Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Osmanabad413501

धाराशिव में मुसलधार बारिश रुक चुकी, पूर खतरा अभी भी बना

DPdnyaneshwar patange
Sept 28, 2025 13:08:38
Dharashiv (Osmanabad), Maharashtra
धाराशिव DHARA_MNJRA_FLOD धाराशिव जिल्ह्यात पाऊस थांबला – पूर मात्र कायम मांजरा नदी बारा तासांपासून धोक्याच्या पातळीवर Anchor: धाराशिव – दोन दिवसांच्या मुसळधार पावसाला आता विश्रांती मिळाली आहे. आकाशात ढग विरळले, पावसाचा जोर थांबला... मात्र पूरस्थिती मात्र अजूनही तशीच कायम आहे. मांजरा नदीला काल मध्यरात्रीपासून पूर आला असून तब्बल बारा तास उलटून गेले तरी नदी अजूनही पात्र सोडून वाहतेय. पाण्याचा विसर्ग कमी न झाल्याने नदीकाठच्या गावांना धोका कायम आहे. गावोगावच्या शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत, तर काही ठिकाणी घरे आणि रस्त्यांनाही पाण्याचा वेढा बसलाय. प्रशासनाने सतत परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे. या धोकादायक पूरस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांनी, मांजरा नदीच्या काठावरून. WKT
4
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
YKYOGESH KHARE
Sept 28, 2025 14:46:32
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Sept 28, 2025 14:16:17
Thane, Maharashtra:ब्रेकिंग... टिटवाळ्यातील मुख्य रस्ता पाण्याखालीच‌... रस्त्यावरील पाणी ओसरण्याच्या प्रतिक्षेत नागरिक... ॲंकर... दुपारी एक वाजल्यापासून टिटवाळा गणपती मंदिर ते रेल्वे स्थानक हा मुख्य रस्ता पाण्याखाली गेला आहे. काळू नदीला पूर आल्याने पूराचे पाणी या रस्त्यावर आले आहे. या रस्त्यावरील संपूर्ण वाहतूक दुपार पासून ठप्प झाली आहे. यामुळे लगतच्या ग्रामीण परिसरातील, टिटवाळा मंदिर व रेल्वे स्थानक परिसरातील नागरिक अडकून पडले आहेत. जवळ जवळ सहा तासांचा प्रदीर्घ काळ उलटून ही परिस्थिती जशीच्या तशी आहे. रस्त्यावरील पाणी अद्याप कमी झाले नसल्याने नागरीक पाणी कमी होण्याची वाट पहात आहेत. यामुळे गणपती मंदिर व रेल्वे स्थानक यि दोन्ही बाजूला नागरीक पाणी‌ ओसरण्याची वाट पाहत आहेत.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 28, 2025 14:00:54
Navi Mumbai, Maharashtra:Story slug-विमानतळला दि बा पाटील यांच नाव देण्यासाठी भूमीपुत्रांचा सहा ऑक्टोबर ला मोर्चा नवी मुंबई एअरपोर्ट को नाम देणे के लीये मोर्चा FTP slug - nm airport protest Shots - meeting Reporter- swati naik Navi mumbai Anchor - नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांच नाव देण्यात यावे यासाठी भूमिपुत्र आक्रमक असून सहा ऑक्टोबर ला लाखो भूमीपुत्र विमनतलावर मोर्चा काढणार आहेत, आठ ऑक्टोबर ला पतप्रधानच्या हस्ते करण्यात येणार आहे ,तरी देखील विमनतलाला नाव देण्यात आले नसल्याने , भूमीपुत्रांनी नाराजी व्यक्त केली आहे , तीन वर्षांपूर्वी अनेक आंदोलन केल्यानंतर राज्य सरकारने प्रस्ताव मंजूर करून केंद्रात पाठवला तरी देखील अंमलबजावणी होत नसल्याने भूमिपुत्र आक्रमक झाले असून ठाणे आणि रायगड मधून भूमिपुत्र या मोर्चात सहभागी होणार आहेत। बाईट- सुरेश म्हात्रे - खासदार --------------
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 28, 2025 13:47:02
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:Breaking Sng_sfot स्लग - आतिषबाजीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कवठेएकंदमध्ये शोभेच्या दारूचा स्फोट - सहा जण जखमी. अँकर - सांगलीच्या तासगाव तालुक्यातील कवठे एकंद येथे शोभेच्या दारूच्या स्फोट होऊन सहा जण जखमी झाल्याचा प्रकार घडला आहे. सांगलीच्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून जखमी पैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येतंय.गावातल्या एका गोडाऊनमध्ये शोभेच्या दारूचा मोठ्या प्रमाणात साठा होता,फटाके बनवण्याचं काम सुरू असताना हा स्फोट झाला आहे.आसपासचा परिसर हादरून गेला होता.या घटनेनंतर प्रशासनाने कवठेएकंद मध्ये धाव घेत पंचनामा देखील केला आहे. कवठेएकंद हे गाव शोभेची दारू आणि फटाके बनवण्यासाठी प्रसिद्ध असून दसऱ्याच्या निमित्ताने अतिषबाजीसाठी देखील कवठे एकंद गाव ओळखली जाते.त्या निमित्ताने शोभेच्या दारूची चाचणी घेत असताना हा स्फोट घडल्याने घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Sept 28, 2025 13:46:55
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Sept 28, 2025 13:33:11
Vasai-Virar, Maharashtra: Date-28sep2025 Rep-prathamesh tawade Loc-vasai Slug-VASAI NARAL Feed send by 2c Type-AV Slug- लोकल मधून समुद्रात निर्माल्य नारळ फेकला , ट्रॅक वरून चालणाऱ्या तरुणाच्या डोक्यात लागून दुर्दैवी मृत्यू नायगाव-भाईंदर खाडी पुलावरील घटना अँकर - वसईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धावत्या लोकलमधून निर्माल्य फेकताना नारळ तरुणाच्या डोक्याला लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. पाणजु बेटावर राहणारा संजय भोईर नावाचा हा तरुण नायगाव-भाईंदर खाडी पुलावरून पायी जात असताना हा अपघात झाला. नारळ डोक्यात लागल्याने गंभीर जखमी झालेल्या संजयला उपचारासाठी मुंबईच्या नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रविवारी त्याचा मृत्यू झाला. स्थानिकांच्या माहितीनुसार याआधीही अशा घटनांत अनेकजण जखमी झाले आहेत.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 28, 2025 13:32:13
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Sept 28, 2025 13:17:16
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 28, 2025 13:16:53
Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यातील रोहना येथील नागरिकांनी आज उमा नदीच्या तीरावर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या प्रमुख मागण्या म्हणजे पुनर्वसनाची अंमलबजावणी, तसेच उमा बॅरेज प्रकल्पातील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे. रोहना येथील गावकरी गेल्या १२ ते १३ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या उमा बॅरेज प्रकल्पामुळे त्रस्त झाले आहेत. प्रकल्प पूर्ण होण्याचे आश्वासन वारंवार दिले गेले, मात्र अद्याप काम अपूर्ण असून नागरिकांची फसवणूक झाल्याचा आरोप होत आहे. आमदार हरीश पिंपळे यांनी या प्रकल्पातील खर्चात झालेल्या प्रचंड वाढीवरून गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांच्यानुसार सुरुवातीला ९ कोटी रुपयांचा असलेला प्रकल्प खर्च तब्बल २७ कोटींपर्यंत वाढला आहे. तरीदेखील संबंधित अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. याशिवाय, प्रशासनाने रोहनवासियांना पुनर्वसनाच्या नावाखाली फसवले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.मागण्या पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषण सुरू राहणार असून, जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होईपर्यंत आंदोलन तीव्र केले जाईल असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.रोहनवासियांच्या या लढ्यामुळे उमा बॅरेज प्रकल्पातील कथित भ्रष्टाचार आणि प्रशासनाची भूमिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top