Back
राजेंद्र भांडगे यांची राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते पदी नियुक्ती, निवडणुकीसाठी महत्त्वाची जबाबदारी!
SKSudarshan Khillare
FollowJul 22, 2025 01:30:36
Yeola, Maharashtra
अँकर:- राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचे निकटवर्ती असलेले राजेंद्र भांडगे यांची येवला शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रवक्ते पदी जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी नियुक्ती केली आहे मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती झाली असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भांडगे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
2
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowJul 22, 2025 05:38:01Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - कृष्णा व वारणा नदीकाठच्या गावांसाठी शक्तिपीठ ठरणार कर्दनकाळ - राजू शेट्टी.
अँकर - सांगली जिल्ह्यातुन जाणारा शक्तीपीठ महामार्ग कृष्णा व वारणा नदी काठाच्या गावांसाठी कर्दनकाळ ठरणार असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.कृष्णा आणि वारणा नदी काठावरील गावातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या भरावामुळे वारणा व कृष्णा नदीकाठच्या गावांना महापुराचा धोका अधिकचा निर्माण होणार असल्याची भीती राजू शेट्टींनी व्यक्त केली आहे.शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली सांगलीच्या कर्नाळा येथे
बाधित शेतकरी व ग्रामस्थांची बैठक
पार पडली.यावेळी राजू शेट्टींनी शेतकऱ्यांशी चर्चा करत गावातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या जागेची पाहणी देखील शेतकऱ्यांसोबत करण्यात आली.
0
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 22, 2025 05:37:28Washim, Maharashtra:
वाशिम:
File:2207ZT_WSM_FLOOD_PAINGANGA_RIVER
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर : वाशिमच्या जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैन गंगा नदीला आला पूर...
जिल्ह्यात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं नदी नाल्यांना पूर
पुरामुळे वाशिम जिल्ह्यातील रिसोड - मेहकर,करडा - गोभणी,
सरपखेड - धोडप बुद्रुक हे मार्ग झाले बंद...
तिन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प...
नदी काठावरील गावांना प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा.
जिल्ह्यात संततधार पाऊस सुरूच...
पुरामुळे नदीकाठच्या शेतीसह पिकाचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली..
0
Report
ABATISH BHOIR
FollowJul 22, 2025 05:37:05Kalyan, Maharashtra:
डोंबिवलीत '६५ अनाधिकृत इमारतीं'नंतर आता २०९ हून अधिक घरांवर रेल्वेची टांगती तलवार!.
२०९ घरांना रेल्वेच्या नोटिसा, रहिवाशांचा 'आम्ही अतिक्रमणदार नाही' म्हणत आक्रोश...पुनर्वसन किंवा मोबदल्याची मागणी, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा.
डोंबिवली पश्चिमेकडील गणेशनगर आणि भगवान काटेनगर परिसरातील सुमारे २०९ घरांना रेल्वे प्रशासनानं कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत.
रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवत ९ डिसेंबर रोजी रहिवाशांना या नोटिसा मिळाल्या आहेत. यामुळं रहिवाशांच्या पायाखालची जमीनच सरकली असून, त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे.
सर्व राजकीय नेत्यांची भेट घेऊन सुद्धा कोणीही दखल घेत नाही..
आम्ही रेल्वे कोर्टामध्ये लढा देत आहोत तरीसुद्धा रेल्वे कडून एकूण ४१० घर आहे त्यापैकी २०९ जणांना नोटीसा देण्यात आलेले आहे
दखल घेतली नाही तर कुटुंबासहित सामूहिक आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही असा इशारा दिला आहे.
Byte...रहिवाशी
0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowJul 22, 2025 05:36:41Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File name : 2207ZT_MAVAL_MULSHI_VED
Total files : 03
Headline : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमुकल्याच्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा
लेटर बॉक्स बनवून सर्व चिमुकल्यांचे लेटर घेऊन वेद मारणे थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
Anchor:
मुळशी तालुक्यातील वेद मारणे या लहानग्याने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस एका अत्यंत अनोख्या आणि भावनिक पद्धतीने साजरा केला आहे. बालवयात असतानाही वेदने आपल्या मित्रांसोबत मिळून एक छोटेखानी "लेटर बॉक्स" तयार केला, ज्यामध्ये प्रत्येक मित्राने मुख्यमंत्र्यांविषयीच्या आपल्या भावना पत्रामार्फत व्यक्त केल्या. या पत्रांमधून मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबद्दल मुलांचे विचार, प्रेरणा, आणि त्यांच्याविषयी असलेले आदरभाव उमटले आहेत. हा आगळा-वेगळा उपक्रम या लहानग्याच्या कल्पकतेचे आणि भावनिक जाणिवेचे दर्शन घडवतो. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून वेद मारणे याने आपल्या पालकांसह थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. फडणवीस यांनीही या लहानग्याच्या उपक्रमाचे कौतुक केलं. तसंच, फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वेदने छत्रपती शिवाजी महाराजांची "शिव प्रेरणा चित्ररचना" साकारून आगळ्या वेगळ्या पद्धतीने मुख्यमंत्री फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या. लहान वयात वेदने दाखवलेली ही सामाजिक आणि सांस्कृतिक जाणीव नक्कीच प्रेरणादायक ठरते.
0
Report
LBLAILESH BARGAJE
FollowJul 22, 2025 05:36:33Pune, Maharashtra:
अहिल्यानगर येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अहिल्यानगर शहरप्रमुख किरण काळे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल...
नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात एकवीस वर्षीय विवाहित महिलेने केला गुन्हा दाखल...
पीडित महिला आणि तिचा पती यांच्यात होणारे सततचे वाद मिटवण्यासाठी पीडिता ही किरण काळे यांच्या संपर्कात आल्यानंतर अत्याचार केल्याचा आरोप...
पीडित महिलेला मदत करण्याचे आमिष दाखवून शिवसेना UBT शहर प्रमुख किरण काळे यांनी वारंवार बलात्कार केल्याचा आरोप...
2023 ते 2024 पर्यंत किरण काळे याने स्वतःच्या संपर्क कार्यालयात केला बलात्कार...
तसेच ही गोष्ट कोणाला सांगितली तर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप...
कोतवाली पोलिसांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहरप्रमुख किरण काळे यांना घेतले ताब्यात...
0
Report
KJKunal Jamdade
FollowJul 22, 2025 05:36:04Shirdi, Maharashtra:
Anc - शिर्डीतील 'ग्रो मोअर' कंपनीने साईबाबा संस्थानमध्ये काम करत असलेल्या शेकडो कर्मचाऱ्यांसह स्थानिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याच्या आरोपावरून, संस्थाचालक भूपेंद्र सावळेसह त्याचे वडील, चुलता, भाऊ यांच्यासह सातजणांवर शिर्डी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चार आरोपी साईबाबा संस्थानच्या सेवेत आहेत. गुन्हा दाखल होऊनही ते संस्थानच्या सेवेत कार्यरत होते व शिर्डीत उजळ माथ्याने फिरत होते.मुख्य आरोपी भूपेंद्रचे वडील राजाराम भटू सावळे (प्रसादालय विभाग), भाऊसाहेब आनंदराव थोरात, सुबोध सुकदेव पाटील (श्री साईवावा रुग्णालय), संदीप भास्कर सावळे (साई आश्रम) हे चौघे साई संस्थानमध्ये कार्यरत होते.शिर्डी पोलिसांत कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर साई संस्थान प्रशासनाने चारही आरोपींना साई संस्थान प्रशासनाने निलंबित केलंय..या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून आणखी तक्रारदार बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जातेय...
0
Report
NMNITESH MAHAJAN
FollowJul 22, 2025 05:35:52Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2207ZT_JALNA_MANTHA_RAIN(4 FILES)
जालना : मंठा तालुक्यातही ढगफुटी, पिकं पाण्याखाली, सरस्वती नदीला पूर
अँकर | जालन्यातील मंठा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे.तालुक्यातील तळणी भागात ढगफुटी सदृष्य पाऊस झालाय.या मुसळधार पावसामुळे परीसरातील पिकं पाण्याखाली गेली आहे.तर सरस्वती नदीला देखील पूर आला असून रात्रभरापासून या भागात पाऊस सुरू असल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे.कपाशी,सोयाबीन,तुर आणि खरीप पिकांमध्ये पाणी साचलय.
1
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 22, 2025 05:35:45Washim, Maharashtra:
वाशिम:
File:2207ZT_WSM_THIEVES_ARRESTE
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:वाशिमच्या रिसोड पोलिसांनी दोन अट्टल चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल ११ लाख १७ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय, तर आरोपीनीं दिलेल्या कबुली नंतर आणखी १० चोरीचे गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आलंय. युवराज पवार रा.बीबी. जिल्हा बुलढाणा आणि श्यामराव पवार रा.जांभरून नावाजी जिल्हा वाशिम यांना अटक करण्यात आलीये, त्यांच्याकडून १२२ ग्रॅम सोनं, ५०० ग्रॅम चांदी,एक मोटारसायकल, मोबाईल आणि ४५०० नगदी असा ११,१७,७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या अटल चोरांना अटक केल्यामुळे जिल्ह्यातील घडलेल्या चोरिच्या घटनांचा उलगडा होण्यची शक्यता आहे.
0
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 22, 2025 05:35:36Parbhani, Maharashtra:
अँकर- विदर्भ आणि जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात रात्री झालेल्या मोठ्या पावसानंतर हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील बन बरडा परिसरातून वाहणाऱ्या सरस्वती नदीला मोठा पूर आलाय, यामुळे सेनगाव आणि मंठा तालुक्याचा संपर्क तुटलाय, तर बरडा शिवारात असलेल्या महादेव मंदिराला पुराचा वेढा पडल्याने या मंदिरातील सेवेकरी महाराज आणि इतर दोघे दोघेजण मंदिराच्या छतावर अडकून पडले होते. मंदिर आणि परिसरात पाणी शिरल्याने त्यांना छताचा आधार घ्यावा लागला होता. पुराचे पाणी वाढतच चालल्याने त्यांनी आपली लवकर सुटका व्हावी म्हणून त्यांनी ग्रामस्थ आणि प्रशासनांकडे मदत माघीतली होती,पण कापडसिंगी येथील राज्य महामार्गावरील पुलावरून पाणी जात असल्याने त्यांना इकडे पोहोचण्यास वेळ लागणार होता,त्यामुळे गावकर्यांनी दोरीच्या साहाय्याने मंदिरात अडकलेल्या तिघांची सुखरूप सुटका केलीय,त्यानंतर महाराज आणि सेवेकऱयांनी सुटकेचा निश्वास सोडलाय.
0
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowJul 22, 2025 05:03:47Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_RUMMY_ANDOLAN चार फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
चक्क उपविभागीय कृषी अधिकाऱ्याच्या टेबलवर शेतकऱ्यांनी जुगार भरवत खेळले रमी; कृषी मंत्री कोकाटे विरोधात घोषणाबाजी
अँकर :- सोयाबीनवर हुमणी अळीचा प्रकोप वाढलेला असताना त्यावर कृषी विभागाने कोणतेही प्रकारच्या उपयोजनां केल्या नसल्याचा आरोप करत कृषी विभागाचे अधिकारी केवळ दालनात बसून शेतकऱ्यांचे नुकसान पाहत आहे. असा आरोप करत शेतकऱ्यांनी अमरावती उपविभागीय अधिकाऱ्याच्या दालनात त्यांच्याच टेबलवर रमी जुगाराचा खेळ खेळत आंदोलन केले. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील परिसरातील सोयाबीनवर हुमणी अळीचा प्रकोप झाल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी हातबल झालेला आहे. गेल्या एक ते दीड महिन्यापासून पेरलेल्या सोयाबीनच्या शेतामध्ये हुमणी अळीमुळे प्रचंड नुकसान झालेले आहे. तरीही कृषी विभागाला जाग आलेली नाही. भातकुली उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय अंतर्गत कृषी विभागाचा कोणताच अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर गेला नाही, त्याला मार्गदर्शन केले नाही, हुमणी अळी म्हणजे काय? हे सुद्धा सांगितले नाही, तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा अशा परिस्थितीमध्ये रमीमास्टर कृषिमंत्र्याच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांनी काय अपेक्षा करावी ? असा हा प्रश्न सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे नेते प्रकाश साबळे यांनी प्रशासनाला केला आहे.
बाईट :- प्रकाश साबळे, शेतकरी नेते
2
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 22, 2025 05:03:14Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2207ZT_CHP_RAMBAG_PROTEST
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर शहरातील मध्यवर्ती रामबाग मैदान वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी चंद्रपूरकरांनी केले अनोखे वृक्षारोपण, नव्या जिल्हा परिषद इमारत बांधकामासाठी प्रशासनाने हे मध्यवर्ती मैदान केले होते निश्चित, मात्र स्थानिकांच्या विरोधानंतर काम थांबविण्यात आले, मात्र आंदोलनाचा धुरळा खाली बसल्यानंतर पुन्हा एकदा शंभर वृक्ष कापून इमारत बांधकामाची करण्यात आली तयारी, मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी वृक्षतोडीच्या विरोधात नागरिकांनी आंदोलन करत वृक्षारोपण करून साजरा केला वाढदिवस
अँकर:--चंद्रपूर शहरातील मध्यवर्ती रामबाग मैदान वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी चंद्रपूरकरांनी अनोखे वृक्षारोपण केले. नव्या जिल्हा परिषद इमारत बांधकामासाठी प्रशासनाने हे मध्यवर्ती मैदान निश्चित केले होते. मात्र स्थानिकांच्या प्रखर विरोधानंतर 2 महिन्यांपूर्वी हे काम थांबविण्यात आले. मात्र आंदोलनाचा धुरळा खाली बसल्यानंतर पुन्हा एकदा शंभर वृक्ष कापून सा. बां. विभागाने इमारत बांधकामाची तयारी केली. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी वृक्षतोडीच्या विरोधात नागरिकांनी आंदोलन करत वृक्षारोपण करून त्यांचा वाढदिवस साजरा केला. शहरातील हिरवळ आणि शिल्लक राहिलेली मोजकी मैदाने वाचवण्यासाठी सतत संघर्ष करण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.
बाईट १) पप्पू देशमुख, सामाजिक कार्यकर्ते
बाईट २) राजेश अडुर, स्थानिक नागरिक
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 22, 2025 05:02:44Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात नशिले पदार्थ पाजून धर्मांतर करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी धर्मांतर करवून घेणाऱ्याला दिला चोप
(((( हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी ज्या ठिकाणी रेड टाकली त्या ठिकाणी काहीशी शिवीगाळ झालेली आहे आवश्यक तिथे बीप टाकावा विनंती ))))
- सोलापुरात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी धक्कादायक प्रकार आणला उघडकीस
- शहरातील भूषण नगर भागात घडत होता प्रकार
- एका विशिष्ट धर्माच्या धर्मगुरूकडून हिंदू धर्मातील महिलांना वाईन पाजून धर्मांतर करत असल्याचा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा आरोप
- महिलांना वाईन पाजणाऱ्या धर्मगुरुला चोप देत केली पोलिसांच्या हवाली
- धर्मांतर करायला नकार दिल्यास संबंधितांच्या घरासमोर जाऊन त्रास देणे, शिवीगाळ करणे, दगड फेकणे अशी कृत्ये करत आणला जातं होता दबाव
- हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून रेड वाईन, धर्मांतराचे सर्टिफिकेट, विशिष्ट प्रकारची डायरी करण्यात आली जप्त
- धर्मांतर करायला लावणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
बाईट -
सुधीर बहिरवाडे ( हिंदू महासभा शहराध्यक्ष )
बाईट -
शिवराज गायकवाड ( ओमसाई प्रतिष्ठान )
बाईट -
अपर्णा माने ( हिंदुत्ववादी कार्यकर्त्या )
0
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 22, 2025 05:01:44Washim, Maharashtra:
वाशिम:
File:2207ZT_WSM_DECORATION_NOTES
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर : वाशिम शहरातील पद्मतीर्थावरील पुरातन मंदिर असलेल्या श्री पदमेश्वराच्या पिंडीला उत्तर भारतीयांच्या दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्त 5 लाख 51 हजार रुपयांच्या चलनी नोटांचा आकर्षक शृंगार करण्यात आला.श्री पदमेश्वराच्या पिंडीला सजवण्यासाठी चलनातील 10,20,50,100, 200 आणि 500 च्या नोटा तसेच काही नाण्यांचा ही या शृंगारात वापर करण्यात आला.श्री पदमेश्वराला केलेला चलनी नोटांचा हा आकर्षक शृंगार पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.यावेळी श्री पदमेश्वराची महाआरती ही करण्यात आली.
2
Report
KPKAILAS PURI
FollowJul 22, 2025 05:00:44Pune, Maharashtra:
अजित पवारांच्या प्रतिभा संवर्धनाचा प्रयत्न... वाढदिवसानिमित्त शहरात इंग्रजीतून फ्लेक्सबाजी....!
pimpri ncp
kailas puri pune 22-7-25
feed by 2c
Anchor - 0उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रतिमा संवर्धनाचा पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कडून प्रयत्न करण्यात आलाय...पिंपरी चिंचवड शहरातील उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या पिंपळे सौदागर,वाकड या भागात अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इंग्रजी मधून फ्लेक्सबाजी करण्यात आलीय...अजित पवार शब्दाचे पक्के असल्याचा संदेश फ्लेक्स च्या माध्यमातून देण्यात आलाय...पिंपरी चिंचवड शहरात अनेक आयटी कर्मचारी असल्याने इंग्रजी मधून फ्लेक्स बाजी करण्याचा राष्ट्रवादीने प्रयत्न केलाय....त्याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी.....!
kailas puri wkt+ vis
0
Report
SKShubham Koli
FollowJul 22, 2025 05:00:36Thane, Maharashtra:
ठाणे
नवीमुंबई ते गुजरात ८ टन लोखंडी पाईप व लोखंडी रॉड या वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे ठाणेवरून घोडबंदरकडे जाणाऱ्या वाहिनीवरती पातलीपाडा ब्रिजवरील रोड दुभाजकाच्या मध्ये असलेल्या स्ट्रीट लाईट पोलवरती वाहन आदळून अपघात झाला होता.
सदर घटनास्थळी शहर वाहतूक पोलीस कर्मचारी ०२-हायड्रा मशीनसह, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०१-पिकअप वाहनासह व अग्निशमन दलाचे जवान ०१- फायर वाहनासह, ०१- रेस्क्यू वाहनासह व ०१- खाजगी रुग्णवाहिका उपस्थित होते.
सदर घटनास्थळी अपघातग्रस्त वाहनांमधील दोन व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
सदर दोन्ही व्यक्तींना अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने बाहेर काढून उपचाराकरिता रुग्णवाहिकेमधून जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे येथे दाखल केले असता तेथील डॉक्टर यांनी सदर दोन्ही व्यक्तींना मृत घोषित केले आहे.
अपघातग्रस्त वाहनांमधील लोखंडी पाईप व लोखंडी रॉड रस्त्यावरती पडले होते, सदर लोखंडी पाईप व रॉड आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांच्या कडून हायड्रा मशीनच्या सहाय्याने एका बाजूला करण्यात आले आहे.
सदर घटनास्थळी अपघातग्रस्त ट्रक ०२-हायड्रा मशीनच्या साहाय्याने सुमारे ०३:०० तासांच्या प्रयत्नानंतर रोडच्या एका बाजूला करण्यात आला आहे.
अपघातग्रस्त वाहनांधून रस्त्यावरती ऑईल सांडले होते. अग्निशमन दलाच्या जवानांकडून व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्या मदतीने सदर ठिकाणी होजरीलच्या सहाय्याने पाणी मारून रस्त्यावरील ऑईल साफ करण्यात आले आहे.
सद्यस्थितीत ब्रिजवरील अपघातग्रस्त वाहन रोडच्या बाजूला करण्यात आले असून, घोडबंदर रोड वाहतुकीसाठी पूर्णपणे मोकळा करण्यात आला आहे.
0
Report