Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune413102

दौंडमध्ये ३१ लाखांचा बेकायदा मद्य साठा जप्त!

JMJAVED MULANI
Jul 21, 2025 11:36:57
Baramati, Maharashtra
JAVED MUALNI SLUG 2107ZT_DAUNDCRIME FILE 2 दौंड तालुक्यातील पाटस टोल नाक्यावर ३१ लाखांचा बेकायदा मद्य साठा जप्त.. ANCHOR:— पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गोव्यातून अवैधरित्या मद्याची वाहतूक करून पुणे शहर आणि जिल्ह्यात विक्री करणाऱ्या टोळीविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे.दौंड तालुक्यातील पाटस टोल नाक्यावर सापळा रचून तब्बल ३१ लाख ५६ हजार ४९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या कारवाईत ४,७७९ मद्याच्या बाटल्या (८४ बॉक्स), चारचाकी वाहने, तसेच हॉटेल्स आणि घरांमध्ये साठवलेला बेकायदेशीर मद्यसाठा जप्त करण्यात आला.या प्रकरणी ५ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं आहे.
1
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
Jul 22, 2025 02:02:10
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara Slug - 2207_BHA_GUTAKHA FILE - 1 VIDEO 3 IMAGE लाखनीमध्ये १ लाख ६४ हजार रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू जप्त....गोदामात दडवला होता माल व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल Anchor ;- भंडारा जिल्ह्याच्या लाखनी शहरातील सिंधी लाईन परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत सुमारे १ लाख ६४ हजार रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी ४९ वर्षीय व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई भंडारा गुन्हे शाखेच्या पथकाने केली.पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे,उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सिंधी लाईन येथील रामू गोविंदराव गुरुनानी (४९, लाखनी) याच्या दुकानाच्या गोदामावर छापा टाकला.यावेळी पंचासमक्ष घेतलेल्या झडतीत विविध कंपन्यांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि पान मसाल्याचा मोठा साठा आढळून आला.महाराष्ट्रात सुगंधित तंबाखू आणि पान मसाल्याच्या विक्रीवर बंदी असताना हा साठा बेकायदेशीरपणे साठवून ठेवण्यात आला होता. याप्रकरणी आरोपी रामू गुरूनानी विरुद्ध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
3
Report
PTPRAVIN TANDEKAR
Jul 22, 2025 02:01:27
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara Slug - 2207_BHA_SCHOOL_VISIT FILE - 3 VIDEO जिल्हास्तरीय शाळा सुरक्षा समितीने जिल्ह्यातील शाळेची केली पाहणी.... या समितीचा मुख्य उद्देश शाळांना भेटी देऊन त्या शाळांमध्ये असलेल्या त्रुटीची नोंद घेणं आणि त्या त्रुटी दूर करणे.... शाळांचा विकास भौतिकदृष्ट्या त्याचबरोबर शैक्षणिक दृष्ट्या कसा होईल यासाठीचा शासनाचा हा उपक्रम राबवत आहे..... Anchor : माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय शाळा सुरक्षा समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष हे सेवानिवृत्त न्यायाधीश असतात तर त्यांच्या माध्यमातून सहा सदस्यांची कमिटी आहे. या समितीचा मुख्य उद्देश शाळांना भेटी देऊन त्या शाळांमध्ये असलेल्या त्रुटीची नोंद घेणं आणि त्या त्रुटी दूर करण्यासाठी ज्या सर्व यंत्रणा आहेत त्या यंत्राच्या माध्यमातून प्रयत्न करणे.... या कमिटीच्या माध्यमातून दरमहा दोन शाळांना भेटी दिली जाते. आणि त्या माध्यमातून त्या शाळा ज्या काही वैशिष्ट्ये पूर्ण बाबी आढळल्या किंवा ज्या कृती आढळल्या त्याची जी आव्हान आहे त्याचा तो अहवाल राज्य स्तरावर पाठविला जातो. त्यानुसार त्या ठिकाणी त्या ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येतो. BYTE :- शरद त्रिवेदी, माजी न्यायाधीश BYTE :- रवींद्र सोनटक्के, शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद भंडारा
0
Report
HPHARSHAD PATIL
Jul 22, 2025 02:00:37
Palghar, Maharashtra:
पालघर_ मोखाडा पोलिसांनी केलेल्या कारवाईत १११ किलोपेक्षा जास्त अफू आणि एक कार असा एकूण १५ लाख ८० हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला  आहे. सोमवारी  पहाटे २.०२ वाजता मोखाडा पोलीस ठाण्याचे पोलीस रात्रीची गस्त घालत असताना, मोखाडा-त्र्यंबक रोडवर एक कार भरधाव वेगाने जात असताना त्यांना संशय आला. पोलिसांनी तात्काळ कारचा पाठलाग केला असता मौजे चिचुतार गावाजवळ कार चालकाने अंधाराचा फायदा घेऊन गाडीची चावी काढून पळ काढला.या मधून अफू पकडण्यात आला. पोलिस सदर प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत .
0
Report
ADANIRUDHA DAWALE
Jul 22, 2025 01:33:05
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_BOMB_BLAST सहा फाईल आहे रिपोर्टर : अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 मुंबई लोकल ट्रेन बॉम्ब स्फोट प्रकरण; अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहातून चार बंद्यांची सुटका, बंद्यांनी न्यायालय, वकील आणि सरकारचे मानले आभार अँकर :– मुंबई लोकल ट्रेन बॉम्ब स्फोट प्रकरणात काल उच्च न्यायालयाने सर्व अकरा आरोपींची निर्दोष सुटका केली. या 11 आरोपींपैकी चार बंदी अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होते. उच्च न्यायालयाचे आदेश येतात अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहातून चार बंद्यांची सुटका करण्यात आली आहे. तनवीर अहमद मोहम्मद इब्राहिम अन्सारी, महद मजीद महद शफी, सुहिल मोहम्मद शेख, जमीर अहमद लतीफुर रहेमान शेख असे या चार बंद्यांचे नाव आहे. काल रात्री उशिरा चारही बंद्यांना कारागृहाबाहेर सोडण्यात आले. मुंबई लोकल ट्रेन बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात या चारही बंद्यांची अमरावती मध्यवर्ती करागृहातून सुटका करण्यात आली. या केस सोबत आमचा कुठलाही संबंध नव्हता या प्रकरणी आम्हाला मुंबई सत्र न्यायालयातूनच सुटका मिळायला पाहिजे होती मात्र, अखेर आता उच्च न्यायालयातून आमची निर्दोष मुक्तता करण्यात आली असल्याने बंद्यांनी न्यायालय, वकील आणि सरकारचे आभार मानले आहे. दरम्यान अमरावती मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात गुप्तता पाळण्यात आली होती. बाईट :– सुहिल मोहम्मद शेख, तत्कालीन आरोपी
12
Report
SMSarfaraj Musa
Jul 22, 2025 01:31:04
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचा नुतून इमारतीचा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला लोकार्पण सोहळा.. अँकर - सांगली मध्ये जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला.हजार कोटींची उलाढाल आणि 576 कोटींची ठेव असणारी ही शिक्षकांची बँक असून बँकेच्या नफ्यातून विभवी दिव्य इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीचा उद्घाटन मंत्री मुश्रीफ हस्ते आणि राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडी व शिक्षक नेत्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला यावेळी आयोजित समारंभामध्ये बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी, शिक्षणासारखे पवित्र काम कोणतं नाही त्यावेळी शिक्षकांनी प्रामाणिक काम केलं पाहिजे,तसेच आजच्या व्यसनाच्या आहारी जाणाऱ्या तरुण पिढीला चांगल्या वळणावर आणून चांगली पिढी घडवण्याचं देखील काम शिक्षकांनी केलं पाहिजे,असं मत मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.
3
Report
SKSudarshan Khillare
Jul 22, 2025 01:30:53
Yeola, Maharashtra:
अँकर :-येवला शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी थैमान घातले असून पोलीस यंत्रणा या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरत आहे. हाकेच्या अंतरावर असलेल्या येवला शहर पोलीस स्टेशन शेजारील आईना मज्जित परिसरातून नावेद शेख यांच्या मालकीची पिकप गाडी दोन चोरट्यांनी चोरून दिली असून ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे यामुळे पोलीस करताय काय ? हा सवाल आता निर्माण झाला असून या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे..
0
Report
SKSudarshan Khillare
Jul 22, 2025 01:30:46
Lasalgaon, Maharashtra:
अँकर - सध्या महाराष्ट्रात स्मार्ट मीटर बदलण्याचं काम महावितरण कडून सुरू आहे मात्र सामान्य नागरिकांचा याला मोठ्या प्रमाणात विरोध आहे ज्यांचे यापूर्वी मीटर बदलले त्यांना वाढीव स्वरूपाचे बिल येत असल्याने नागरिकांमध्ये धास्तीचे वातावरण आहे. या विरोधात महाविकास आघाडीतर्फे लासलगाव येथील महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा नेवून सहाय्यक अभियंता यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी स्मार्ट मीटर बाबतच्या आणि महावितरणच्या तक्रारी असणारे असंख्य ग्राहक आणि महाविकास आघाडीच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, मनसे या पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
0
Report
SKSudarshan Khillare
Jul 22, 2025 01:30:36
Yeola, Maharashtra:
अँकर:- राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचे निकटवर्ती असलेले राजेंद्र भांडगे यांची येवला शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रवक्ते पदी जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी नियुक्ती केली आहे मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती झाली असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भांडगे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
0
Report
SKSudarshan Khillare
Jul 22, 2025 01:30:17
Yeola, Maharashtra:
अँकर:-नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून जिल्ह्यातील कर्जदार शेतकऱ्यांकडून होत असलेल्या वसुलीबाबत शेतकरी राज्य शेतकरी समिती आणि कर्जमुक्ती अभियान नाशिक जिल्हा बँक यांच्या प्रतिनिधींनी मंत्री छगन भुजबळ यांची संपर्क कार्यालय ते भेट घेत मध्यम *मुदतीच्या* *कर्जाची* संपूर्ण व्याज मुक्ती मिळून द्यावी या करता निवेदन दिले नाशिक जिल्ह्यातील 54 हजार 40 शेतकऱ्यांकडे मध्यम *मुदतीचे* 902 कोटी रुपये मुद्दल थकित आहे या मुद्दलीचे व्याज 1200 कोटी रुपये पर्यंत गेले असून बँकेच्या कारवाईमुळे शेतकरी देशोधडीला लागले आहे या गंभीर बाबीकडे शिष्टमंडळाचे प्रतिनिधी भागवतराव सोनवणे यांनी लक्ष वेधले यावर मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्हा बँक कोणी *संपवली* याचा शेतकऱ्यांनी शोध घ्यावा तसेच व्याज मुक्तीसाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले..
0
Report
SKSudarshan Khillare
Jul 22, 2025 01:30:09
Lasalgaon, Maharashtra:
अँकर:- लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात डाळिंब ड्रॅगन फ्रुट व टोमॅटो लिलावाचा उपसभापती संदीप दरेकर यांच्या हस्ते करण्यात आली या लिलावाच्या शुभारंभ प्रसंगी 135 क्रेट्स  मधून विक्रीसाठी आलेल्या डाळिंबाला जास्तीत जास्त 3 हजार 700 रुपये, कमीतकमी 1 हजार 100 रुपये तर सरासरी 2 हजार 500 रुपये प्रति क्रेट्स ला दर मिळाला तर 25 क्रेट्स मधून ड्रॅगन फ्रुट हा शेतीमाल विक्रीसाठी आला होता जास्तीत जास्त 2 हजार 100 रुपये, कमीतकमी 1 हजार  रुपये तर सरासरी 1 हजार 900 रुपये प्रति क्रेट्स ला दर मिळाला आहे तसेच 545 क्रेट्स मधून टोमॅटो विक्रीसाठी आले याला जास्तीत जास्त 2 हजार 500 रुपये, कमीतकमी 500 रुपये तर सरासरी 1 हजार 500 रुपये प्रति क्रेट्स ला दर मिळाला आहे प्रतवारी करून शेतमाल विक्रीसाठी आणल्यास योग्य बाजार भाव मिळण्यासाठी मदत होईल असे आव्हान बाजार समितीच्या वतीने करण्यात आले.
0
Report
SMSarfaraj Musa
Jul 22, 2025 01:02:32
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफांच्या हस्ते मिरज शासकीय रुग्णालयातील अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांचे पार पडले।लोकार्पण अँकर - सांगलीच्या मिरज येथील शासकीय रुग्णालयामध्ये अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांचा लोकार्पण सोहळा पार पडला आहे.राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला मिरज शासकीय रुग्णालयामध्ये गोरगरीब जनतेला सुलभ आणि अत्याधुनिक पद्धतीने उपचार देण्याच्या उद्देशाने सिटीस्कॅन मशीन बरोबर शस्त्रक्रिया गृह अद्यावत करण्यात आले आहे.याचा उद्घाटन दिमाखात पार पडले,तसेच या निमित्ताने मिरज शासकीय रुग्णालयात करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन देखील मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संपन्न झालं,यावेळी माजी मंत्री सुरेश खाडे,आमदार इद्रिस नायकवडी व रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
11
Report
HPHARSHAD PATIL
Jul 22, 2025 01:02:24
Palghar, Maharashtra:
अँकर _ पालघर जिल्ह्यातील वाडा काँग्रेस कमेटी कडून जन सुरक्षा विधेयक रद्द करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांचे वाडा बस स्टॅन्ड वर आंदोलन केले. जन सुरक्षा विधेयकाच्या प्रति जाळून जन सुरक्षा विधेयकाला काँग्रेस कडून विरोध दर्शवला. जन सुरक्षा विधेयक रद्द रद्द करा ,काळा कायदा रद्द करा अशा घोषणा देत वाडा बस स्टॅन्ड वर आंदोलन करण्यात आले . शिवाय काँग्रेस कार्यकर्त्यांनी वाडा तहसीलदार याना निवेदन देण्यात आले . byte--प्रफुल पाटील [ काँग्रेस जिल्हा अध्यक्ष पालघर ]
8
Report
HPHARSHAD PATIL
Jul 22, 2025 01:02:17
Palghar, Maharashtra:
Anch - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या उभारणीसाठी आणलेलं साहित्य चोरी करणाऱ्या सहा चोरट्यांच्या डहाणू पोलिसांनी मुस्क्या आवळल्या आहेत . डहाणूच्या आंबे सरी येथे बुलेट ट्रेन प्रकल्प उभारणीच काम सुरू असताना साहित्य चोरीला जात असल्याची तक्रार बुलेट ट्रेन प्रकल्पाचा ठेका असलेल्या एल अँड टी या कंपनीकडून देण्यात आली होती यानंतर डहाणू पोलिसांनी सापळा रसत सहा जणांना अटक केली असून त्यांच्याकडून आतापर्यंत तीन लाख वीस हजारांपेक्षा अधिक रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . यामध्ये या चोरट्यांकडून काही बाईक्स देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून यापूर्वी या चोरट्याने चोरी केलेला माल कोणाच्या मध्यस्थीने विक्री केला याचा तपास सध्या डहाणू पोलीस करत आहेत . बाईट - किरण पवार - पोलीस निरीक्षक डहाणू पोलीस ठाणे .
2
Report
TTTUSHAR TAPASE
Jul 21, 2025 17:30:29
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE 3 FILES SLUG NAME -SAT_BOY_KNIFE_R1 सातारा - साताऱ्यात एका अल्पवयीन मुलीवर माथेफिरू युवकांन एकतर्फी प्रेम प्रकरणातून चाकू हल्ला केला होता या हल्ल्यावेळी उमेश आडागळे या तरुणाने संबंधित युवकावर झडप घालत त्या मुलीचा जीव वाचवला होता हा सगळा थरार अनुभवलेल्या उमेश अडागळे या तरुणासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी 121 वीओ 2-साताऱ्यातील एकतर्फी प्रेमातून हल्ला प्रकरणात आरोपी युवक 18 वर्षांचा असून तो अल्पवयीन नाही. आरोपीचे नाव आर्यन वाघमळे असून तो मूळचा आरळे येथील असून सध्या मोळाचा ओढा येथे राहतो.या माथेफिरू युवकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात पोक्सो कायदा, विनयभंग, दुखापत करणे आणि आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी माहिती दिली. byte पोलीस अधीक्षक तुषार दोशी
4
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Jul 21, 2025 16:33:59
Ambernath, Maharashtra:
अंबरनाथमध्ये सीएनजी पंपावर गॅस गळती सीएनजीची वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये गॅस भरताना गळती वेळीच गळती रोखल्यामुळे मोठा अनर्थ टळला Amb  gas leakage Anchor - अंबरनाथ पश्चिमेच्या कल्याण-बदलापूर राज्य महामार्गावरील फॉरेस्ट नाक्याजवळ सीएनजी पंपावर गॅस गळती झालीय. सीएनजी गॅसची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकवरील सिलेंडरमध्ये गॅस भरताना ही घटना घडलीय. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सीएनजी गॅसचे सिलेंडर घेऊन ट्रक इगतपुरी येथे जाणार होता, मात्र अचानकपणे नोझल मधून गॅस गळती झाल्याची प्राथमिक माहिती ट्रक चालकाने दिलीय. दरम्यान गॅस गळती होताच सीएनजी पंपावरील कर्मचाऱ्यांनी वेळीच या गळतीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे राज्य महामार्गावर काहीकाळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. फॉरेस्ट नाका हा अति महत्त्वाचा चौक असून या चौकातच हा सीएनजी पंप आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने सीएनजी गॅस भरण्यासाठी येत असतात. अशा ठिकाणी ही गॅस गळती झाल्याने एकच खळबळ उडाली. चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
12
Report
Advertisement
Back to top