icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
281401
SKSudarshan Khillare6 Jul 2025, 09:02 am
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

मालवण के स्विमिंग पूल से ऊँचाई से छलांग में युवक की मौत, वीडियो वायरल

Oras Bk., Maharashtra:मालवण वायरी येथील एका छोट्या स्विमींग पूलमध्ये उंचवरून उडी मारल्याने डोकीला गंभीर दुखापत झाल्याने इस्लामपूर, ता. कागल (जि. कोल्हापूर) येथे श्रेणीक मिलींद टाकळे (२५) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी घडली. याप्रकरणी पोलीसांनी आकस्मित मृत्यू म्हणून नोंद केली होती मात्र आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. कागल येथील दहा मित्र पर्यटनासाठी मालवणमध्ये आले होते. ते वायरी येथील एका रिसॉल्टमध्ये उतरले होते. दुपारच्या वेळी काही मित्र रूममध्ये होते तर काही मित्र स्विमींगचा आनंद लुटत होते. छोट्या स्विमींगपूलमध्ये लहान मुलांसाठी आनंद लुटण्याच्या चार फुटाच्या भागामध्ये श्रेणीक याने आठ ते दहा फुटावरून उडी घेतली. श्रेणीक याची उंची असल्याने त्याची उडी थेट पूलच्या तळाशी जावून आपटली. यात त्याच्या डोकीला दुखापत झाल्याने तो जागीच गतप्राण झाला. त्याच्या मित्रांना तात्काळ त्याला उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात हलविले. मात्र उपचाराप्रवर्गीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलीसांनी याबाबत आकस्मित मृत्यू म्हणुन नोंद केलीय. मात्र या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय
0
0
Report
Advertisement

बीड केज तालुक्यात विलास घुले हत्याकांड: परिवार ने पुलिस संरक्षण और गिरफ्तारी की मांग

Beed, Maharashtra:बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले खून प्रकरणात नवी घडामोड समोर आली आहे. मयत विलास घुले यांचे बंधू रमेश घुले यांनी आज बीडचे पोलीस अधीक्षकांची भेट घेत तपासासंदर्भात महत्त्वाच्या मागण्या केल्या. मुख्य आरोपी रामेश्वर गायकवाड यानेच या खुनाचे षडयंत्र रचल्याचा आरोप करत त्यालाही अटक करण्याची मागणी करण्यात आली. तसेच स्वतःला आणि कुटुंबीयांना सातत्याने धमक्या येत असल्याचा दावा करत पोलीस संरक्षणाचीही मागणी करण्यात आली आहे. केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले खून प्रकरणात तपासाची दिशा अधिक व्यापक करण्याची मागणी घुले कुटुंबीयांनी केली आहे. मयत विलास घुले यांचे बंधू रमेश घुले यांनी आज बीडचे पोलीस अधीक्षकांची भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी त्यांनी खुनाच्या तपासासाठी नेमण्यात आलेल्या एसआयटीमध्ये काही अनुभवी आणि विशिष्ट अधिकाऱ्यांचा समावेश करण्याची मागणी केली. मुख्य आरोपी रामेश्वर गायकवाड याच्या घराजవळच कारखाना असल्याने त्यानेच या खुनाचे नियोजन केल्याचा आरोप करत त्यालाही अटक करण्याची मागणी त्यांनी केली. याशिवाय, स्वतःसह कुटुंबीयांना सातत्याने धमक्या मिळत असल्याचा दावा करत तातडीने पोलीस संरक्षण देण्याची मागणी त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली. मारहाणीच्या घटनेचा उल्लेख करत रमेश घुले यांनी, आरोपी पांढऱ्या रंगाच्या वाहनातून आले होते आणि मारहाण करताना खासदार बजरंग सोनवणे यांचे नाव घेत होते, असा आरोपही केला आहे. दरम्यान हत्या प्रकरणातील एक संशयित पोलीस अधीक्षक कार्यालयात दिसल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संशयित पोलीस अधीक्षक कार्यालयात काय करत होता असा सवाल देखील फिर्यादी उमेश माने यांनी केला आहे. बाईट : रमेश घुले – मयत विलास घुले यांचे बंधू बाईट : उमेश माने – फिर्यादी
0
0
Report

कोकण में स्टेटस वार: दो बड़े नेता सोशल मीडिया पर निशाने साधे

Ratnagiri, Maharashtra:स्टेटस वॉर पॅकेज.. स्टेटस वॉर! उद्योगमंत्री उदय सामंत और आमदार भास्कर जाधवांच्या 'त्या' स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात खळबळबळ!.. ‘योग्य लोकांचे हात हातात असतील तर...’ उदय सामंतांचा महाविकास आघाडीला थेट टोला? ‘कस्मे वादे प्यार वफा...’ गाणं शेअर करत भास्कर जाधवांचा नेमका कोणावर निशाणा? कोकणात राजकीय वातावरण तापलं!. अँकर राज्याच्या राजकारणात सध्या 'स्टेटस' वॉर रंगल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरील व्हॉट्सॲप स्टेटसच्या माध्यमातून नेत्यांनी एकमेकांवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. कोकणातील दोन दिग्गज नेते, म्हणजेच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या सोशल मीडिया स्टेटसमुळे सध्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. उदय सामंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोसह एक सूचक मेसेज टाकला आहे, तर दुसरीकडे भास्कर जाधव यांनी 'कस्मे वादे प्यार वफा सब बातें हैं' या गाण्याचा व्हिडिओ शेअर करत खळबळ उडवून दिली आहे.या दोन नेत्यांनी या स्टेटसच्या माध्यमातून नेमका कोणावर निशाणा साधला आहे? पाहूयात यावरील आमचा हा विशेष रिपोर्ट.. Vo राज्याच्या राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही. पण सध्या राजकीय नेते थेट बोलण्याऐवजी सोशल मीडिया स्टेटसचा वापर करून एकमेकांवर गुगली टाकत आहेत. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपल्या सोशल मीडियावर ठेवलेल्या एका व्हॉट्सॲप स्टेटसने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या स्टेटसमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकत्रित फोटो असून, सोबत शिवसेना आणि भाजपचे पक्षचिन्ह दिसत आहे.. ​Graphics/TEXT ON SCREEN योग्य लोकांचे हात हातात असतील तर चुकीच्या लोकांची साथ धरायची कधीच वेळ येत नाही. Vo 2 उदय सामंत यांच्या या सूचक मेसेजमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी थेट महाविकास आघाडीला किंवा विरोधकांना लक्ष्य करण्यासाठीच हे स्टेटसे ठेवले आहे का? अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.. Bite भाजप/शिवसेना प्रवक्ते - स्टेटसचे समर्थन करणारी प्रतिक्रिया.. V 3 उदय सामंत यांचे स्टेटस चर्चेत असतानाच, दुसरीकडे कोकणातीलच आणखी एक डॅशिंग नेते आणि शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्या सोशल मीडिया स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडाली आहे.भास्कर जाधव यांनी आपल्या स्टेटसवर १९६७ मधील गाजलेल्या 'उपकार' चित्रपटातील एका गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.. AUDIO/TEXT ON SCREEN "देते हैं भगवान को धोखा, तो इन्सानों को क्या छोडेंगे... कस्मे वादे, प्यार वफा सब बातें हैं, बातों का क्या..." Vo 4 भास्कर जाधव यांनी शेअर केलेल्या या गाण्याच्या ओळी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. राजकीय घडामोडींच्या वेगामध्ये भास्कर जाधवांनी हे स्टेटस ठेवून नेमका कोणावर बाण चालवला आहे? कोणाच्या 'कस्मे-वाद्यांवरून' त्यांचा विश्वास उडाला आहे? याबाबत आता रत्नागिरी आणि संपूर्ण महाराष्ट्रात तर्क-वितर्क लढवले जात आहेत.. Bite - महाविकास आघाडीचे नेते /राजकीय विश्लेषक - स्टेटसवर प्रतिक्रिया.. Vo "राजकारणात शब्दांपेक्षा इशाऱ्यांना जास्त महत्त्व असते आणि कोकणातील या दोन बड्या नेत्यांनी सोशल मीडिया स्टेटसच्या माध्यमातून दिलेले हे इशारे सध्या बरेच काही सांगून जात आहेत..", End p2c
0
0
Report

शिवसेना विधायक राजेश क्षीरसागर के कथित वीडियो पर SIT जांच की मांग तेज

Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरातील शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या कथित टक्केवारी मागणीच्या व्हिडिओवरून राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणाची विशेष तपास पथक अर्थात एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार आणि जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी केली आहे. याबाबत राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेलद्वारे पत्र पाठविण्यात आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित व्हिडिओमध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांचे संभाषण असल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. संजय पवार आणि विजय देवणे यांनी पाठविलेल्या पत्रात या व्हिडिओतील आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच चौकशीत तथ्य आढळल्यास आमदार राजेश क्षीरसागर यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, तसेच अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीमार्फत चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. याचबरोबर व्हिडिओ क्लिपमध्ये राहुल आणि प्रशांत या नावांचा उल्लेख असल्याचा दावा करत, त्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचीही चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
0
0
Report
Advertisement

लोकतंत्र में पैसे के खेल से खतरा: दिलीप वळसे पाटील की चेतावनी

Shirur, Maharashtra:निवडणुकीचं गणित जेव्हा पैशांच्या गणितावर मांडलं जातं, तेव्हा ती लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असते, असं परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केलं आहे. शिरूर बाजार समिती निवडणुकीच्या प्रचार नारळ शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उमेदवारी वाटप आणि मतदारांच्या बदलत्या सवयींवर त्यांनी चिंता व्यक्त केली. बाजार समिती श्रीमंत आहे की नाही माहिती नाही, पण पॅनेलचे उमेदवार मात्र सगळे श्रीमंत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. आंबेगावमध्ये यापूर्वी अनेक निवडणुका बिनविरोध झाल्या असून कधीही पैशांचा वापर करावा लागला नसल्याची आठवण त्यांनी करून दिली. मात्र, आता जिल्हा परिषद, पंचायत समितीनंतर ग्रामपंचायतींमध्येही मतदारांना लागलेली पैशांची सवय ही उद्या सरपंच पदासाठीही तीच परिस्थिती निर्माण करेल, अशी भीती व्यक्त करत हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक असल्याचं मोठं विधान वळसे पाटील यांनी केलंय. बाइट: दिलीप वळसे पाटील (माजी मंत्री) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे...
0
0
Report

कल्याण में देहव्यापार रैकेट का पर्दाफाश; महिला दलाल गिरफ्तार, दो पीड़ित महिलाएं मुक्त

Kalyan, Maharashtra:Female broker arrested कल्याणमध्ये देहव्यापाराचा पर्दाफाश; महिला दलाल अटकेत,महिला वकील असल्याची माहिती दोन पीडित महिलांची सुटका ठाणे गुन्हे शाखेच्या मानव तस्करी प्रतिबंधक पथकाने कल्याण पूर्वेत मोठी कारवाई करत देहस्यापाराच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका महिला दलालाला अटक करण्यात आली असून तिच्या तावडीतून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. पोलीस तपास दरम्यान ही महिला दलाल वकील असल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण पूर्व परिसरातील तिसगाव नाका येथील उडुपी पॅलेस हॉटेलमध्ये एक महिला दलाल गरजू महिलांना आमिष दाखवून व फूस लावून देहव्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या मानवी तस्करी प्रतिबंधक पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित हॉटेलवर सापळा रचला .कारवाईदरम्यान आरोपी महिला दलालाला रंगेहात अटक करण्यात आली, तरएका 24 वर्षीय आणि 25 वर्षीय अशा दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात आरोपी महिला मनीषा नांदे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अटक करण्यात आलेली मनीषा नांदे वकील असल्याची माहिती पोलीस तपासा दरम्यान समोर आली आहे
0
0
Report

आषाढी वारी: कर्नाटक से आळंदी 315 किमी की अश्वयात्रा, पालखी अग्रभाग में

Pandharpur, Maharashtra:आषाढी वारी साठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी कर्नाटकातील अंकली येथील शितोळे सरकार यांच्या राजवाड्यातून माऊलींच्या मानाच्या अश्वांचे दरवर्षी आषाढी वारीसाठी आळंदीकडे प्रस्थान झाले आहे. अंकली येथील शितोळे घराण्याकडे १८३२ पासून मानाच्या अश्वांची परंपरा चालत आली आहे. अश्वांचा प्रवास: अंकली ते आळंदी हे अंतर सुमारे ३१५ किमी आहे. हे अश्व अंकली येथून पायी चालत निघतात. शितोळे सरकार यांच्या राजवाड्यात विधिवत पूजा आणि आरती करून अश्वांना निरोप दिला जातो. हे मानाचे अश्व पालखी प्रस्थानाच्या काही दिवस आधी आळंदी येथे पोहोचतात आणि पालखी सोहळ्यात अग्रभागी असतात.
0
0
Report
Advertisement

भाजपा विधायक सुधीर गाडगीळ की गाड़ी दुर्घटना, चार-पाँच जख्मी, एक दुचाकी सवार गंभीर

Sangli, Maharashtra:सांगलीचे भाजपा आमदार सुधीर गाडगीळ यांच्या गाडीला अपघात झाला आहे. सांगलीच्या रत्नागिरी नागपूर महामार्गावर हा अपघात झाला असून यामध्ये आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह चार ते पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. तर एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. कर्नाटकाच्या उगार येथून सांगलीकडे परतत असताना मिरज जवळ रत्नागिरी-नागपूर महामार्गावर हा अपघात झाला आहे. यामध्ये गाडगीळ यांच्या चारचाकी गाडीच्या दर्शनी भागाचा मोठा नुकसान झाले आहे. दुचाकीला धडकल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज असून अपघातामध्ये आमदार सुधीर गाडगीळ यांच्या बोटाला मार लागला आहे. तर गाडगीळ यांच्या वाहनाचे चालक,स्वीय सहायक,अंगरक्षकासह चौघेजण किरकोळ जखमी झाला असून त्यांची प्रकृती ठीक आहे, गंभीरपणे जखमी असणाऱ्या दुचाकीस्वराला मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
0
0
Report

दिलचस्प वीडियो से कोल्हापुर की राजनीति हिल रही है: राजेश क्षीरसागर-ठेकेदार के कमीशन विवाद पर नया आरोप

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्याशी संबंधित टक्केवारीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. इंगवले यांच्या दाव्यानुसार, या व्हिडीओमध्ये आमदार राजेश क्षीरसागर आणि एका कंत्राटदारामध्ये कथित कमिशन व टक्केवारीबाबत संवाद होताना दिसत आहे. व्हिडीओतील संभाषणात संबंधित कंत्राटदार “तुमचे पाच टक्के आणि आणखी दोघांचे प्रत्येकी एक टक्का कमिशन दिले” असल्याचा दावा करताना ऐकू येत असल्याचे इंगवले यांनी म्हटले आहे. तसेच, “यापूर्वी ४० लाख रुपये दिले असून आता कामच नको” असेही संबंधित कंत्राटदार संभाषणात सांगत असल्याचा दावा करण्यात आला आहे. याच व्हिडीओमध्ये “आम्हाला वरही द्यावे लागतात” असे वाक्य आमदार राजेश क्षीरसागर यांनी म्हटल्याचा आरोप इंगवले यांनी केला है. या प्रकरणावर आमदार राजेश क्षीरसागर यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. पण नव्या टक्केवारीच्या व्हिडिओमुळे कोल्हापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
0
0
Report
Advertisement

नागपुर महापालिका 2026-27 बजट: कर नहीं बढ़ेगा, 6202 करोड़ रुपये की विकास योजनाएं

Nagpur, Maharashtra:नागपूर स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे यांनी नागपूर महानगरपालिकेचा सन 2026-27 साठीचा 6202.99 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला. नागपूरकर नागरिकांवर कोणताही कराचा वाढीव बोजा न टाकता समाजातील सर्व घटकांना विकासाच्या साखळीमध्ये सामावून घेत महापौर माहेर योजना, मजुरांसाठी ठिय्या, स्मार्ट प्रभाग, सावजी बुनकर व मारबत महोत्सव, उद्याने व मैदानांचा विकास तसेच नाग नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी कर्ज रोखे काढून रू. २०० कोटी उभारणार आहे. अशा नव्या संकल्पांसह स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे यांनी नागपूर महानगरपालिकेचा सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 6202-99 लाख रुपयांचा शिलकीचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या सभागृहात महापौर निता ठाकरे यांना सादर केला. याचवेळी सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा सुधारित अर्थसंकल्पही स्थायी समितीच्या अध्यक्षांनी सादर केला. गेल्या 19 मे रोजी स्थगित झालेली मनपाची विशेष सभा आज कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडली. मनपा स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे यांनी 2026-27 या आर्थिक वर्षात मनपाचे आर्थिक उत्पन्न 5690 कोटी 37 लाख राहणार असून सुरूवातीची शिल्लक 512 कोटी 61 लाख रुपये मिळून एकूण उत्पन्न 6202 कोटी 99 लाख रुपयांचे उत्पन्न गृहित धरले आहे. यात 6202 कोटी 48 लाख रुपये खर्चाच्या बाजूला राहणार असून आर्थिक वर्षाच्या अखेरीस मनपाच्या तिजोरीत 50.18 लाख रुपयांची शिल्लक राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
0
0
Report

नाशिक में जलसंकट: डैमों में सिर्फ 20 प्रतिशत पानी बचा

Nashik, Maharashtra: पावसाअभावी नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईचे चटके; धरणांनी गाठला तळ! नाशिककरांवर पाणीबाणीचे संकट; धरणांमध्ये केवळ २०% पाणी साठा! आभाळ रुसले, धरणे सुकली! नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईची धग, प्रशासनाकडून टँकरची धावपळ. अँकर जून महिना संपत आला तरी वरुणराजाने नाशिक जिल्ह्याकडे पाठ फिरवली आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील मोठ्या आणि मध्यम धरणांमधील पाणीसाठ्याने तळ गाठला असून, संपूर्ण जिल्हा आता भीषण पाणीटंचाईच्या छायेत आहे. जिल्ह्यात सध्या केवळ १९.९३ टक्के, म्हणजेच जेमतेम २० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गोदावरी खोऱ्यातील गंगापूर धरण समूहात ३६ टक्के, तर पालखेड समूहात अवघा १२ टक्के पाणीसाठा उरल्याने चिंतेचे ढग गडद झाले आहेत. या भीषण परिस्थितीवर प्रशासनाने आता काय पावले उचलली आहेत? पाहूयात आमचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट... पाण्याच्या या भीषण टंचाईमुळे ग्रामीण भागात हाहाकार उडाला आहे. पाण्यासाठी महिलांना मैलोन्मैल भटकंती करावी लागत आहे. मात्र, नागरिकांची ही पाण्यासाठीची वणवण थांबवण्यासाठी आणि कुठल्याही भागात पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने आता कंबर कसली आहे. ज्या ज्या भागात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे, तिथे कोणताही विलंब न करता तात्काळ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रशासनाकडून केवळ टँकर गाड्यांवर भर न देता, भविष्यातील नियोजनासाठी ग्रामपंचायत पातळीवर सातत्याने बैठका घेतल्या जात आहेत. टंचाई आराखड्याची कडक अंमलबजावणी सुरू असून, पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन केले जात आहे. परिस्थिती गंभीर असली तरी प्रशासन प्रत्येक नागरिकांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी अहोरात्र काम करत आहे. आता वेध लागले आहेत ते फक्त एकाच गोष्टीचे... ती म्हणजे वरुणराजचे आगमन कधी होणार?
0
0
Report

बीड़ ब्रेक: सांसद पुत्र सौरभ सोनवणे की SIT चौकशी चार घंटे चली

Beed, Maharashtra:बीड ब्रेक: खासदार पुत्र सौरभ सोनवणे याची चार तास चौकशी - SIT प्रमुख व्यंकट राम यांच्याकडून चौकशी - सौरभ याचे CCTV आणि वाहनाची चौकशी झाली - सौरभरयचा देखील SIT समोर जबाब झाला - आणखीन चौकशी सुरूच राहील, चौकशीनंतर सर्वच बाबी उघड करणार - चार तासाच्या चौकशीनंतर सौरभारला सोडले - पुराव्याच्या आधारे संपूर्ण तपास सुरू आहे. - हत्येसाठी वापरलेले साहित्य, चाकू सगळं जप्त केलं आहे. - सौरव सोनवणे यांना आम्ही कालच हजर राहण्यासंदर्भात नोटीस दिली होती यानंतर हजर झाले. - आमच्या सर्व प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली त्यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. - ते आम्हाला तपासात सहकार्य करत आहेत आमचा पुढील तपास सुरू आहे. - थार गाडी तिथे गेल्याचे सांगत आहेत. त्या सर्व बाजुने तपास केला जात आहे. बाईट- IPS व्यंकटराम (SIT प्रमुख)
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top