Back
मुंबईतील मराठा आंदोलनासाठी कोल्हापुरातून खाद्यपदार्थ पाठवले जात आहेत!
PNPratap Naik1
Sept 01, 2025 07:32:42
Kolhapur, Maharashtra
Kop Maratha Andolan WT
Feed:- Live U
Anc:- मुंबईमध्ये आंदोलन करणाऱ्या मराठा बांधवांना खाण्याची कमतरता भासू नये यासाठी कोल्हापुरातून देखील सर्व मराठा संघटनाच्या वतीने एकत्रित मुंबईला खाद्यपदार्थ पाठवले जात आहेत. कोल्हापुरातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.
Play WT
2
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 01, 2025 09:47:55Raigad, Maharashtra:
स्लग - रायगडात गौरी पूजन उत्साहात .......
अँकर - रायगड जिल्ह्यात आज गौरी पूजन उत्साहात पार पडले. बांबूच्या सुपामध्ये विविध वाण साहित्य तसेच पत्री, फूले, फळे ठेवून गौराईची ओटी भरण्यात आली. ही सुपे जवळच्या नातेवाईकांना भेट देण्यात आली. यंदा पूर्वा नक्षत्रावर गौरी पूजन आल्याने नव विवाहितांचे ओवसे पार पडले. महिलांनी गौरीचे पूजन करून आरती म्हटली. तिला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवण्यात आला.
0
Report
KJKunal Jamdade
FollowSept 01, 2025 09:47:48Shirdi, Maharashtra:
Anc - मनोज जरांगे यांची प्रकृती चांगली रहावी आणि मराठा आरक्षणाचा तिढा सुटावा यासाठी शिर्डीतील मराठा बांधवांनी साईबाबा चरणी साकडं घातलं आहे.. जरांगे यांची प्रतिमा साई समाधीवर ठेवत मराठा बांधवांनी मुंबईतील आंदोलकांसाठी प्रार्थना केली आहे..राज्यभरातील मराठा बांधव मनोज जरांगे यांना विविध माध्यमातून पाठिंबा देत आहेत.. शिर्डीतील मराठा बांधवांनी साई चरणी साकडं घालत जरांगे यांची प्रकृती चांगली रहावी यासाठी प्रार्थना केली.. यासह शिर्डी नगरपरिषेदेसमोर आज एकदिवसाचे लाक्षणिक उपोषण करत आरक्षणाचा तिढा लवकर सुटावा आणि आंदोलक मराठे सुखरूप घरी परतावेत अशी प्रार्थना करण्यात आली.या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
Wkt/tiktak kunal jamdade
0
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 01, 2025 09:21:13Washim, Maharashtra:
वाशिम :
File:0109ZT_WSM_CONGRESS_ANDOLAN
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:वाशिम शहरातून जाणाऱ्या अकोला -नांदेड महामार्गाचे नूतनीकरणाचे काम सध्या सुरू आहे.मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वी या महामार्गाचे चौपदरीकरण होईल असे आश्वासन दिले होते.परंतु सध्या या रस्त्याचे फक्त दुपदरीकरण सुरू असून यामुळे जनतेत नाराजी व्यक्त होत आहे.या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आज वाशिम शहरातील वसंतराव नाईक चौकात रास्ता रोको आंदोलन केले. शहर पोलिस ठाण्याजवळ झालेल्या या आंदोलनातून भाजप सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.आंदोलकांनी महामार्गाचे काम दर्जेदार करण्याची आणि वाशिम शहरातून जाणाऱ्या या महामार्गाचे चौपदरीकरण तातडीने करण्याची मागणी केली.
0
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 01, 2025 09:15:20Ratnagiri, Maharashtra:
मंत्री नितेश राणे पॉइंटर्स
कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी, कामांसाठी वैभव खेडेकर भेटत होते
पक्षासाठी दिवस रात्र एक करतो, पण ज्यांच्यासाठी आपण करतो त्यांनी आपणाला साथ द्यावी अशी अपेक्षा प्रत्येकाची असते
त्यांच्याबरोबर जे घडलं ते त्यांनाही कदाचित अपेक्षित नव्हतं
अतिशय प्रामाणिकपणे ते पक्षाचे काम करत होते
ते पत्र त्यांना मिळाल्यावर मी त्यांना फोन करून आम्ही बरोबर आहोत हे सांगितलं
भाजपमध्ये येण्याचा विचार करावा हे मी सांगितलं
प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब यांच्याशीही याबाबत बोललो
त्यांची आणि चव्हाण साहेबांची भेट झाली
वैभव खेडेकर 4 सप्टेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार - नितेश राणे यांची माहिती
मुंबईत नरिमन पॉईंट कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होईल
जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार
मंत्री नितेश राणे
भाजपचा एक कार्यकर्ता म्हणून प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेबांचा संदेश घेउन मी इथे आलो आहे
4 तारखेला अधिकृत भाजपमध्ये स्वागत करणार
On स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक
जे चेहरे येताहेत ते त्या भागाचे नेतृत्व करताहेत
तर निश्चितपणे याचा फायदा आम्हाला होईल
अजून रांग फार मोठी आहे, येणाऱ्या काळात अनेकजण भाजपमध्ये येतील
खेडेकर यांच्यावर निश्चितपणे टाकली जाईल
वैभवजिना योग्य पद्धतीने ताकद देऊ
प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा अधिकार
On आंदोल
उपसमिती गठीत आहे
मराठा आरक्षण 10 टक्के कोणी घालवलं
यांनी आरक्षण घालवलं, हे सर्व पापी आहेत
हे करणारे कोण आहेत हे शोधलं पाहिजे
आंदोलनाला कोणाचं बळ आहे यासाठी एक पत्रकार परिषद घेऊ
फडणवीस साहेबाचं नाव घेतल्याशिवाय हे पुढे जाऊच शकत नाही, विरोधकांवर हल्लाबोल
ज्या झाडाला फळे लागतात त्याच झाडावर दगड मारले जातात
सर्व परिस्थितीवर लक्ष आहे
कायदा सुव्यवस्था बिघडवू देणार आहे
*पोलिस आंदोलक वेशात जाताहेत.. जरांगे वक्तव्यावर प्रत्युत्तर*
पोलिसांवर एवढा अविश्वास दाखवू नका
ते नितेश राणेवर टीका करणारच
कालपासून दाढीवाले भेटताहेत
अब्बाला खुश करायचं आहे त्यामुळे मला शिव्या ते देणारच
मी हिंदुत्वचं काम करतो त्यामुळे त्यांना खुश करण्यासाठी मला शिव्या ते देणारच
त्यांच्या बरोबर जे आता व्यासपीठावर बसायला येताहेत, ते जिहादी मानसिकतेचे, ते कसं चालतं आता
गोमूत्र शिंपडलं पाहिजे व्यासपीठावर
कोकणात काही प्रॉब्लेम नाही
आम्ही सर्व इथे गुण्यागोविंदाने राहतो
नितेश राणे
आंदोलन उग्र होण्याची वेळ येणार नाही
On रो रो
थोडा पाऊस जाऊदे रो रो सुरू होईल
0
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 01, 2025 08:51:41Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_DOG_BYTE एक फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
अमरावती शहरासह जिल्ह्यात मोकाट श्वानांच्या झुंडीमुळे वाहनधारकांमध्ये मोठी दहशत; सात महिन्यात तब्बल 15 हजारांवर नागरिकांना घेतला चावा
अँकर :– अमरावती शहरासह जिल्ह्यात मोकाट श्वानांच्या झुंडीमुळे वाहनधारकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली असून सात महिन्यात तब्बल 15 हजारांवर नागरिकांना श्वानांनी चावा घेतल्याची आरोग्य विभागाची माहिती असून अमरावती शहरात चौका चौकात मोकाट श्वानांची दहशत पाहायला मिळत आहे. अनेक श्वान दुचाकी स्वारांवर झडप घेत असल्याचे प्रकार समोर महानगरपालिकेने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
1
Report
AKAMAR KANE
FollowSept 01, 2025 08:50:57kolhapur, Maharashtra:
Ngp Mudhoji raje Byte
live u ने फीड पाठवले
----------
नागपूर--- मुधोजीराजे भोसले बाईट
Ngp Mudhojiraje byte
(मुंबईत आंदोलन)
--मोठ्या संख्येने आंदोलन आंदोलनासाठी गोळा झाले, तर ज्या ठिकाणी आंदोलन होत आहे, त्या भागातील लोकांना काही त्रास होणे स्वाभाविक आहे.. त्यामुळे आंदोलनासंदर्भात लवकर तोडगा काढणे आवश्यक असते..
मराठा म्हणूनच आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते टिकाऊ असल पाहिजे.. कोणाकडून आरक्षण काढून मराठ्यांना आरक्षण न देता, मराठ्यांसाठी विशेष प्रवर्ग निर्माण करून आरक्षण दिलं पाहिजे..
--आंदोलनात गेलेल्या तरुणांनी शांततेने आंदोलन केलं पाहिजे.. आंदोलनाची एकी कायम राहिली पाहिजे.. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण आजच्या स्थितीमध्ये तर शक्य नाही..
--आंदोलन पुढे वाढत जाताना मागण्यांमध्ये काहीच अंतर होत जातो.. ज्यांच्याकडे कुणबी मराठा म्हणून दस्तावेज आहे, त्यांना सरकार ओबीसी मध्ये घेण्यास तयार आहे, त्यांना घेतलेच(गेले पाहिजे) पाहिजे.. मात्र ज्यांच्याकडे दस्तावेज नाही, त्यांना ओबीसी मध्ये घेणे शक्य नाही.. त्यामुळे मराठ्यांना वेगळं स्वतंत्र आरक्षण देणंच योग्य राहील..
आरक्षण संपलं तर सर्वांसाठी चांगलं होईल.. आज मराठा मागत आहे उद्या ब्राह्मण ही आरक्षणाची मागणी करतील.. मुळात आरक्षण दहा वर्षासाठी लागू झालं होतं.. फक्त राजकीय पुढाऱ्यांमुळे तो कायम राहिलं आहे.. आरक्षण सरसकट रद्द झालं, तर हुशार विद्यार्थ्यांना संधी मिळेल, मग तो कुठल्याही समाजाचाच असो.. आरक्षणाची भानगड संपली पाहिजे असं मला वाटते...
2
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 01, 2025 08:46:02Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव:
DHARA_R2_HELP
डीजेमुक्त गणेश मिरवणुकीचा संकल्प करत गणेश मंडळाकडून मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मदत रवाना
धाराशिच्या कळंब मधील मोहा येथील स्वराज गणेश मंडळाकडून मदत, सर्व जाती-धर्माच्या लोकांकडून वर्गणी
मुंबईत ताज जेवण बनवून आंदोलकांना देणार, गावाकडून नेलेली भाजी भाकरी खराब होईल म्हणून निर्णय
Anc: मुंबईत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्व सुरू असलेल्या मराठा आंदोलकांना राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. धाराशिवच्या कळंब मधील मोहा गावातील स्वराज गणेश मंडळाने डीजे मुक्त मिरवणूक काढायचा संकल्प करत मदत मुंबईकडे रवाना केली. गावातील अठरापगड जातीतील लोकांनी मदतीचा हात दिला. राज्यभर अनेक गावातून भाकरी आणि भाजी बनवून मुंबईकडे रवाना होत आहे. मात्र मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या भाकरी खराब होऊ शकतात म्हणून मुंबईतच जेवण बनवून देण्याचा निर्णय करत मोहा येथील तरुण मुंबईकडे रवाना झाले.
Byt: मदत घेऊन गेलेलं तरुण
4
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 01, 2025 08:19:01Jalna, Maharashtra:
FEED NAME : 0109ZT_JALNA_OBC_UPOSHAN(6 FILES)
जालना | ब्रेकिंग
अंतरवाली सराटीत ओबीसींच्या उपोषणाला सुरुवात
अंतरवाली सराटीच्या सोनिया नगरमध्ये ओबीसींचं उपोषण सुरु
मनोज जरांगे यांच्या झुंडशाहीविरोधात आंदोलन
जरांगेंच्या झुंडशाहीला बळी पडून सरकारने ओबीसींवर नांगर फिरु नये
ओबीसी कार्यकर्ते बाबासाहेब बटुळे, विठ्ठल तळेकर, बाळासाहेब दखने आणि श्रीहरी निर्मळ यांचं उपोषण सुरु
अँकर : अंतरवाली सराटीत ओबीसींच्या उपोषण आंदोलनाला सुरुवात झालीये.. अंतरवाली सराटीच्या सोनियानगरमध्ये हे आंदोलन सुरु झालंय.. ओबीसी कार्यकर्ते बाबासाहेब बटुळे, विठ्ठल तळेकर, बाळासाहेब दखने आणि श्रीहरी निर्मळ उपोषणाला बसले आहेत.. मनोज जरांगे यांच्या झुंडशाहीला बळी पडून सरकारनं ओबीसींवर नांगर फिरु नये, वाटप झालेले बोगस दाखले रद्द करण्यात यावेत, त्याचबरोबर सरकारनं केलेला मराठा समाजाचा मागास अहवालही बोगस असून त्याचं पुन्हा सर्वेक्षण करावे अशा मागण्यांसाठी अंतरवाली सराटीत ओबीसी बांधवांनी उपोषण सुरु केलंय..
बाईट- विठ्ठल तळेकर, ओबीसी आंदोलक
बाईट- बाबासाहेब बटुळे, ओबीसी आंदोलक (टोपी घातलेले)
बाईट- बाळासाहेब दखने, ओबीसी आंदोलक(हिरवा शर्ट असलेले)
1
Report
SNSWATI NAIK
FollowSept 01, 2025 08:05:49Navi Mumbai, Maharashtra:
story slug - वाशी रेल्वे स्थानक wkt
वाशी रेल्वे स्टेशन पर मराठा आंदोलक
FTP slug - nm vashi railway wkt
byet- wkt
shots -
reporter- swati naik
navi mumbai
नवी मुंबई ब्रेकिंग
मराठा आंदोलकांची वाशी रेल्वे स्थानकावर केली गर्दी.
मराठा आंदोलकांची मुंबईकडे जाण्यासाठी मोठी गर्दी
मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईकडे करत आहेत कूच.
रेल रोको आंदोलन करण्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलीस वाशी रेल्वे स्टेशनवर मोठ्या संख्येने तैनात.
बाईट - wkt
2
Report
AKAMAR KANE
FollowSept 01, 2025 08:05:36kolhapur, Maharashtra:
Ngp Illusion ganesh
live u ने फीड पाठवले
---------
नागपूरात तर आभासी जग (illiusion )तयार करून त्याच्यात बाप्पा विराजमान झालेय... प्रताप नगर येथील बाल गणेशोत्सव मंडळाने इल्युजन(illusion) या थीमवर देखावा तयार केलाय.. या मंडाळाने केलेल्या संपूर्ण देखावा एक भ्रमजाळ असल्याची अनुभूती येतेय... महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण देखावा स्वतः गणेश मंडळाच्या सदस्यांनी स्वतःच्या संकल्पनेतून आणि मेहनतीतून साकारला आहे.... या आभासी जगतात बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर भक्तगणपण अचंबित होऊन जात आहे..
तिथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी
-----
बाईट ---सारंग कदम, बाल गणेशोत्सव मंडळ प्रताप नगर
1
Report
AKAMAR KANE
FollowSept 01, 2025 07:49:55kolhapur, Maharashtra:
Ngp Bjp congrss
( एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांसोबत बाईट )
Ngp Congres
( अभिजीत वंजारी आणि विकास ठाकरे यांचे बाईट)
Ngp Khopade Vanjari
( भाजपा आमदार कृष्णा खोपडे आणि काँग्रेस आमदार अभिजीत वंजारी यांचे बाईट )
वरील slug ने सर्व फीड पाठवले आहे
-----------------
ऐन गणेशोत्सवामध्ये आज भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आले... पूर्व नागपूर भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांच्या निवासस्थानासमोर भाजपा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकमेकांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली... यावेळी पोलिसांचाही मोठा ताफा तैनात करण्यात आला होता..
काल काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांच्या कार्यालयावर फलकावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी काळे फासल्याचा आरोप करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.. तसेच निषेध नोंदवण्यासाठी काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे, आमदार अभिजीत वंजारी, गिरीश पांडव यासह अनेक कार्यकर्ते कृष्णा खोपडे यांच्या निवासस्थाना जवळ येऊन आंदोलन करत घोषणाबाजी करू लागले ... त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी ही घोषणाबाजी करत त्यांना उत्तर दिले त्यामुळे काही काळाकरता तणाव निर्माण झाला होता. दोन्ही कार्यकर्ते अन्य सामने येता-येता राहिले... पोलिसांनी परिस्थिती हाताळत दोन्ही कार्यकर्त्यांचा समजूत घालत परिस्थिती नियंत्रणात आणली
अभिजित वंजारी हे विधान परिषदच्या नागपूर पदवीधर मतदार संघाचे आमदार आहे. त्याचे नागपूरच्या वर्धमान नगर भागात 2020 पासून जनसंपर्क कार्यालय आहे.या कार्यालयाच्या पाटीवर आमदार अभिजित वंजारी यांचे जनसंपर्क कार्यालय, पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्र असा उल्लेख आहे. त्याला भाजप कार्यकर्त्यांचा आक्षेप होता.
त्यातून भाजप कार्यकर्त्यांनी काळ फसल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.
-----
बाईट --- आमचे प्रतिनिधी अमर करणे यांनी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी करताय त्यावेळेचा wkt
-----------*
बाईट
--- काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि आमदार अभिजीत वंजारी यांच्यासोबत चा वन टू वन
------
बाईट
आमदार कृष्णा खोपडे, भाजपा नेते
आमदार अभिजीत वंजारी, काँग्रेस नेते
4
Report
SNSWATI NAIK
FollowSept 01, 2025 07:33:19Navi Mumbai, Maharashtra:
story slug - वाशी टोल नाक्यावर वाहतूक कोंडी wkt
FTP slug - nm traffic
byet- wkt
shots-
reporter - swati naik
navi mumbai
नवी मुंबई ब्रेकिंग
वाशी टोलनाक्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी.
मुंबईला जाणाऱ्या लेनवर झालेय वाहतूक कोंडी.
वाशी टोल नाक्याजवळ दोन ते तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा.
मुंबईला निघालेल्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका.
वर्किंग डे असल्याने मोठ्यासंखेने वाहने मुंबईकडे निघाली.
Wkt
1
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 01, 2025 07:33:06Hingoli, Maharashtra:
अँकर - मनोज जरांगे पाटील मागील चार दिवसांपासून आझाद मैदानावर ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण द्यावे यामागणीसाठी आमरण उपोषणाला बसले आहेत,त्यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत, त्यांना अन्न पाणी मिळत नसल्याने हिंगोलीच्या सेनगाव येथील मराठा बांधवांनी दहा क्विंटल पुरी ठेचा मुंबईकडे रवाना केलाय, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात मराठा बांधव आंदोलनासाठी मुंबईत गेले आहेत. त्यांची गैरसोय होत असल्याने सेनगाव येथील मराठा बांधवांनी एकत्रित येत आंदोलन करणाऱ्या मराठा बांधवांसाठी जेवणाची सोय केली आहे.
3
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 01, 2025 07:32:54Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0109ZT_CHP_SHIVBHOJAN
( single file sent on 2C)
टायटल:-- अखेर गरीबाच्या तोंडचा घास हिरावलाच, थकीत अनुदानाने त्रस्त शिवभोजन केंद्र संचालकांनी बंद केले केंद्र, चंद्रपूर शहरातील अत्यंत वर्दळीच्या बसस्टँड समोरील मयूर स्नॅक्स केंद्र बंद
अँकर:-- राज्य सरकारच्या अनास्थेमुळे अखेर गरिबांच्या तोंडचा घास हिरावण्याची सुरुवात झालीच. राज्यातील दहा रुपयात पोटभर अन्न मिळणारी शिवभोजन योजना आता अखेरचा श्वास मोजत आहे. गेली काही महिने शिवभोजन केंद्रांचे अनुदान रखडले आहे. आताच नव्हे तर याआधीही अनेक वेळा शिवभोजन केंद्रांचे अनुदान रखडले होते. मात्र कच्चामाल आणण्यासाठी लागणारा पैसा भोजन केंद्र संचालक कसातरी ढकलून नेत होते. चंद्रपूरच्या वर्दळीच्या बस स्टॅन्ड चौकातील मयूर स्नॅक्स नावाच्या शिवभोजन केंद्र संचालकांनी मात्र आज पासून हे शिवभोजन केंद्र तात्पुरते बंद करत असल्याची सूचनाच लावली आहे. तशा आशयाचे स्व-शपथ पत्र त्यांनी राज्याच्या अन्न नागरी पुरवठा विभागाला पाठविले आहे. सातत्याने होणारी आर्थिक कुचंबणा आणि त्यातून निर्माण होणारे आर्थिक अरिष्ट यावर मार्ग काढण्यासाठी सर्व उपाय खुंटल्याचे सांगत हे केंद्र बंद करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र यामुळे शहरातील गरिबांच्या पोटाला मिळणारा घास बंद झालाय. लाभार्थ्यांनी ही योजना तातडीने सुरू व्हावी अशी मागणी केली असून केंद्र संचालकांनी मात्र आर्थिक बाबींविषयी हाताबलता व्यक्त केली आहे.
बाईट १) त्रस्त लाभार्थी
बाईट २) कैलास चव्हाण, केंद्र संचालक
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
1
Report