icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
413002
AAABHISHEK ADEPPA16 Jul 2025, 09:01 am

प्रवीण गायकवाड यांना जन्मजेयराजे भोसले यांचे आवाहन: एक विशेष संवाद!

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना जन्मजेयराजे भोसले यांचे झी 24तास च्या माध्यमातून आवाहन ( 1 to 1 Exclusive ) - संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना जन्मजेयराजे भोसले यांचे झी 24 तासच्या माध्यमातून आवाहन - मुळात ज्या कार्यक्रमात प्रवीण गायकवाड आले होते त्या कार्यक्रमाचा आयोजक मी नव्हतोच - मला एका पत्रकार संघाचा पुरस्कार मिळाल्यामुळे तिथे सत्कारासाठी आमंत्रित करण्यात आले होते - मला अनेकांनी विनंती केल्यानंतर प्रवीण गायकवाड यांना मी फोनवरून बोलावले होते - घडलेला प्रकार अमोलराजेंना कळताच ते अन्नछत्र मंडळातून त्या ठिकाणी आले - प्रवीण गायकवाड हे आम्हाला आदरणीय आहेत.. काही चुकले असेल तर त्यांनी व्यक्तीशः आमचे कान पकडावेत - कार्यक्रम संपल्यानंतर मी प्रवीण गायकवाड यांची माफी मागितलो होतो आणि निषेधही व्यक्त केला होता - आंदोलन जे होते त्यापैकी आम्ही कोणालाच ओळखत नाही - प्रवीण गायकवाड यांना माझी नम्र सूचना आहे.. पुरुषोत्तम खेडेकर आम्हाला आदरणीय आहेत.. - आपण आमच्याबद्दल मनातून गैरसमज काढून टाका.. आमचं काही चुकलं असेल तर तुम्ही सांगा - 18 तारखेच्या अक्कलकोट बंदला माझा पूर्ण पाठिंबा आहे याविषयी अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचे सर्वेसर्वा जन्मजेयराजे भोसले यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी.... ( 1 to 1 Exclusive)
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

सुझय विक्हे के निरीक्षण से नगर-मनमाड महामार्ग पर ट्रैफिक सुधार की उम्मीद

Shirdi, Maharashtra:झी 24 तासाच्या बातमीचा इम्पॅक्ट , नगर मनमाडच्या सुरू असलेल्या कामाच्या पाहणीला सुजय विखे महामार्गावर... नगर–मनमाड महामार्गाच्या कामाची माजी खा.सुजय विखे कडून यांची पाहणी... खड्डेमय नगर मनमाड महामार्ग या झी 24 तासच्या बातमीनंतर सुजय विखेंकडून ठेकेदारांची कानउघाडणी... सावळीविहीर येथील उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम... कामात ठेकेदारांकडून त्रुटी झाल्याची सुजय विखेंनी स्पष्ट कबुली... अधिकारी आणि ठेकेदारांना तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश... पुढील तीन दिवसांत वाहतुकीची समस्या कमी होणार असल्याचा सुजय विखेंचा दावा... गुरु पौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी खुली करण्याचे नियोजन... महामार्गालगतची अतिक्रमणे हटविण्याबत प्रशासनाला सुजय विखेंच्या सूचना...
0
0
Report

अकोला में सोयाबीन बियाणे फेल: किसानों को भारी नुकसान, कंपनियों पर कड़ी कार्रवाई मांग

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या तक्रारींमध्ये सातत्याने वाढ होत असून शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि दोषी बियाणे कंपन्यांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी आज बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीनंतर भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी कृषी विभाग, गुणवत्ता नियंत्रण यंत्रणा आणि संबंधित बियाणे कंपन्यांवर गंभीर आरोप केले आहेत. कृषी विभागाकडे शुक्रवारपर्यंत सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या एकूण 1,722 तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी सर्वाधिक म्हणजे सुमारे 1,000 तक्रारी मूर्तिजापूर तालुक्यातील असल्याचे पिंपळे यांनी सांगितले. बियाणे निकृष्ट निघाल्यामुळे हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून त्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी केली. या वेळी बोलताना पिंपळे यांनी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी आणि तालुका गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप केला. आतापर्यंत जिल्ह्यातील 183 बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी घेतलेल्या असल्याचे सांगत कृषी विभाग आणि गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेचे हे अपयश असल्याची टीका त्यांनी केली. दोषी बियाणे कंपन्यांवर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावे, तसेच पुढील वर्षी अशा कंपन्यांचे बियाणे विक्रीस परवानगी देऊ नये, असं इशारा त्यांनी दिला. याशिवाय शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी नियुक्त अधिकाऱ्यांनीच फसवणूक केल्याचा आरोप करत काही अधिकाऱ्यांचे कंपन्यांशी लागेबांधे असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. शेतकऱ्यांना तीन दिवसांच्या आत मदत जाहीर करावी, तसेच गुणवत्ता नियंत्रण अधिकारी आणि संबंधित कृषी अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही हरीश पिंपळे यांनी केली आहे.
0
0
Report

नवी मुंबई कृषि बाजार में कोथींबर 40–50 रुपये, पालेभाजी के दाम बढ़े

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई स्थित मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती में कोथींबीर तथा पालेभाजी के दाम बढ़े हैं। कोथंबीर 40 से 50 रुपये प्रति जुडी बिकली जा रही है, जबकि पालक, मेथी 30 रुपये, कांदा पत्ता, पुदीना 20 रुपये जुडी विकली जा रही है। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती में बेलगाव, गुजरात और कर्नाटक से कोथंबीर की आवक हुई है, जिससे मुंबई मार्केट में कोथंबीर दर 40 से 50 रुपये हैं, जबकि ये दर स्थानीय मार्केट जैसे पुणे, नाशिक में 100 रुपये जुडी है, परंतु मुंबई मार्केट में परराज्यातून माल आने के कारण पालेभाजी तथा कोथंबीर के दर स्थिर हैं।
0
0
Report
Advertisement

वारकऱ्यां में लावणी-भक्ति गीतों की जुगलबंदी, पालखी सोहळे में कलाकारों ने धूम मचाई

Rui, Maharashtra:जिथे चाळ और टाळ एकत्र येतात... घुंगराचा छनछनाट , टाळ मृदुंगाचा नाद...लावणी आणि भक्तीगीतांचा मिलाफ ..अशा भक्तीमय वातावरणात आज वारकऱ्यांना भक्ती आणि लावणीच्या जुगलबंदीचा अवीट नमुना अनुभवायला मिळाला ... जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज यवत हून वरवंडच्या दिशेने निघाला असताना केडगाव चौफुल्यावर या सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी येथील अंबिका सास्कृतिक कला केंद्राच्या नर्तीकानी आपल्या अदाकारीत भजन, भक्तीगींतांसह मराठी सिनेसृष्टीतील नृत्यावर चक्क वारकऱ्यांनी नाचण्याचा मनमुराद आनंद लुटला . त्यातील कला सादर करुन वारकऱ्यांना आपल्या कलाविष्काराने ठेका धरायला लावला . पायी चालत वारीत वारकऱ्यांनच्या सेवेसाठी कोणी अन्नदान करतंय तर कोणी अंथरूण देतेय तर कोणी पांघरून देतय...मात्र पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कला केंद्रातील नर्तिकानी आपल्या कलेचे सादरीकरण वारकऱ्यांसमोर करून आपलीही सेवा विठल चरणी पोहचविण्याचा सायास केलाय...या वेळी या नर्तीकानी एखादा विठुरायाच्या भक्ती गीतावर टाळ धरला तर लावणीही सादर करत जुगलबंदीचा एक नजराणा वारकऱ्यांसाठी सादर केला या जुगलबंदी मूळ जणू या वारकऱ्यांचा थकवाच दूर झाला... गेल्या 30 वर्षांपासून या कलाकेंद्राच्या नर्तका वारकऱ्यांसाठी आपली कला सादर करतात ही परंपरा त्यांनी आजही कायम जपलीय ...आज जगतगुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील सुमारे दहा हजार वारकऱ्यांना सुग्रास असे भोजन ही देण्यात आलेय याच बरोबर कलाही सादर करुन त्यांची सेवा केलीय ...
0
0
Report

चंद्रपुर कांग्रेस सांसद प्रतिभा धानोरकर: नगरसेवकों पर दबाव नहीं, व्यक्तिगत निर्णय

Chandrapur, Maharashtra:टायटल: कोणत्याही नगरसेवकावर गटात सामील होण्याचा दबाव नसल्याची चंद्रपूरच्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर शहर मनपा गटनेते पदाच्या वादावर प्रतिक्रीया अँकर: कोणत्याही नगरसेवकावर गटात सामील होण्याचा दबाव नसल्याची प्रतिक्रिया चंद्रपूरच्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर शहर मनपा गटनेते पदाच्या वादावर दिली आहे. 5 नगरसेवक दबावापोटी आले नसून, कुठलाच दबाव नाही शेवटी हा नगरसेवकांचा वैयक्तिक प्रश्न आहे की त्यांनी कुठल्या गटात सामील व्हायचं, नगरसेवक कुठेही गेले तरी ते शेवटी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचेच आहेत, आयुक्त मॅडम याबाबत अंतिम निर्णय देतील आणि त्यानंतर देखील काँग्रेसचे सर्व नगरसेवक एकजुटीने काम करतील, असेही खा. धानोरकर म्हणाल्या.
0
0
Report
Advertisement

पूरग्रस्तों को राहत: वसई-विरार में नुकसान-भरपाई के लिए पंचनामे तेज

Vasai-Virar, Maharashtra:वसई विरार : वसई-विरारमधील पूरग्रस्त नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुसळधार पावसामुळे ४८ तासांहून अधिक काळ घरांमध्ये पाणी साचून मोठे नुकसान झालेल्या नागरिकांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्यासाठी नुकसानग्रस्त भागातील पंचनामे करण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. नायब तहसीलदार राजाराम देवकाते यांनी स्वतः पूरग्रस्त भागाची पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेत असून चाळी , झोपट्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये विशेष लक्ष देण्यात येत आहे ...महसूल विभाग आणि वसई-विरार महानगरपालिका प्रशासनाच्या संयुक्त पथकांकडून पंचनाम्याचे काम सुरू असून, विविध भागांमध्ये विशेष कॅम्पही उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये नागरिकांकडून बँक खात्याचा तपशील, आवश्यक कागदपत्रे आणि इतर माहिती स्वीकारली जात आहे. पंचनामा पूर्ण झाल्यानंतर शासनाच्या नियमानुसार पात्र पूरग्रस्तांच्या बँक खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पूरग्रस्त नागरिकांना आता दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
0
0
Report

चंद्रपुर कांग्रेस के नगरसेवक संख्या पर आयुक्त के समक्ष दावे, 11 मौजूद

Nagpur, Maharashtra:नागपूर बाइट – राजेश अडूर बाइट. राजेश अडूर हे विजय वडेट्टीवार गटाचे आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात ते आपले संख्या बळ दाखवण्यासाठी पोहचले होते. त्यानंतर त्यांनी दिलेला बाइट. चंद्रपूरमध्ये काँग्रेसकडे 27 नगरसेवक आहेत; 16 नगरसेवक आपल्याकडे सोबत असल्याचा दावा अगोदरच यांनी केलाय. आज आमचे 11 नगरसेवक या ठिकाणी उपस्थित झाले होते. कोर्टाच्या निर्देशानुसार आम्ही आमचे सर्व नगरसेवक आज उपस्थित केले होते. गट नेता पदाचा निर्णय फक्त संख्याबळाच्या आधारावरच व्हावा, यापेक्षा काही तांत्रिक गोष्टीही विभागीय आयुक्तांनी पाहिल्या पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. न्यायालयाने विभागीय आयुक्तांच्या मागील निर्णयावर स्थगिती आदेश का दिला होता, याचाही विचार होण्याची गरज आहे. विनोद लभाने हे पूर्वी आमच्यासोबत होते मात्र आज ते या ठिकाणी आलेले नाही; अखेरीस ते काँग्रेस पक्षाचेच नगरसेवक आहेत आणि 27 नगरसेवकांमध्ये ते समाविष्ट आहेत. पुढे न्यायालयात जाणार का या प्रश्नावर, आधी विभागीय आयुक्तांना त्यांचा निर्णय देऊ द्या, त्यानंतर त्याबद्दल विचार करू.
0
0
Report

तळकोकण में बारिश रुकी, किसान की लावणी फसलें खतरे में—नुकसान की आशंका

Oras Bk., Maharashtra:तळकोकणात मागील पाच दिवस पावसाने दडी मारलीय त्यामुळे तळकोकणातील बळीराजाच्या चिंतेत वाढ झालीय. तळकोकणात सद्या भात लावणीची काम सुरु आहेत. काही प्रमाणात लावणीची काम शिल्लक असताना पावसाने दडी मारल्याने लावणीची काम खोळबलीत त्यासोबत बळीराजाने लावणी केलेली रोप देखील कोमेजून गेलीत. येत्या दोन दिवसात पाऊस आला नाही तर मात्र बळीराजाची मेहनत वाया जाण्याची शक्यता आहे. कोमजलेली रोप कडक उन्हामुळे सुकून जाण्याची दाट शक्यता आहे. सुरवातीच्या काळात लपंडाव करणाऱ्या पावसाने ऐन लावणीच्या मोसमात दडी मारल्याने बळीराजाच्या चिंतेत वाढ झालीय. या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी
0
0
Report
Advertisement

सांगली में संत ज्ञानेश्वर पालखी दिंडी हादसे में तीन महिला श्रद्धालुओं की मौत

Sangli, Maharashtra:स्लग - दिंडीतील वारकऱ्यांच्या मृत्यूच्या घटनेने सांगली जिल्ह्यावर शोककळा,गावं बंद ठेवत श्रद्धांजली. अँकर - संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये जेजुरी येथे वारकऱ्यांच्या दिंडीचा अपघात झाला आहे.ट्रक अपघातामध्ये सांगली जिल्ह्यातल्या तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे,तर ३ वारकरी जखमी झाले आहेत,मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज,मालगाव आणि कवलापूर येथील महिला वारकरयांचा समावेश आहे.नंदा पवार वय 60,माधवी राजाराम सलगरे वय 55,राजश्री शंकर भोसले वय 55,अशी मृत वारकरी महिलांची नावे असून घटनेमुळे तिन्ही गावांमध्ये शोककाळा पसरली असून वारकरयांच्या मृत्युच्या घटनेची माहिती मिळताच,गावामध्ये बंद पाळण्यात आले आहे.१५० हुन अधिक वारकरी हे 6 जुलै रोजी कसबे डिग्रजच्या संत ज्ञानेश्वर माऊली पालखी दिंडीतून आळंदीला गेले होते,दिंडीचा आजचा पाचवा दिवस होता.मात्र पालखी सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर दिंडीवर काळाने घाला घातला आहे,या घटनेमुळे सांगली जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त होत असून मृत पावलेल्या वारकऱ्यांना राज्य शासनाने भरघोस मदत करावी व दिंडीमध्ये वारंवार घडणाऱ्या अपघाताच्या घटना टाळण्यासाठी सरकारने ठोस पावलं उचलावेत,अशी मागणी कसबे डिग्रज येथील वारकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
0
0
Report
Advertisement

शालार्थ आयडी घोटाला: धुळे में बनावट IDs से 160 करोड़ रुपये का अपहार उजागर

Nashik, Maharashtra:२५ लाखांत 'शालार्थ आयडी' विक्रीचा पर्दाफाश शिक्षण विभागातील 'शालार्थ आयडी' घोटाळ्यात बनावट आदेश तयार करणाऱ्या प्रशांत वाडिले याला पोलिसांची कोठडी. धुळे येथील मध्यस्थ संशयित प्रशांत तुकाराम वाडिले याला नाशिकरोड न्यायालयाने १७ जुलैपर्यंत सुनावली पोलीस कोठडी. वाडिले याने धुळ्यातील एका शिक्षण संस्थेतील सहा जणांना बनावट आयडी मिळवून देण्यासाठी दीड कोटी रुपये उकळले. बनावट 'शालार्थ आयडी' तयार करून देण्यासाठी प्रतिव्यक्ती २० ते २५ लाख रुपये उकळल्याचे तपासात समोर. शिक्षकांचे वैद्यकीय बिले मंजुरी आणि वेतनाची फरक बिले काढून देण्यासाठी आरोपी ५० टक्के कमिशन घ्यायचा. आरोपी वाडिले याने या बेकायदेशीर पैशांमधून धुळ्यात चार गुंठ्यांत तब्बल तीन कोटी रुपयांचा अलिशान बंगला बांधला. 'बॅकडेटेड' आदेश दाखवून शासनाच्या तिजोरीतून सुमारे १६० कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी १६ संशयितांवर सबळ पुरावे.
0
0
Report

मानसून देर से आया, भंडारदरा में भात की खेती शुरू, किसान चिंतित

Shirdi, Maharashtra:अकोले तालुक्यातील भंडारदरा पाणलोटात पावसाची संततधार सुरू असून घाटघर, भंडारदरा, रतनवाडी परिसरात भात लागवडीला सुरुवात झाली आहे. यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्याने भात लागवड देखील उशिरा सुरू झाली आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असून या पावसामुळे आदिवासी शेतकऱ्यांची भातखाचरे पाण्यात तुडुंब भरली आहेत. भंडारदरा परिवार पावसाचे माहेरघर समजला जातो. हे ठिकाण पावसाचे ठिकाण असल्याने प्रमुख पीक भात आहे.या परिसरातील नागरिकांनी भाताची लागवड सुरू केली आहे.यंदाच्या वर्षी पाऊस उशिरा सुरू झाला आणि कमी प्रमाणात पाऊस पडल्याने भात लागवड उशिरा सुरू केली असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केलीय. भंडारदरा परिसरातील भात लागवडीच्या शेतीतून भात लागवड करत असलेल्या शेतकऱ्यांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top