Back
जालना जिल्ह्यात पावसाने केली जोरदार हजेरी, काय आहे कारण?
NMNITESH MAHAJAN
Aug 11, 2025 02:16:27
Jalna, Maharashtra
FEED NAME : 1108ZT_JALNA_RAIN(1 FILE)
जालना : जिल्ह्यात पावसाची हजेरी,घनसावंगी, जाफ्राबाद,भोकरदन तालुक्यात पाऊस
अँकर : जालना जिल्ह्यात काल संध्याकाळच्या सुमारास भिज पावसानं हजेरी लावलीय.गेले तीन दिवस जिल्ह्यात पाऊस सुरू आहे.घनसावंगी तालुक्याबरोबरच जाफ्राबाद तालुक्यात देखील पावसानं हजेरी लावलीय.घनसावंगी तालुक्यातील राजेगाव, ढाकेफळ, चिंचोली, बोडखा, मांदळा, खडकावाडी भागात देखील जोरदार पाऊस झाला आहे
13
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowAug 11, 2025 04:47:16Pandharpur, Maharashtra:
पीक पाणी
11082025
Slug - PPR_CEREAL_CROP
file 02
------
Anchor - पंढरपूर तालुक्यात ऊसा सारखी नगदी पिके तसेच द्राक्ष डाळिंब केळी अशा फळबागांची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. एक बागायती तालुका म्हणून जिल्ह्यात याची ओळख आहे. वर्षभर काळजी घेऊन उत्पादन घेण्यापेक्षा आता कमी कालावधीची पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय. यामुळे पंढरपूर तालुक्यात यावर्षी प्रथमच साडेसहा हजार हेक्टर वर विविध कड धान्याची खरीप हंगामात लागवड झाली आहे. यात सर्वाधिक 2 हजार 400 एकरावर उडीद लागवड आहे. तीन महिन्यात येणारे पिक असून सध्या याला दर सुद्धा समाधानकारक आहे. कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारे पीक आहे. सोबत तूर, मूग, सोयाबीन ,भुईमूग लागवड सुद्धा वाढली आहे.
---
Wkt - सचिन कसबे पंढरपूर
3
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 11, 2025 04:32:22Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1108ZT_WSM_VEGETABLE_PRICE
रिपोर्टर: गणेश मोहळे, वाशीम
अँकर:वाशिम भाजीबाजारात लिलावा मध्ये शेतकऱ्यांचा कष्टाने पिकवलेला भाजीपाला कमी दराने विकला गेला.भेंडी, बटाटा, पानकोबी,शेवगा यांसह इतर भाजीपाल्याला किलोमागे केवळ १२ ते १५ रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नाराजी उमटली. पावसाचे अनिश्चित वातावरण,वाढता शेतीखर्च आणि बाजारातील आवक वाढ यामुळे शेतकऱ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. परिणामी,भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आर्थिक अडचणीची चिंता वाढली आहे.
5
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowAug 11, 2025 04:30:57Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_ACCIDENT तीन फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
अमरावती-मोर्शी मार्गावरील लेहगाव चौफुलीवर दोन वाहनांचा भीषण अपघात; पाच गंभीर जखमी
अँकर :– अमरावती-मोर्शी मार्गावर लेहगाव चौफुलीवर पहाटे दोन वाहनांचा भीषण अपघात झाला. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शिरखेड पोलीस ठाण्यापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर सकाळी चारच्या सुमारास घडला. नागपूर जिल्ह्यातील लोहारा येथून पर्यटनस्थळ चिखलदरा येथे जाणारी स्कॉर्पिओ आणि अमरावतीवरून मोर्शीकडे जाणारे मालवाहू पिकअप वाहन यांची लेहगाव चौकात समोरासमोर धडक झाली. मिळालेल्या माहितीनुसार, पिकअप वाहनचालकाने गतिरोधक टाळण्याच्या प्रयत्नात वाहन विरुद्ध दिशेला नेले यावेळी नेर पिंगळाईकडून चांदूर बाजारकडे जाणाऱ्या स्कॉर्पिओला जोरदार धडक बसली. अपघातानंतर दोन्ही वाहने पलटी झाली.
4
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 11, 2025 04:17:57Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळच्या पुसद तालुक्यातील वनवारला इथल्या कोंडेश्वर महादेव मंदिरात आज तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने बेलपत्र लाखोळी व अभिषेक करण्यासाठी महिलांनी रीघ लावली. येथे शिवलिंगावर एक लाख एक्कावन्न हजार बेलपत्र लाखोळी श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी वहिल्या जातात. अभिषेक व महाप्रसाद देखील होतो.
त्यासाठी पहाटेपासूनच भक्तिमय वातावरणात
हा धार्मिक सोहळा सुरू झाला आहे.
11
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowAug 11, 2025 04:17:44Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_BHATAKULI_RAIN पाच फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात जोरदार पाऊस; नदीला पूर आल्याने तुटला दगडागड गावाचा संपर्क
अँकर :– अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात कालपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे दगडागड गावातील नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. गावात 50 घरे असून 160 लोकवस्ती असलेल्या नागरिक मुख्य रस्त्यापासून दूर राहत असून गावात फक्त 160 लोक राहत असल्याने लोकप्रतिनिधीचे या गावाकडे दुर्लक्ष असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. गावात जाणाऱ्या नदीवरील पूल हा कमी उंचीचा असल्याने पुराचे पाणी वाढल्यावर गावाचा अनेकवेळा संपर्क तुटत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. गावात कुणी आजारी पडले उपचारासाठी गावाबाहेर कसे जावे असा प्रश्न गावातील नागरिकांसमोर उभा राहिला आहे.
7
Report
TTTUSHAR TAPASE
FollowAug 11, 2025 04:17:36Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
1 FILE
SLUG NAME -SAT_POLICE_KARVAI
सातारा शहरात कालपासून मंडळांच्या गणेश मूर्तींचे आगमन सुरू झाले आहे. रात्री उशिरा बुधवार पेठ येथील शिवतेज गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचे डॉल्बी आणि लेझर लाईट लावून मोठ्या दिमाखात आगमन झाले... या आगमना दरम्यान सातारा पोलिसांनी डॉल्बी आणि लेझर लाईट लावून नियमांचे उल्लंघन केल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे.जिल्ह्यातील ही पहिली कारवाई केली आहे.. पोलिसांनी यावेळी डॉल्बी सिस्टम सह लेझर लाईट जप्त केले आहेत
10
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowAug 11, 2025 04:16:01Dhule, Maharashtra:
ANCHOR - धुळे जिल्ह्यात गेल्या अडीच महिन्यांपासून समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकरी हवालदील झालेला आहे. तूरळक पावसाच्या भरोशावरत शेतकऱ्यांनी खरीप पिकांची लागवड केली. आता पाऊस नसल्यामुळे सर्वच खरीप पिकांची स्थिती बिकट आहे. सर्वाधिक दुरवस्था कापूस पिकाचे झालेले आहे. जिल्ह्यात दोन लाख हेक्टर पेक्षा अधिक कापूस लागवड करण्यात आलेले आहे. मात्र कापूस पिकाची वाढ आतापर्यंत अडीच ते तीन फुटापर्यंत होण अपेक्षित होत. तो कापूस अद्याप एक ते दीड फुटापर्यंतच वाढला आहे. पावसा अभावी पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे यावर्षी कापसाचे उत्पन्न मिळणार की नाही असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. पाऊस नसल्याने शेतकरी हवालदील झाले असून, या वर्षाचा खरीप हंगाम धोक्यात आला आहे. पावसाअभावी नदी नाले कोरडे असून, शेतकऱ्यांना पिकांना बाह्य सिंचन देखील देता येण अशक्य झाल आहे. त्यामुळे सरकारने याची दखल घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे
बाईट - अमोल पवार, शेतकरी
प्रशांत परदेशी धुळे.
9
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 11, 2025 04:15:55Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1108ZT_WSM_SHRI_PALKHI
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर : वाशिमच्या रिसोड तालुक्यातील बेलखेडा गावातून श्रावण महिन्यात भक्तिमय वातावरणात शेगावकडे जाणाऱ्या पायदळ दिंडीतील मानाची पालखीचं यंदा २७व्या वर्ष आहे.गावातील हनुमान मंदिराजवळ आरती करून आणि संपूर्ण गावाची प्रदक्षिणा घालून संत गजानन महाराजांच्या पालखीला पारंपरिक पद्धतीने प्रस्थान देण्यात आले.या मानाच्या पालखीत गावकऱ्यांचा अपार श्रद्धा व भक्तिभाव दिसून आला.यामध्ये केवळ बेलखेडाच नव्हे तर आजूबाजूच्या गावांमधील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले.यंदाच्या दिंडीत नवतरुणांचा उत्साह लक्षणीय होता. महिला व पुरुष भक्तांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून पालखीचे स्वागत केले.
10
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowAug 11, 2025 04:02:58Dhule, Maharashtra:
Anchor - धडगाव तालुक्यातील रस्ता नसल्यामुळे अनेक गरोदर महिलांना बांबूच्या झोळीतून प्राथमिक आरोग्य केंद्र पर्यंत पोहोचवण्याची वेळ येत आहे. परंतु प्राथमिक आरोग्य केंद्र लांब असल्याने गरोदर मातांना घेऊन जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे धडगाव तालुक्यातील राजबर्डी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात याव, अशी मागणी अशासेविका स्वयंसेविकांनी केली आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागात आरोग्याच्या अनेक समस्या आहेत. त्यात सर्वात मोठी समस्या म्हणजे रस्ता नसल्यामुळे गरोदर मातांना रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असते, प्राथमिक आरोग्य केंद्राची संख्या देखील कमी आहे. त्यामुळे तालुका रुग्णालयात जावा लागत असतं, परंतु जवळ प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. राजबर्डी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्यामुळे वेलखेडी आणि परिसरातील रुग्णांना मांडवी, तेलखेडी किंवा तालुका रुग्णालय येथे जावा लागत असतं, परंतु यासाठी खर्चही वाढत असतं, त्यामुळे रुग्णांकडे पैशांची मोठी अडचण होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने राजबर्डी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात यावा सातपुड्याच्या दुर्गम भागात गरोदर मातांसोबतच कुपोषित बालकांच्या देखील मोठा प्रश्न आहे. या बालकांना देखील नियमित तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राला घेऊन जावं लागत असतं, मात्र प्राथमिक केंद्र नसल्यामुळे इतर केंद्रांवर घेऊन जाण्याची वेळ आशाताईंवर येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र सोबतच उपकेंद्रावर येण्यासाठी देखील ५० किलोमीटर यावा लागत असतो, राजबर्डी प्राथमिक आरोग्य केंद्र झाला तर १५ ते १६ किलोमीटरच्या अंतर राहणार आहे. या प्राथमिक केंद्र मुळे जवळपास १५ गावांना याच्या फायदा होणार आहे. त्यामुळे शासनाने राजबर्डी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावा,
बाईट :- सुनीत पाडवी आशा सेविका
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
9
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowAug 11, 2025 04:01:12Dhule, Maharashtra:
Anchor - काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या वतीने आज निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेने गांधी परिवार काँग्रेसला नाकारला आहे. विरोधकांकडे आता कुठलाही मुद्दा कोरलेला नाही आहे. त्यामुळे खोटा मराठी पसरवण्याच्या काम केलं जात असल्याच्या टोला भाजपाचे प्रदेशसरचिटणीस विजय चौधरी यांनी लगावला, काँग्रेस आणि इंडिया घडीला लोकसभेत अपेक्षित यश मिळाला त्यामुळे निवडणूक आयोगावर कुठलाही अक्षय घेतला नाही, मात्र लोकांच्या लक्षात आलं की इंडिया आघाडी खोटे बोलून मत घेत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा आणि इतर राज्यांमध्ये जनता भाजपसोबत उभी राहिली, त्यामुळे निवडणूक आयोगावर आक्षप घेत आहे. खरंतर हे चुकीचे आहे यांच्या जागा आल्या तर आमच्यामुळे आम्ही निवडून आलो आणि यांच्या विरोधात मतदान केलं तर निवडणूक आयोगामुळे भारतीय जनता पार्टीला मत मिळालेत, अशा प्रकारची दुटप्पी भूमिका विरोधी पक्षाची आहे. त्यामुळे विरोधकांना कुठलाही काम उरलेला नाही आहे देशात नरेंद्र मोदी सरकार आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार यशस्वीपणे विकासाचे काम करत आहेत. त्यामुळे विरोधकांना हे सहन होत नाही आहे. त्यामुळे केविलवाना प्रयत्न केला जात आहे.
बाईट :- विजय चौधरी प्रदेश सरचिटणीस भाजप
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
7
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowAug 11, 2025 03:46:26Raigad, Maharashtra:
स्लग - स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विजयाची हंडी आम्हीच फोडणार ..... आमदार महेंद्र दळवी यांचा दावा ...... जिल्हा परिषद , पंचायत समिती, नगर पालिका निवडणुका जिंकणार ...... अलिबाग इथं गोविंदा पथकांचे सराव शिबिर .......
अँकर - आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका किंवा ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विजयाची हंडी आम्हीच फोडणार असा दावा अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केला. अलिबाग इथं साई क्रीडा मंडळ आयोजित गोविंदा पथकांच्या सराव शिबिरादरम्यान ते बोलत होते. दिलीप भोईर आणि मी एकत्र आल्याने आमची ताकद वाढली आहे. विरोधकांकडे केवळ आरोप करण्याचं काम उरल्याचं ते म्हणाले. विधान सभा निवडणुकीत दिलीप भोईर यांनी दळवी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती आता भोईर यांनी शिवसेनेत प्रवेश करून महेंद्र दळवी यांची साथ दिली आहे.
बाईट - महेंद्र दळवी
12
Report
PNPratap Naik1
FollowAug 11, 2025 03:34:20Kolhapur, Maharashtra:
Kop Mahalaxmi Murti Savardhan
Feed :- Live U
Anc :- साडेतीन शक्तीपीठा पैकी महत्त्वाचे पीठ असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मूर्तीवर आज आणि उद्या रासायनिक संवर्धन प्रक्रिया राबवली जाणार आहे. मूर्तीच्या अनेक भागांमध्ये झिज झाल्याने संवर्धन प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. काही दिवसापूर्वी भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी अंबाबाई देवीच्या मूर्तीचे परीक्षण केले होते, त्यामध्ये देवीचे नाक, होट, हनुवटी आणि इतर भाग जिझ झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर भारतीय पुरातत्व विभागाने आज आणि उद्या तातडीने संवर्धन प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विशेष संवर्धन तज्ञाकडून आजपासून दोन दिवस मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया राबवून मूर्तीचे संवर्धन केले जाणार आहे. पुरातत्व विभागाने यापूर्वीच संवर्धन प्रक्रिया दर दोन वर्षांनी राबवणं आवश्यक असल्याचे निरीक्षण नोंदवले होते त्याप्रमाणे ही संवर्धन प्रक्रिया राबवली जात आहे. दरम्यान ही संवर्धन प्रक्रिया होणार असल्याने देवीच्या मुख्यमूर्तीचे दर्शन भक्तांना होणार नाही, त्यामुळे देवस्थान समितीने उत्सव मूर्ती भक्तांच्या दर्शनासाठी ठेवणार आहे.. अवघ्या काही वेळेतच हि संवर्धन प्रक्रिया होणार असल्याने अनेक भक्तांनी सकाळीच अंबाबाई देवीच्या मुख्य मूर्तीचे दर्शन घेतले.
14
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 11, 2025 03:34:15Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
csn high court av
feed attached
ANCHOR : निवडणुकीत बनावट मतदारांच्या मुद्यावरून काँग्रेस आक्रमक झाली असतानाच, बीड जिल्ह्यातील आष्टी नगर पंचायत निवडणुकीत आढळून आलेल्या बोगस मतदारांवरून औरंगाबाद खंडपीठाने बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना १४ ऑगस्टपर्यंत शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहे. आष्टी येथे १ नोव्हेंबर २०२३ च्या प्रारूप यादीमध्ये जवळपास ५५० मतदारांची नावे बनावट असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते राम सूर्यभान खाडे, नदीम शेख व इतरांनी केल्या होत्या. त्यानुसार चौकशी झाली आणि बनावट मतदार असल्याचा अहवाल शासकीय पातळीवर तयार करण्यात आला. पण कोणतेही फौजदारी कारवाई झाली नसल्याने औरंगाबाद खंडपीठात फौजदारी याचिका दाखल करण्यात आलेली आहे. यावर झालेल्या सुनावणीवेळी १४ ऑगस्टपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी शपथपत्र दाखल केले नाही तर शासनाचे काही म्हणणे नाही, असे गृहीत धरून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. तर पुढील सुनावणी २६ ऑगस्ट रोजी ठेवली आहे.
14
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 11, 2025 03:34:02Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn water issue av
Feed attached
पावसाळ्याचे सव्वादोन महिने उलटले आहेत. या कालावधीत मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांत आज सरासरी ८० टक्के पाणीसाठा आहे. असे असले, तरी अपेक्षित मुसळधार पाऊस न पडल्याने विभागातील मध्यम आणि लघु प्रकल्पांत केवळ ४० टक्केच जलसाठा जमा झालेला आहे. मराठवाड्यात जायकवाडीसह ११ मोठे प्रकल्प आहेत. माजलगाव वगळता उर्वरित सर्वच प्रकल्पांत सरासरी ८० टक्के जलसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. मोठ्या प्रकल्पांत पुरेसा जलसाठा असला तरी मध्यम आणि लघु प्रकल्पांत मात्र अत्यल्प पाणी आहे. या प्रकल्पांवरच गावखेड्यांची तहान भागविण्यात येते. तसेच पशू, पक्ष्यांच्या चाऱ्या, पाण्याची सोय होत असते. यामुळे लघु आणि मध्यम भरावे ही अपेक्षा असते..
जालन्यातील ७ प्रकल्पांत २६ टक्के जलसाठा जमा आहे. बीड जिल्ह्यातील १६ धरणांत ६१ टक्के आणि लातूर जिल्ह्यातील ८ धरणांत १९ टक्के आणि धाराशिवमधील १७ प्रकल्पांत ५५ टक्के पाणी आहे. नांदेड जिल्ह्यात ९ मध्यम प्रकारची धरणे आहेत. यात आज ४५ टक्के पाणी जमा आहे. परभणी जिल्ह्यातील २ प्रकल्पांत ५४ टक्के जलसाठा आहे , छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 61 टक्के तर हिंगोलीत अवघा अठरा टक्के पाणीसाठा आहे...
14
Report
JJJAYESH JAGAD
FollowAug 11, 2025 03:32:09Akola, Maharashtra:
Anchor : अकोला जिल्ह्यातील गावंडगाव येथे एका २१ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलीय..दारूच्या नशेत या युवकाने आत्महत्या केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय..
Vo 1 : पातूर तालुक्यातील
गावंडगावात येथे एका २१ वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप करीत गावात तीव्र संतापाची लाट उसळली आहेय.. गावकरी, विशेषत: महिलांचा आरोप आहे की पोलिसांच्या छत्रछायेखाली अवैध दारू विक्री उघडपणे सुरू आहेय..गावात सहज दारू मिळते, आणि तक्रार करणाऱ्यांची नावेच विक्रेत्यांना सांगून त्यांना धमक्या व शिवीगाळ दिली जाते असा आरोप गावकऱ्यांनी केलाय..रुपेश ज्ञानदेव राठोडने (२१, रा. गावंडगाव, ता. पातूर, जि. अकोला) गावाच्या शेवटी असलेल्या घराजवळ साडीच्या दोऱ्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली..या युवकाच्या आत्महत्येनंतर पोलिस आणि दारू विक्रेतांवर गावकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय..
Byte : इंदुबाई जाधव , अंगणवाडी सेविका.
Byte : संतोष हिरामण राठोड , तंटामुक्ती अध्यक्ष
Vo 2 : ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि गावकऱ्यांनी अनेकदा पोलिसांकडे अवैध दारू बंद करण्यासाठी तक्रार केली मात्र दारूचा धंदा बंद झालाच नसल्याचं गावकऱ्यांच म्हणणं आहेय..मात्र पोलिसांनी ही आत्महत्या कर्जबाजारी आणि नैराश्यातून झाली असल्याचं म्हंटलंय..तर अवैध दारू विरुद्ध वेळोवेळी पोलिस कारवाई करत असल्याचंही पोलिसांच म्हणणं आहेय..
Byte : रवींद्र लांडे , चान्नी पोलीस
ठाणेदार..
Final Vo : अकोला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ‘मिशन उडान’ अंतर्गत व्यसनमुक्तीसाठी कारवाई सुरू आहेय , तरीमात्र या गावकऱ्यांच्या मते ग्रामीण भागात त्याचा कोणताही परिणाम दिसून येत नाही..या उलट ठाणेदारच या मिशनला सुरुंग लावत असल्याचा आरोप आता गावकरी करत आहेय..त्यामुळे पोलिस अधीक्षकांचा ' मिशन उडान ' ग्रामीण भागात ' उडान ' भरणार का हे पाहणे आता महत्वाचे राहणार आहेय.
जयेश जगड,
झी मीडिया,
अकोला
15
Report