Back
शेतकऱ्याने पाण्याच्या टाकीवर चढून कर्जमाफीसाठी आंदोलन केले!
VKVISHAL KAROLE
FollowJul 13, 2025 04:30:24
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn farmer andolan av
Feed attached
छत्रपती संभाजीनगर च्या तळेगाव येथील शेतकरी बाळू गव्हाड यांनी शनिवारी पाण्याच्या टाकीवर चढून कर्जमाफीसाठी शोलेस्टाइल आंदोलन केले. पावसाळी अधिवेशन सुरू असून सरकारकडून कर्जमाफीबाबत कोणताही निर्णय घेतला जात नसल्याने त्यांनी हे पाऊल उचलले. - जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत खाली
उतरणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. आत्महत्या करण्याची धमकीही दिली.बया प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच फुलंब्री तहसील कार्यालयाकडून नायब तहसीलदार संजीव राऊत घटनास्थळी पोहोचत शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन दिले आणि आंदोलन मागे घेण्यात आले
2
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowJul 13, 2025 13:37:18Washim, Maharashtra:
वाशिम:
File3:1307ZT_WSM_RATHOD_CIVILHONORS
WSM_RATHOD_BT
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशीम
अँकर:वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथील श्री संत सेवालाल महाराज मंदिर आणि जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचा वाशिम शहरात भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्याला बंजारा समाजबांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मंत्री संजय राठोड यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले.पोहरादेवीच्या धार्मिक आणि सामाजिक कार्याला चालना देणाऱ्या विकास योजनांमुळे बंजारा समाजात समाधान व्यक्त होत आहे.
व्हिवो:नगरी सत्कार कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना राज्याचे मंत्री संजय राठोड अचानक भावूक झाले.भाषणाच्या दरम्यान त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले आणि काही क्षणांसाठी ते थांबले.भावूक होत मंत्री राठोड म्हणाले,माझ्यावर समाजाचा जेवढा विश्वास आहे,आणि ज्या अपेक्षा आहेत, त्या मी पूर्ण करू शकेन की नाही ही भावना मनात आल्याने मी भारावून गेलो.आज कार्यक्रमात मला जे प्रेम आणि जिव्हाळा मिळाला तो मी कधीच विसरू शकणार नाही.कोणतेही संकट असो माझा बंजारी समाज एक जुटीने माझ्या पाठीशी खंबीर पणे उभा असतो.मंत्री संजय राठोड भाषणा दरम्यान भावनिक झाले होते.निवडणुका वेळी अनेक जण विरोध करतात मात्र माझा बंजारा बांधव माझ्या पाठीशी असतो.मंत्री संजय राठोड यांनी वाशिम मध्ये झालेल्या नागरी सत्कार सोहळ्यात बोलत होते.
बाईट:संजय राठोड,मृद व जलसंधारण मंत्री
0
Share
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 13, 2025 13:34:52Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग : काळे फासण्याची घटना घडल्यानंतर प्रवीण गायकवाड यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला
- काळे फासण्याची घटना घडल्यानंतर प्रवीण गायकवाड यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला
- शिवव्याख्याते शिवरत्न शेटे यांनी केला सत्कार
- माध्यमांशी बोलताना प्रवीण गायकवाड म्हणाले, मी या विषयावर आत्ताच बोलणार नाही.
- योग्यवेळी प्रत्युत्तर दिल्यानंतर आम्ही आमची भूमिका आपल्यासमोर मांडतो
- दरम्यान संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी डोळ्याची तपासणी देखील केली.
0
Share
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 13, 2025 13:05:12Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
1 FILE
SLUG NAME -SAT_GORE
सातारा: फलटण येथील मेळाव्यात ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर जहरी टीका केलीये यावेळी त्यांनी असत्य, कटकारस्थानाचा आनंद तात्पुरता असतो. शकुनी मामांनी कटकारस्थानातून दुर्योधनाच्या अंताचा आसुरी आनंद घेतला. तशाच प्रकारचा असुरी आनंद जयकुमार गोरे, रणजितसिंह तसेच गाळेधारकांवर अन्याय करत असताना ते आसुरी आनंद घेत होते. मात्र त्यांनी रचलेला डाव आता त्यांच्यावरच उलटला आहे. स्वतःला वाचवण्यासाठी कोणा-कोणाचे पाय धरलेत हे मला माहित आहे. परमेश्वराच्या रूपाने आपणाला देवेंद्र पावले. मी माफ केलं म्हणून जेलमध्ये बसायचं वाचलात. त्याची जाणीव ठेवा. आता तरी सुधरा.नीट वागा. चुकीचं वागलात तर ते तुम्हालाच फेडावे लागणार आहे हे ही ध्यानात ठेवा. अशी खरमरीत टीका ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर केली.
स्टेज बाईट: मंत्री जयकुमार गोरे
0
Share
Report
PPPRANAV POLEKAR
FollowJul 13, 2025 13:02:13Ratnagiri, Maharashtra:
ब्रेकिंग :
परशुराम घाटातील संरक्षक भिंती वाचवण्यासाठी प्रशासनाकडून प्लास्टिक ताडपत्रीचा आधार....ठोस उपाया योजना नाहीच
मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या बाबतीत प्रशासनाची उदासीनता पुन्हा समोर.
वारंवार ताडपत्रीचा उपाय फोल ठरून देखील परशुराम घाटात पुन्हा ताडपत्री पसरल्याने स्थानिकांसह वाहनचालकांमध्ये नाराजी.
पावसाचे पाणी थेट मातीमध्ये झिरपू नये यासाठी शंभर मीटर हून अधिक भागात ताडपत्रीचा आधार.
परशुराम घाटातील अनेक भागात काँक्रिट ला गेलेलं तडे देखील बुजवण्याचे काम सुरू.
घाटातील एक लेन वाहतुकीसाठी आहे बंद.
लोकेशन : चिपळूण
0
Share
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 13, 2025 12:35:31Yeola, Maharashtra:
अँकर:-राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी एकत्र मेळावा घेऊन युती करण्याचे संकेत दिले यामुळे शिंदे गटात चलबिचल झाल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली वारी केली यावर मंत्री छगन भुजबळ यांना प्रश्न विचारला असता छगन भुजबळ म्हणाले की कोणाचा लोकसंग्रह वाढला आणि कोणाचा कमी झाला याच मोजमाप बॅरोमीटर म्हणजे निवडणूक आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत कळेलच कोण पुढे जाते आणि कोण मागे राहते असे वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्यातील पत्रकार परिषदेमध्ये केले आहे.
0
Share
Report
ABATISH BHOIR
FollowJul 13, 2025 12:34:36Kalyan, Maharashtra:
झोपेत असलेल्या कुटुंबावर कोसळले घराचे छत
घराचे नुकसान सुदैवाने जीवितहानी नाही
Anc.. कल्याण पूर्वेतील मंगल राघो नगर गणेशनगर भागात चाळीतील एका घराचे जीर्ण झालेले छप्पर कोसळल्याची दुर्घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली. नरेश रंगारे हे आपल्या कुटुंबियांसह दुर्वांकुर सोसायटी मध्ये वास्तव्यास आहेत. आपल्या कौलारू घरातील जीर्ण झालेले व वाळवी लागलेले वासे तुटल्याने घरावरील छत उंचावरून खाली जमिनीवर कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी घराचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
0
Share
Report
SKShubham Koli
FollowJul 13, 2025 12:03:02Thane, Maharashtra:
ठाण्यातील नागला बंदर भागा एका अज्ञात वाहनाने एका दुचाकीला जोरदार दिली धडक...
ठाण्यातील घोडबंदर मार्गावरून ठाण्याच्या दिशेला दुचाकीस्वार गजल तुटेजा ही महिला प्रवास करत असताना एक अज्ञात वाहनाने धडक दिल्याने महिलेस गंभीर दुखापत झाली असून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे घटनेची माहिती कासारवडवली पोलिसांना मिळाल्यानंतर कासारवडवली पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तिचा मृतदेह ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.
या अपघाताची नोंद कासारवडवली पोलीस ठाण्यात करण्
0
Share
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 13, 2025 12:02:33Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणी तालुक्यातील संबर येथील 22 वर्षीय अपहरण झालेल्या तरुणाचा सेलू तालुक्यातील मोरेगाव येथील कॅनलच्या परिसरात मृतदेह आढळून आलाय. यामुळे एकच खळबळ माजलीय. ओंकार बन्सीधर गायकवाड अस मयताचे नाव असून तो परभणी तालुक्यातील संबर गावचा रहिवाशी होता. परभणी ग्रामीण पोलिस ठाण्यात मयताचे वडील बन्सीधर गायकवाड यांनी आपल्या मुलाचे अहपरण केल्याची तक्रार काल दिली होती. आज याच अपहरण झालेला मुलाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजलीय, पैशाच्या देण्याघेण्याच्या कारणावरून त्याचं अपहरण केल्याची तक्रार परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात केली होती. त्यानंतर पोलिसांनी ओंकारचा शोध घेण्याचा प्रयत्न देखील केलाय, परंतु ओंकारला शोधण्यात पोलिसांना यश आले नाही. अपहरण करून ओंकारचा खून केल्याचा संशय ओंकारचा भाऊ आणि वडिलांना आहे,त्यावरून पोलीस तपास करतायेत.
बाईट- बन्सीधार गायकवाड -मयताचे वडील
बाईट- मयताचा भाऊ
0
Share
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 13, 2025 11:30:39Parbhani, Maharashtra:
अँकर- शाळा ही विद्येच माहेर घर असते, येथे मुलं शिक्षण आणि संस्कार घेऊन देशाचं भविष्य घडवीत असतात.पण याच विद्येच्या मंदिराला ज्ञानदान करणारे गुरुजीच दारूचा अड्डा बनवतायेत. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील खोकलेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक बिराजदार यांना वर्गातच मद्यपान करीत असतांना पालकांनी रंगेहात पकडलय, यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ माजलीय,
व्हीओ- परभणीच्या झिरो फाटा येथील हायटेक रेसिडेन्सी स्कुल मध्ये टीसी परत मागण्यासाठी गेलेल्या पालकाला जीवे ठार मारल्याची घटना ताजी असतांनाच परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील खोकलेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत आणखीन एक करारनामा उघड झालाय,शासनाने नुकताच शासकीय कार्यालयात वाढदिवस करणाऱ्यावर बंदी घातली खोकलेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील वर्गात मुख्याध्यापक चक्क दारू पीत असतांना पालकांनी रंगेहात पकडलय,गया वया करणाऱ्या या मुख्याध्यापकाचे व्हिडीओ मोबाईल कॅमेर्यात पालकांनी कैद केलेत,शिवाय हा मुख्याध्यापकाने शाळेतच घरोबा केल्याचा आरोप ही पालक करतायेत.
बाईट- मतीन शेख- महिलेचा मुलगा
व्हीओ- खोकलेवाडी येथील संतप्त पालकांनी या मद्यपी शिक्षकाची तात्काळ बदली करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सरपंच सुशीला नामदेव मलगे यांनी शिक्षण अधिकारी परभणी यांच्याकडे केलीय. बदली न केल्यास गावची शाळा बंद ठेवण्याचा इशारा गावकर्यांनी शिक्षण विभागाला दिलाय. या तळीराम शिक्षकामुळे शाळेची गुणवत्ता ढासळली असून हजेरी पटावरील पटसंख्या ही कमी झल्याच पालक सांगतायेत. शिवाय शाळेत मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली असून यातून विद्यार्थ्यांना आजाराची लागण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बाईट-बालाजी आंधळे - पालक
बाईट-
बाईट- ज्ञानेश्वर खोकले- पालक
व्हीओ- या मद्यपी शिक्षकामुळे शाळेचा ताळमेळ राहिला नसून शिक्षणाचा दर्जा खालावला आहे,अगोदरच पालक आपले मूल जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवीत नसतांना गुरुजीच जर दारूचे बुचन शाळेत उघडत असतील तर मुलांवर कोणते संस्कार होतील हा प्रश्न पालकांना सतावीत आहे,त्यामुळे या मुख्याध्यापकावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली जात आहे...
गजानन देशमुख, झी मीडिया,परभणी
0
Share
Report
JJJAYESH JAGAD
FollowJul 13, 2025 11:08:52Akola, Maharashtra:
4 फाईल्स आहेत..AVB
Anchor : मशीद आणि इस्लाम धर्माबाबतचे असणारे गैरसमज दूर करून इस्लाम विषयी माहिती देण्याच्या उद्दिष्टाने अकोल्यातील ' राईटवे ' या सामाजिक संस्थे तर्फे एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला ...' राष्ट्रीय एकता मस्जिद परिचय ' असे या उपक्रमाचे नाव असून या माध्यमातून इस्लाम धर्म, रोजाच महत्तव आणि मशिदीतील प्रार्थनांची माहिती देण्यात आलीय..
Vo 1 : नमाज म्हणजे काय , मशीद आतून कशी असते, मशिदीत प्रार्थना कशी करतात असे अनेक प्रश्न अन्य धर्मीय लोकांना अनेकदा पडतो... गैरमुस्लिम धर्मियांच्या मनातील अशा अनेक प्रश्नांचे समाधान करण्यासाठी अकोल्यातील ' राईटवे ' तर्फे 'मशीद परिचय ' उपक्रमाचे आयोजन करण्यात आलंय...माध्यमातून रूढी परंपरांची मुस्लिमेतर धर्मियांना माहिती व्हावी , इतर धर्मियांसोबत बंधुत्व वाढावा आणि मुस्लिम समाजबाबत असणारी नकारात्मक धारणा बदलावी हे या उपक्रमामागील मुख्य उद्देश होत..त्यानूसार आज झालेल्या मस्जिद परिचय कार्यक्रमात मशिदीचे महत्व काय ? मशिदीत नमाज (प्रार्थना) कशी अदा करतात ? ती का करतात ? 5 वेळा नमाज करण्यामागील उद्देश काय? दिवसात असणाऱ्या प्रार्थनांपैकी प्रत्येक प्रार्थनेचे महत्व काय? वेगळेपण काय? अशा अनेक मुद्द्याची माहिती या वेळी उपस्थितांना देण्यात आली ...
Byte : सज्जाद खान , आयोजक.
10
Share
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowJul 13, 2025 11:08:09Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज...
स्किप्ट ::- 70 वर्षीय सासूला सुने कडून अमानुष मारहाण....नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस...
AC ::- लातूर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे...
किरकोळ कारणावरून एका 70 वर्षीय वृद्ध सासूला तिच्या सुनेकडून अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.
या व्हिडिओत वृद्ध महिलेचे केस ओढत, तिला जमिनीवर फरफटत नेताना आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करतानाचे दृश्य दिसत आहे...
हा संतापजनक प्रकार शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सुमठाणा गावातील असल्याचे बोलले जात आहे
विशेष म्हणजे, इतकी गंभीर घटना समोर येऊनही या प्रकरणी अद्याप कोणतीही पोलिस तक्रार दाखल झालेली नाही.दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला असला तरी ZEE 24 TAAS या व्हिडिओची पुष्टी करत नाही....
0
Share
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 13, 2025 11:05:30Yeola, Maharashtra:
अँकर :-राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे येवला मतदार संघाच्या दौऱ्यावर आले असता पत्रकारांनी उज्वल निकम यांना राज्यसभेचे खासदारकी मिळते मात्र आपल्यासारख्या सीनियर नेत्याला का नाही.? असा प्रश्न विचारला असता भुजबळांनी त्यावर शिळ्या कडीला ऊत का ?.... आणता अशी कोपरखिळी लावली
2
Share
Report
ABATISH BHOIR
FollowJul 13, 2025 11:04:13Kalyan, Maharashtra:
शालिमार एक्सप्रेसमधून गांजा तस्कर गजाआड साडेआठ किलो गांजा जप्त
आरपीएफ आणि कल्याण रेल्वे पोलिसांची कारवाई
ओडिसातून भिवंडीसाठी आणला होता गांजा
Anchor : शालिमार एक्सप्रेसमधून गांजाची तस्करी करत असलेल्या एका.आरोपीला आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांनी संयुक्त कारवाईत अटक केली आहे. शिराज खलील खान असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून, तो मूळचा उत्तर प्रदेशातील प्रयागराजचा आहे तिथे तो वेल्डिंगचे काम करत होता .त्याने गांजा ओडिसा येथून आणला असून भिवंडी येथे पोहचवणार असल्याची कबुली त्याने दिली आहे
Vo...आज पहाटे साडेपाच वाजता शिराज खान शालिमार एक्सप्रेसने कल्याण स्टेशनवर उतरला. त्यावेळी स्टेशन परिसरात संशयास्पद हालचाली करत असल्याने गस्तीवर असलेल्या रेल्वे पोलिसांनी पोलिसांनी त्याला थांबवून झडती घेतली असता, त्याच्याकडे सुमारे ८.५ किलो गांजा आढळून आला. या गांजाची अंदाजे किंमत ६९ हजार रुपये असल्याची माहिती आहे.प्राथमिक चौकशीत शिराज खानने गांजा ओडिसा येथून आणला असून ती भिवंडी येथे पोहचवणार असल्याची कबुली दिली आहे. सध्या आरोपीविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास कल्याण रेल्वे पोलीस करत आहे.
0
Share
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 13, 2025 11:03:12Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे काळं फासण्यात आलं
- *संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे काळं फासण्यात आलं*
- प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले असताना घडली घटना
- शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांनी काळं फसल्याची माहिती
- प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवधर्म फाउंडेशन आक्रमक होते
- त्याचबरोबर स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केल्याचा देखील राग पदाधिकाऱ्यांच्या मनात होता
- यापूर्वी शिवधर्म फाउंडेशन ने संभाजी ब्रिगेडच्या विरोधात उपोषण देखील केले होते
- दरम्यान आज अक्कलकोट मध्ये प्रवीण गायकवाड यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता त्यावेळी त्यांना काळं फासण्यात आलं
2
Share
Report
NMNITESH MAHAJAN
FollowJul 13, 2025 11:02:53Jalna, Maharashtra:
FEED NAME | 1307ZT_JALNA_JARANGE(1 FILE)
जालना : तर मुंबईत मराठे मुंग्यांसारखे दिसतील,जरांगे यांचा राज्य सरकारला ईशारा
मि मुंबईत मरेन अथवा आरक्षणाचा विजय घेऊनच परत येईल-जरांगे
मला भेटायला येणारे प्रत्येक नेते फडणवीस यांच्याजवळ आमच्या मागण्या सोडवण्याबाबत बोलत आहे
अँकर : राज्य सरकारने 29 ऑगस्टच्या आत आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा मुंबईत मराठे मुंग्यांसारखे दिसतील असा ईशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे.मला भेटायला येणारे प्रत्येक नेते हे आमच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करत आहे.मात्र तरीही मागण्या पूर्ण न झाल्यास यावेळी मुंबईत मराठे हे मुंग्यांसारखे दिसतील असा ईशारा जरांगे यांनी दिला.यावेळी मुंबईत गेल्यानंतर मि तिथे मरेन किंवा आरक्षण घेऊनच परत येईल असा ईशाराही द्यायला जरांगे विसरले नाहीत
बाईट : मनोज जरांगे
1
Share
Report