Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

नाशिकमध्ये पूराचा धोका: गोदावरी नदीचा जलस्तर वाढत आहे!

VKVISHAL KAROLE
Jul 08, 2025 03:01:19
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn flood warning av काही शॉट्स जोडले आहेत काही नाशिक च्या पुराचे वापरा नाशिक जिल्ह्यात संततधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. नांदूर मधमेश्वर पिकअप वेअर धरणातून ४३,८८२ क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. हे है पाणी कायगाव येथे ३८,००० क्युसेक वेगाने जायकवाडीत पोहोचत आहे.  त्यामुळं खबरदारी म्हणून गोदाकाठच्या गंगापूर तालुक्यातील २० गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे., दारणा समूहातील धरणांसह गंगापूर, होळकर पूल, पालखेड, पुणेगाव, भावले, भाम, भोजापूर, वालदेवी, आळंदी, कश्यपी, मुकणे, कडवा आणि करंजवण धरणातून पाणी नांदूर मधमेश्वर धरणात जमा होत आहे. या सर्व धरणांमधून येणारे पाणी गोदावरीत सोडले जात असल्याने नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास पाण्याचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुराच्या वाढत्या पाण्याचा धोका लक्षात घेऊन तहसील प्रशासनाने सोमवारी सायंकाळी प्रसिद्धिपत्रक काढले. त्यात गंगापूर तालुक्यातील नेवरगाव, हैबतपूर, कानडगाव, बगडी, ममदापूर, जामगाव, कायगाव, अमळनेर ते सावखेड्यापर्यंतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 55 टक्क्यांवर पोहोचला आहे....
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top