Back
दारूब्रे गावात पावसामुळे भात लागवड जोरात, शेतकऱ्यांचा आनंद!
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowJul 08, 2025 07:03:28
Pune, Maharashtra
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File name : 0807ZT_MAVAL_PIKPANI
Total files : 02
Headline -समाधानकारक पावसाने दारूब्रे गावात भात लागवड जोरात
Anchor:
मावळ तालुक्यातील दारूब्रे गावात भात लागवड मोठ्या प्रमाणात शेतकरी करत आहे. सध्या पाऊस ही पोषक पडत असल्याने भात लागवडीना वेग आला आहे. दारूब्रे येथील शेतकरी रामदास सोरटे यांनी कृषि अधिकारी विकास गोसावी यांच्या मार्गदर्शना खाली इंद्रायणी वाणाच्या भाताची दोन एकर क्षेत्रात चारसूत्री पद्धतीने लागवड केली. या पद्धती मध्ये रोपे कमी लागत असून लावणीला वेळ ही कमी लागतो. उत्पादनात दुप्पट वाढ होऊन आर्थिक फायदा होतो. पवन मावळ भागातील इंद्रायणी भात चवीला चांगला असल्याने या भाताला मुबई, पुणे, पिंपरी-चिंचवड बाजारपेठेत ग्राहकांची मागणी जास्त असते.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowJul 08, 2025 10:07:30Kalyan, Maharashtra:
मानपाडा पोलिसांची मोठी कारवाई...
डोंबिवली निळजे परिसरातील एका हाय प्रोफाईल कॉम्प्लेक्स मध्ये एम ड्रग्स विकण्यासाठी येत असल्याची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी आरोपली सापळा रचून आरोपलीला केली अटक
डोंबिवली खोणी पळावा मध्ये काही दिवसापूर्वी एका फ्लॅट मधील जवळपास दोन कोटीचे एमडी ड्रग्स केले होते जप्त
काल देखिल निळजे परिसरात एक आफ्रिकेन नागरिक एम डी ड्रग्स विकण्या करात येणार असल्याची पोलीसना माहिती.
आठवडाभरात ४ कोटीपेक्षा जास्त किमतीचे एमडी जप्त
याप्रकरणी एका आफ्रिकन देशातील नागरिकाला अटक करून पंधराशे ग्राम असे दोन कोटीचे एम डी ड्रग्स केले हस्तगत.
आरोपीचे नाव इशा बकायोका
कल्याण परिमंडल तीन पोलिसांनी एका आठवड्यात दोनदा कारवाई करून चार कोटीचे एम ड्रग्स हस्तगत
दोन कारवाई मध्ये पाच आरोपींना अटक
नक्की ड्रग्स कोण पुरवतोय आणि कोणाला पुरवला जातोय याचा पोलीस तपास सुरू
बाईट अतुल झेंडे. डीसीपी कल्याण परिमंडल 3
14
Share
Report
NMNITESH MAHAJAN
FollowJul 08, 2025 10:05:21Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0807ZT_JALNA_PKG_AC(28 FILES)
जालना :एसीच्या व्यसनापोटी महापालिका अधिकाऱ्यांचा महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला,सामाजिक कार्यकर्त्यांकडून कारवाईची मागणी
अधिकाऱ्यांना कोर्टात खेचण्याचाही ईशारा
जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांकडेही केली अधिकाऱ्यांची तक्रार
(PKG)
अँकर : जालना महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी एसीच्या हव्यासापोटी महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारल्याच माहिती अधिकारातून समोर आलंय.त्यामुळे अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी दंड थोपटत अधिकाऱ्यांना कोर्टात खेचण्याचा ईशारा दिलाय.जालना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी काय प्रताप केलाय त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट
व्हिओ :०१: एसीच्या हव्यासापोटी जालना महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी थेट महानगरपालिकेच्या तिजोरीवरच 4 लाख 7 हजारांचा डल्ला मारलाय.जालना महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त,मुख्य लेखा अधिकारी,मुख्य लेखा परीक्षक,महापालिका सहाय्यक आयुक्त या 5 जणांच्या दालनात 5 एसी बसवलेत.विशेष म्हणजे राज्य सरकारनं अधिकाऱ्यांना त्यांच्या दालनात एसी बसवण्याबाबत राज्य सरकारने काढलेल्या आदेशातील नियमांचं महापालिकेतील सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उल्लंघन केल्यानं या अधिकाऱ्यांविरोधात सामाजिक कार्यकर्त्यानी दंड थोपटलेत.
बाईट :साद बिन मुबारक, सामाजिक कार्यकर्ते
ग्राफिक्स व्हिओ:2:राज्य सरकारनं 25 मे 2022 रोजी अधिकाऱ्यांनी त्यांच्या दालनात एसी बसवण्याबाबत एक अध्यादेश काढत एसी बसवण्याबाबत अधिकाऱ्यांसाठी नियम ठरवून दिलेत.या नियमानुसार ज्या अधिकाऱ्यांचा पगार 7 व्या वेतन आयोगानुसार 1 लाख 44 हजार 200 ते 2 लाख 18 हजार 200 रुपयांदरम्यान किंवा यापेक्षा अधिक आहे तेच अधिकारी त्यांच्या दालनात एसी बसवू शकतात.पण एवढा पगार असणारा जालना महानगरपालिकेत एकही अधिकारी नसल्याचं एका माहिती अधिकारात समोर आलंय.शिवाय 5 एसी बसवण्यासाठी आलेला 4 लाख 7 हजारांचा खर्च अधिकाऱ्यांनी महापालिकेच्याच तिजोरीतून खर्च केल्याचंही माहिती अधिकारातून उघड झालं.महापालिका राखणाऱ्या अधिकाऱ्यांनीच नियम बाह्य काम केल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि एसीच्या खर्चासह वीजबिलाचा खर्च अधिकाऱ्यांकडूनच वसूल करावा अन्यथा अधिकाऱ्यांना कोर्टात खेचण्याचा ईशारा सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक यांनी दिलाय
बाईट : साद बिन मुबारक,सामाजिक कार्यकर्ते
व्हिओ:३: आधीच जालना महापालिकेची कर वसुलीबाबत दयनीय अवस्था आहेत.त्यात अधिकाऱ्यांनाच एसीची हवेचे व्यसन लागल्यानं या अधिकाऱ्यांच्या एसीच्या व्यसनापासून रोखणार कोण असा प्रश्न निर्माण झालाय
END P 2C -नितेश महाजन,प्रतिनिधी, जालना
14
Share
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJul 08, 2025 09:36:59Yavatmal, Maharashtra:
AVB
Anchor : केंद्रात भाजप, राज्यात भाजप आणि जिकडे तिकडे भाजपचाच प्रचार होत आहे, घरावरही भाजपचे झेंडे त्यामुळे शेतच कशाला शिल्लक ठेवता, तसंही शेती पेरून काही फायदा नाही असे सांगत प्रहार चे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सातबारा कोरा या पदयात्रेदरम्यान एका नापिक शेतात भाजपचे झेंडे रोवले, शेतीत लागवड खर्च अधिक आणि शेतमालाला भाव कमी असे चित्र असल्यामुळे आता भाजपचे झेंडे शेतात लावले आहे, त्याला कमळ लागले तर ते भाजपवाल्यांनी घेऊन जावे असा उपहासात्मक टोला बच्चू कडू यांनी लगावला.
बाईट : बच्चू कडू
0
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 08, 2025 09:07:46Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - तासगावच्या गव्हाण मध्ये शक्तिपीठ महामार्गाची मोजणी शेतकऱ्यांनी रोखली, सरकार विरोधात निदर्शन करत शक्तिपीठ रद्दची मागणी..
अँकर - सांगलीमध्ये शक्तिपीठ विरोधात आंदोलन करण्यात येत आहे तासगाव तालुक्यातल्या गव्हाण येथे शेतकरी व शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीने एकत्रित येत शक्तीपीठ महामार्गासाठी करण्यात येणारी मोजणी रोखली आहे.सांगली जिल्ह्यामध्ये नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी मोजणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे,मात्र याला ठिकठिकाणी शेतकऱ्यांकडून विरोध करण्यात येत आहे.तासगाव तालुक्यातील गव्हाण येथे प्रशासनाकडून मोजणी करण्याची प्रक्रिया आज राबवण्यात येत होती.पण शेतकऱ्यांनी याला तीव्र विरोध केला आहे,सकाळपासून शेतकरयांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे,अशी भूमिका घेत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येत आहे.
0
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 08, 2025 09:07:39Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0807ZT_WSM_VEGETABLES_PRICES
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर:वाशिम जिल्ह्यात सलग सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.सततच्या ओलाव्यामुळे टोमॅटो, कोबी,भेंडी,गवार,वांगी,पालख,मेथी यांसारख्या भाजीपाला पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.परिणामी, बाजारात भाज्यांची आवक कमी झाली असून, दरात मोठी वाढ झाली आहे.सध्या टोमॅटो, भेंडीसह इतर भाज्यांचे दर प्रतिकिलो १०० ते १५० रुपयांपर्यंत गेले आहेत. दरवर्षी जुलै महिन्यात भाजीपाल्याची आवक वाढत असते, मात्र यंदा पावसामुळे परिस्थिती उलट झाली आहे. दरवाढीमुळे गृहिणींना घरगुती खर्चाचे बजेट सांभाळताना कसरत करावी लागत आहे.
0
Share
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 08, 2025 09:07:25Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 0807_BHA_AMBULANCE
FILE - 2 VIDEO
भंडारा जिल्ह्यातील तामसवाडी परिसरात रुग्णवाहिका अडकली चिखलमय रस्त्यात.....
Anchor :- भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात असलेल्या तामसवाडी येथे एका गर्भवती महिलेला रुग्णालयात नेण्याकरिता येणारी ॲम्बुलन्सच चिखलात अडकली. अखेर महिलेलाच गावातून रुग्णवाहिकेपर्यंत पायदळ चिखल तुडवत रस्ता पार करावा लागला. दरम्यान ट्रॅक्टरच्या मदतीने फसलेल्या रुग्णवाहिकेला बाहेर काढत महिलेला सदर रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णालयात पाठवण्यात आले. चिखलमय रस्त्यामुळे दोन जीवांवर जीवन मरणाचा प्रश्न उद्भवल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय.
0
Share
Report
KJKunal Jamdade
FollowJul 08, 2025 08:04:11Shirdi, Maharashtra:
Shirdi News Flash
श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी "ब्रेक दर्शन" सेवा बंद राहणार...
९ ते ११ जुलैच्या कालावधीत साई संस्थानकडून गुरुपौर्णिमा उत्सवाचा आयोजन...
सर्वसामान्य साईभक्तांना दर्शनासाठी व्हीआयपींचा कुठलाही अडथळा होऊ नये यासाठी साई संस्थांनकडून करण्यात आली होती ब्रेक दर्शन व्यवस्था...
गुरु पौर्णिमा उत्सवानिमित्त साई भक्तांची आणि व्हीआयपींची गर्दी लक्षात घेता ब्रेक दर्शन व्यवस्था असणार बंद...
साई संस्थान प्रशासनाची माध्यमांना माहिती...
0
Share
Report
PPPRANAV POLEKAR
FollowJul 08, 2025 08:01:59Ratnagiri, Maharashtra:
अविनाश जाधव याला अटक केल्याप्रकरणी
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सन्माननीय अविनाश जाधव यांनी आज मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र, महाराष्ट्र सरकारने या मोर्चाला परवानगी नाकारत दडपशाहीचे धोरण अवलंबले. सरकारची ही भूमिका मराठीविरोधी असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.
मनसेचे मुख्य प्रवक्ते प्रकाश महाजन आणि राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त करत, सकाळी अविनाश जाधव यांना ३ वाजता अटक केल्याचा निषेध केला. हा प्रकार म्हणजे अघोषित आणीबाणी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या घटनेविरोधात आज मनसे कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. तसेच या संदर्भात घोषणा देत खेड तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले असून, अविनाश जाधव यांची तत्काळ सुटका करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
प्रकाश महाजन
वैभव खेडेकर
0
Share
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowJul 08, 2025 07:32:17Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File name : 0807ZT_MAVAL_KASARSAI_WKT
Total files : 04
Headline : कासारसाई धरणातून 1220 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू
Anchor:
मावळ आणि मुळशी तालुक्यातील दहा गावांतील शेतकऱ्यांना सिंचनासाठी आणि पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या कासारसाई धरणातील पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणीसाठा 87 टक्क्यावर आला आहे. कासारसाई धरण परिसरात पावसाचा जोर वाढला असून असाच पावसाचा जोर कायम राहिला तर धरण शंभर टक्क्यावर लवकरच जाईल असा अंदाज कासारसाई धरण प्रशासनाने व्यक्त केला असून सध्या कासारसाई धरणाच्या सांडव्यावरून 1220 क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा कासारसाई पाटबंधारे विभागाने दिलाय याच धरणावरून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी...
Wkt Chaitralli (file no.04)
0
Share
Report
VKVISHAL KAROLE
FollowJul 08, 2025 07:31:23Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
छत्रपती संभाजीनगर
महानगरपालिकेकडून भर पावसात अतिक्रमण कारवाई सुरू
आज जळगाव महामार्गावरील हर्सूल टी पॉइंट ते सिडको कारवाईला वेग
16 जेसीबी, 4 पोकलेन, 15 टिप्परसह पोलीस दंगा काबू पथक यांच्या कडेकोट बंदोबस्तात अतिक्रमण कारवाई सुरू
मागील पंधरा दिवसापासून शहरात महानगरपालिकेकडून अतिक्रमणविरोधात धडक मोहीम..
अनेक दशकानंतर जळगाव महामार्ग घेणार मोकळा श्वास
0
Share
Report
KJKunal Jamdade
FollowJul 08, 2025 07:02:26Shirdi, Maharashtra:
Anc - उद्यापासुन शिर्डी साई मंदिरातील तिन दिवसीय गुरूपोर्णिमा उत्सवाला सुरूवात होणार असुन उत्सवाच्या पार्श्वभुमीवर साईबाबा संस्थानने जय्यत तयारी केलीय...मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई तसेच फुलांची सजावट करण्याच काम अंतिम टप्प्यात असुन उत्सवाच्या दरम्यान विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.पावसाची शक्यता लक्षात घेता ठिकठिकाणी मंडप उभारण्यात आले आहेत...साईबाबांना गुरूस्वरूप मानून लाखो साईभक्त गुरूपोर्णिमा उत्सवात साईदर्शनासाठी येत असतात. गुरु पौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी साईमंदिर रात्रभर खुले राहणार आहे... साई मंदिर परिसरातून गुरु पूर्णिमा उत्सवाच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनीधी कुणाल जमदाडे यांनी..
wkt - कुणाल जमदाडे शिर्डी
0
Share
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 08, 2025 07:00:58Pandharpur, Maharashtra:
08972025
Slug - PPR_MUKTAI_MAULI
feed on 2c
file 02
-----
Anchor - आषाढीच्या पर्वकाळात आज पंढरपूरमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याकडून संत मुक्ताईला साडी चोळीचा आहेर भेट देण्यात आला. ज्ञानेश्वर महाराजांकडून देण्यात आलेली साडी संत मुक्ताई यांना दिवाळीच्या भाऊबीजेला परिधान केली जाते. माऊली आणि मुक्ताई यांची पंढरपुरातच भेट होत असते. त्यामुळे वारीच्या पर्वकाळातच भाऊबीज संपन्न होते. शेकडो वर्षापासून बहिण भावाच्या भेटीचा आणि साडी चोळीआहेर देण्याची परंपरा आजही पंढरपुरात अबाधित आहे. आळंदी संस्थानच्या वतीने विश्वस्त डॉ भावार्थ देखणे यांनी संत मुक्ताई यांची विधिवत पूजा करून त्यांच्या पादुकांवर साडी चोळीचा आहेर भेट दिला. या निमित्ताने संता मधील असणाऱ्या बहीण भावाच्या नात्यातील गोडवा आषाढी वारीच्या निमित्ताने पुढे आला.
Byte :- डॉ भावार्थ देखणे ( विश्वस्त , संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी )
0
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 08, 2025 06:31:25Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - तीन तीन दिवसापासून गायब असलेल्या अडीच वर्षाच्या बालकाचा अखेर लागला शोध..
अँकर - सांगलीच्या तासगाव तालुक्यातल्या पाडळी येथून बेपत्ता झालेल्या अडीच वर्षाच्या बालकाचा अखेर तीन दिवसानंतर शोध लागला आहे. शंभूराजे शशिकांत पाटील असे या बालकाचे नाव असून तो आपल्या वडिलांसोबत दोन दिवसांपूर्वी शेतामध्ये गेला होता.मात्र त्या ठिकाणाहून तो बे पत्ता झाला दरम्यान शशी कांत पाटील यांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार तासगाव पोलीस ठाण्यामध्ये दिली होती.यानंतर सलग दोन दिवस शंभूराज याचा पोलीस,पाडळी ग्रामस्थ, रेस्क्यू टीम आणि शंभूराजच्या नातेवाईकांकडुन शोध घेण्यात येत होता.शंभुराज याचे अपहरण झाले की अन्य काही घटना घडली आहे,याबाबत तर्कवितर्क सुरू होते.मात्र दिवसानंतर तो ज्या ठिकाणाहून तो गायब झाला होता,तिथून एक किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या म्हसोबा देवाच्या मंदिरामध्ये तो खेळत असताना सुखरूप आढळला आहे,त्यामुळे सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला आहे.
0
Share
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJul 08, 2025 06:04:45Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळ मध्ये एक महिला व तिच्या अल्पवयीन मुलीला घरात डांबून त्यांच्यावर अघोरी उपचार करणाऱ्या एका भोंदू चा पर्दाफाश झाला आहे. वंजारी फैल परिसरात पोलिसांनी भोंदू महादेव पालवे याच्या घरी धाड मारली असता पोलिसही हादरले. घरात भोंदूची पत्नी व मुलीचे वास्तव्य असून शेजारीच असलेल्या टीनाच्या शेड मध्ये एक महिला आणि तिची अल्पवयीन मुलगी गंभीर अवस्थेत दिसून आल्या, पती पासून विभक्त असलेल्या या महिलेला दृष्टात्म्याची करणी झाल्याची बतावणी करून भोंदू महादेवने जाळ्यात ओढले, तिला व तिच्या मुलीला घरी आणून डांबले, सात महिन्यांपासून त्यांना शौच व लघुशंकेसाठीही बाहेर जाण्यास मनाई होती. उपचाराच्या नावावर दोघींना गरम सळाखीचे चटके दिल्या जायचे. त्यामुळे दोघींच्याही शरीरावर अनेक जखमा आढळल्या. शिवाय
घरात शेकडो बाहुल्या, धागे, गंडे, दोरे एक शवपेटी व अनेक आक्षेपार्ह वस्तूंसह आठ लाख रुपयांची रोकड मिळाली. घरातच खड्डे देखील खोदलेले आहे, गुप्तधनासाठी गुरु पौर्णिमेला या दोघी मायलेकींचा बळी देण्याचा त्याचा प्रयत्न असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी छापा मारताच भोंदू महादेवने स्वतःच्या गळ्यावर चाकूने वार करून आत्महत्येचा देखील प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्याला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. तर पीडित महिला व तिच्या मुलीला देखील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनुसार महादेव पालवे विरोधात बाल संरक्षण अधिनियम आणि जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
बाईट : रामकृष्ण जाधव : पोलिस निरीक्षक
0
Share
Report