Back
वसई विरारमध्ये ७९व्या स्वातंत्र्य दिनाची भव्य उत्सव!
PTPRATHAMESH TAWADE
Aug 15, 2025 07:02:58
Virar, Maharashtra
Date-15aug2025
Rep-prathamesh tawade
Loc-virar
Slug-VIRAR FLAG
Feed send by 2c
Type-Av
स्लग : वसई विरार पालिकेत ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहन
अँकर : : वसई विरार शहर महानगरपालिकेत ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात पालिकेचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला सलामी देत उपस्थितांनी राष्ट्रगीत गाऊन देशभक्तीचा जयघोष केला.
या वेळी शहरातील विविध राजकीय नेते, मान्यवर, पालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्वातंत्र्य दिनाचे अवचित्य साधून वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. झाडे लावा.. झाडे जगवा..पर्यावरणाचे रक्षण करा असा संदेश देण्यात आला.
तसेच कार्यक्रम स्थळी देशभक्तीपर गीते, सांस्कृतिक सादरीकरणे आणि विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर कविता सादरीकरणाने वातावरण भारावून गेले. ध्वजारोहणानंतर आयुक्त सूर्यवंशी यांनी उपस्थितांना शपथ देत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
8
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SGSagar Gaikwad
FollowAug 15, 2025 08:49:40Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_tirnga_rally
शहरात एक हात देशासाठी या अभिनव संकल्पनेतून विश्वविक्रम
अँकर
नाशिक शहरात एक हात देशासाठी या अभिनव संकल्पनेतून विश्वविक्रम नोंदवण्यात आलाय.. नाशिक शहरातील मानवधन संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. माझा हात देश कार्यासाठी या संकल्पनेतून पांढऱ्याशुभ्र कापडावर राष्ट्रध्वजातील तीन रंगांनी 9 हजार 999 हातांच्या ठशांचा 381 मीटर लांब तिरंगा तयार करण्यात आलाय... दरम्यान विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या हाताच्या ठशांच्या तिरंगा ध्वजाची रॅली आयोजित करण्यात आली होती.. या तिरंगा ध्वजाची रॅली शहरात फिरवण्यात आली यात अनेक विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला.... या ध्वजाची सध्या शहरभर चर्चा सुरू झालीये....
0
Report
TTTUSHAR TAPASE
FollowAug 15, 2025 08:49:15Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
3 FILES
SLUG NAME -SAT_JALEBI_NEWS
सातारा - भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात विविध सांस्कृतिक, देशभक्तीपर कार्यक्रमांची रेलचेल असते. मात्र, साताऱ्यात १५ ऑगस्ट म्हटलं की एक गोड परंपरा ताजी होते — तिरंग्याच्या शानसोबत तोंडात विरघळणाऱ्या गरमागरम जिलब्यांचा आस्वाद घेण्याची!
विओ - दरवर्षीप्रमाणे यंदाही साताऱ्यातील मुख्य बाजारपेठ, चौपाट्या, चौक आणि गल्लीबोळात सकाळपासूनच जिलेबीचे स्टॉल सजू लागले आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कुटुंबियांसह, मित्रांसह किंवा सकाळच्या ध्वजवंदनानंतर थेट जिलेबीच्या स्टॉलवर जाण्याची साताऱ्याची ही जुनी परंपरा आहे. "१५ ऑगस्टला जिलेबी नाही खाल्ली, तर दिवसच अपुरा वाटतो," असे स्थानिक नागरिक हसत सांगतात.
प्लास्टिक पिशव्यांविरोधात मोहीम
यंदा मात्र या गोड परंपरेला एक नवा सामाजिक संदेशही जोडला गेला आहे. शहरातील काही जिलेबी विक्रेत्यांनी प्लास्टिक पिशव्यांच्या वापराविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. ग्राहकांनी जिलेबी खरेदीसाठी आपले डबे आणल्यास त्यांना बिलावर थेट १० टक्के सवलत देण्यात येत आहे.
Byte - ग्राहक
विओ3-"आम्ही रोज शेकडो ग्राहकांना जिलेबी देतो. प्लास्टिक पिशव्या कमी करण्यासाठी हा छोटा प्रयत्न आहे. ग्राहकांनीही उत्साहाने प्रतिसाद दिला आहे. शहर अधिक स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बनेल," असे एका विक्रेत्याचे सांगणे आहे
Byte - प्रशांत मोदी - विक्रेते
विओ 3- सकाळपासूनच जिलेबीच्या स्टॉलवर खवय्यांची रांग लागलेली दिसते. साताऱ्यात १५ ऑगस्टच्या दिवशी मिळणारी ही 'देशभक्तीची गोड भेट' वर्षानुवर्षे लोकांच्या मनात ताजी राहत असून, यंदा प्लास्टिकविरोधी मोहिमेमुळे ती अधिक खास ठरणार आहे.
0
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 15, 2025 08:49:01Yavatmal, Maharashtra:
यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील चिरकुटा येथील अरुणावती प्रकल्पाला स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंगा रंगात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे अरुणावती धरण तीन रंगांनी न्हाऊन निघाल्याचे भासत आहे, धरणाचे हे विहंगम दृश्य कार्यकारी अभियंता विनोद बागुल यांनी
ड्रोन कॅमेऱ्यात चित्रित केले आहे.
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 15, 2025 08:45:56Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पालकमंत्री जयकुमार गोरे यांना पडला सोलापुरातील हुतात्म्यांच्या नावाचा विसर
- स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पालकमंत्री जयकुमार गोरेंना पडला सोलापुरातील चार हुतात्म्यांपैकी एका हुतात्म्याच्या नावाचा विसर
- स्वातंत्र्यासाठी स्वतःचे बलिदान देणाऱ्या कुर्बान हुसेन यांचे भाषणादरम्यान नाव न घेतल्याने सोलापुरात व्यक्त होतेय नाराजी
- सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे करण्यात आले होते आयोजन
- हुतात्म्यांच्या नावाचा विसर पडल्याने पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर होतेय टीका
- मंत्री जयकुमार गोरे यांच्या भाषणातील चुकीमुळे सोलापुरातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता
- हुतात्मांचे नाव राहिले हे लक्षात आणून देतात पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे स्पष्टीकरण
साऊंड बाईट -
जयकुमार गोरे ( ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री सोलापूर )
भाषणानंतर स्पष्टीकरण दिलेले बाईट -
जयकुमार गोरे ( ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री सोलापूर )
0
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 15, 2025 08:36:14Yavatmal, Maharashtra:
यवतमाळच्या लाडखेड ग्रामपंचायत चे सरपंच दिनेश इंगोले यांनी कार्यालयातील ध्वजारोहणाचा मान दोन दिव्यांग व्यक्तींना दिला. ग्रामपंचायत लाडखेड कार्यालयातील ध्वजारोहण कैलाश डेबुरकार व पशु वैद्यकीय दवाखान्यातील ध्वजारोहण सलिम खान सलाम खान यांचे हस्ते करण्यात आले. दोन्ही व्यक्ती पूर्णतः दिव्यांग आहे, डेबूरकर दाम्पत्य दिव्यांग असल्याने ते भिक्षा मागून उदरनिर्वाह करतात तर सलिम खान जन्मत: अंध आहे.
स्वातंत्र्यदिनी समाजातील सर्व स्तरांतील लोकांना समान संधी मिळावी आणि ते देखील समाजात सन्मानित व्हावे यासाठी सरपंच दिनेश इंगोले यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत झाले.
बाईट : दिनेश इंगोले : सरपंच
1
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 15, 2025 08:34:54Nashik, Maharashtra:
*मंत्री गिरीश महाजन ऑन जामनेर*
- मलाही आताच माहिती मिळाली
- सकाळी नवरा बायकोने भांडण केले
- त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना केली
- त्या दोघांचे भांडण आणि बाबासाहेबांचा काही संबंध नाही
- संबंधिताला ताब्यात घेतले आहे
- नवरा बायकोचे भांडण झाल्यानंतर त्याने संतापात ही केले
- जातीय सलोखा बिघडेल असे करू नये
- सर्वांनी शांतता राखावी असे माझे आवाहन आहे
- परिस्थिती नियंत्रणात आहे
- सर्वांनी शांतता ठेवावी
2
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 15, 2025 08:34:31Nashik, Maharashtra:
*गिरीश महाजन जलसंपदा मंत्री*
शासनाने झेंडावंदन साठीं पाठवले त्याचे आभार
पालकमंत्री पद बाबतीत लवकर निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल
भुजबळ माझ्या सोबत होते ते नाराज नाहीत, तब्बेत मुळे त्यांनी गोंदिया जाण्यास नकार दिला
पालकमंत्री नाही म्हणून कामे रखडले नाहीत, निधी दिला जातोय
आता हजारो कोटी रुपयांचे रस्ते होणार आहेत
मोठे हायवे केले जाणार आहेत दिड वर्षात सर्व कामे पूर्ण होतील
गोदावरी प्रदूषण साठी कामे केले जात आहे
गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी काम करत आहोत
रस्त्याच्या कामने शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे
रस्ते करणे क्रमप्राप्त आहे
**गिरीश महाजन ऑन स्वदेशी नारा*
जागतिक बाजर पेठेत काय होते हे आपण बघत अहोत
आपली गळचेपी करण्याचा प्रयत्न काही मोठी राष्ट्र करत आहेंत
आपण 140 कोटींचा देश आहोत
सर्वानी स्वदेशी चा वापर केला तर आपल्याला बाहेरचया वस्तुची गरज पडणार नाही
*नाशिक : मंत्री गिरीश महाजन बाईट पॉईंट*
- *ऑन ध्वजारोहण*
- तुम्हाला काही वाईट वाटत आहे का
- हे अधिकृतच आहे
- शासनाने ध्वजारोहणासाठी माझी नियुक्ती केली त्याबद्दल आभार
- *ऑन पालकमंत्री*
- राज्याचे प्रमुख तिन्ही नेते ठरवून तो विषय पण मार्गी लावतील
- जो काय निर्णय होईल तो मान्य राहील
- *ऑन भुजबळ*
- त्यांची नाराजी नव्हतीच
- आम्ही दोन अडीच तास सोबत होतो
- पालकमंत्री म्हणून काम रखडले असे होत नाही
- सर्व काम होत आहे
- आपण सगळे काम करतो आहे रस्ते तयार करतो आहे
- येणाऱ्या वर्षभरात रस्ते कुंभमेळ्याच्या निमित्ताने होतील
- दीड वर्षात सर्व काम होईल
- गोदावरीची स्वच्छता ठेवली पाहिजे
- आम्ही त्यासाठी प्रयत्न करत आहोत
- रिंग रोड झाल्या नंतर नाशिक शहराचा चेहरा मोहरा बदलला जाणार आहे
- रस्ते होणे देखील क्रमप्राप्त आहे
- उद्योजकांसाठी याचा फायदा होणार आहे
- नाशिक त्र्यंबक रस्ता हा सहापदरी होणार आहे
- त्यासाठी टेंडर प्रोसेस सुरू आहे लवकर काम सुरू होईल
- शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणार आहे
- बांगलादेश मध्ये निर्यातीला परवानगी मिळाल्यानंतर कांद्याच्या भावात देखील सुधारणा होईल
- *ऑन मोदी*
- अतिशय महत्त्वाचा विषय आहे
- अमेरिकेकडून जे निर्बंध लावले जात आहे त्यासाठी स्वदेशीचा वापर केलाच पाहिजे
- आपण तो वापर केला तर बाहेर जायची गरज नाही अवलंबून राहण्याची गरज नाही
- जागतिक पातळीवर जी गळचेपी होत आहे ती होणार नाही
- मोदींनी ज्या प्रमाणे सांगितले ते भविष्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे
0
Report
TTTUSHAR TAPASE
FollowAug 15, 2025 08:34:08Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
2 FILES
SLUG NAME -SAT_PALAKMANTRI
सातारा: सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पालकमंत्री कार्यालयाचे उद्घाटन ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक यांच्या हस्ते सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ज्येष्ठ स्वातंत्र सैनिक आजोबांना पालकमंत्री यांच्या खुर्चीवर बसवण्याचा पहिला मान यावेळी त्यांनी दिला या कार्यक्रमास प्रशासनातील सर्व अधिकारी उपस्थित होते... दरवेळी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर विविध विकास कामांच्या आढावा, बैठका पालकमंत्री यांना घेता याव्यात या अनुषंगाने हे स्वतंत्र दालन व्यवस्था कार्यालयात असावी यासाठी पालकमंत्री कार्यालय बनवण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
बाईट: पालकमंत्री शंभूराज देसाई
0
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 15, 2025 08:33:07Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1508ZT_WSM_RAIN_15AUGUST
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर: एक दिवसाच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासून वाशिम जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे.सकाळपासूनच पावसाच्या हलक्या सरी सुरू झाल्या होत्या.मात्र दुपारच्या सुमारास रिसोड तालुक्यासह जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला.या मुसळधार सरींमुळे शेतकऱ्यांचे शेतकाम खंडित झाले आहेत.सध्या सोयाबीन पिकं फुलधारणेच्या अवस्थेत असून,यावेळी मुळधार पाऊस पडल्यास पिकांना नुकसान होण्याची भीती आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे.
0
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 15, 2025 08:30:13Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1508ZT_JALNA_SUCIDE_TRY(1 FILE)
जालना : तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, जिल्हा परिषदेसमोरील घटना
अँकर :जालन्यातील परतूर तालुक्यातील अकोली गावात मनरेगाच्या कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, चौकशी अहवाल द्यावा या मागणीसाठी तिघांनी अंगावर डिझेल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय.पंजाब देशमुख आणि सिद्धेश्वर सोळुंके अशी आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्यां दोघांची नावं आहेत.जालन्यातील जिल्हा परिषद कार्यालयासमोर ही घटना घडलीय.आंदोलकांनी अंगावर डिझेल ओतून घेताच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं पुढचा अनर्थ टळला आहे.अकोली गावात मनरेगाच्या कामांची चौकशी घनसावंगी गटविकास अधिकाऱ्यांनी केलेली आहे मात्र चौकशी अहवाल देण्यात आलेला नाही.हा अहवाल तातडीनं देण्याच्या मागणीसाठी आत्मदहन आंदोलन करण्याचा ईशारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आला होता.
0
Report
UPUmesh Parab
FollowAug 15, 2025 08:18:44Oros, Maharashtra:
सिंधुदुर्ग --- पालकमंत्री नितेश राणे पत्रकार परिषद
स्वातंत्र्य दिन --- स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. जिल्ह्याच्या विकासासाठी आमचं महायुतीचे सरकार नेहमीच कटीबद्द आहे.
On पाहिलं ध्वजारोहण --- पालकमंत्री म्हणून आज पाहिलंच सावंत्र्य दिनाचा ध्वजारोहण केले हा आपल्या साठी भावनिक क्षण आहे. लहानपणी वडिलांना ध्वजारोहण करताना पाहिलं आणि आज तेच करायची संधी मिळाली हा आपल्यासाठी भावनिक क्षण आहे पण जबाबदारी देखील वाढली आहे.
On वाळू चोरी --- बाळू चोरणाऱ्यांचे हात तोडले पाहिजे.. वाळू चोरी बाबत आमच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. अनधिकृत बाळू उपशावर कारवाई होणार
on जितेंद्र आव्हाड ( मटण पार्टी ) --- आज हिंदू संस्कृतीच्या दृष्ठिने महत्वाचा दिवस आहे. स्वातंत्र्य दिन आणि आज गोकुळ अष्टमी आहे. आज जे हिंदुद्वेशी आहेत तेच मटण पार्टी करणार. स्वतःला हिंदू का म्हणवून घेता आमचा धर्मांतर झालंय असं सांगून टाका.. जिहादी मानसिकतेचे हे लोक आहेत.
Byte -- मंत्री नितेश राणे
feed on desk
4
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 15, 2025 08:18:25Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn biryani wkt
Feedby tvu jalil biryani making
कत्तलखाने बंद असल्याचा निषेधार्थ इम्तियाजलील स्वतः घरी बिर्याणी बनवत आहेत हा तुघलकी निर्णय मला मान्य नाही आणि त्यामुळेच मी कालच घरी चिकन आणून ठेवलं आणि ते आज शिजवून ही बिर्याणी तयार करणार असल्याच जलील यांनी सांगितले , आता मी आमदार खासदार नाही बिर्याणी करायला जमली तर एक छोटीशी बिर्याणी स्टॉल उघडायला हरकत नाही असाही टोला त्यांनी लावलाय त्यांच्यासोबत खास बिर्याणी बनवत असताना बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी...
4
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 15, 2025 08:18:07Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1508ZT_CHP_MNS_PROTEST
( single file sent on 2C)
टायटल:-- स्वातंत्र्य मिळाले -खड्ड्यापासून मुक्ती कधी? चंद्रपुरात मनसेने विचारला सवाल ,शहराच्या सीमेवर पडोली भागात केले अनोखे आंदोलन
अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 62% एवढा पाऊस झाला आहे. मात्र या पावसातही चंद्रपूर शहर व लगतच्या भागातील रस्त्यांची खड्ड्यामुळे दैनावस्था झाली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही राष्ट्रीय असो अथवा राज्य महामार्ग खड्ड्यापासून मुक्ती मिळालेली नाही. अशा स्थितीत 79 व्या स्वातंत्र्यदिनी खड्ड्यांपासून मुक्ती कधी? असा सवाल करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चंद्रपुरात आंदोलन केले. शहरातील पडोली भागात मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी करत सरकारने खड्ड्यांपासून मुक्ती द्यावी अशी मागणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हजारो वर्षांपूर्वी बांधलेले किल्ले व स्मृतिस्थळे शाबूत असताना आपल्याच कराच्या पैशातून उत्तम दर्जा असलेले रस्ते का मिळत नाहीत असा सवाल देखील मनसेने केला.
बाईट १) राहुल बालमवार, मनसे, जिल्हा प्रमुख
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
5
Report
DPdnyaneshwar patange
FollowAug 15, 2025 08:17:34Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव ब्रेकिंग
DHARA_FLOOD
मांजरा नदीला पूर.
मांजरा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात 65 वर्षीय शेतकरी सुबराव शंकर लांडगे वाहून गेला.
तीन तासांपासून सुरू शोधमोहीम;
गावकरी व NDRF टीम घटनास्थळी दाखल
पुलावरून जाताना पाय घसरून पडल्याने शेतकरी वाहून गेल्याची माहिती.
घटनास्थळी भाजप आमदार राणा पाटील व ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील उपस्थित.
ड्रोनच्या साह्याने प्रशासनाकडून सुरू शोधकार्य.
पूरपरिस्थितीमुळे प्रशासनाचा परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा
3
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 15, 2025 08:16:39Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1508ZT_JALNA_MUNDE_BYTE(11 FILES)
जालना : माझ्यासोबत फोटो,सेल्फी काढणाऱ्यांना मि निधी देणार नाही,कामांना निधी देईल : पंकजा मुंडे
अँकर : माझ्याकडे चांगला निधी आहे .त्यामुळे चांगलं काम करण्याचा माझा प्रयत्न असणार असून माझ्यासोबत फोटो,सेल्फी काढणाऱ्यांना मि निधी देणार नाही.तसेच मतदान केलं म्हणून मतदारांना निधी देता येणार नाही,कामांना निधी देता येईल,माझ्यासोबत फोटो काढला म्हणून निधी देता येणार नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय.आज ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी मुंडे जालन्यात आलेल्या होत्या.ध्वजारोहण संपल्यानंतर मुंडे यांच्या हस्ते जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून शहरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
साऊंड बाईट : पंकजा मुंडे,पालकमंत्री ,जालना
4
Report