Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

शेतकऱ्यांचे रेल्वे रुळावर ठिय्या आंदोलन: प्रशासनाची दुर्लक्ष?

SMSarfaraj Musa
Jul 17, 2025 03:32:38
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - जमीनीच्या मोबदल्यासाठी आक्रमक शेतकरयांचा रेल्वे रुळावर ठिय्या आंदोलन.. अँकर - रेल्वे प्रशासना विरोधात सांगलीच्या वसगडे मध्ये शेतकरयांनी रेल्वे रुळावर झोपुन आंदोलन केले आहे.रात्रीपासून रेल्वे बाधित शेतकरयांनी रेल्वे रुळावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.यामुळे पुणे-मिरज रेल्वेसेवेवर परिणाम झाला आहे.संतप्त शेतकरयांनी पुणे-लोंढा दुहेरी मार्गावरील एका रुळावर ठाण मांडत आंदोलन सुरू केले आहे.वसगडे येथील 50 ते 60 शेतकरयांच्या पुणे-लोंढा दुहेरीकरणासाठी रेल्वे प्रशासनाकडुन जमीन संपादित करण्यात आल्या आहेत,मात्र आद्यप जमीनीचा मोबदला देण्यात आला नाही,गेल्या 2 वर्षांपासून शेतकरयांकडुन आंदोलन करण्यात येत आहे,मात्र रेल्वे प्रशासकडुन दखल घेण्यात येत आहे,त्यामुळे आक्रमक शेतकरयांनी रेल्वे प्रशासनाकडुन संपादित केलेल्या जमिनीवर गेल्या 2 दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे,मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने संतप्त शेतकरयांनी काल रात्री पासून थेट रेल्वे रूळावर ठिय्या मारत झोपून आंदोलन सुरू केले आहे.स्थानिक व रेल्वे प्रशासनाकडून शेतकरयांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला,मात्र मोबदला मिळत नाही,तो पर्यंत हटणार नाही,अशी भूमिका शेतकरयांनी घेतली आहे.
3
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top