Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

जालना में गोदावरी बाढ़: 8 हजार लोग सुरक्षित ठिकानों पर पहुँचे

NMNITESH MAHAJAN
Sept 29, 2025 06:18:56
Jalna, Maharashtra
FEED NAME | 2909ZT_JALNA_MANGRUL(7 FILES) जालना : घनसावंगी तालुक्यातील मंगरूळ,शेवता येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले प्रशासनाकडून नागरीकांना हलवण्यात आले गावात शिरले गोदावरी नदीचे पाणी अँकर : जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील मंगरूळ,शेवता येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.या गावात गोदावरी नदीचं वणी शिरल्यानं गावकऱ्यांना प्रशासनाकडून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.दरम्यान अंबड,घनसावंगी ,परतूर तालुक्यातील 10 हजार नागरीकांना रात्री सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आलं होतं.मात्र आता गोदावरी नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्याने स्थलांतरीत करण्यात आलेल्या 8 हजार नागरीकांचा पुन्हा मूळ ठिकाणी परतीचा प्रवास सुरु करण्यात आला आहे बाईट : आशिमा मित्तल,जिल्हाधिकारी,जालना
2
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Sept 29, 2025 08:02:20
Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यातील पारस या छोट्याशा गावाने धार्मिक क्षेत्रात एक मोठी ओळख निर्माण केली आहे. पारस येथील गणेश लांडे यांनी आपल्या गावात महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे हुबेहू मंदिर उभारले आहे. या मंदिराच्या दर्शनाला आल्यानंतर भाविकांना जणू तुळजापूर गाठल्याचा अनुभव येतो. Vo 1 : गणेश लांडे यांच्या आईची तुळजाभवानी मातेचा मंदिर उभारण्याची अनेक वर्षांची इच्छा होती त्यांची ही इच्छा त्यांचे पुत्र गणेश लांडे यांनी पूर्ण करत तुळजाभवानी मातेचा मंदिर उभारला.पारस येथील या भव्य मंदिराची उभारणी अत्यंत बारकाईने करण्यात आली असून तुळजापूर येथील मूळ मंदिराच्या आराखड्याचा अभ्यास करून त्याच धर्तीवर शिल्पकला व वास्तुरचना करण्यात आली आहे. देवीची ही मूर्ती बालाजी हून आणण्यात आली आहे, मंदिराचा कळस , देवीचा मुकुट आणि मंदिराच्या गाभाऱ्यात असलेला स्तंभ सोन्याचा आहे.मंदिरातील गर्भगृह, शिखर, नक्षीकाम आणि सभामंडप पाहताना भाविकांना खरी तुळजापूर यात्रा केल्याची अनुभूती मिळते.पारस गावात हे मंदिर उभारल्यामुळे जिल्ह्यासह राज्यभरातील भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः वृद्ध, महिला आणि लहान मुलांना आता दूरवरचा प्रवास न करता तुळजाभवानीचे दर्शन घेण्याची संधी मिळते आहे. Byte : शिवानी लांडे , भाविक Vo 2 : मंदिरात दररोज सकाळ-संध्याकाळ आरतीसोबत नित्य पूजाअर्चा केली जाते.नवरात्रोत्सव, चैत्र पौर्णिमा आणि विशेष धार्मिक उत्सवांमध्ये येथे भाविकांची मोठी गर्दी उसळते. यामुळे पारस गाव हळूहळू धार्मिक पर्यटन केंद्र म्हणूनही नावारूपाला येत आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि भक्तांनी या मंदिराच्या निर्मितीबद्दल अपार आनंद व्यक्त केला आहे. गावातच तुळजापूरच्या तुळजाभवानीचे दर्शन घडत असल्याने गावकऱ्यांना देखील खूप समाधान वाटते.पारस येथे उभारलेले हे तुळजाभवानीचे मंदिर अकोला जिल्ह्यासाठी अभिमानाचे केंद्र बनले असून पुढील काळात येथे भाविकांचा ओघ वाढणार हे निश्चित आहे. आता या ठिकाणी राजकीय नेत्यांची वर्दळ वाढली आहे शेतकऱ्यांवरील संकट दूर करण्याची प्रार्थना देवीला बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी केली आहे. Byte : नितीन देशमुख , आमदार. Final Vo : आईच्या डोळ्यांत तुळजाभवानीचे मंदिर उभारण्याचे स्वप्न होतं…ती अपूर्ण इच्छा पुत्र गणेश लांडे यांनी पूर्णत्वास नेली आहे. आईच्या श्रद्धेला आकार देत मुलाने उभारलेलं हे मंदिर फक्त भक्तीचं नव्हे, तर आई–मुलाच्या नात्याच्या अतूट प्रेमाचं प्रतीक ठरत आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 29, 2025 08:02:08
Washim, Maharashtra:वाशिम: File2:2909ZT_WSM_GORBANJARA_MORCHA WSM_GORBANJARA_MORCHA121 रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर: राज्य शासनाने हैदराबाद गॅझेटच्या आधारे अधिसूचना काढून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा केला.ओबीसी आरक्षणाची दारे खुली झाल्यानंतर आता याच गॅझेटला आधार मानून राज्यातील गोरबंजारा समाजालाही अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणात समाविष्ट करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.या मागणीसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गोरबंजारा समाजाने मोठ्या प्रमाणावर मोर्चे काढण्यात येतं आहेत.त्याच पार्श्वभूमीवर आज वाशिममध्ये कृषीउत्पन्न बाजार समितीपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा गोरबंजारा समाजाकडून मोर्चा काढला काढण्यात आला आहे यावेळी मोठ्या संख्येने गोरबंजारा बांधव सहभागी झाले असून या मोर्चाद्वारे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे.याच बाबतचा मोर्चेकऱ्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी..
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 29, 2025 08:01:37
Chakan, Maharashtra:Feed What''''s Up Slug: Chakan Ajit Pawar Rep: Hemant Chapude(Chakan) अजित पवार बाईट * *ऑन जिल्हाधिकारी, पालिका बैठक* संत तुकाराम महाराजांचे राहते घर होतं, तिथं जुना टच ठेऊन वास्तू उभारायची आहे. पिंपरी पालिकेत एमआयडीसी भागात विविध समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्याअनुषंगाने बैठक झाली. प्रदूषण, वीज, रस्ते, पाणी अशा प्रश्नांवर चर्चा झाली. पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीसह अनेक नद्यांचे पात्र कमी केले जातायेत. यामुळं पुरजन्य परिस्थिती निर्माण होते. हा मुद्दा पर्यावरणवाद्यांनी विरोध केलाय. आता नदीच्या पुण्याच्या बाजूचा ठेकेदार अन पिंपरीच्या बाजूचा ठेकेदार वेगळा आहे. त्यात तोडगा काढला जातोय. आत्ता राज्यातील अनेक नद्यांना पूर आला, प्रचंड नुकसान झालं. ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न निर्माण झालाय. परतीच्या पाऊस ही मोठा असेल असं म्हटलं जातंय. हे पाहता भविष्यात काय करायला हवं, याबाबत महत्वाचे मुद्दे मांडण्यात आलेत. * *ऑन कॅबिनेट बैठक* सर्व मंत्र्यांनी दौरे केलेत. शेतकऱ्यांचा रोष, नाराजी, राग, विरोध पाहायला मिळाला. जेंव्हा घरदार उध्वस्त होतं, शेतीचं प्रचंड नुकसान होतं, जमीन वाहून जाते, तेंव्हा साहजिक अशा प्रतिक्रिया उमटतात. पण आम्ही या शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल, त्याअनुषंगाने निर्णय घ्यायचं ठरवलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीचा दौरा केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींना झालेल्या नुकसानीची माहिती दिलीये, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी अशी मागणी केलेली आहे. यासाठी विविध विभागांची मदत लागणार आहे. सरकार याबाबत उद्याच्या बैठकीत निर्णय घेईल. * *ऑन ओला दुष्काळ जाहीर करणार का?* मुख्यमंत्री आणि सरकार म्हणून आम्ही सांगितलं आहे. शेतकऱ्यांना असं काही द्यावं लागणार आहे. जेणेकरून सरकार त्यांच्या पाठीशी आहे. असं वाटायला हवं. * *दिवाळीपर्यंत बळीराजाला या संकटातून बाहेर काढण्याचे नियोजन आहे.* * *ऑन आत्ता तातडीची मदत* आत्ता तातडीची 5000 रुपये, अन्न-धान्य, कपडे, निवारा अशी मदत केली जातीये. * *ऑन चाकण वाहतूक कोंडी कधी फुटणार?* पाऊस थांबल्यावर डांबरीकरणाचे काम सुरू होईल. तूर्तास चाकण परिसरातील अतिक्रमण हटवले जातायेत. आपल्याला जे साध्य करायचं आहे, ते पाऊस थांबल्यावर करता येईल. चालू पावसात जी कामं करता येतील तेवढी सध्या कामं करतोय. * *ऑन लाडकी बहीण ई-केवायसी* बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो, तिथल्या महिलांनी ई-केवायसी केलेले आहेत. आता आपल्याला योग्य लाभार्थ्यांना ही रक्कम द्यायची आहे. बऱ्याच महिलांनी चुकीच्या पद्धतीने पैसे घेतलेत, सरकारचा पैसा आहे. तो चुकीच्या पद्धतीने कोणी घेऊ नये, म्हणून ई-केवायसी गरजेची आहे. * *ऑन उद्धव ठाकरे दसरा मेळावा* मला याबाबत काही बोलायचं नाही, प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते प्रगल्भ आहेत. त्यांनी त्यांच्या सद्सद्विवेक बुद्धीला पटेल तो निर्णय घ्यावा. * *ऑन एशिया कप विजयी* यश मिळवल्यानंतर प्रत्येक भारतीयांना आनंद वाटतो, त्यामुळं भारतीयांना शुभेच्छा. ऑपरेशन सिंधुर नंतर एक वर्ग भारताने पाकिस्तान विरुद्ध खेळावं तर दुसरा वर्ग खेळायला नको म्हणत होता. शेवटी आता या सगळ्या गोष्टी झाल्यात आणि या गोष्टी संपलेल्या आहेत. * *ऑन शेतकरी मदतीत कोणते निकष* कॅबिनेट बैठकीत आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ. * *ऑन बच्चू कडू आरोप* मला काही बोलायचं नाही, मी काय बोललो तर तुम्ही लगेच बच्चू कडू कडे जाणार. मुळात आज शेतकरी संकटात आहे, त्यांना कशी मदत करता येईल, याकडे लक्ष द्यायचं हवं. * *ऑन संजय राऊत दिल्ली विरोधात बंड* प्रश्न संपत आले की तुम्ही हा असा बोलला आणि तो तसा बोलला असे प्रश्न विचारता. ज्याचं त्याला लखलाभ, मला कामं करायची आहेत, मी कामं करत राहतो. Byte: अजित पवार (उपमुख्यमंत्री प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया चाकण पुणे...
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 29, 2025 08:01:20
Chandrapur, Maharashtra:Feed slug:-- 2909ZT_CHP_THIEVES_CAUGHT ( Single file sent on 2C) टायटल:--चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस शहरात एटीएम कापून 11 लाख रुपये चोरी प्रकरणातील टोळीचा पर्दाफाश, राजस्थानचा 1 आरोपी अटकेत अँकर:---चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या एटीएम कटींग प्रकरणातील आरोपींपैकी एकाला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. १५ सप्टेंबर रोजी रात्री पो स्टे घुग्घुस अंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएममधून गॅस कटरच्या साहाय्याने 11 लाख चोरी करण्यात आले होते. या प्रकरणी घुग्घुस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकांनी १३ दिवसात सुमारे ९०० ते १००० सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींना शोधून काढला. त्यातून राजस्थानातील भरतपूर जिल्ह्यातील जिल्ली सिरदार खान (वय ५२ वर्ष) याला चिन्नूर, जिल्हा मंचेरियाल (तेलंगणा) येथून ताब्यात घेण्यात आले.या प्रकरणातील इतर 3 आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 29, 2025 07:55:58
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 29, 2025 07:48:30
Nagpur, Maharashtra:Ngp Bawankule Byte 121 live u ने फीड पाठवले ------------------------ ( नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातही अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्याचा मोठा फटका फळबाग, पिकांना बसला आहे.... संत्रा अनेक ठिकाणी गळून पडला आहे.... त्याची पाहणी करण्याकरता नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दाढेरा आणि तिडंगा या गावात जाऊन पाणी केली आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या... त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान याची नागपूर जिल्ह्यातील आणि राज्यातील परिस्थिती बाबत आणि सरकार मदतीच्या दृष्टीने कोणते पाऊल उचलत आहे याबाबत माहिती प्रसिद्धी माध्यमांना दिली ) ( चंद्रशेखर बावनकुळे यांचा 121ही केला आहे ) नागपूर चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री. - पाऊस मोठ्या प्रमाणात झाला, नागपुरात 60, हजार हेक्टर पिकाच नुकसान झालं. सोयाबीन,कपास,संत्रा हे सर्वच पीक उद्धवस्त झालेल आहे. शेतकऱ्यांचा संपूर्ण संत्रा झाड उलमडून पडले आहे...शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी. यासाठी प्रयत्न करत आहे पण नुकसान फार मोठ झाला आहे. - संत्राचे बगीचे उध्वस्त झालेले आहे...सोयाबीन पिकाचे नुकसान झाल.. शेतात काही शिल्लक राहिलेलं नाही. शेतकरी आज संकटात सापडलेला आहे. राज्यात संपूर्ण पंचनामे लक्ष ठेवून आहे. रोज पंचनाम्याचे आकडे घेत आहे. * *ऑगस्ट महिन्यात 25 लक्ष हेक्टर तर सप्टेंबरमध्ये 22 लक्ष हेक्टरवर पंचनामे झाले आहे... सुमारे 50 लाख हेक्टरवर नुकसान झालं आहे...* - पुढील महिन्यात चार पाच तारखेपर्यंत अंदाज येईल... पुढील चार-पाच दिवसात एकूण किती नुकसान झालं, किती जनावर वाहून गेले, घर, जनावर, वेगवेगळा पंचनामा करावा लागतोय... महसुल विभागाने पंचनामे करत ग्राम्ससभेने दाखवले गेले पाहिजे, जेणेकरून कोणीही वंचित राहू नये. On जिल्हाधिकारी सूचना - * *जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांना सूचना दिलेल्या आहे. कुठल्याही शेतकरी पिक विमा पासून वंचित राहू नये.... नियमावर बोट ठेवून न चालता, काही नुकसान हे नैसर्गिक आहे कारण बांधावरचे पूर्णतः जमीन ही खरडून निघालेली आहे बरोबर आहे.* - फिल्डवर आमचे अधिकारी राहील तरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल, आपापल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत बसून सर्व तलाठी, महसुली अधिकारी ग्रामविकास अधिकारी फिल्डवर जाऊन प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जात आहे... खरं नुकसान शेतकऱ्यांपर्यंत आलं पाहिजे. * *सरकारकडे जर आकडे चुकीचे आले, तर शेतकऱ्यांचे नुकसान होईल. * *बांधावर गेलेच पाहिजे. पण दौऱ्यामुळे संपूर्ण यंत्रणा शेतकरी हवालदील.... असं होऊ नये किंवा होऊ देणार नाही.* On निधी दिवाळी पूर्वी - * *NDRF निकषाप्रमाणे केंद्र सरकार मदत करत आहे. पाच तारखेपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट झाल्यावर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महत्त्वाचे नेते बसून जास्तीची मदत शेतकऱ्यांना दिली पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे सरकार त्याचा योग्य विचार करणार आहे...* - * *दिवाळीपूर्वी मदत करणे सुद्धा शक्य आहे. कारण मायनस अकाउंट मध्ये सुद्धा पैसे देता येतात. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कुठली भूमिका घ्यावी लागली तरी देवेंद्र फडणवीस सरकारची भूमिका घेईल. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत कशी होईल यासाठी प्रयत्न केले जाणार आहे शेतकऱ्यांना मजबूत केल्याशिवाय राज्य विकासाकडे जाऊ शकत नाही.* - * *संपूर्ण पंचनामे चार पाच तारखेपर्यंत होईल. एकंदरीत राज्याचा आढावा घेऊन *संपूर्ण नुकसान भरपाई करिता, यात घर, जनावर हे सगळे आकडेवारी आल्यावत चीत्र स्पष्ट होईल...त्यासाठी किती खर्च येईल किती नुकसान भरपाई द्यावी लागेल सरकारवर किती बोजा येईल याचा सगळ्या अभ्यास करून निर्णय होईल.* - * *सप्टेंबर महिन्यात 22 लक्ष पंचनामे आले आहेत. निकषानुसार आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात जे अश्रू आहे..हे सरकार पाठीशी असेल.* (on केशव उपाध्ये- ठाकरे दसरा मेळावा) - शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी आलो, यात माधव भंडारी यांच्या विषयावर आता बोलणार नाही.. - * *जमाबंदी आयुक्त कामी लागले, इ पंचनामे करत आहे. संपूर्ण महसुल अधिकरी यांना आदेश दिले आहे.. यादी ग्रामपंचायतला दाखवा असे आदेश दिले आहे..* - आकडेवारी आल्यावर नुकसानीचा आढावा घेऊन राज्याचा विचार करेल. (On हर्षवर्धन सपकाळ) - * *हर्षवर्धन सपकाळ मुख्यमंत्र्यासह पंतप्रधान यांना भेटायला गेले होते का? असा उपहासात्मक टोला बावनकुळे यांनी सपकाळ यांना लगावला.. मुख्यमंत्री पंतप्रधान यांच्याशी बोलत असताना तिथे यांनी काही व्यक्ती ठेवला होता का? केवळ शेतकऱ्यांची काहीतरी थट्टा करण्याचं काम करत आहे... राजकीय बाबी सोडून शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहण गरजेचे आहे....शेतकऱ्यांवर जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा सर्वांनी पाठीशी रहाणे गरजेचे आहे. पॉलिटिकल आखाडे नंतर करता येईल... राजकारणाच्या गोष्टी करून काही फायदा नाही.* On क्लायमेट बदलले - पडणाऱ्या पावसाचे नियोजन करण्याची गरज आहे. नदीजोड प्रकल्प प्रमाणे संपूर्ण जिल्ह्याचे नाले हे जोडले गेले पाहिजे... येणारा पाऊस नाल्यांना वितरित झाला पाहिजे... जेणेकरून पूर परिस्थिती शहरात निर्माण होणार नाही वॉटर grid करून त्या जिल्ह्याचा पाणी नियोजन झाल पाहिजे. VNIT सर्व्हे - संपूर्ण शहराचा नव्या पद्धतीने जल निसारण मल निसारण पुनर्विलोकन होणे आवश्यक आहे. प्रत्येक शहरात आज अशी परिस्थिती आहे...एका तासात दोनशे मिलिमीटर पाऊस पडला तर पूर्ण शहर पाण्याखाली जातं.. अनेक भागात पाण्याची खाली गेलेली आहे. त्यासाठी वॉटर मॅनेजमेंट झालं पाहिजे याचा विचार करण्याची गरज आहे. On कर्जमाफी मागणी - शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने कर्जमाफी झाली पाहिजे किंवा गरज असणारे शेतकरी शोधण्यासाठी समिती काम करत आहे... काही शेतकऱ्यांच्या शेतात फार्म हाऊस आहे. अकृषक शेतीवर रहिवासी शेतीवर कर्ज आहे. खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होण्यासाठी सर्वेक्षण झालं पाहिजे तो यातून वगळला जाऊ नये. ज्यांनी फार्म हाऊस बांधले... काही जमिनीवर लेआउट पडलेले आहे ते जमिन अकृषक दाखवलेली आहे... निश्चित आकडा दाखवण्यासाठी ही समिती पूर्ण रिपोर्ट देणार आहे आणि मगच कर्जमाफीचा निर्णय होईल. - * *संपूर्ण राज्यभरात वेगवेगळ्या भागांमध्ये शेतकरी अडचणी सापडलेला आहे.... महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आहे...पन्नास वर्षात झालं नाही एवढं नुकसान यावर्षी झालेला आहे.... नुकसानीतुन शेतकऱ्यांना बाहेर काढायचा आहे...चार प्रोजेक्ट नाही झाले तरी चालतील, शेतकऱ्याने नुकसान भरपाईतून बाहेर काढलं गेलं पाहीजे...* -
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Sept 29, 2025 07:46:32
Shirdi, Maharashtra:Anc_ अहिल्यानगर जिल्ह्यातून वाहणा-या गोदावरी नदिला पूर आल्याने नदिकाठचे अनेक नागरीक पुराच्या पाण्यात अडकल्याच्या घटना घडल्या आहेत..नेवासा तालुक्यातील जुने भालगाव येथे गोदावरी नदिच्या पाण्याचा विळखा बसला असुन प्रशासन आणी ग्रामस्थांच्या मदतीने एकोनपन्नास जनांना सुखरुप बाहेर काढले आहे.. रात्री सुरू झालेली मोहीम आजही सुरू होती बोटीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढलेल्या नागरीकांची गावातील जिल्हा परीषद शाळेत तात्पूरती व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर भालगाव येथील बानगंगा ओढ्याला आलेल्या पुरामुळे साठ ते सत्तर लोकसंखेच्या लोकवस्तीलाही पाण्याचा विळखा बसला असुन त्यांचा संपर्क तुटलेला आहे. त्यांनाही बाहेर काढण्यासाठी आपत्कालीन व्यवस्था काम करत आहे..
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 29, 2025 07:34:00
Beed, Maharashtra:बीड : हिंगणीतील 13 शेतकऱ्यांना पुराच्या पाण्यातून वाचवण्यात यश, एनडीआरएफ च्या पथकाने रेस्क्यू करून लोकांना काढले बाहेर ड्रोन दृश्य : शरद गर्जे Anc : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात जोरदार पावसामुळे सिना, मेहकरी आणि कांबळी नद्यांना पूर आला असून हिंगणी गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातला होता. या पूरस्थितीत गावातील 13 शेतकरी नदीच्या पाण्यात अडकले होते. मात्र तात्काळ कारवाई करत एनडीआरएफच्या पथकाने धाडसी बचाव मोहिम राबवत या सर्व शेतकऱ्यांना सुखरूप बाहेर काढले आहे. ड्रोनद्वारे घेतलेल्या दृश्यांमध्ये या बचाव मोहिमेचे थरारक चित्रण दिसून येत आहे. पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार सुरेश धस यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून प्रशासनाने या भागातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी मदतकार्य सुरू आहे. बाईट : सुरेश धस, आमदार
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 29, 2025 07:31:18
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 29, 2025 06:48:02
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Sept 29, 2025 06:47:44
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top