचा मुद्दा अद्याप सुटलेला नाही. उद्घाटन झाल्यावर स्थानिक भूमिपुत्र काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे. gf-
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 19, 2025 11:46:31
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1909ZT_CHP_BURNING_CAR_1_2 ( 2 file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात राष्ट्रीय महामार्गावर अचानक कारने घेतला पेट, शहरातील आनंदवन चौकातील घटना अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात राष्ट्रीय महामार्गावर कारने अचानक पेट घेतला. ही घटना शहरातील आनंदवन चौकातील घडली. काही क्षणातच धूर व नंतर ज्वालांनी संपूर्ण कार ची राख रांगोळी झाली.  अचानक आग लागल्याने सर्वत्र पळापळ झाली. आगीचे कारण मात्र अज्ञात आहे. थोड्या वेळासाठी या महामार्गावरील वाहतूक  विस्कळीत झाली होती. पोलीस आणि अग्निशमन पथकांनी घटनास्थळी पोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. ---- बर्निंग कार चे vis----- आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
2
comment0
Report
Advertisement
Back to top