Back
नाशिकमध्ये खतांचा टंचाई: शेतकऱ्यांचा संताप वाढला!
SKSudarshan Khillare
FollowJul 15, 2025 01:01:12
Manmad, Maharashtra
अँकर- कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नाशिक जिल्ह्यात खतांचा टंचाई जाणवत आहे. खते असताना विक्रेत्यांकडून कृत्रिम टंचाई निर्माण करून अवाजवी दरात खतांची विक्री केली जात असल्याचा आरोप होत असून, खतांची लिंकिंग केले जात असल्याने शेतकऱ्यांना टंचाईमुळे खरिपाच्या पिकांना गरज असतांना खते देता येत नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे.त्यातच आज नाशिकच्या मनमाडमध्ये खतांचा साठा तपासणीसाठी आलेल्या नांदगाव तालुका कृषी गुण नियंत्रण अधिकाऱ्यांना संतप्त शेतकऱ्यांनी धारेवर धरत जाब विचारला.तातडीने खतांचा साठा उपलब्ध करून द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.दरम्यान खतांचा रॅक लवकरच उपलध होणार असून , शेतकऱ्यांना खते तातडीने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन प्रशासनाच्यावतीने देण्यात आले.
बाईट-सागर झोळे-कृषी अधिकारी-नांदगाव
बाईट : शेतकरी ,मनमाड
14
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRANAV POLEKAR
FollowJul 15, 2025 07:34:59Ratnagiri, Maharashtra:
खेड येथे मच्छी मार्केटच्या पाठीमागे रस्त्यावर महिला पुराच्या पाण्यामध्ये फसली होती त्या महिलांना सुरक्षित पाण्यातून बाहेर काढून तिला सुखरूप घरी पाठवण्यात आलं त्यावेळी सरफराज पांगारकर एजाज खेडेकर, खालील जुईकर उपस्थित होते
अल सफा वेल्फेअर फाउंडेशनचे कार्यकर्ते सोबत होते
0
Share
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 15, 2025 07:34:47Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणीच्या झिरो फाटा येथील हायटेक रेसिडेन्सीअल स्कुलमध्ये आपल्या पाल्याची टीसी काढण्यासाठी गेलेले पालक जगन्नाथ हेंडगे यांना स्कुल संस्थाचालक चव्हाण दाम्पत्याने मारहाण केल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला होता, या घटनेने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ माजली होती,पोलिसांनी पूर्णा पोलीस ठाण्यात या आरोपी रत्नमाला आणि प्रभाकर चव्हाण दाम्पत्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता,पण या घटनेला पाच दिवस उलटून ही आरोपी दाम्पत्य पोलिसांना सापडत नसल्याने आज मयताच गाव आसलेल्या उखळद येथील ग्रामस्थांनी मयत जगन्नाथ हेंडगे यांच्या कुटुंबियांना ज्ञाय मिळावा म्हणून मोर्चाची हाक दिली होती,त्याप्रमाणे आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर वसमत रोडवरून भव्य मोर्चा निघालाय, यात मोठ्या संख्यने महिलांचा ही समावेश आहे, जगन्नाथ हेंडगे यांच्या कुटुंबियांना ज्ञाय मिळावा म्हणून सर्व गाव रस्त्यावर उतरले आहे, या मोर्चात हजारो ग्रामस्थ सहभागी झाले आहेत. यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करीत आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे...
0
Share
Report
JJJAYESH JAGAD
FollowJul 15, 2025 07:34:40Akola, Maharashtra:
Anchor : राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सरकारी पातळीवर प्रत्यक्षात पहिले पाऊल म्हणून प्रभाग रचना जाहीर करून पडले आहेय..जिल्हा परिषद संदर्भात अधिसूचना प्रसिद्ध झाली असून सदस्य संख्या ५२ राहणार आहेय..
५३ वर असणारी सदस्य संख्या आता ५२ वर आलीय, हिवरखेड नगर परिषद झाल्याने तेल्हारा तालुक्यातील एक सर्कल कमी झाल्याने गावे अन्य सर्कलमध्ये समाविष्ट आहेय..१८ ऑगस्ट रोजी अंतिम प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहेय..
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने निवडणुका लांबणीवर पडल्या तेव्हापासून अकोला जिल्हा परिषद व सातही पंचायत समितीवर प्रशासक नेमण्यात आलेय.. ६ मे २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाचा निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याला हिरवा कंदील मिळाला. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक पूर्वीची प्रक्रिया करण्यासंदर्भात शासनाला निर्देश दिले त्यानुसार प्रभाग रचनेच्या कार्यक्रम जाहीर झाला आहेय..२०२० व्या जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीत गटांची संख्या ५३ होती, मात्र हिवरखेड नगर परिषद झाल्याने एक सर्कल कमी झालेय..
0
Share
Report
AKAMAR KANE
FollowJul 15, 2025 07:31:26kolhapur, Maharashtra:
Ngp Bhonga Byte
live u ने फीड पाठवले (DCP बाईट आहे)
(भोंग्याचे shots --2c ला जोडले आहे)
---------
मुंबई प्रमाणेच उपराजधानी नागपुरात ही धार्मिक स्थळावरील अनधिकृत भोंगे, लाऊडस्पीकर काढण्याची कारवाई केली जात आहे.. आतापर्यंत 300 पेक्षा जास्त भोंगे व लाऊडस्पीकर पोलिसांकडून काढण्यात आले असून आज आणि उद्या असे दोन दिवस ही कारवाई पुन्हा केली जाणार आहे... पोलिसांनी काढलेल्या ठिकाणी पुन्हा भोंगे किंवा लाऊडस्पीकर लावल्यास फौजदारी कारवाई केली जाईल असा इशाराही नागपूर पोलिसांकडून दिला जात आहे..
----
Byte - राहुल मदने, पोलीस उपयुक्त, झोन 3
4
Share
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowJul 15, 2025 07:31:11Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File name : 1507ZT_MAVAL_TAXI_CAB
Total files : 04
Headline -ई-बाईक टॅक्सीविरोधात आज मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन
-पुण्यातून दोन हजार चालकांनी सहभाग घेतलाय
-पोलीसांनी वेगवेगळ्या ठिकाणी या कॅब चालकांना अडविले आहे
-पुण्यातील काही भागात तर पिंपरी चिंचवड च्या वाकडला, तसेच देहूरोड सेंट्रल चौक, जुना पुणे महामार्गावरील सोमाटणे टोल नाका दरम्यान आणि उर्से टोल नाक्यावर आंदोलक कॅब चालकांची अडवणूक
Anchor:
राज्य सरकारकडून ई-बाईक टॅक्सीला दिलेल्या परवानगीविरोधात पुण्यातील बघतोय रिक्षावाला संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात पुण्यातून ५०० कॅब्समधून दोन हजार चालक सहभागी झाले आहेत. ई-बाईकमुळे पारंपरिक रिक्षाचालकांचे उत्पन्न घटण्याची भीती आहे. तसेच अँपवर शासनाने निश्चित केलेले दर न दर्शवता जास्तीचे भाडे आकारले जात असल्याचा आरोप आहे. कंपन्यांना यापूर्वी निवेदने देऊनही दखल न घेतल्याने आता सरकारने कारवाई करावी, अशी संघटनेची मागणी आहे. दरम्यान पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेसह विविध ठिकाणी या सर्व कॅब चालकांना प्रशासनाने अडवले असून पुढे त्यांना सोडलं जात नाही मात्र हे कॅबचालक आपल्या भूमिकेवरती ठाम असून प्रशासनाने आम्हाला सहकार्य न केल्यास आम्ही या मुंबई पुणे महामार्गावरती चक्काजाम आंदोलन करणार असल्याचं या आंदोलनकर्त्यांचे म्हणणं आहे आत्ता सरकारी याबाबत काय भूमिका घेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
0
Share
Report
PPPRANAV POLEKAR
FollowJul 15, 2025 07:06:05Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पावसाची संततधार सुरू आहे. लांजा तालुक्याला देखील मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. दरम्यान काजळी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने लांजा तालुक्यातील अंजणारी येथील प्रसिद्ध दत्त मंदिर पाण्याखाली गेलं आहे. काजळी नदी पात्रा बाहेर आल्यामुळे दत्त मंदिराच्या परिसरात मोठया प्रमाणात पाणी आहे. रात्रीपासूनच लांजा तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे दत्त मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला असून, दत्त मंदिर परिसरात तीन ते चार फुटांपर्यंत पाणी आहे.
0
Share
Report
SMSATISH MOHITE
FollowJul 15, 2025 07:03:50Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Language
Feed on - 2C
--------------------------
Anchor - बौद्धिक क्षमता वाढली पाहिजे, संभाजी महाराजांना 16 भाषा येत होत्या असे वक्तव्य राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले. काल नांदेड मधील नेताजी सुभाषाचंद्र बोस म्हविद्यालयातील कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. तिसरी भाषा नको म्हणता असा सवालाही हरिभाऊ बागडे यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांना जेव्हढं शिक्षण घेता येतं ते घ्यावे त्यांची बौद्धिक क्षमता वाढली पाहिजे असे राज्यपाल बागडे म्हणाले.
Sound Byte - हरिभाऊ बागडे - राज्यपाल राजस्थान
------------------
0
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 15, 2025 07:03:26Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - चांदोली धरण क्षेत्रात पावसाची पुन्हा दमदार हजेरी,धरणातुन साडेआठ हजार क्यूसेक पाणी सोडण्याचा निर्णय,वारणा नदी काठी सतर्कतेचा इशारा..
अँकर - सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून उसंती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा दमदार हजेरी लावली आहे.24 तासामध्ये 53 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे.गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे चांदोली धरण 82 टक्के इतकं भरले आहे,तर पुन्हा पावसाचे हजेरी सुरू झाल्याने धरणातून आता पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून आज सायंकाळी चार वाजल्यानंतर धरणातून वारणा नदीत साडेआठ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे असा इशारा धरण प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
0
Share
Report
PPPRANAV POLEKAR
FollowJul 15, 2025 06:34:57Ratnagiri, Maharashtra:
रात्रीपासून संगमेश्वर तालुक्यात जोरदार पाऊस
संगमेश्वर तालुक्यात 142 मिलिमीटर पावसाची नोंद
तालुक्यातील कसबा, शास्त्री फुल भागाला पावसाने जोरदार झोडपले
लावणी कामांना वेग, बळीराजा सुखावला
संगमेश्वर तालुक्यातील माखजन बाजार पेठेत पुराचे पाणी
गड नदीचे पाणी माखजन बाजारपेठेत
पावसाचा जोर वाढला तर पुराच्या पाण्याचा बाजारपेठेला धोका वाढणार
गड नदीच्या लागतच्या गावांना सतर्कतेचा इशारा
0
Share
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 15, 2025 06:32:13Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
1 FILE
SLUG NAME -SAT_KOYNA_DISCHARG
सातारा - कोयना पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटांनी उचलून 5000 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.धरणाच्या पायथा वीजगृहातून 2100 क्युसेक विसर्ग याआधी पासून सुरू असून आता एकूण 7100 क्युसेक विसर्ग नदीपात्रात केला जातो आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.सध्या धरणात 75.48 टीएमसी पाणीसाठा असून 15819 क्युसेक वेगानं धरणात पाण्याची आवक होते आहे.पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे
0
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 15, 2025 06:31:38Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1507ZT_WSM_MRGS_WELL
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर: मनरेगा योजनेंतर्गत शेतकऱ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या सिंचन विहिरींच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिरंगाई होत असून अनेक विहिरींची कामं पूर्ण होऊनही लाभार्थ्यांना अद्याप निधी मिळालेला नाही, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.2023-24 वर्षामध्ये 614 विहिरींसाठी शासनाकडून 7 कोटी 37 लाख 85 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता.मात्र, 2024-25 आणि 2025-26 या कालावधीत दीड हजारांहून अधिक लाभार्थ्यांना अजूनही निधी मिळालेला नाही.या विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून, योजनांच्या अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता आणि गती देण्याची मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.
3
Share
Report
AKAMAR KANE
FollowJul 15, 2025 06:31:27kolhapur, Maharashtra:
2c ला बाईट व्हिडिओ जोडला आहे
-----------------
नागपूर
- उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पूर्व नागपूरात पैसे घेतल्या शिवाय काम होत नसल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला. दलाला मार्फ़त गेले तरच काम होते असाही आरोप करण्यात आला आहे..
- या कार्यालयात पैसे घेऊन काम करत असल्याचा आरोप करण्यात यावेळी परिवहन कार्यालयात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून कारवाईची मागणी करण्यात आली..
- अनेक तक्रारी मनसेकडे आल्यात त्याचे पुरावे सुद्धा अधिकाऱ्यांना दिले आहे.. मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन काम केले जाते असा आरोप मनसेकडून करण्यात आला..
- पुढील सात दिवसात कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन केलं जाईल..
- यात फॉर्म भारतानं स्वतः गेल्यास काम करण्यासाठी पैसे द्यावे लागते, अनेक काम होत नाही, मात्र दलाला मार्फत गेले तर काम होतात.. यात रेषा मारल्या जातात, या रेषेवरून पैसे देण्याचं ठरत असल्याचा आरोप मनसेचे पदाधिकारी आदित्य दुरुगकर यानी केला आहे..
-------
बाईट - आदित्य दुरुगकर, मनसे.
0
Share
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 15, 2025 06:30:39Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणी शहरातील सुभाष रोड परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटना समोर आल्या आहेत, सदर प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये कैद झालाय, सुभाष रोडवरील नागराज कॉर्नर येथे मोकाट कुत्र्यांनी चांगलाच हैदोस घातलाय, मनपाकडे वारंवार तक्रार करून देखील या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला जात नसल्याने वेगवेगळ्या ठिकाणी दोन कुत्र्यांनी अनेक व्यक्तींना चावा घेतलाय. यामध्ये एका वृद्ध महिलेचा तर एका लहान मुलाचा समावेश आहे. वृद्ध महिलेच्या हाताला दुखापत झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या मोकाट कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहेत,
0
Share
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowJul 15, 2025 06:30:32Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File.name : 1507ZT_MAVAL_ROAD_CCTV
Total files : 01
Headline-पीएमआरडीए आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष कायम
-तीन तासांत दहा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Anchor:
देहूत एका मार्गावर ते ही एकाच ठिकाणी तीन तासांत दहा अपघात झालेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण हे अपघात म्हणजे जणू ऍक्शन रिप्लेचं, जे सीसीटीव्हीत सुद्धा कैद झालेत. बरं या अपघातांना नेहमीप्रमाणे प्रशासनचं जबाबदार आहे, असा आरोप स्थानिकांनी केलाय. मावळ तालुक्यातील देहू ते येलवाडी मार्गावर हे दहा अपघात एकाचं ठिकाणी झालेत. या मार्गावर प्रचंड खड्डे पडलेत, त्या खड्ड्यांमुळे अपघात घडू शकतो अन एखाद्याचा त्यात नाहक बळी जाऊ शकतो. म्हणून स्थानिकांनी खड्डे बुजवण्याची विनंती केली तर प्रशासनाने मलमपट्टी म्हणून या खड्ड्यात मुरुम आणून भरला. बरं यामुळं तर आणखी भलतंच घडायला लागलं. पावसामुळं मुरुमचा चिखल झाला अन तो रस्त्यावर पसरला. आता इथून प्रवास करणारे दुचाकीस्वार एकामागोमाग एक घसरुन जखमी होतायेत. त्यामुळं प्रशासनाने केलेली तात्पुरती मलमपट्टी ही कोणाच्या जीवावर बेतणारी ठरतेय. एखाद्याचा जीव जाण्याआधी प्रशासन यावर तोडगा काढेल अशी अपेक्षा स्थानिकांना आहे.
0
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 15, 2025 06:02:54Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1507ZT_WSM_ZP_PANCHYATSAMITYA
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर : वाशिम जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रारूप प्रभागरचनेची अधिसूचना जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी जाहीर केली आहे.२१ जुलैपर्यंत नागरिक,राजकीय पक्ष आणि इच्छुक व्यक्तींना हरकती व सूचना नोंदवता येणार आहेत.जानेवारी २०२५ मध्ये जिल्हा परिषद व सहा पंचायत समित्यांचा कार्यकाळ संपल्याने सध्या प्रशासकीय व्यवस्था लागू आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 2025-30 या कार्यकाळासाठी निवडणुकांची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली असून,नव्याने प्रभागरचना करण्यात आली आहे.नवीन प्रारूप प्रभागरचना जनतेसमोर खुली असून, यावर हरकती आल्यानंतर अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल.त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
0
Share
Report