Back
सिंधुदुर्गमध्ये ध्वजारोहण: पालकमंत्री नितेश राणे यांची खास घोषणा!
UPUmesh Parab
Aug 15, 2025 05:18:04
Oros, Maharashtra
अँकर ---- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्य ध्वजारोहण सोहळा सिंधुदुर्ग नगरी येथील पोलिस मैदानावर संपन्न झाला. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. वंचित घटकाच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी विशेष जनता दरबाराचे आयोजन केले. याबरोबरच विविध घटकांसाठी समस्यामुक्त करण्याचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ले जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला हे सर्वांसाठी गौरवास्पद आहे. अशा शब्दात स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित केले. यावेळी विशेष उल्लेखनीय कार्यासाठी विविध व्यक्तींना सन्मानित करण्यात आले .
6
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowAug 15, 2025 07:03:44Raigad, Maharashtra:
स्लग - मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण ......
अँकर - राज्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी आज महाड तालुक्यातील नडगाव तर्फे बिरवाडी ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण केलं. यावेळी ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते. गोगावले यांनी यावेळी छोटेखानी मार्गदर्शन केलं.
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 15, 2025 07:03:26Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - 15 ऑगस्टच्या निमित्ताने अवयवदान केलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांचा करण्यात आला सत्कार
Anchor - अवयव दानाला देशभरात चालना मिळावी यासाठी विविध उपक्रम आणि जनजागृती करण्यात येत आहे. सोलापुरातील वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने 15 ऑगस्टच्या निमित्ताने अवयवदान केलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. सोलापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर यांच्या हस्ते सन्मानपत्र देत हा सत्कार करण्यात आला. यावेळी अवयव दात्यांच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते.
0
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowAug 15, 2025 07:02:58Virar, Maharashtra:
Date-15aug2025
Rep-prathamesh tawade
Loc-virar
Slug-VIRAR FLAG
Feed send by 2c
Type-Av
स्लग : वसई विरार पालिकेत ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहन
अँकर : : वसई विरार शहर महानगरपालिकेत ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात पालिकेचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला सलामी देत उपस्थितांनी राष्ट्रगीत गाऊन देशभक्तीचा जयघोष केला.
या वेळी शहरातील विविध राजकीय नेते, मान्यवर, पालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्वातंत्र्य दिनाचे अवचित्य साधून वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. झाडे लावा.. झाडे जगवा..पर्यावरणाचे रक्षण करा असा संदेश देण्यात आला.
तसेच कार्यक्रम स्थळी देशभक्तीपर गीते, सांस्कृतिक सादरीकरणे आणि विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर कविता सादरीकरणाने वातावरण भारावून गेले. ध्वजारोहणानंतर आयुक्त सूर्यवंशी यांनी उपस्थितांना शपथ देत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
0
Report
JMJAVED MULANI
FollowAug 15, 2025 07:01:53Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 1508ZT_BARAMATISHARD
BYTE 1
बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान मध्ये शरद पवारांच्या हस्ते ध्वजारोहण
Anchor_बारामती मधील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय. देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री राज्यसभेचे खासदार शरद पवार यांच्या हस्ते विद्या प्रतिष्ठान या संस्थेच्या प्रांगणात ध्वज फडकवण्यात आलाय. यावेळी शरद पवार यांनी राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली.
बारामती : शरद पवार पॉईंटर ...
आजचा दिवस महत्त्वाचा आहे
जेव्हा देश स्वतंत्र मिळाले तेव्हा मी 7 वर्षाचा होतो
संरक्षण खात्याची जबाबदारी मला मिळाली
कितीही संकट आली तरी सैन्य देशाला संकटातून बाहेर काढतो
कश्मीर खोऱ्यात हल्ला झाला तो हल्ला देशावर होता. हा हल्ला झाल्यानंतर देशाचे चित्र काय आहे हे सगळ्या जगाला आपल्या सैन्याने दाखवले
बेस उध्वस्त करण्याचे काम आपल्या सैन्याने केलं...
शेजारच्या देशाला जशास तसे उत्तर दिले जाईल असं आपल्या सैन्याने दाखवून दिलं...
0
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 15, 2025 07:01:14Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1508ZT_WSM_BHARANE_ON_MNS
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर:निवडून प्रक्रियेवरून इंडिया आघाडीनंतर मुंबईत मनसेने ईव्हीएम व निवडणुकीवर प्रश्नचिन्ह लावणारी पोस्टरबाजी केली.यावर प्रतिक्रिया देताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की विरोधकांचे बोलणे हे त्यांचे काम असते,पराभूत उमेदवार नेहमी कुणावर तरी दोष टाकतात.याबाबत मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री उत्तर देतील.कृषी विषयावर बोलताना ते म्हणाले की शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला चांगले उत्पन्न व बाजारभाव मिळावा,त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसावा यासाठी प्रयत्नशील आहे.शेतकरी पुत्र म्हणून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा व भविष्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्याचा प्रयत्न करेन.
बाईट: दत्तात्रय भरणे, कृषिमंत्री
0
Report
SMSarfaraj Musa
FollowAug 15, 2025 06:50:22Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
Sng_padyatra
स्लग - सांगलीत शिवप्रतिष्ठानच्यावतीने भगवे ध्वज घेऊन हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा ..
अँकर - भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सांगलीत शिवप्रतिष्ठानच्यावतीने हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा काढण्यात आली. हातात भगवे ध्वज घेऊन शेकडो धारकरी या पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून शहरातल्या प्रमुख मार्गावरून ही हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा निघाली. यामध्ये डोक्यावर भगवे फेटे, पांढऱ्या टोप्या परिधान करत हातात भगवे ध्वज घेऊन ही रॅली काढण्यात आली.तर
स्वातंत्र्य दिना निमित्ताने देशभर आणि राज्यभर तिरंगा रॅली काढण्यात येत असताना शिवप्रतिष्ठानच्या निघालेल्या भगव्या ध्वज रॅलीमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
2
Report
JMJAVED MULANI
FollowAug 15, 2025 06:50:13Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 1508ZT_BARAMTISUNETRA
BYYE 1
बारामती फडकला 30 मीटर उंचीचा भव्य राष्ट्रध्वज..... खासदार सुनेत्रा पवारांच्या हस्ते झाले लोकार्पण
Anchor _ बारामती शहरात 30 मीटर उंचीचा राष्ट्रध्वज बसवण्यात आला आहे. आज स्वतंत्र दिनी राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या राष्ट्रध्वजाचे लोकार्पण पार पडले.
*खासदार सुनेत्रा पवार बाईट पॉइंटर*
*ऑन_स्वातंत्र्य दिन शुभेच्छा*
सर्वांना स्वतंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देते.
बारामती मध्ये पहिल्यांदाच तीस मीटर उंचीचा राष्ट्रध्वज उभा केला आहे हा अभिमानाचा विषय आहे.
यामुळे बारामतीच्या विकासात वैभव एक भर पडेल.
ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले त्यांना श्रद्धांजली वाहिली.
*ऑन_फोटो प्रदर्शन*
दादांच्या वाढदिवसानिमित्त या नाट्य मंदिरात प्रदर्शन भरवण्यात आलं होतं.
त्यामध्ये दादांनी आजपर्यंतच्या जीवन प्रवासात कशी कशी वाटचाल केली ते फोटो मधून मांडण्यात आलं.
बारामतीकरांना या आठवणी भावल्या असतील
या फोटोकडे बघताना पाठीमागचा सर्व काळ समोरून गेला.
*ऑन_कौटुंबिक क्षण*
कौटुंबिक क्षण या ठिकाणी आहेत.
आमची संपूर्ण फॅमिली प्रतिबिंब इतर पाहायला मिळत आहे.
वैचारिक मतभेद असले तरी नात्यांची घट्ट वीण या ठिकाणी पाहायला मिळते
0
Report
JMJAVED MULANI
FollowAug 15, 2025 06:46:54Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 1508ZT_INDAPURKAMGAR
FILE 5
रामराजे निंबाळकर आयोगाच्या शिफारशीच्या मागणीसाठी इंदापुरात मोर्चा...
Anchor:-
इंदापूर तालुक्यातील खंडकरी शेतकरी कामगारांना दोन गुंठे राहण्यासाठी जागा व काम मिळावे यास कामगारांच्या विविध मागण्यांसाठी
रत्नपुरी मळा ते जंक्शन चौक पर्यंत महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या कामगारांचा विविध मागण्यांसाठी सत्याग्रही पायी मोर्चा काढण्यात आला.
यावेळी महिला कामगारांचा सहभाग या मोर्चा मोठ्या संख्येने होता.
0
Report
JMJAVED MULANI
FollowAug 15, 2025 06:46:45Baramati, Maharashtra:
JAVED MULANI
SLUG 1508ZT_PUERNDRJEJURI
FILE 5
जेजुरी मल्हारी मार्तंड च्या गाभाऱ्यात आकर्षक आरास...
Anchor: देशाच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत मल्हारी मार्तंडाच्या जेजुरी नगरीत देखील स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आलाय... मल्हारी मार्तंडाच्या गाभाऱ्यात विविध फुलांनी वंदे मातरम भारत माता की जय याबरोबरच तिरंगा काढत आकर्षक आरास करण्यात आले आहे
स्वातंत्र्यदिनानिमित्त भाविकांनी देखील दर्शनासाठी गडावर गर्दी केली आहे.
0
Report
PPPRANAV POLEKAR
FollowAug 15, 2025 06:45:38Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील
आंबा घाटात दरड कोसळली
वाहने सावकाश चालवण्याचे आवाहन
संगमेश्वर साखरपा मुर्शी चेक पोस्टच्या पुढे रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या संगमेश्वर-आंबा घाट मार्गावर दरड कोसळण्याची गंभीर घटना घडली आहे. साखरपा मुर्शी चेक पोस्टच्या पुढील धोकादायक वळणावर ही दरड कोसळल्याने मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
दरड कोसळत असल्याने रस्त्याचा एक भाग पूर्णपणे बंद झाला आहे, स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळपासूनच दरड कोसळण्याची शक्यता होती आणि अखेर ती प्रत्यक्षात घडली. यामुळे रस्त्याचा काही भाग वाहनांसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. वाहनचालकांनी अत्यंत सावधगिरीने आणि कमी वेगाने वाहने चालवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
0
Report
SGSagar Gaikwad
FollowAug 15, 2025 06:45:16Nashik, Maharashtra:
feed send by mozo
reporter-sagar gaikwad
slug-nsk_bhujbal_byte
।मंत्री छगन भुजबळ, BYT.
- ७९ वा आज स्वतंत्र दिवस आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले आहे.
- भारत समृद्ध कसा होईल अशी वाटचाल सुरू
- आपण अन्नधान्य समृद्ध आहोतच
- खनिज तेल आणि इतर आपण इतर देशांकडून घेतो त्यावर अवलंबून आहे त्यासाठी आपण प्रयत्न करतो
- हा देश मोठा आहे आपण तस काम केले पाहिजे
- या देशातला गावातला झोपडपट्टीतला नागरिक सर्व समृद्ध व्हावा.
ऑन नाराजी विधान
- ठीक आहे, मी अनेक वर्ष नाशिकमध्ये ध्वजारोहण केले आहे..
- मला स्वतः ला इतर ठिकाणी जाण शक्य होत नाही
- ध्वजारोहण कुठेही करा आपल्या झेंडा एकच आहे, आपण फक्त वंदन करा.
- वंदन कुठे करायचे त्यामुळे महत्व कमी होत नाही
- झोपडपट्टीला जरी झेंडा लावला तरी तो आनंद
- आता तुम्ही हे विषय बंद करा.
*ऑन मांस विक्री*/ आंदोलन
- सरकारने असा कोणताही आदेश काढला नाही.
- मुख्यमंत्र्यांनी देखील त्यावर स्पष्टीकरण दिले आहे.
- काय खावं काय खाऊ नये याबद्दल भाष्य योग्य नाही
- महाराष्ट्रात सर्व ठिकाणी याचा आदेश आहे असं मला वाटत नाही
- काही महत्त्वाचे दिवस आहे त्यादिवशी कत्तल किंवा इतर गोष्टी करू नये.
- मांस खाऊ नका, अशी मागणी योग्य नाही
- देशात हजारो कार्यक्रम उत्सव आहे
*ऑन EVM हॅक*
- त्यांना विचारा ते सांगतील.
*ऑन जळगाव*
- काहीही करा पण हे स्वतंत्रच्या दिवशी झालं
- सर्व अधिकार प्राप्त झाले पण महापुरुषांचा अपमान नको.
- माहिती घेऊन योग्य ती कारवाई स्थानिक प्रशासन करेल.
*ऑन सुरज चव्हाण बढती*
- माझ्यासमोर सुरत चव्हाण यांना सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली आहे.
- त्याने अनेक वर्ष पक्षात काम केले आहे, त्यांची चूक झाली त्याची माफी मागितली आहे
- काही कारणामुळे त्यांना महत्त्वाच्या पदावरून दूर करण किंवा त्यांना शिक्षा देण कायमस्वरूपी लांब ठेवणे हे योग्य अस मला वाटत नाही.
*ऑन रोहीत पवार*
- ठीक आहे. रोज कोणीही काही बोलत असता
- त्यावर मी रोज बोलता त्यावर काय बोलू.
*ऑन राहुल गांधी मतदार यात्रा*
- लोकशाही मध्ये हे सुरू असते
- विरुद्ध पक्षात हे केले जाते
- हे आज नाही विरोधक ८९ वर्षापासून विरोधात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात काम करतातच
- सत्ताधारी आरोप करता त्याबद्दल विरोधक आरोप करतात.
*ऑन गिरीश महाजन*
- हे नाशिक सर्वांना आवडतं
- जळगावला देखील विसरू नका मतदारसंघ ला देखील विसरू नका.
- तुम्हाला जबाबदारी दिली जाईल तिथे तुम्ही काम करा आमच्या शुभेच्छा.
*ऑन गोदावरी प्रदूषण*
- आपण काल म्हणाला होता की नाशिकचे गोदावरीचा प्रदूषणाचा विषय आहे तो अनेक दिवसांपासून महत्त्वाचा
- काय करायचं तोच महत्त्वाचा प्रश्न आहे
- कुंभमेळ्यात काही करा पहिले गोदावरी स्वच्छता हेच काम
- नंतर रस्ते वगैरे इतर काही काम करा
*ऑन जरांगे*
- त्याला कोण आडव येत आहे
- आंदोलन जालन्यात कर किंवा अंतरवाली सराटीतकर
- आंदोलन मुंबईतकर नाहीतर दिल्लीत कर
- पण आंदोलन नियमात करा
- संविधानांची दिलेले अधिकार आहे उपोषण,भाषण कर पण नियमात
- मात्र कोणती कुरघोडी करू नये.
- मराठा समाजाला आरक्षण देता आले ते दिले आणखी काय पाहिजे
- इतर कोणता समाजात गेलं तर कोणी सहन करणार नाही.
- ओबीसी समाजात कोणी शिरकाव करत असेल तर गप्प बसणार नाही
*ऑन लोकशाही/ उद्धव ठाकरे*
- सगळ्या जगाने बोललेलं मी कस त्यावर बोलू.
0
Report
TTTUSHAR TAPASE
FollowAug 15, 2025 06:31:26Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
1 FILE
SLUG NAME -SAT_SWATANTRADIN
सातारा - आज 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्त साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी पोलिस दलाचा वतीने मानवंदना देण्यात आली.यावेळी स्वतंत्र सैनिक, जेष्ठ माजी सैनिक ,महसूल अधिकारी,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते माजी सैनिकांचा कुटुंबियांना सन्मान करण्यात आला त्याच बरोबर माजी सैनिकांचा कुटुंबियांना शासकीय जमीन वाटप देखील करण्यात आले.यावेळी उल्लेखनीय काम केलेल्या अनेक अधिकाऱ्यांचा सन्मान देखील यावेळी करण्यात आला.
2
Report
SMSarfaraj Musa
FollowAug 15, 2025 06:31:03Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
Sng_dhwajarohan
स्लग - पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न..
अँकर - भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात सांगलीत साजरा झाला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.रिमझिम पाऊस सुरू असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ध्वजारोहण केले.यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते प्रशासनातील विविध उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील खासदार,आमदार, समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
2
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowAug 15, 2025 06:30:44Bhandara, Maharashtra:
मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते गोंदियात ध्वजारोहन
Anchor :- गोंदिया पोलिस मुख्यालयातील कवायात मैदानावर
राज्याचे कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते शासकीय ध्वजरोहन सोहळा पार पडला या वेळी मंत्री महोद्यानी शासकीय योजनाची माहिती देत 79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या या वेळी जिल्हाधिकारी प्रजित नायर जिल्हा पोलीस अधीक्षक गौरख भामरे.जिल्हा परिषदेचे मुखकार्यकारी अधिकारी एम मुर्गानांथम उपस्थित होते. यावेळी पोलिस दलाच्या वतीने देण्यात येणार मानवंदना मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्वीकारली त्यानंतर गोंदिया पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस शिपायांचा राष्ट्रपती पदक देऊन सन्मान करण्यात आला या वेळी गोंदिया शहरातील नागरिकांनी हा सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती
BYTE :- मंगल प्रभात लोढा, मंत्री
3
Report
PNPratap Naik1
FollowAug 15, 2025 06:30:32Kolhapur, Maharashtra:
Kop Shaktipith Virodh Zenda Vandan
Feed :- Live U
Anc :- प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी 15 ऑगस्ट निमित्त शुक्रवारी तिरंगा झळकाऊ शेतात..शक्तीपीठ नको आमच्या वावरात.. या टॅग लाईन खाली शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने कोल्हापुरात शेतात तिरंगा फडवण्याचा अभिनव आंदोलन केले जात आहे. करवीर तालुक्यातील कोगील बुद्रुक इथल्या सुशीला गोपाळ पाटील यांच्या शेतात देखील हे अभिनव आंदोलन करण्यात आले. या अभिनव आंदोलनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.
Play 121
सुशीला गोपाळ पाटील, शेतकरी
1
Report