Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahmednagar423109

शिर्डी में अज्ञात ने सुजय विखे का बैनर फाड़ डाला

KJKunal Jamdade
Sept 09, 2025 06:33:26
Shirdi, Maharashtra
Shirdi News Flash शिर्डीत अज्ञातांनी सुजय विखेंचे बॅनर फाडले.. शिर्डी शहरातील लक्ष्मीनगर भागातील प्रकार.. अज्ञातांनी बॅनरसह परिसरातील दुचाकींची केली तोडफोड... सुजय विखे समर्थकांची पोलिस ठाण्यात धाव... शिर्डी पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू...
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Sept 09, 2025 12:34:56
Dhule, Maharashtra:
anchor - महाराष्ट्रातील भाजपाची सरकार आदिवासी विरोधी सरकार आहे, असा आरोप के.सी. पाडवी यांनी करत, बंजारा समाज आंध्रामध्ये आणि तेलंगणामध्ये १९७६ मध्ये एस टी प्रवर्गामध्ये आले आहेत, त्यामुळे हे महाराष्ट्रात होऊ नये, असं पाडवी यांनी सांगत, महाराष्ट्रात भाजपशीत सत्ताधाऱ्यांनी एस टी त बंजारा समाजाला समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला तर तो, अणू बॉम्ब चा विस्फोट केल्यासारखा प्रकार घडेल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. देशात आणि राज्यात कुणीही उठत आणि अनुसूचित जमाती मध्ये आरक्षण मागतो, राज्य घटनेत अनुसूचित जमाती ची सूची दिली आहे, त्या शिवाय दुसऱ्या जातींना यात आरक्षण देने शक्य नाही, असं पाडवी यांनी स्पष्ट केले आहे. सगळे बोगस जाती आदिवासीत समाविष्ट करण्याच्या प्रयत्न आहे. त्यामुळे आदिवासींच्या सवलत बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असं आरोप्प पाडवी यांनी केला असून, केंद्रातील आणि राज्यातील सरकार आदिवासींच्या विरोधी आहे विशेषता भाजप सरकार हे आदिवासींच्या विरोधात आहे असं आरोप करती, महाराष्ट्रातील सरकार धनगरांच्या बाजूनी आहे, असा सांगत आमच्याकडे सगळे पुरावे आहेत त्यामुळे न्यायालयाने देखील लढाई लढण्याची तयारी पाडवींनी व्यक्त केली. आम्ही न्यायालयाच्याही निकाल मानणार नाही कारण न्यायालयात पैशांच्या आधारावर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात जाणारी खूप आहेत, असा सांगत सरकारने ट्रायबल ॲडव्हायझर कमिटीला विचारल्याशिवाय कुठलाही निकाल घेतला तर सरकारला भारी पडणार, असा इशारा पाडवी यांनी दिला आहे byte - अड के सी पाडवी, माजी आदिवासी विकास मंत्री प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Sept 09, 2025 12:30:59
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE 1 FILE SLUG NAME -SAT_RIVER_MURTI साताऱ्यात गणेशोत्सवानंतर संगम माहुली येथे कृष्णा नदी पात्रात झालेल्या गणपती विसर्जनानंतर मोठ्या प्रमाणावर तिथे गणपतीमुर्ती या नदीपात्राच्या बाहेर आल्या होत्या या मुर्त्यांचं पुनविसर्जन आणि संगममाहुली घाटाची साफसफाई स्वच्छता श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सातारा , RSS , नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, गुरू एकॅङमी आणि माहुली ग्रामपंचायत तर्फे करण्यात आले. यादरम्यान राजघाट आणि छत्रपती शाहुमहाराज समाधी परिसर स्वच्छता करण्यात आली..
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 09, 2025 12:30:33
Dhule, Maharashtra:
Anchor - शहादा येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लाल बावटा) यांच्या वतीने शहादा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. जन सुरक्षा विधेयक तात्काळ रद्द करावे, नवीन कामगार कायदा रद्द करावा, संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, दिव्यांग व राष्ट्रीय अर्थसहाय्य योजनेची प्रलंबित रक्कम त्वरित अदा करावी, आणि शबरी आवास व रमाई आवास योजनेअंतर्गत पात्रांना त्वरित घरकुलाचा लाभ द्यावा यासह १५ मागण्या घेऊन लाल बावठा शहादा तहसील कार्यालयावर धडकला. शासनाने आणि प्रशासनाने आमच्या मागण्यांकडे लक्ष दिलं नाही तर, लवकरच रास्ता रोको देखील आंदोलन करणार असल्याच्या इशारा कम्युनिस्ट पक्षाने दिला आहे. शासनाला वारंवार सांगून देखील दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे आज तहसील कार्यालयावर आलो आहोत, उद्या आम्ही रस्त्यावर उतरणार आहेत, त्यामुळे शासनाने आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचे जिल्हाध्यक्ष सुनील गायकवाड यांनी सांगितलं. बाईट - सुनील गायकवाड जिल्हाध्यक्ष प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Sept 09, 2025 12:30:14
Ratnagiri, Maharashtra:
अंबादास दानवे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते होते अंबादास दानवेंची 31 ऑगस्टला मुदत संपलेली आहे तीन पक्षांच्या बैठकीत निर्णय झाला आहे ती जागा काँग्रेसला द्यायची आहे विधानसभा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे राहील भास्कर जाधव
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 09, 2025 12:05:53
Washim, Maharashtra:
वाशिम: File:0909ZT_WSM_ZP_SCHOOL_LOCK रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर:वाशिमच्या जांभरूण महाली गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये आज शिक्षकच न आल्यानं पालकांनी संतप्त होत विद्यार्थ्यांना घरी जायला सांगून शाळेला चक्क कुलूप ठोकलय.पालकांनी दिलेल्या माहितीनुसार या गावात इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा आहे. मात्र आज एकही शिक्षक शाळेत न आल्यानं बराच वेळ विद्यार्थी तसेच बसून होते.ही बाब पालकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शाळेत धाव घेऊन विद्यार्थ्यांना घरी जाण्यास सांगितलं आणि शाळेच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावलं आणि अनुपस्थित असलेल्या शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली.
7
comment0
Report
SKSudarshan Khillare
Sept 09, 2025 12:02:57
Lasalgaon, Maharashtra:
अँकर :-लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यात कांद्याच्या भावात सुरु असलेली घसरण कायम असून कांद्याचे भाव 1500 वरुन 1200 रुपये प्रती क्विंटलवर आले. अगोदरच्या या अगोदर जो भाव मिळत होता त्यातून पिकांवर केलेला खर्च निघत नव्हता आता क्विंटल मागे 300 रुपयाची घसरण झाल्यामुळे वाहतुकीवरचा खर्च देखील निघत नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून शासनाने कांद्याला किमान प्रती क्विंटल 2500 ते 3000 रुपये भाव मिळेल अशी व्यवस्था करावी किंवा आम्हाला क्विंटल मागे 1000 रुपये अनुदान द्यावा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करीत आहे..
7
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 09, 2025 12:01:46
Parbhani, Maharashtra:
अँकर- बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करून त्यांना एसटीचे आरक्षण लागु करावे यामागणीसाठी परभणीच्या जिंतूर शहरात विनोद आडे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून उपोषणाला बंजारा समाजाचा मोठा पाठिंबा मिळत आहे. बंजारा समाजाची एसटी प्रवर्गात नोंद सापडली असून आता बंजारा समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण देण्याची मागणीसाठी आमरण उपोषण केले जात आहे, उपोषणकर्ते विनोद आडे यांची प्रकृती आता खालावलीय,त्यामुळे समाज बांधव चिंता व्यक्त करीत आहेत...
4
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 09, 2025 12:01:36
Washim, Maharashtra:
वाशिम: File:0909ZT_WSM_OBC_MORCHA रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर : राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देण्यासाठी जो GR काढला आहे तो GR रद्द करण्याच्या मागणीसाठी आज वाशिम जिल्ह्यातील रिसोड तहसील कार्यालया वर सकल ओबीसी समाजाने मोर्चा काढला.यावेळी हा GR रद्द करण्याच्या मागणी साठी विविध घोषणा देत आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं.हा मोर्चा रिसोड शहरातील भाजी बाजारातुन निघून मुख्य मार्गाने तहसील कार्यालया वर निघाला.या मोर्चात मोठ्या संख्येने सकल ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
3
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 09, 2025 11:46:26
Kolhapur, Maharashtra:
Kop Gokul PKG Feed:- Live U Anc:- कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची 63 वी सर्वसाधारण वार्षिक सभा आज गोंधळात पार पडली.. मागील वार्षिक सभेसारखा अभूतपूर्व गोंधळ झाला नसला तरी सभासदांना समाधानकारक उत्तरे दिली नाहीत असा आरोप विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांनी केलाय. सत्ताधारी नेत्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत सभेच्या कामकाजात अडथळा आणला असा आरोप देखील महाडिक यांनी केला आहे. VO 1:- कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण सभा आणि गोंधळ हे समीकरण कायमचंच ठरलेला असतं... गोकुळचे सर्वसाधारण सभा सुरळीत पार पाडू द्यायचीच नाही हा त्या त्या वेळच्या विरोधकांचा एकमेव अजेंडा पाहायला मिळाला. गोकुळच्या सभेमध्ये गोंधळ घालण्याची परंपरा गेल्या सहा वर्षांपासून पाहायला मिळते. सत्ताधाऱ्यांना ठराव मंजूर करायचे असतात आणि विरोधकांना त्या ठरावांना विरोध करायचा असतो.याही वर्षी समर्थक आणि विरोधक या दोघांच्या घोषणाबाजीत आजची गोकुळची वार्षिक सभा पार पडली.. गोकुळच्या विरोधी संचालिका शोमीका महाडिक यांनी गोकुळची ज्या पद्धतीने सभा पार पडली त्याबाबत मी समाधानी नसल्याचं म्हटलंय. Byte:- शौमिका महाडिक, विरोधी संचालिका ( बाईट 121 मधील काढून घ्यावा) VO 2 :- दरम्यान सत्ताधारी नेत्यांनी मात्र सभा अतिशय सुरळीत आणि शांततेत पार पडल्याचा दावा केला आहे. इतकच नाही तर महाडिक विरोधक काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी किमान आता तरी विरोधकांनी समजूतदारपणा दाखवायला हवा होता अशी भूमिका मांडत महाडिक यांच्यावर टीका केलीय. Byte:- आमदार सतेज पाटील, नेते गोकुळ VO 3:- गोकुळचे चेअरमन नावेद मुश्रीफ यांनी देखील सभा अतिशय खेळीमेळीत पार पडली असून महाडिक यांच्या सर्व प्रश्नांची उत्तर दिली आहेत, त्यातून त्याचे समाधान झाले नसेल तर त्यांना साधनकारक उत्तर देवू असं आश्वासन दिलय. Byte:- नावेद मुश्रीफ, अध्यक्ष गोकुळ दूध संघ VO 4:- गोकुळचा इतिहास पाहता सर्वात आधी गोकुळचे दूध वाहतूक करणाऱ्या टँकर वरून महाडिक यांना निशाणा बनवले. त्यावेळी आमदार सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके यांनी गोकुळच्या कारभारावर टीका करत महाडिक यांच्या विरोधात दंड थोपटले. 2018 साली पहिल्यांदा गोकुळच्या सर्वसाधारण सभेमध्ये राडा पाहायला मिळाला. एकीकडे सतेज पाटील हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके आपल्या समर्थक सभासदांसह सर्वसाधारण सभेमध्ये घुसले होते त्यावेळी खुर्च्यांची तोडफोड चपलांची फेकाफेक आणि गाडीची तोडफोड झाली होती. त्याच वर्षापासून गोकुळच्या सर्वसाधारण सभेत दरवर्षी गोंधळ पाहायला मिळू लागला. याही वर्षी सभासदांच्या घोषणातच गोकुळची सभा पार पडली.सत्ताधारी संचालकानी प्रश्न उत्तराच्या माध्यमातून सभासदांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. पण दुसरीकडे मात्र विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांना मात्र बोलू दिले नाही असा आरोप केला जातोय. यावरूनच गोकुळच्या सत्तेच्या सारीपाटात आरोप प्रत्यारोप आज पर्यंत पाहायला मिळाले, यापुढे देखील तसेच आरोग्य प्रत्यारोप पाहायला मिळणार आहेत. पण त्यामध्ये सभासदांचे हित जोपासलं पाहिजे असं दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाटतय. प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर आत्तापर्यंत गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सभेत झालेल्या गोंधळाचा इतिहास ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. GFX In 30 सप्टेंबर 2018 सत्ताधाऱ्यांकडून म्हणजेच महादेवराव महाडिक, अरुण नरके, स्वर्गीय पी एन पाटील यांच्याकडून चुकीचा कारभार होत असल्याचे सांगत सतेज पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके सभासद आणि समर्थक यांच्यासह गोकुळच्या सभेमध्ये शिरले होते. त्याचवेळी सगळ्यात मोठा राडा पाहायला मिळाला.... 30 ऑगस्ट 2019 गतवर्षी झालेल्या राड्याचा अनुभव पाहता 2019 साली खुर्च्या बांधून ठेवण्याची वेळ सत्ताधाऱ्यांवर आली होती... मात्र त्यावेळी देखील घोषणाबाजीने सर्वसाधारण सभा दणाणून गेली... 2020 आणि 24 सप्टेंबर 2021 कोरोना काळामुळे या दोन वर्षी गोकुळची सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने झाली... 29 ऑगस्ट 2022 गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यानंतर ही पहिल्याच सभेत महाडिक आणि नरके यांचे केवळ 4 संचालक निवडून आले तर सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांचे 17 संचालक निवडून आले... विरोधी संचालकांमध्ये महाडिक यांच्या स्नुषा शौमिका महाडिक यांचा समावेश होता, त्यामुळे त्यांनी गोकुळची सर्वसाधारण सभा अक्षरशः दणाणून सोडली. 15 सप्टेंबर 2023 2023 च्या सभेत शौमिका महाडिक यांनी सत्ताधाऱ्यांना अक्षरशा घाम फोडला... निवडून आलेल्या विरोधातील संचालकांपैकी केवळ शौमिका महाडिकच सर्व संचालकांनी विरोधात लढू लागल्या इतर तीन संचालक सत्ताधाऱ्यांबरोबर पाहायला मिळाले. 30 ऑगस्ट 2024 पशुखाद्य कारखाना ठिकाणी देखील सभेमध्ये गोंधळ होऊ लागल्याने बॅरिकेट लावून सभासदांना सोडले जाऊ लागले...यावेळी शौमिका महाडिक यांच्यासोबत आलेल्या सर्व सभासदांनी बॅरिकेट तोडून सभेच्या ठिकाणी प्रवेश केला. आज झालेल्या सभेत अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला नसला तरी सत्ताधारी आणि विरोधकांच्या घोषणामध्ये आजची सभा पार पडली. गोकुळच्या विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांनी सभेचे GFX Out
10
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 09, 2025 11:16:42
Akola, Maharashtra:
Anchor : अकोला शहरातील डाबकी रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार आहे..या घटनेने अकोला जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. मुलीची प्रकृती स्थिर असल्याचं सांगत, या प्रकरणातील आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्यामुळे त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करू, असे मिटकरी यांनी स्पष्ट केले.तसेच हा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. Byte : अमोल मिटकरी, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस
11
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 09, 2025 10:35:07
Raigad, Maharashtra:
स्‍लग – अलिबागमधील शेतकरयांचे धरणे आंदोलन आणि उपोषण ....... कंपन्‍यांनी खरेदी केलेल्‍या जमिनी परत करण्‍याची मागणी ........ अँकर – आपल्‍या जमिनी परत मिळाव्‍यात यासाठी अलिबागच्‍या खारेपाट विभागातील शेतकरयांनी आज रायगड जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन आणि उपोषण केले. पटनी एनर्जी व इतर काही कंपन्‍यांनी प्रकल्‍प उभारण्‍यासाठी मेढेखार व परीसरातील शेतकरयांच्‍या पिकत्‍या जमिनी खरेदी केल्‍या. 380 खातेदार शेतकरयांची 750 एकर जमीन 50 टक्‍के मोबदला देवून या जमिनी संबंधित कंपन्‍यांच्‍या नावावर देखील करण्‍यात आल्‍या परंतु अद्याप पूर्ण मोबदला दिला नाही किंवा या जमिनींवर प्रकल्‍पही उभारण्‍यात आला नाही. उलट खाडीची बांधबंदिस्‍ती न झाल्‍याने आजूबाजूच्‍या पिकत्‍या जमिनी नापिक होत असल्‍याचा आरोप या शेतकरयांनी केला आहे. बाईट - प्रकाश खरसांबळे, शेतकरी
13
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 09, 2025 10:33:21
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0909ZT_JALNA_JARANGE(1 FILES) जालना :ब्रेकिंग | राज्य सरकारने काढलेल्या जीआरमध्ये मोठी ताकद,हा जीआर निघायला 50 वर्षं लागली- जरांगे भुजबळ कोर्टात जायला लागले, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करायला लागले याचा अर्थ जीआर फार महत्वाचा आहे मराठ्यांचं सगळं भविष्य या जीआरमध्ये गुंतलं आहे मुख्यमंत्र्यांना 8 पानाचं पत्र लिहू द्या अथवा 800 पानांचं मुख्यमंत्री त्याला कोलून लावणार आहे,तो काही सरकारचा बाप नाही-जरांगे यांची भुजबळ यांच्यावर टिका सरकारने जीआरमध्ये हेराफेरी करायची नाही अन्यथा रस्त्यावरुन फिरू देणार नाही परस्पर जीआर काढला नाही,कॅबिनेट, उपसमितीने जीआर काढला,तू दिड छटाक पुस्तकं वाचून लई शहाणा झाला का.? भुजबळ यांना सवाल तू सगळ्यांचा सत्यानाश करून ठेवला भुजबळ यांच्यावर जरांगे यांची टिका तू सरकारचा बाप झाला आहे का.? फडणवीसांनी याला जेलमध्ये घालावे तात्काळ प्रमाणपत्र वाटायला सुरुवात करा अन्यथा काळ विदारक झाला असं म्हणू नका जरांगे यांचा सरकारला ईशारा अँकर : राज्य सरकारने काढलेल्या जीआरमध्ये मोठी ताकद,हा जीआर निघायला 50 वर्षं लागली असा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे.भुजबळ यांनी या जीआर बाबत मुख्यमंत्र्यांकडे 8 पानी पत्र लिहून तक्रार केली आहे. यावर जरांगे बोलत होते.भुजबळ कोर्टात जायला लागले, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करायला लागले याचा अर्थ जीआर फार महत्वाचा आहे असा दावाही जरांगे यांनी केला.मराठ्यांचं सगळं भविष्य या जीआरमध्ये गुंतलं आहे असंही जरांगे यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांना 8 पानाचं पत्र लिहू द्या अथवा 800 पानांचं मुख्यमंत्री त्याला कोलून लावणार आहे,तो काही सरकारचा बाप नाही अशी टीका जरांगे यांनी भुजबळ यांच्यावर केलीय.सरकारने जीआरमध्ये हेराफेरी करायची नाही अन्यथा रस्त्यावरुन फिरू देणार नाही असा ईशारा देखील जरांगे यांनी दिला.भुजबळ यांच्या परस्पर जीआर काढल्याच्या आरोपाला देखील जरांगे यांनी उत्तर दिलंय जीआर परस्पर काढला  नाही,कॅबिनेट, उपसमितीने जीआर काढला,तू दिड छटाक पुस्तकं वाचून लई शहाणा झाला का.? असा सवाल जरांगे यांनी भुजबळ यांना केला.तू सरकारचा बाप झाला आहे का.? फडणवीसांनी याला जेलमध्ये घालावे अशी मागणी जरांगे यांनी केली.तात्काळ कुणबी प्रमाणपत्र वाटायला सुरुवात करा अन्यथा काळ विदारक झाला असं म्हणू नका असा ईशारा जरांगे यांनी सरकारला दिला. बाईट : मनोज जरांगे पाटील
13
comment0
Report
SGSagar Gaikwad
Sept 09, 2025 10:02:17
Nashik, Maharashtra:
Feed send by TVU 51 Reporter-sagar gaikwad Slug-nsk_nmc_election *नाशिक महापालिका प्रभाग रचनेच्या हरकतींबवरील सुनावणी सुरू* अँकर नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेच्या आराखड्यावर आजपासून सुनावणी सुरू झालीये.... शिवसेना ठाकरे गटासह काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती घेतले आहेत...२२ ऑगस्टला जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेच्या आराखड्यावर घेतलेल्या हरकतीवर सचिव संजय खंदारे आणि मनपा युक्त मनीषा खत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत आजपासून सुनावणी झाली आहे..पालिकेच्या ३१ प्रभगरचेनेबाबत एकूण ९१ हरकती आले आहेत..प्राप्त हरकतींमध्ये प्रभाग २२ आणि ३१ संदर्भात आत्तापर्यंत सर्वाधिक ३९ तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत.. मागच्या महापालिका निवडणुकीत ज्या प्रभागांमध्ये तीन सदस्यांची संख्या होती त्याच प्रभागांमध्ये पुन्हा यंदा देखील तीन सदस्यांची संख्या ठेवल्याचे आक्षेप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे... तसेच इतरही प्रभाग रचना संदर्भात काही राजकीय पक्षातील नेत्यांनी आक्षेप घेत आपले म्हणणं अधिकाऱ्यांसमोर आज मांडले...आक्षेप घेतलेल्या स्थानिक नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिलीये.... बाईट- विक्रम कोठुळे ( राष्ट्रवादी काँग्रेस white शर्ट) बाईट- मसूद जीलानी  ( शिवसेना ठाकरे गट)
13
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 09, 2025 09:49:33
Pandharpur, Maharashtra:
Anchor - माढा तालुक्यातील कुर्डू येथील मुरूम उपसा प्रकरणा नंतर राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बाबाराजे जगताप यांचा अमली पदार्थ पितानाचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याचा कार्यक्रम करणार त्यांचा सहकारी नितीन जगताप यांची खुलेआम ग्रामस्थांना धमकी देणारा नाव व्हिडिओ समोर कुर्डू येथील मुरूम उत्खननावर कारवाईसाठी गेलेल्या महिला आयपीएस अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी फोन जोडून देणारे बाबाराजे जगताप यांचा अमली पदार्थ पितानाचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी वायरल झाला होता यानंतर आता त्यांचे सहकारी नितीन जगताप यांनी गावच्या मुख्य चौकामध्ये उभे राहून हा व्हिडिओ ज्या कोणी व्हायरल केलेला आहे. त्याला शोधून त्याचा कार्यक्रम करणार असा धमकी वजा इशारा दिलेला आहे. असा व्हिडिओ समोर आला आहे. तसेच नितीन जगताप आपण मोहिते पाटील यांचा कार्यकर्ता असल्याचा.उल्लेख करत आहे. पण मोहिते पाटील यांनी गावाचे नाव बीड सोबत च्या गुन्हेगारी प्रमाणे जोडल्याने त्यांचे काम या पुढे करणार नसल्याचा उल्लेख केला आहे त्यामुळे कुर्डू गावामध्ये आता दहशतीचा वातावरण असल्याचा पाहायला मिळते. प्रशासन आता यावर काय कारवाई करते हे पहावे लागेल. -----
14
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 09, 2025 09:49:01
Raigad, Maharashtra:
स्लग - अलिबाग ते वडखळ रस्त्याच्या दुरवस्थेवरून सर्वपक्षीय पदाधिकारी आक्रमक ...... महामार्ग विभागाच्या कार्यालयावर धडक ...... महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर ....... अँकर - अलिबाग ते वडखळ रस्त्याच्या दुरवस्थेवरून अलिबाग मधील सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज सर्वपक्षीय शिष्ट मंडळाने राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या पेण येथील कार्यालयात धडक दिली आणि कार्यकारी अभियंता यांना चांगलेच धारेवर धरले. पावसाळा सुरू झाल्यापासून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत त्याचा प्रचंड त्रास प्रवाशांना होतो आहे. त्यामुळे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. अखेर उद्यापासूनच या मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात येईल असं आश्वासन शिष्ट मंडळाला देण्यात आलं.
14
comment0
Report
Advertisement
Back to top