Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001
कोरोनामुळे वडिलांचा मृत्यू; तरुण गुन्हेगार बनला!
YKYOGESH KHARE
Sept 08, 2025 07:47:29
Nashik, Maharashtra
Nsk_drtheftpkg Feed by 2C Anchor कोरोनामध्ये वडिलांचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि तरीही खूप फिज द्यावी लागली. या रागातून नाशिकमध्ये पकडण्यात आलेला जळगावचा तरुण गुन्हेगार बनलाय. बघू या काय घडले ते Vo 1 नाशिक शहरापासून जवळच असलेला राधानगरी हा परिसर ....या परिसरात महिनाभरापूर्वी एक दोन नव्हे तर अनेक घरांमध्ये घरफोड्या करण्यात आल्या. नाशिक शहरात चार डॉक्टर यांची घरे सुद्धा यामध्ये होती...पोलिसांनी परिसरातील सर्व घरफोडींच्या गुन्ह्याच्या ठिकाणांवरील आणि रत्यांवरील सीसीटीव्हींची तपासणी करण्यात आली. चार ठिकाणी झालेल्या घरफोडीत एकच संशयिताचे वर्णन जुळले. त्यात जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील फारुख रज्जाक काकर या तरुण गुन्हेगाराला पकडण्यात आलेय . पोलिसांना आपल्या गुन्ह्यांची कबुली देताना त्याने कोरोनामध्ये डॉक्टर यांच्या अवाजवी फीज देऊनही वडील वारले. त्यामुळे लाखोंची कमाई करणाऱ्या चार डॉक्टर यांना लक्ष्य केल्याच कबूल केले आहे. Byte मोनिका राऊत डीएसपी झोन 1 Vo 2 या गुन्हेगाराने केलेल्या गुन्ह्यात १० घरफोडीचे गुन्हे उघड झाले आहेत. यात पंचवटी पोलिस ठाणे ९, म्हसरुळ १ अशा १० ठिकाणी घरफोडी उघड झालिये. यात ११ तोळे सोने, १ किलो ५२ ग्रॅम चांदी असे १३ लाख ६ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केलेत. Byte मोनिका राऊत डीएसपी झोन 1 Vo 3 गुन्हेगार होण्यासाठी गुन्हेगाराची स्थानिक पार्श्वभूमी कारणीभूत ठरते असे म्हटले जाते. मात्र या घटनेने मूलभूत गरज असलेल्या वाढत्या महागड्या वैद्यकीय उपचाराबाबतची समजात निर्माण होणारी चीड समोर आलीय
11
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Sept 09, 2025 06:51:48
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0909ZT_CHP_EE_SUSPEND ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विवेक पेंढे निलंबित, परवानगी नसताना कामांचे कार्यादेश दिल्याचा ठपका, काहीच दिवसांपूर्वी कक्षात 20 हजार रुपये लाच घेतानाचा व्हिडिओ झाला होता व्हायरल अँकर:-- चंद्रपूर जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विवेक पेंढे यांना जिल्हा परिषद प्रशासनाने निलंबित केले आहे. याआधी त्यांना जिल्ह्यातील आमदारांनी तक्रारी केल्यानंतर सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. मात्र मॅट च्या निर्णयात त्यांना पुन्हा रुजू करून घेण्यात आले. चंद्रपुरात घेण्यापूर्वी पेंढे वर्धा येथेही कार्यरत होते. त्या ठिकाणी देखील त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला होता. ताज्या प्रकरणात परवानगी नसताना त्यांनी काही कामांचे कार्यादेश स्वतः जारी केले असून कार्यालयात सतत गैरहजर राहण्याचाही दोषारोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. चार दिवसांपूर्वी पेंढे यांच्या कक्षात वीस हजार रुपये लाचेची रक्कम घेतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आम आदमी पक्षाने याबाबत प्रकरण लावून धरले होते. पेंढे यांच्या निलंबनासाठी हा देखील आधार असल्याचे बोलले जात आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
1
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 09, 2025 06:48:53
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - मुरूम उपसा संदर्भात कुर्डू गावात प्रशासनाने केलेली कारवाई नियमानुसारच ‘’मुरूम उपसा संदर्भात कुर्डू गावात प्रशासनाने केलेली कारवाई नियमानुसारच‘’ ‘’कुर्डू येथे सुरू असलेला मुरुम उपसासाठी कोणतीही परवानगी किंबहुना अर्ज देखील देण्यात आलेला नाही‘’ सोलापूर जिल्हा प्रशासनाची माहिती दरम्यान जिल्हातील अवैध मुरूम, वाळू उपसावरील कारवाई संदर्भत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतः व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे घेतली बैठक
6
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 09, 2025 06:48:26
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0909ZT_CHP_NRHM_PROTEST ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपुरात राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी संपावर , 20 ऑगस्ट पासून विविध 20 मागण्यांसाठी सुरू आहे संप, राज्यातील 36 हजार कर्मचारी गेलेत संपावर, समायोजन ही आहे प्रमुख मागणी ,मागण्या मान्य होईपर्यंत संप रेटण्याचा दिला इशारा      अँकर:--चंद्रपुरात राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचा-यांनी जि. प. समोर संप - निदर्शने सुरू केली आहेत. 20 ऑगस्ट पासून कर्मचारी विविध 20 मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. राज्यातील 36 हजार कर्मचारी संपावर गेले आहेत. समायोजन ही आंदोलक कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. मागण्या मान्य होईपर्यंत संप रेटण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.  १० वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांचे दि. १४-०३-२०२४ च्या शासन निर्णयानुसार शासन सेवेत समायोजन करणेसाठी शासन निर्णय करणेत आलेला आहे. परंतु सव्वा वर्षापेक्षा जास्त कालवधी होऊन गेला तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचारी यांना नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार त्यांना आरोग्य सेवेतील मान्यता प्राप्त समकक्ष पदावर सामावून घेणेत येईल असे सांगण्यात आलेले होते परंतू अभिभाषनामधील या निर्णयाची अंमलबजावणी पूर्ण झालेली नाही. एनएचएम कर्मचारी यांना ९५ टक्के मानधनवाढ व लॉयल्टी बोनस लागु करावा, याबाबत अजूनही राज्य कर्मचारी समिती मध्ये मंजूरी झालेली नाही. आदी मागण्यांचा यात समावेश आहे. बाईट १) आंदोलक कर्मचारी आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
5
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 09, 2025 06:48:03
Pandharpur, Maharashtra:
Anchor - माढा तालुक्यातील कुर्डू गावच्या अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी कुर्डूवाडी पोलिसांत सरपंच आणि ग्रामसेवक या दोघांनी संगनमत करुन मुरुम उपसा केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा पातळीवरून कारवाईला वेग माढा तालुक्यातील कुर्डू येथे रस्त्यासाठी सुरू असलेला मुरुम उपशा साठी परवानगी अर्ज देण्यात आलेला नाही. ज्या दोन रस्त्यासाठी मुरूम उपसा सुरु असल्याच ग्रामस्थ सांगत आहेत. त्या रस्त्यासाठी दिलेली वर्कऑर्डरची मुदत संपलेली आहे. एका रस्त्यासाठीची वर्कऑर्डर ऑक्टोबर 2024 मध्ये तर दुसऱ्या रस्त्याची वर्कऑर्डर मुदत ही एप्रिल 2025 मध्ये संपली असल्याची माहिती सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे. या मुरुम उत्खनन प्रकरणी सरपंच कुंताबाई अंबादास चोपडे आणि ग्रामसेवक मोहन पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मुरुम उत्खनन करून पर्यावरणाचा ऱ्हास केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. कुर्डू गावात मुरूम उपसा संदर्भात झालेल्या प्रकरणाची तहसीलदार यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत ही माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचे सविस्तर अहवाल सादर करण्याचे तहसीलदारांना सूचना देखील वरिष्ठ पातळीवरून करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक कामासाठी जरी मुरूम उपसा करायचा असल्यास त्यासाठी तहसीलदार यांच्याकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक कामासाठी कोणतेही रॉयलटी न घेता परवानगी दिली जाते. मात्र कुर्डू गावात झालेला मुरूम उपसा प्रकरणात कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नव्हती. तहसीलदार यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीतील हि माहिती उघड झाली आहे.
4
comment0
Report
KJKunal Jamdade
Sept 09, 2025 06:33:26
Shirdi, Maharashtra:
Shirdi News Flash शिर्डीत अज्ञातांनी सुजय विखेंचे बॅनर फाडले.. शिर्डी शहरातील लक्ष्मीनगर भागातील प्रकार.. अज्ञातांनी बॅनरसह परिसरातील दुचाकींची केली तोडफोड... सुजय विखे समर्थकांची पोलिस ठाण्यात धाव... शिर्डी पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू...
2
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 09, 2025 06:30:13
Kalyan, Maharashtra:
डोंबिवली पलावा येथील के जी एन बिर्याणी शॉप ला लागली आग आगीत सपूर्ण दुकान जळून खाक.. सकाळी आठ च्या सुमारास लागली होती आग दुकान बंद असल्याने होणतीही जीवितहानी नाही.. आगीची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली महानगरपालिका अग्निशमन दलाने घटना स्थळी जाऊन विजवली आग आग कशा मुले लागली हे स्पस्ट झाले नाही...
2
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 09, 2025 06:17:56
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0909ZT_CHP_DEER_DEATH ( single file sent on 2C) टायटल:----- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह-गोंदिया रेल्वे मार्ग वन्यजीवांसाठी बनला मृत्यूचा सापळा, सांबराच्या पिल्लाचा रेल्वेखाली दुर्दैवी मृत्यू अँकर:----- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह-गोंदिया रेल्वे मार्ग वन्यजीवांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. लोहारा येथे वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक १० मध्ये चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेसच्या धडकेत एका सांबराच्या पिल्लाचा मृत्यू झाला. या मार्गावर यंदा एकूण ७ वन्यजीवांचे बळी गेले असून, त्यात ३ अस्वल, ३ सांबर आणि एका रानगव्याचा समावेश आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प तसेच नव्याने घोषित कन्हाळगाव अभयारण्याच्या लगतून जाणारा हा रेल्वेमार्ग वन्यजीवांच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरला आहे. मध्यप्रदेशात वन्यजीवांसाठी अंडरपास-ओव्हरपासची सुविधा आहे, मात्र महाराष्ट्रात अद्यापही अशा उपाययोजना न झाल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीचे अध्यक्ष दिनेश खाटे यांनी या गंभीर प्रश्नावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. बाईट १) दिनेश खाटे,अध्यक्ष,हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीचे आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
6
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Sept 09, 2025 06:05:00
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE 2 FILES SLUG NAME -SAT_HUTATMA सातारा - ९ सप्टेंबर १९४२ रोजी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडगाव जयराम स्वामी येथून वडूजकडे एक विराट मोर्चा निघाला होता, ज्यामध्ये सुमारे १५०० लोक सहभागी झाले. या मोर्च्यात वडगाव जयराम स्वामी, पुसेसावळी आणि उंचीठाणे येथील ९ क्रांतीकारक वीरांना इंग्रजांनी बेछूट गोळीबार करीत ठार केले होते.सातारा जिल्ह्यातील या ९ क्रांतीवीरांनी छातीवर गोळ्या झेलत देशासाठी प्राणांचे बलिदान दिले.या बलिदानाची आठवण म्हणून आज वडगाव जयराम स्वामी हुतात्मा स्मारक येथे विविध मान्यवरांनी आदरांजली वाहिली. यावेळी आमदार महेश शिंदे, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील,आमदार मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांच्यासह सातारा जिल्ह्यातील क्रांतिकारकांचे वारसदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शहीद क्रांतिकारकांच्या वारसदारांचा सत्कार करण्यात आला.
14
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 09, 2025 06:04:49
Ambernath, Maharashtra:
उल्हासनगरात नशेखोर तरुणांचा धुमाकूळ,  दहा गाड्यांची केली तोडफोड Ulh tod fod Anchor  उल्हासनगरातील गीता कॉलनी परिसरात पहाटेच्या सुमारास नशेखोर तरुणांनी मोठा हैदोस घालत दहा गाड्यांची तोडफोड केली. यात बाहेरगावाहून आलेला एक ट्रक, रिक्षा तसेच कार यांचा समावेश असून, गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. केवळ वाहनांची तोडफोड न करता या तरुणांनी ट्रक चालकाला मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, नुकसानीची पाहणी करण्यात आली आहे. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात येत असून, आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
12
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Sept 09, 2025 06:04:07
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE 3 FILES SLUG NAME -SAT_BHEEM_KUNTI सातारा - साताऱ्यातील पाटण तालुक्यात तारळे येथे शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरागत भिमकुंती यात्रेची सांगता दोन्ही मुर्तींचे तारळी नदीत विसर्जनाने झाली. यावेळी कुंती माता की जय, भीमसेन महाराज की जय च्या गजरात आणि गुलालाची उधळण करत भीमकुंतीची मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणूकीत पावसाने हजेरी लावल्याने श्रीं च्या मूर्तीवर वरुण राजाने एक प्रकारे जलाभिषेकच घातला. या पावसात भविकही ओले चिंब झाले होते. पावसात केलेल्या गुलालच्या उधळणीत तरुणाई माखून गेली होती. अतिशय उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात भीमकुंती सोहळ्याला तारळी नदीत निरोप देण्यात आला.
13
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 09, 2025 06:01:24
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - गणेश विसर्जन मिरवणूकीत नाचण्याच्या वादातून तरुणाचा खून,संतप्त ग्रामस्थांनी संशयितांच्या घरासमोर मृतदेह ठेवत केले आंदोलन. अँकर - गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान झालेल्या वादातून एका तरुणाचा खून झाल्याचा प्रकार सांगलीच्या अंकली मध्ये घडला आहे.शीतल पाटील,वय 25 असे तरुणाचे नाव आहे.तीन दिवसांपूर्वी गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचण्याच्या वादातून शीतल पाटील याच्यावर तिघांनी चाकू हल्ला केला होता,ज्यामध्ये शितल पाटील हा गंभीर जखमी झाला होता,दरम्यान उपचार सुरू असताना शीतल पाटील याचा काल मृत्यू झाला,मृत्युच्या घटनेनंतर आज संतप्त ग्रामस्थांनी स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी नेलेला मृतदेह संशयित आरोपींच्या घरासमोर आणून ठेवत आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. संशयितांच्यावर कारवाई करावी,अशी मागणी करत अंत्यविधी न करण्याची आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती.दरम्यान सांगली ग्रामीण पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल,असा आश्वासन ग्रामस्थांना दिल्याने तणाव निवळला आहे,मात्र गाव बंद ठेवून खुनाच्या घटनेचा निषेध नोंदवण्यात येत असून या पार्श्वभूमीवर गावात मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. बाईट - शशिकांत पाटील - माजी सरपंच - अंकली.-सांगली. बाईट - किरण चौगले - पोलीस निरीक्षक, ग्रामीण पोलीस,सांगली.
12
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 09, 2025 06:00:33
kolhapur, Maharashtra:
Ngp Taywade Byte live u ने फीड पाठवले ---------------------- नागपूर - बाईट - डॉ बबनराव तायवाडे,अध्यक्ष,राष्ट्रीय ओबीसी महासंघ On ओबीसी बैठक - - ओबीसी कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे साखळी उपोषण सोडवायला आले होते,त्यावेळी 14 मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या होत्या, तेव्हा त्यांनी उत्तरादाखल त्यांनी सांगितलं होतं की बारा मागण्या मान्य करतोय आणि दोन मागणी संदर्भात मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ समोर निर्णय होईल - ज्या बारा मागण्या होत्या यासंबंधी शासन निर्णय घेण्यासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृहवर साडेचार वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे - बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार परिणय फुके,ज्या विभागाशी संबंधित आहेत त्या विभागाचे सचिव,आणि आमचे 25 जणांचे शिष्टमंडळ या बैठकीत उपस्थित राहणार आहे -on ओबीसी नेते मतभेद - - पूर्ण महाराष्ट्र आणि देश बघतो आहे, राष्ट्रीय ओबीसी महासंघ हा एनजीओ आहे, ओबीसी समाजाच्या केंद्राची आणि राज्याशी संबंधित आहे त्या मागण्या मांडण्याकरिता आम्हाला जे कोणी मंत्रिमंडळ असतील त्यांच्यासमोरच मांडाव्या लागणार आहेत - आजपर्यंत दहा अधिवेशन झाले,त्या अधिवेशनात आम्ही सर्वच पक्षाचे नेत्यांना निमंत्रित केला आणि ते आले, भाजपचे आले काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचे सर्वच लोक आले - या सर्वांच्या समस्या आम्ही आमच्या मागण्या मानतो आणि त्यावर चर्चा होऊन मंत्रिमंडळात मागण्या मान्य होऊन केंद्र आणि राज्य सरकारने मान्य केलेला आहे, त्यामुळे या गेल्या दहा वर्षात मी ओबीसी समाजाचे विद्यार्थी युवक आणि सामान्य माणसाच्या कल्याणाकरिता 58 जीआर काढून घेतले आहेत - आजपर्यंत कोणीही काढलेले नाही हे जीआर एखाद्याने तरी पुढे यावं आणि सांगावं साठी हा शासन निर्णय काढला होता - ज्यांना ओबीसी राष्ट्रीय महासंघात काम करायचे त्यांनी आपले राजकीय जोडे बाहेर काढावे आणि नंतर यावे - आरक्षणाचे रक्षण करणं हे आमचा आद्य कर्तव्य आहे, त्यासोबतच ज्या सोयी आणि सवलती सरकारने द्यायला पाहिजे त्याची सातत्याने मागणी आम्ही करत असतो, म्हणून आतापर्यंत 58 जीआर करण्यात आम्ही यशस्वी झालो आहे - मी जर आहारी गेलो असतो तर हे आंदोलनच सरकारचे विरोधात उभे राहिले नसतं, सरकारचे विरोधात आंदोलन केल्यावर सरकारने आम्हाला आश्वासन दिले की आम्ही आरक्षणाला धक्का लावणार नाही - त्यावेळी एकही आला नव्हता आमच्या सोबत आता मागणी पूर्ण झाल्यावर - सरसकट हा शब्द मराठा आंदोलकांनी मागे घेतला आहे, जो शासन निर्णय निघालेला आहे ते प्रचलित पद्धतीनुसार आहे On जरांगे प्रमाणपत्र अल्टीमेटम - - या शासन निर्णयामध्ये ज्या अटी घातल्या आहेत त्या अटींचा पालन जी व्यक्ती करेल त्या व्यक्तीला प्रमाणपत्र सरकार देणारच आहे त्यासाठी अशा व्यक्ती पुढे आल्या पाहिजे आमच्याकडे वडिलोपार्जित वंशावळनुसार एवढे नातेवाईक आहोत या नातेवाई पैकी माझ्याकडे हे प्रमाणपत्र आहे आणि या आधारे वितर नातेवाईकांना प्रमाणपत्र देण्यात यावे, ज्याच्याकडे कागदपत्र असतील त्याला सरकार प्रमाणपत्र देणे
14
comment0
Report
Sept 09, 2025 05:57:25
Yavatmal, Maharashtra:
यवतमाळ – महादेवराव जानकर यांनी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, "शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासन गांभीर्याने पाहत नाही. शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे, कर्जमाफी झालीच पाहिजे. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असून त्याची भरपाई शासनाने त्वरित करावी," अशी मागणी त्यांनी केली. या पत्रकार परिषदेला विभागीय अध्यक्ष, तहसील अध्यक्ष तसेच यवतमाळ जिल्हाध्यक्ष सुरज ठाकूर उपस्थित होते.
14
comment0
Report
SKSudarshan Khillare
Sept 09, 2025 05:50:28
Chandwad, Maharashtra:
अँकर-मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड च्या राहुड घाटात काल रात्री गॅस टँकरचा अपघात होऊन गॅस गळती सुरू झाली होती,मनमाड,सिन्नर येथील पथकाने गॅस गळती थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही गॅस गळती मुळे टँकरवर पाण्याचा मारा करण्यात येत असून,सकाळ पासून गॅस गळती रोखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे,तर या बुलेट गॅस टँकर मधल्या ऐका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे,गॅस गळतीमुळे आजू बाजूच्या गावांना तसेच रस्त्यावरील ढाबा चालकांना सातर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहे.
13
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 09, 2025 05:32:51
Pandharpur, Maharashtra:
Anchor - सांगोल्याचे शेकापचे आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी भरपावसात लोकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. महूद येथे रात्री आमदार बाबासाहेब देशमुख यांनी लोकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी जनता दरबार घेण्यात आला. या दरम्यान अचानक पाऊस सुरू झाला. भर पावसात आमदार बाबासाहेब देशमुख यांनी लोकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. आमदार बाबासाहेब देशमुख यांचा पावसातील व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला‌ आहे.
12
comment0
Report
Advertisement
Back to top