Back
बारिश में कंझरा गाँव के अंतिम संस्कार की राह पानी में बह गई
GMGANESH MOHALE
Sept 13, 2025 16:30:14
Washim, Maharashtra
वाशिम:
File:1309ZT_WSM_FUNERAL_PROCESSION
रिपोर्टर: गणेश मोहळे, वाशिम
अँकर : वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील कंझरा गावात आज हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. गावातील सुभाषराव भानुदास वाघमारे यांचे आज सकाळी निधन झाले.संध्याकाळी त्यांच्या अंत्यसंस्काराची वेळ ठरली होती.परंतु कंजरा परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला त्यामुळे गावाच्या शेजारी असलेल्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्यामुळे मृतदेह पाण्यातून व चिखलातून वाहून नेण्याची वेळ कुटुंबीयांसह ग्रामस्थांवर आली.देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटली तरी मृत व्यक्तीलाही सन्मानाने शेवटचा निरोप देता येत नाही,ही मोठी शोकांतिका आहे.गावकऱ्यांनी अनेकदा स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची मागणी केली,निवेदनं दिली; मात्र अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही.त्यामुळे पावसाळ्यात प्रत्येक वेळी अशीच यातना सोसावी लागते.जिवंतपणी माणसाने कितीही संघर्ष केला,तरी मरणोत्तर अंतिम प्रवासही पाण्यातून व चिखलातून करावा लागतो,यापेक्षा मोठं दुःख कोणतं?असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.आजच्या या घटनेने गावकरी हळहळ व्यक्त करत असून, मृत व्यक्तीला सन्मानाने अंतिम यात्रा देता यावी यासाठी तरी प्रशासनाने तातडीने रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी आर्त मागणी त्यांनी केली आहे.
7
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 13, 2025 16:33:317
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 13, 2025 16:03:066
Report
SNSWATI NAIK
FollowSept 13, 2025 15:15:161
Report
ABATISH BHOIR
FollowSept 13, 2025 14:48:3412
Report
SNSWATI NAIK
FollowSept 13, 2025 14:32:017
Report
ABATISH BHOIR
FollowSept 13, 2025 14:15:3912
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 13, 2025 14:02:3312
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 13, 2025 14:01:4213
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 13, 2025 14:01:059
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 13, 2025 13:48:5114
Report
ABATISH BHOIR
FollowSept 13, 2025 13:46:349
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 13, 2025 13:46:2113
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 13, 2025 13:31:008
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 13, 2025 13:16:269
Report