Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

नाशिक में पाथर्डी फाटा पर युवक पर हमला, मौत की खबर से हड़कंप

SGSagar Gaikwad
Sept 25, 2025 14:19:03
Nashik, Maharashtra
feed send by 2c reporter-sagar gaikwad slug-nsk_murder_updet *नाशिक ब्रेकिंग...* - नाशिकच्या पाथर्डी फाटा जवळ एका कॅफेवर एका 21 वर्षे तरुणावर हल्ला - राशिद खान असं हल्ला झालेल्या तरुणाचे नाव - चार तरुणांकडून करण्यात आला होता हल्ला हल्ल्यात राशीत त्या जागीच मृत्यू - असीम वारसी अदनान वारसी तारीख वारसी आणि धीरज असे हल्ला करणाऱ्या संशयतांचे नाव - जुन्या वादाच्या कारणावरून करण्यात आला होता हल्ला - राशीदला नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर करण्यात आले मृत घोषित - मृत घोषित केल्यानंतर नातेवाईकांकडून मृत्यू देह ताब्यात घेण्यास नकार - आरोपी अटक झाल्यानंतरच मृत्युदेह घेऊ नातेवाईकांकडून आले सांगण्यात . बाईट -इब्राहिम हरून खान (मृतव्यक्ती चा भाऊ)
1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 25, 2025 15:36:28
Latur, Maharashtra:लातूर प्रेस पाँइंट... अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांना वाढीव मदत आवश्यक – गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची लातूर मध्ये पत्रकार परिषदेत माहीती..... ➡️ गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सरकारकडून मदतीच्या घोषणा झाल्या असल्या तरी शेतकऱ्यांचे झालेल्या प्रचंड नुकसानीचा विचार करून अजून वाढीव मदत देणे गरजेचे आहे. यासाठी ते स्वतः मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ➡️ 2022 च्या शासन निर्णयानुसार, अतिवृष्टी व पूर परिस्थितीत शेतातील जमीन खर्डून गेल्यास शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी वेगळी मदत मिळण्याची तरतूद आहे. ज्या पद्धतीने नुकसान झाले आहे त्याच पद्धतीने मदत दिली जाईल, असेही ते म्हणाले. ➡️ पिक विम्याबाबत गृहराज्यमंत्री कदम यांनी भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, शेतकऱ्यांच्या मदतीच्या भावनेने विमा कंपन्यांनी काम करणे आवश्यक आहे. शेतकऱ्याकडून पैसे घेऊनही मदत वेळेवर दिली जात नसेल तर अशा कंपन्यांवर कडक कारवाई करण्याची विनंती मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात येणार आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 25, 2025 15:36:19
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 2509ZT_CHP_POSTAL_STAMP_1_2 ( 2 file sent on 2C)  टायटल :  चंद्रपुरात बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे जन्मशताब्दीनिमित्त टपाल तिकिटाचे करण्यात आले विमोचन, सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती अँकर :--- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र आणि आंबेडकरी चळवळीतील प्रभावी नेतृत्व असलेले राज्यसभेचे माजी उपसभापती स्व. बॅरिस्टर राजाभाऊ  खोबरागडे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचे औचित्य साधून आज चंद्रपूर शहरातील गांधी चौक येथे भारतीय डाक विभागातर्फे टपाल तिकिटाचे विमोचन करण्यात आले. आ. सुधीर मुनगंटीवार, आ.विजय वडेट्टीवार, आ.अभिजीत वंजारी, आ. सुधाकर अडवले, आ.किशोर जोरगेवार, आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. राजाभाऊ  खोबरागडे यांच्या कार्याला अभिवादन म्हणून हे टपाल तिकिट प्रकाशित करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी या तिकीटासाठी लागणारा 12 लाखांचा निधी सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला गेलाय. या विमोचनाप्रसंगी मान्यवरांनी हे टपाल तिकीट म्हणजे समतेच्या लढ्याला आणि सामाजिक न्यायाच्या व्रताला दिलेले ऐतिहासिक अभिवादन असल्याचे सांगितले. जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त 27 सप्टेंबरपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. बाईट १) बाळू खोब्रागडे, संयोजक आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 25, 2025 15:17:46
Pandharpur, Maharashtra:25092025 slug - PPR_SANGOLA_HELP file 01 ----- अतिवृष्टी आणि महापूर यामध्ये मृत्यू झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील मृताच्या कुटुंबीयांना चार लाखाची आर्थिक मदत मिळण्यास झाली सुरुवात सांगोला तालुक्यातील महिम येथे असणाऱ्या कासाळ ओढ्यात तन्मय रवी किरण ऐवळे या सात वर्षाच्या व सोमनाथ विठ्ठल ऐवळे या तेरा वर्षाच्या मुलाचा 20 सप्टेंबर रोजी पाण्यात बुडवून मृत्यू झाला होता .. काल आणि आज अशा दोन दिवसात दोन्ही कुटुंबांना प्रत्येकी चार लाखाची शासकीय आर्थिक मदत बँक खात्यात जमा झालेली आहे .. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ही मदत तहसील सांगोला यांच्याकडून देण्यात आलेली आहे याशिवाय सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या जवळील प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत या दोन ऐवळे कुटुंबाला दिलेली आहे
2
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 25, 2025 14:16:29
Nanded, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_FarmerCrying Feed on - 2C ------------------------------ Anchor - नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या मंत्र्यासमोर वृद्ध शेतकऱ्याने टाहो फोडला. जाळसंधारण मंत्री संजय राठोड आज नांदेडमध्ये पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले होते. नांदुसा येथे राठोड पाहणी करत असताना अल्पभूधारक शेतकरी चांदबा जाधव यांना रडू कोसळले. चांदबा जाधव यांच्या दोन एकरवरील पिक पूर्ण उध्वस्त झाले आहे शिवाय त्यांची दोन जनावरे पुरात वाहून गेली. त्यामुळे मंत्री महोदयाना पाहताच त्यांना रडू कोसळले. ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50 हजार मदत करा अशी मागणी या वयोवृद्ध शेतकऱ्याने मंत्री महोदयांसमोर केली. --------------------------------
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 25, 2025 14:16:02
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 2509ZT_CHP_VIJAY_ON_BHIDE ( single file sent on 2C)  टायटल:--  भिडे गुरुजींनी गरबा ला नपुंसकपणाशी जोडल्याच्या विधानावर काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया, एकीकडे विहिंप- बजरंग दल गरबा--दांडियात मुस्लिमांच्या समावेशासाठी आधार कार्ड मागत आहे तर दुसरीकडे भिडे गरबाला हिणवत आहेत, अन्य कुणी असे विधान केले असते तर पिसे काढली गेली असती, दिव्य भिडेबद्दल आम्ही पामरांनी काय बोलावे अँकर:--भिडे गुरुजींनी गरबा ला नपुंसकपणाशी जोडल्याच्या विधानावर काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकीकडे विहिंप- बजरंग दल गरबा--दांडियात मुस्लिमांच्या समावेशासाठी आधार कार्ड मागत आहे तर दुसरीकडे भिडे गरबाला हिणवत आहेत, अन्य कुणी असे विधान केले असते तर पिसे काढली गेली असती. दिव्य भिडेबद्दल आम्ही पामरांनी काय बोलावे असा खोचक सवाल त्यांनी केला. बाईट १) आ. विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Sept 25, 2025 14:01:12
0
comment0
Report
UPUmesh Parab
Sept 25, 2025 14:00:59
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग मंत्री नितेश राणे byte ---- ऑन -- चिपी विमानतळ नाव ( नाथ पै ) --- चीपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव देण्याची मागणी होतीच पण याचा आमदार दिपक केसरकर यांनी पाठपुरावा केला. प्रस्ताव केंद्र सरकारकडे गेला असून लवकरच बॅरिस्टर नाथ पै साहेबांचं नाव चिपी विमानतळाला दिलं जाईल. ऑन --- ऑन विरोधक टीका ( राज्य सरकार मदत ) --- पंचनामे सुरू आहेत. माहिती घेण्याचं काम सुरू आहे. थोडा संयम ठेवा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्व मंत्री शेतात जात आहेत. शेतकऱ्यांच्या आम्ही संपर्कात आहोत. योग्य निकषांमध्ये बसून चांगल्यातली चांगली मदत देण्याची मानसिकता आणि तयारी आमच्या सरकारची आहे. पंजाबला जशी मदत मिळाली तशी मदत महाराष्ट्राला मिळेल. ऑन संजय राऊत ( दौरा भास ) --- भांडुप मध्ये बसून आरोप करणे सोपे आहे. त्यांचे मालक मुख्यमंत्री असताना त्यांनी काय काय आश्वासन दिलेले. तेव्हा लाल कार्पेट टाकून शेतकऱ्यांना भेटायचे.. तुम्ही काय केले ते सांगा आणि आम्ही काय करतो ते येणाऱ्या दिवसात दिसेल. ऑन संभाजी भिडे --- गुरुजी हे आदरणीय आहेत ज्येष्ठ आहेत. ते काही मार्गदर्शन करत असतील तर त्यावर आम्ही भाष्य करू नये. गुरुजींनी हिंदुत्वासाठी केलेले काम आपण विसरलोय का ?? त्यांना असे सल्ले देण्याचा अधिकार आहे. ऑन उद्धव ठाकरे ( पंचांग बघताय का ? झुकवण्याची ताकद ) --- ( स्मित हास्य करत ) पहिल स्वतः वाकून दाखवायचं आणि मग आम्हाला झुकवायचा प्रयत्न करायचा मानेचा, पाठीचा प्रॉब्लेम... उगाच अशा मोठ्या गोष्टी करू नये. तुम्ही जे काही करू शकला नाहीत तेवढं आमच सरकार करेल. ऑन स्विफ्ट कार जाळपोळ --- त्याबाबत पोलिस चौकशी करत आहेत. आमच्या महाराष्ट्रात आम्ही गोमांस तस्करी वैगरे अशा गोष्टी खपवून घेणार नाही योग्य ती कारवाई होईल. गाडी पकडली आहे पोलिस चौकशी करत आहेत थोड्या दिवसात कळेल दांड्याचा आवाज कुठून येतो ते. Byte --- नितेश राणे मंत्री feed on desk
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 25, 2025 14:00:48
Kalyan, Maharashtra:कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर भाविकांची अलोट गर्दी तीन दिवसांत दोन लाखांहून अधिक भाविकांनी घेतलं दर्शन कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर गेली 55 वर्षे नवरात्र उत्सव पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जातो. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांनी 1967 मध्ये येथे भाविकांसाठी दर्शनाची परंपरा सुरू केली होती. आजही ती परंपरा अखंड सुरू आहे.यंदा नवरात्र उत्सवाच्या सुरुवातीपासून फक्त तीन दिवसांत तब्बल दोन लाख भाविकांनी दुर्गामातेच्या दर्शनासाठी उपस्थिती लावली आहे. आगामी दिवसांत ही संख्या आणखी वाढेल दर्शनासाठी स्वतंत्र रांगा, सीसीटीव्ही नजर, स्वच्छतागृह, आरोग्य सुविधा यांसारख्या आवश्यक सेवांची व्यवस्था करण्यात आली आहे.भाविकांचा उत्साह आणि श्रद्धा यामुळे दुर्गाडी किल्ल्यावरचा नवरात्र उत्सव यंदाही अत्यंत भव्य आणि सोहळामय ठरत आहे. Byte रवी पाटील ( कल्याण शहर प्रमुख शिंदे गट )
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 25, 2025 13:49:55
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - संजय राऊतांनी कधी नगरपालिकेची निवडणूक लढली नाही,संजय राऊतांच्या प्रश्नावरून चंद्रकांत पाटील भडकले.. अँकर - संजय राऊतांनी कधी नगरपालिकेचे निवडणूक लढली नाही,काय संजय राऊतंच लावून बसलाय,सरकार चालवा मग कळेल, अशा शब्दात भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील हे संजय यांच्यावर भडकले,तर दोन वर्षे सरकार चालवताना तुमची फ्या-फ्या झाली,कोविडने तुम्हाला साथ दिली म्हणून 2 वर्ष घरी बसून राज्य चालवता आले,असा टोलाही मंत्री पाटील यांनी लगावला आहे. यांच्यावरील आरोप शेतकऱ्यांच्या बाबतीत अजित पवार आणि गिरीश महाजन कडून करण्यात आलेल्या विधानावरून संजय राऊतांनी केलेल्या टिकेवरून चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे,ते सांगली मध्ये बोलत होते. बाईट - चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री.
1
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 25, 2025 13:49:44
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : आमच्या खात्यातून शेतकऱ्यांना रोजगार आणि बांधबंधिस्ती करण्यासाठी मदत करू - मंत्री गोगावले ऑन 50 हजार हेक्टरी मदत - शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. - हरियाणा, चंदीगड ही राज्य छोटी आहे पण महाराष्ट्र खूप मोठे राज्य आहे. - त्या अनुषंगाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. - NDRF चा निकाल बदलून आपण जसं म्हणालात (50 हजार हेक्टरी) त्याप्रमाणे आमचा प्रयत्न राहील. - रोजगार हमी फलोत्पादन हे खातं माझ्याकडे आहे त्या माध्यमातून शेतकऱ्यांना उभा करण्यासाठी प्रयत्न करू. - सर्वांनी हातभार लावला तर शेतकऱ्याला पुन्हा उभा करता येऊ शकतो. *- ऑन माती खरवडून गेली :* - एखाद्या वेळी पीक आलं नाही किंवा कुजलं तर ते परत घेता येत. मात्र जमीनच खरवडून गेल्यानंतर कातळावर त्यावर काय घेणार. - मात्र आमच्या खात्यातून शेतकऱ्यांना रोजगार आणि बांधबंधिस्ती करण्यासाठी मदत करू. *- ऑन फळबाग मदतीसाठी दिल्लीला जाणार :* - जी परिस्थिती आहे ती आम्ही पाहिली आणि कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्याकडे मांडणार आहोत - पुढील आठवड्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना सांगून मी दिल्लीला जाणार - दिल्लीकडून जास्तीत जास्त निधी आणून शेतकऱ्यांना कसं उभा करता येईल त्यासाठी प्रयत्न करणार. - ऑन अजितदादा पवार विधान :* - अजितदादा हे .. दादा आहेत... - एकनाथ शिंदे साहेबांनी 50 गाड्याद्वारे दहा हजार किट सोबत घेऊन आले होते. - माढा, बार्शी या गावात पाच पाच दिवस गावात पाणी साचले आहे. आणि गावात वीज नाही जेवण नाही. Byte : भरत गोगावले (रो.ह.यो मंत्री)
3
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Sept 25, 2025 13:49:25
Buldhana, Maharashtra:अखेर! 'सह'मंत्री पोहोचले 'बांधा'वर, नुकसान पाहण्यासाठी 'मिळाला' वेळ! अँकर - बुलढाणा जिल्ह्यातील सोनोशी महसूल मंडळात २१ सप्टेंबर रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने हजारो हेक्टर शेतीचे मोठे नुकसान होऊनही, सह पालकमंत्री संजय सावकारे यांना पाहणीसाठी यायला उशीर झाला. अखेर स्थानिक दबाव व शेतकऱ्यांच्या मागणीनंतर त्यांनी नुकसानीची पाहणी केली आणि "शासनाकडे भरीव मदतीची मागणी करू," तसेच शेडनेटसाठीही मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. मात्र, ही पाहणी सुरू असतानाच संतप्त शेतकऱ्यांनी मंत्र्यांची गाडी अडवून आपला रोष व्यक्त केला, कारण त्यांना मंत्र्यांपर्यंत आपले गार्हाणे मांडायला मिळत नव्हते; यानंतर साहेब गाडीतून उतरले आणि त्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले, ज्यामुळे 'देर आये दुरुस्त आये' अशा वातावरणातही शेतकऱ्यांच्या असंतोषाची झलक दिसली. आता आश्वासन दिलेली 'भरीव मदत' कधी आणि कशी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. byte - संजय सावकारे, सह पालकमंत्री बुलढाणा
4
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Sept 25, 2025 13:17:56
Buldhana, Maharashtra:बुलढाणा... आरक्षणाच्या मागणीसाठी हजारोच्या संख्येने धडकला बंजारा समाजाचा एल्गार मोर्चा... अनुसूचीत जमाती प्रवर्गातून बंजारा समाजाला आरक्षण देण्याची प्रमुख मागणी... Anchor - हैदराबाद गॅझेटीयर आणि सीपी बेरार नुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्यात याव या प्रमुख मागणीसाठी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाचा एल्गार मोर्चा काढण्यात आला.. या मोर्चामध्ये हजारो बंजारा बांधव, भगिनी, तरुण-तरुणी सहभागी झाले होते.. आपला पारंपारिक पोशाख, नृत्य आणि मागण्या संदर्भात घोषणा देत शहरातील प्रमुख मार्गाने मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.. या मोर्चामध्ये पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज, रायसिंग महाराज, समाजाचे नेते हरिभाऊ राठोड, संजय राठोड यांच्या नेतृत्वात आणि प्रमुख उपस्थितीत हा मोर्चा पार पडला.. ज्या पद्धतीने मराठा आंदोलनादरम्यान "एक मराठा लाख मराठा" असे घोषवाक्य पाहायला मिळाले, त्याच पद्धतीने "एक गोर, सव्वा लाखेर जोर" हे घोषवाक्य देखील पाहायला मिळाल.. सरकारने समाजाच्या मागण्या मंजूर कराव्या अन्यथा यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे... बाईट - रायसिंग महाराज, महंत बाईट - नंदिनी चव्हाण, बंजारा युवती
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 25, 2025 13:02:01
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top