Back
गोंदियामध्ये धोकादायक पुलामुळे जड वाहतूक बंद, नागरिकांची मागणी!
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 11, 2025 05:31:26
Bhandara, Maharashtra
Pravin Tandekar Gondia
Slug - 1007_GON_BRIDGE_CLOSE
FILE - 5 VIDEO
वाघ नदीवर पुलाची दुरावस्था....पुलावरील जड वाहतूक करण्यात आली बंद.. गेल्या दोन वर्षापासून पूल आहे धोकादायक..
लवकरात लवकर नवीन पुलाचे बांधकाम करावे नागरिकांची मागणी....
Anchor:- गोंदिया जिल्ह्यातील आमगाव जवळ वाघ नदीवर असलेला सालेकसा आणि छत्तीसगड सह मध्य प्रदेश राज्याला जोडणारा हा पूल गेल्या अनेक दिवसापासून हा पुलावर कंपन आणि हलण्याच्या घटना झाल्या होत्या आणि याची दखल घेत 2023 हा पूल धोकादायक असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केला होता. परंतु या पुलावरून जड आणि हलके वाहतूक सुरू होती पावसाळ्याचे दिवस असल्याने कोणतीही अनुचित घटना होऊ नये यासाठी आता प्रशासन जागे झाले असून या पुलावरून जड वाहतूक बंद करण्यात आली आहे आणि या ठिकाणी लवकरात लवकर नवीन पुल व्हावा यासाठी आता नागरिक मागणी करत आहेत.
14
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 11, 2025 10:05:44Parbhani, Maharashtra:
अँकर- आई वडिलांना कधि ही सोडून न राहिलेल्या मुलीच निवासी शाळेत मन रमत नसल्याने मुलीची टीसी परत मागणीसाठी शाळेत गेलेल्या पालकाला स्वस्थाचालक दाम्पत्याने जीवे ठार मारल्याची घटना परभणी जिल्ह्यात घडली आहे. ही घटना शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी असून मयताच्या पत्नीने आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे...
व्हीओ- सांप्रदायिक वातावरणात वावरनाऱ्या एका सज्जन पित्याचा मग्रुर शिक्षण संस्थाचालकांनी बेदम मारहाण करून खून केल्याची घटना परभणीच्या झिरो फाटा येथील हायटेक रेसिडेन्सी स्कुल मध्ये घडलीय, परभणी तालुक्यातील उखळद येथील 42 वर्षीय जगन्नाथ हेंडगे हे सांप्रदायिक परिवातील सज्जन गृहस्थ होते,त्यांची मुलगी पल्लवीच्या शाळेतील मैत्रिणी झिरो फाटा येथील हायटेक रेसिडेन्सी स्कुल मधील शिकायला गेल्या होत्या,ही शाळा रेसिडेंशियल असल्याने जगन्नाथ यांनी पल्लवीच हट्ट बघून तिच्या मैत्रिणी बरोबर रेसिडेन्सी स्कुल मध्ये टाकलं,पण आई वडिलांना सोडून कधीच न राहिलेल्या पल्लवीचे मन त्या शाळेत रमत नसल्याने तिने घरी जाण्याचा हट्ट धरला,त्यांनतर जगन्नाथ हेंगडे चार दिवसातच पल्लविला घरी घेऊन गेले. एके दिवशी मयत जगन्नाथ हेंडगे आणि त्यांचे काका मुंजाजी हेंडगे हे या शाळेत टीसी काढण्यासाठी गेले असता संस्थाचालक प्रभाकर चव्हाण आणि रत्नमाला चव्हाण या दाम्पत्याने सुरुवातीला कार्यालयात बेदम मारहाण केली,मारहाण करीत त्यांना बाहेर काढला आणि पुन्हा जगन्नाथ यांच्या काका मुंजाजी यांच्या समोर लाथा घातल्या,यातच जगन्नाथ यांचा जाग्यावर मृत्यू झल्याचा आरोप करीत मयताच्या काका मुंजाजी हेंडगे यांनी पूर्णा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केलाय,
बाईट- मुंजाजी हेंडगे- मयताचे काका
बाईट- भास्कर हेंडगे- मयताचा भाऊ
बाईट- रवींद्रसिंह परदेशी -पोलीस अधीक्षक, परभणी
व्हीओ- पल्लवी केवळ चार दिवस या शाळेत निवासी होती, जगन्नाथ यांनी 2 हजार रुपये फी भरली होती,वर्षाभरासाठी आणखीन 28 हजार रुपये ते भरणार होते, पण पल्लवीच मन शाळेत रमत नसल्याने आता या शाळेतून नाव काढणं त्यांना आवश्यक बनल होत. त्यामुळे जगन्नाथ यांनी शाळेकडे टीसी माघीतली होती,पण शाळा व्यवस्थापनाने सर्व पैसे भरल्याशिवाय टीसी देणार नसल्याचा पवित्रा घेतला, त्यातूनच त्यांना बेदम मारहाण झाली, शिक्षना सारख्या पवित्र ज्ञान मंदिरात आपल्या पतीचा जीव घेतल्याने आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी मयतची पत्नी यशोदा हेंगडे यांनी केलीय...
बाईट- यशोदा हेंगडे- मयतची पत्नी
व्हीओ- या घटनेने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ माजलीय,परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निवासी गुरुकुल शिक्षण पद्धती निर्माण झाल्या असून अनेक शाळा पालकांची पैश्यासाठी पिळवणूक करीत असल्याचा घटना नेहमीच घडत असतात, अद्याप आरोपी पोलिसांना सापडले नसल्याने पालक वर्गातून संतप्त भावना समोर येत आहेत...
गजानन देशमूख,झी मीडिया परभणी
2
Share
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 11, 2025 10:01:16Raigad, Maharashtra:
स्लग - गेल प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा ...... जिल्हाधिकारी कार्यालयात खा. धैर्यशील पाटलांची बैठक ....... तीन मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा ...... प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन स्थगित ........
अँकर - अलिबाग तालुक्यातील गेल प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. खासदार धैर्यशील पाटील , जिल्हाधिकारी किशन जावळे, कंपनीचे अधिकारी, ठेकेदार यांनी प्रकल्पग्रस्ताशी सविस्तर चर्चा केली. सीएसआर निधी स्थानिक पातळीवर वापरावा, 264 जणांना कंत्राटी म्हणून कामावर घ्यावे तसेच आंदोलनात सहभागी झाल्यामुळे कमी करण्यात आलेल्या 600 जणांना पुन्हा कामावर घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मागील 16 दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन आज स्थगित करण्यात आले.
बाईट 1 - धैर्यशील पाटील , खासदार भाजप
बाईट 2 - महेश मोहिते , सरचिटणीस भाजप
0
Share
Report
MNMAYUR NIKAM
FollowJul 11, 2025 09:38:14Buldhana, Maharashtra:
बुलढाणा ..
आमदार संजय गायकवाड बाईट्स ..
ऑन संजय राऊत, शिंदे दिल्लीला जाऊन शहांच्या पाया पडले ..
आम्ही महायुतीत काम करतो ..
महायुतीत देशाचे नेते मोदी आणि अमित शहा आहे ..
एकनाथ शिंदे कोणत्या कामासाठी गेले, विकासाच्या कामासाठी गेले का , ही विरोधकांना माहिती आहे का ..
ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यावेळी संजय राऊत उद्धव ठाकरे सोनिया गांधीचे पाय चाटायला जायचे ..
आमच्या साहेबाच्या गुरू एकच आहे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेब ...
तुम्ही तर बाप बदलला ..
बाळासाहेबांचा विचार आणि गुरुत्व तुम्ही सोडले ..
ऑन राजन विचारे,
आमचे गुरू बाळासाहेब होते, राहणार, आहेत ..
विचारे बाप तुम्ही बदलला, विचार बदलला ..
तुम्ही बाळासाहेब ऐवजी सोनिया गुरु केले, शरद पवार गुरू केले राहुल गांधी गुरू केले ..
( १.२९ सेकंड )
ऑन संजय राऊत, दावा, माझा पक्ष विलीन करतो ..
संजय राऊत हा एक नंबर नालायक होपलेस माणूस आहे ..
यांच्या कोणत्या भागात ट्रान्स्लेटर फिट आहे की याला बातम्या कुठून लागतात ..
पक्ष वाढण्यासाठी एकनाथ शिंदे जीवाचे रान करून फिरतात ..
हे का पक्ष विलीन करण्यासाठी का ..
संजय राऊत बोलला की लोक टीव्ही बंद करतात ..
( ५६ सेकंड )
ऑन संजय राऊत, उद्धव राज एकत्र आल्याने शिंदे यांच्या पाया खालची वाळू सरकली .
असे काही झाले मला काही वाटत नाही .
आम्ही आमचे काम करतो ते त्यांचा पक्ष घेऊन काम करतात ..
त्यामुळे पाया खालची वाळू सरकारयाची काय गरज ..
आम्हाला कोणाला घाबरायचे काही गरज नाही ..
( २४ सेकंड )
ऑन विरोधक पोलिसांनी स्वतः फिर्यादी व्हावे ..
पोलिसांनी कोणत्या विषयात फिर्याद व्हाव, याची कायद्यात तरदूत आहे ....
सगळ्यात गोष्टीत पोलिसाना फिर्यादी होता येत नसते .
माझी मारहाण त्याला जीवघेणी नाही किंवा इजा पोहचविणे नाही ..
.
माझी त्याला सौम्य मारहाण आहे.; माझी शक्तिशाली मारहाण नाही ..
धडा शिकवण्यासाठी मारहाण आहे, त्याला धडा शिकवला, त्यावर कारवाई झाली. .
( ३१ सेकंड )
On सिव्हिल hospital पाहणी ..
मी सगळ्या ठिकाणी भेट देणार आहे,
जसे मुंबईत घडले तसे इकडे घडू नये. .
यासाठी माझा प्रयत्न आहे.
( १४ सेकंद)
ऑन विरोधक , मारहाण नंतर राजीनामा मागत आहे. . ..
ज्याला मारहाण केली तो काहीच बोलत नाही , बाकीच्याला काय पुळका येऊन राहिला ..
त्यांनी तक्रारा पण केली नाही, त्याला माहिती आहे आपण चूक केली आहे .
त्याच्यासोबत झाले ते काहीच बोलत नाही, हे चोरटे कशाला बोंबलतता बाकीचे ..
(२७ सेकंड )
On सामना, चड्डी बनियान गँग ..
बालासाहेब ठाकरे यांनी पाहिले आंदोलन जे केलं ते साऊथ इंडियन लोकांचे विरोधात केले होते ..
त्यांनी डान्स बार, लेडीज बार लावून संस्कृती बिघडविली ..
मी जे केले तो शेट्टीच आहे. .
इकडे मराठी मराठी करायला का पुळका आला त्या शेट्टीचां ..
संजय राऊत चे मायचा नवरा आहे का तो शेट्टी ..
त्याला मी आतंकवादी वाटतो का ..
तो आमच्या लोकांना बोगस जेवण खाऊ घालत होता, आज सिद्ध झाले ..
त्या हॉटेल वाल्याने ७९ प्रकाराचे नियमाचे उल्लंघन केल्याचे सिद्ध झाले ..
हा माझा विजय आहे ..
त्याला कुणी वाच्या फोडत नव्हते. .
घंटा कुणी मांजराच्या गळ्यात बांधत नव्हते, तो मी बांधला ..
मला मान्य आहे की माझा मार्ग चुकीचा होता ..
मला कायदा हातात घ्यावा लागला, इच्छा नसताना .
(१.२३सेकंड )
4
Share
Report
SMSATISH MOHITE
FollowJul 11, 2025 09:36:32Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Molestation
Feed on - 2C
--------------------------
Anchor - प्रवासी महिलेसोबत गैरवर्तन करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक करून विक्रमी वेळेत 18 तासात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. नांदेड शहरातील एक महिला 7 जुलै रोजी वजीराबाद चौकातून ऑटोमध्ये बसून प्रवास करत होती. महिला ऑटोत बसल्यापासून ऑटोचालक तिच्याशी गैरवर्तन करू लागला. चालकाने त्याचा आरसाही महिलेच्या दिशेने वळवला होता. अखेर महिलेने आपला प्रवास अर्ध्यावर थांबवला. श्रीनगर मध्ये ती महिला उतरली. महिलेने त्या ऑटोचा नंबरसह फोटो काढला. घडलेल्या प्रकराबाबत तिने इंस्टाग्राम वर पोस्ट टाकली. ही पोस्ट पाहणाऱ्या एका जबाबदार व्यक्तीने थेट पोलीस अधीक्षकांना ही पोस्ट फॉरवर्ड केली. पोलीस अधीक्षकांनी महिलेचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीसांनी आधी त्या महिलेचा शोध घेतला. संपूर्ण हकीकत कळाल्यानंतर भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. काही तासाच्या नवी आबादी येथील 24 वर्षीय शेख इम्रान शेख हरून ला याला अटक करण्यात आली. काही तासात सबळ पुरावे गोळा करत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अवघ्या 18 तासात न्यायालयात पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल केले.
Byte - संतोष तांबे - पोलीस निरीक्षक, भाग्यनगर ठाणे.
------------------
2
Share
Report
LBLAILESH BARGAJE
FollowJul 11, 2025 09:36:20Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:-खासदार लंके उपोषण सुरू
Anchor
अहिल्यानगर मनमाड राष्ट्रीय महामार्गाच रखडलेले काम तात्काळ सुरू करावा या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केला आहे गेल्या अनेक वर्षांपासून या महामार्गाचे काम रखडले आहे काम सुरू झाल्यानंतर काही महिन्यातच ठेकेदार हे काम सोडून जात असल्याने या महामार्गाचा प्रश्न सुटलेला नाही दरम्यान यावर्षी या महामार्गाची नव्याने निविदा काढून महामार्गाच्या प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश काढून अडीच महिने उलटले आहेत तरी देखील प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही लंके उपोषणाला बसल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी उपोषण स्थळी भेट घेऊन काम सुरू करण्याबाबत लंके यांना माहिती दिली मात्र या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाल्यामुळे अनेक अपघात झाले आहेत मागील तीन वर्षांमध्ये 388 जणांचा मृत्यू या महामार्गावर झाला आहे त्यामुळे खासदार लंके यांनी उपोषणाला सुरुवात केली असून जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत आपला उपोषण थांबणार नाही असं त्यांनी स्पष्ट केला आहे
बाईट:- निलेश लंके, खासदार राष्ट्रवादी SP
1
Share
Report
KJKunal Jamdade
FollowJul 11, 2025 09:34:47Shirdi, Maharashtra:
Anc - आज काल्याच्या किर्तनानंतर साईसमाधी मंदिरासमोर पारंपारीक पद्धतीने दहीहंडी फोडून गुरुपौर्णीमा उत्सवाची सांगता झालीय...या तिन दिवसीय उत्सवात देश - विदेशातील लाखो भाविकांनी साईदर्शनाचा लाभ घेतला...सांगता दिनी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सपत्निक साईबाबांची पाद्यपुजा केली...तर गुरूस्थान मंदिरात रुद्राभिषेक करण्यात आला....साईमंदिरात दहीहंडी फोडल्यानंतर दुपारची मध्यान्ह आरती पार पडली...यावेळी शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
Share
Report
JJJAYESH JAGAD
FollowJul 11, 2025 09:34:35Akola, Maharashtra:
7 फाईल्स आहेत AVBB
Anchor : अकोला जिल्ह्यातील हिवरा कोरडे ते मूर्तिजापूर रस्त्याच्या कामाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहेय..निकृष्ट आणि अपूर्ण कामामुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिक मोठ्या त्रासाला सामोरे जात आहेय..रस्त्यावर बेफिकीरपणे टाकलेला कच्चा मुरुम आणि अपुऱ्या नियोजनामुळे हा रस्ता नागरिकांसाठी धोकादायक बनला आहेय..
Vo : या मार्गावरील खराब परिस्थितीमुळे मूर्तिजापूर,भातकुली,
अमरावती या मार्गावरील बससेवा मागील दोन-तीन दिवसांपासून बंद आहेय..कच्च्या मुरुमामुळे अनेक बसेस रस्त्यातच अडकल्याचे प्रकार घडले आहेत..रस्त्याच्या कामाच्या या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बॅनर, फलक किंवा बॅरिकेड्स लावण्यात आलेले नाहीत, त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहेय.. नागरिकांना जीव मुठीत घेऊन हा रस्ता पार करावा लागत आहेय..नागरिकांनी या गंभीर दुर्लक्षावर तीव्र संताप व्यक्त केला आहेय..
नागरिकांनी प्रशासनाकडे रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण आणि नियमानुसार पूर्ण करण्याची मागणी केली असून तात्काळ पावले उचललेली नाही तर जन आंदोलन उभारण्याचा इशाराही काही नागरिकांनी दिला आहेय याप्रकरणी चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची ही मागणी सुद्धा होत आहेय.. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात रेती वाहतूक होणार असल्याचे लक्षात घेता निकृष्ट दर्जाचे मुरूम व अपूर्ण कामामुळे ट्रकच्या हालचालीमुळे रस्ता अधिकच खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे..यामुळे भविष्यात अपघात आणि वाहतूक ठप्प होण्याचे प्रसंग टळणार नाहीत, अशी भीती व्यक्त केली जाते, या गंभीर परिस्थितीकडे मुख्यमंत्री सडक योजना कार्यालयाचे आणि संबंधित अधिकाराचे लक्ष वेधले जात असून, कामाच्या दरम्यान एक बाजूला मार्ग खुला ठेवण्याची कायदेशीर व शासकीय जबाबदारी दुर्लक्षित करण्यात आली आहेय यामुळे नागरिकांच्या दैनंदिन कामकाज प्रभावित झाले असून जनतेत तीव्र नाराजी आहेय..
Byte : संदीप जळमकर, स्थानिक नागरिक.
Byte : नरेंद्र जामोदे, ग्रामस्थ..
0
Share
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowJul 11, 2025 09:07:14Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_KAMBAND तीन फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील कंत्राटी कामगारांचे काम बंद आंदोलन; कामकाज ठप्प, रुग्णांना त्रास
अँकर :– विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मागील चार महिन्याचे वेतन मिळालेले नाही. यामध्ये कक्ष सेवक, सापसफाई कामगार, लिप्ट कामगार, स्टोर कामगार, टेलिफोन ऑपरेटर या कामगारांचा समावेश आहे. त्यामुळे या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रहार कामगार संघटनेच्या वतीने शुक्रवारी कामबंद आंदोलन करण्यात आले. सक्षम फॅसिलिटी मुंबई दादर या कंत्राटदारा विरोधात यावेळी जोरदार नारेबाजी करण्यात आली. या आंदोलनातून दर महिना पेमेंट वेळेवर देण्यात यावे, वर्क ऑर्डर नुसार नमूद असलेले वेतन देण्या यावे, तीन वर्षातील बोनस व आतापर्यंतची पगारातील तफावत रक्कम मिळणे, पीएफ व एसआयसी च्या चलान नावसाहित चार वर्षाच्या सादर करण्यात यावा, शासनाच्या निर्णयानुसार डीए लागू झालेला तो कर्मचान्यांना द्यावा अशा विविध मागण्या या कामबंद आंदोलनातून करण्यात आली आहे.
4
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 11, 2025 09:04:40Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1107ZT_WSM_GAS_TRUCK_ACCIDENT
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर: वाशिमच्या अनसिंग येथील इंडियन गॅस एजन्सीकडे जाणारा रस्ता अरुंद असल्याने अपघाताची शक्यता सतत निर्माण होत आहे. आज या रस्त्यावर गॅस सिलिंडर वाहून नेणारे इंडियन गॅसचे वाहन पलटी झाले.सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र भविष्यातील धोका लक्षात घेता नागरिकांनी रस्त्याच्या त्वरित रुंदीकरणाची मागणी केली आहे.या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणावर वाहने, विशेषतः गॅस वाहतूक करणारी, ये-जा करतात.रस्ता अरुंद आणि खड्डे मय असल्यामुळे वाहनांना वळण घेणे कठीण जाते आणि त्यामुळे अशा प्रकारचे अपघात वारंवार घडतात.त्यामुळे प्रशासनाने याबाबत ठोस निर्णय घेऊन रस्त्याचे रुंदीकरण व डागडुजी करण्याची मागणी केली जातं आहे.
2
Share
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowJul 11, 2025 09:04:28Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_TREE_PLANT पाच फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
डॉ. आंबेडकर महाविद्यालयामध्ये सामाजिक पंधराव्या उपक्रम; एक झाड एक विद्यार्थी उपक्रमाने कार्यक्रमाला सुरुवात
अँकर :- माजी राज्यपाल दादासाहेब गवई यांच्या स्मृतिदिनानिमित्त तसेच डॉ. कमलताई गवई यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावती शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात सामाजिक उपक्रम पंधरवाडा हा राबवण्यात येतो आहे. आज एक झाड एक विद्यार्थी हा उपक्रम सुरू करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरामध्ये एक वृक्ष लावावे असे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या परिसरात बोधी वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांचं आयकार्ड देऊन विद्यार्थ्यांचे महाविद्यालय स्वागत करण्यात आले. यावेळी श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष कीर्ती अर्जुन यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करत वृक्षारोपणाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. याप्रसंगी विद्यार्थी शिक्षक आणि संस्थेचे संचालक उपस्थित होते
बाईट :- कीर्ती गवई, श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट अमरावती
1
Share
Report
PPPRANAV POLEKAR
FollowJul 11, 2025 09:01:48Ratnagiri, Maharashtra:
अँकर - रत्नागिरी नजीकच्या गणपतीपुळे मंदिरात ड्रेस कोड लागू केला जाणार आहे. त्यासाठी मंदिर कमिटी या संदर्भातील विचार करतेय. मंदिरात येणाऱ्या भाविकांनी तोकडे कपडे घालण्यावर बंदी घातली जाणार आहे. संस्कृती जपणारे कपडे घाला या संदर्भातील देखिल निर्णय़ लवकर अपेक्षित आहे. दरवर्षी लाखो भाविक गणपतीपुळ्यात गणरायाच्या चरणी लीन होण्यासाठी येत असतात. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक देवळात ड्रेसकोड लागू झालाय., आता या देवळा प्रमाणे आता गणपतीपुळे मंदिराची सुद्धा यात भर पडणार आहे. काल गणपतीपुळे मंदिर कमिटीची सायंकाळी बैठक झाली. यात ड्रेस कोडचा निर्णय अपेक्षित होता. मात्र या कमिटीच्या बैठकित याबाबतचा निर्णय होवू शकला नाही. त्यामुळे कमिटी या संदर्भात निर्णय़ घेण्यासाठी लवकरच आणखी एक बैठक घेणार आहे. ड्रेसकोड बाबात गणपती आधी निर्णय़ होण्याची शक्यता आहे.
1
Share
Report
LBLAILESH BARGAJE
FollowJul 11, 2025 08:34:37Pune, Maharashtra:
अहिल्यानगर
खासदार निलेश लंके यांचं उपोषण सुरू...
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं सुरू....
नगर-मनमाड महामार्गचे रखडलेले काम सुरू व्हावे यासाठी बेमुदत उपोषण.....
तिसऱ्यांदा टेंडर प्रक्रिया होऊनही काम सुरू न झाल्याने लंके यांचा उपोषण
सध्या या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून अक्षरशः रस्त्याची चाळण झाली आहे
13
Share
Report
SNSWATI NAIK
FollowJul 11, 2025 08:10:20Navi Mumbai, Maharashtra:
Story slug -पनवेल महापालिका शाळेतील प्रकार शौचालयात धुतात ताट
स्कुल मे टॉयलेट मे धोये जा रहे हे प्लेट
Ftp slug - nm panvel school
Shots-
Reporter- swati naik
Navi mumbai
Anchor - पनवेल महापालिकेच्या धाकटे खांदा कॉलनी येथील श्री गणेश मंदिर शाळा क्रमांक 6 येथील व्हेएडिओ व्हायर झाला आहे ,यात मध्यांनभोजन ची ताट मुलांकडून शौचालय धुताना चा व्हेएडिओ व्हायरल करण्यात आला याप्रकरणात म्हापलीक आयुक्त मंगेश चितळे यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे ,
12
Share
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 11, 2025 08:05:13Beed, Maharashtra:
बीड :भूमिहीन, दलित-आदिवासींसाठी आक्रोश मोर्चा; मालकी हक्क देण्याची मागणी
Anc : बीडच्या वडवणीत आझाद क्रांती सेनेच्या वतीने भूमीहीन, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक व शेतमजुरांच्या हक्कांसाठी तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. गायरान, वन जमीन व अतिक्रमणावर कायमस्वरूपी हक्क देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या मोर्चात हजारो गायरान धारकांनी हजेरी लावली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघालेला हा आक्रोश मोर्चा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून तहसील कार्यालयावर धडकला. शासनाने तत्काळ अंमलबजावणी केली नसल्यास आणखीन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिलाय.
6
Share
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 11, 2025 07:36:23Beed, Maharashtra:
बीड : पावसाने घेतली उसंत, खरिपाची पीके संकटात..!
Anc: मान्सूनपूर्व पावसावर विश्वास ठेवून बीडच्या शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. मात्र गत तीन आठवड्यापासून पावसाने पाठ फिरवली असल्याने खरिपाची पीके आता धोक्यात आली आहेत. मान्सूनपूर्व पावसाने अनेक पाणी प्रकल्प तुडुंब झाले आहेत त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्तास तरी मिटला आहे. परंतु जिल्ह्यातील शेती केवळ पावसावरच अवलंबून आहे. अनेक भागातील शेतीमधील ओलावा संपला आहे. अशात पाऊस झालाच नाही तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची दाट शक्यता आहे.
14
Share
Report