Back
राजापूर में मोकाट गुरों से भीषण हादसा: चालक बचा, एक म्हैस मारी गई
PPPRANAV POLEKAR
Sept 19, 2025 03:17:50
Ratnagiri, Maharashtra
राजापूर रानतळे येथे मोकाट गुरांमुळे भीषण अपघात – चालक सुखरूप, म्हैशीचा मृत्यू
राजापूर तालुक्यातील रानतळे येथील पोल्ट्री फार्म जवळ आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास मोकाट गुरांमुळे भीषण अपघात घडला. बारसू येथील युवा ठेकेदार दीप्तेश कदम यांच्या चारचाकी वाहनाला रस्त्यावर आलेल्या गुरांमुळे जोरदार धडक बसली. या धडकेनंतर गाडी पलटी होऊन रस्त्याच्या बाजूला गेली.
सुदैवाने वाहनचालकाला कोणतीही दुखापत झाली नाही. त्यांनी सीटबेल्टचा वापर केल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र या अपघातात एक म्हैस जागीच ठार झाली असून दुसरे जनावर गंभीर जखमी झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मोकाट गुरांचा प्रश्न सातत्याने सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि नागरिकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला होता. तरीदेखील ठोस कारवाई न झाल्यामुळे हा अपघात घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी मोकाट गुरांचे मालक शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच अपघातातून बचावलेल्या वाहनचालकावर कोणतीही जबाबदारी टाकू नये, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowSept 19, 2025 04:52:410
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 19, 2025 04:31:262
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 19, 2025 04:30:390
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 19, 2025 04:30:210
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 19, 2025 04:18:050
Report
AKAMAR KANE
FollowSept 19, 2025 04:17:160
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 19, 2025 04:15:290
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 19, 2025 04:04:310
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 19, 2025 04:04:170
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 19, 2025 04:01:180
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 19, 2025 04:01:060
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 19, 2025 04:00:520
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 19, 2025 03:50:040
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 19, 2025 03:49:052
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 19, 2025 03:48:530
Report