Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांचा उपोषण: सुमित कदम यांचे आश्वासन!

SMSarfaraj Musa
Aug 04, 2025 00:46:57
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - चौथ्या दिवशी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांचा आंदोलन सुरूच, जनसुराज्यशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुमित कदम यांनी आंदोलकांची भेट घेत प्रश्न मार्गी लावण्याचे दिले आश्वासन. अँकर - सांगली मध्ये गेल्या चार दिवसांपासून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण नाथ्यांचा बेमुदत आंदोलन सुरू आहे.तुकाराम बाबा महाराजांकडून अन्न त्याग करत चौथ्या दिवशीही उपोषण सुरू आहे.या आंदोलनाची जनसुराज्य शक्ती पक्षाकडून दखल घेण्यात आली असून प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी शहरातील स्टेशन चौक ते सुरू असलेल्या आंदोलनाला भेट देत पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक मार्ग काढण्याची मागणी करणार असल्याचं स्पष्ट करत सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन मागण्यांच्या बाबतीत पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी समित कदम यांनी दिले आहे. बाईट - समित कदम - प्रदेशाध्यक्ष - जनसुराज्य शक्ती पक्ष .
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Aug 04, 2025 06:18:48
Dhule, Maharashtra:
Anchor - खान्देशसाठी सर्वात मोठा उत्सव म्हणून कानुमातेच्या उत्सव साजरा केला जात असतो, श्रावण महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या रविवारी कानुमातेच्या उत्सवाला सुरुवात होत असते तर सोमवारी कानुमातेला विसर्जन दिला जात असतो, अवघ्या एक दिवसाची असलेली या कानुमातेसाठी सर्व कुटुंब एकत्र येत पूजा आर्च करत पूर्ण रात्रभर मोठ्या भक्तीमाई वातावरणात खान्देशात कानुमाता उत्सव साजरा केला जात असतो, असं म्हटलं जातं की कानुमाता आली की श्रावण महिन्याच्या पावसाला सुरुवात होत असते आणि शेतकरी राजा मोठा समाधान देऊन जात असतं तर संपूर्ण कुटुंबाला सुख शांती लाभो आणि वर्षातून एकदा सोबत येण्याचं एक मोठा उत्सव मांडला जात असतो, खान्देशात लाखोच्या संख्येने कानूबाई मातेची स्थापना केली जात असते, डीजे आणि ढोल चा तालावर नाचत गाजत, फुगडी खेळत कानू मातेला विसर्जन दिल जात आहे. प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
Report
YKYOGESH KHARE
Aug 04, 2025 06:18:29
Nashik, Maharashtra:
nsk_bhavikchoupal फीड by live u Anchor त्र्यंबकेश्वरचे दर्शनसाठी लाखो भाविकांमध्ये तरुणाई सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये आहे युवकांचं महादेव भक्तीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी
0
Report
ABATISH BHOIR
Aug 04, 2025 06:00:21
Kalyan, Maharashtra:
दोन्ही सीट आमच्या! " कसारा लोकलमध्ये चाकरमान्यांची दादागिरी, प्रवाशांचा गोंधळ – मोबाईल व्हिडिओ व्हायरल! Anc..कसारा ते कल्याण दरम्यान लोकल ट्रेनमध्ये आज सकाळी मोठा गोंधळ उडाला.दररोज कसाऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पहाटे 6:10 वाजताच्या लोकल ट्रेनमध्ये, दररोज प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांच्या एका ग्रुपने सीट राखून ठेवण्यासाठी दादागिरी केली.या ग्रुपमधील एका प्रवाशाने स्वतः खिडकीच्या सीटवर बसत, शेजारच्या दोन सीट्सवर आपली बॅग ठेवली आणि इतर प्रवाशांना तिथे बसण्यास मज्जाव केला.त्याचा स्पष्टपणे आग्रह होता, "आमचा माणूस येणार आहे, दोन्हीही सीट आमच्या आहेत, तुम्हाला जे करायचं आहे करा."या बोलण्यामुळे अन्य प्रवाशी संतप्त झाले आणि त्यांनी त्या ठिकाणी गोंधळ घातला. काही प्रवाशांनी या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केला.व्हिडिओ शूट होताच संबंधित ग्रुपने शांतता राखली, मात्र हा प्रकार तितकाच धक्कादायक होता.या प्रकारामुळे सकाळच्या वेळेस रेल्वेचा प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांना जागा असूनही उभं राहून प्रवास करावा लागला. यामुळे मुंबई लोकलमधील अशा गटबाजी व दादागिरीवर रेल्वे प्रशासनाने कठोर पावले उचलावीत,अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.
4
Report
TTTUSHAR TAPASE
Aug 04, 2025 05:33:13
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE 1 FILE SLUG NAME -SAT_NH4_STANT सातारा - पुणे-बेंगळूर महामार्गावर वेळे ते पाचवड दरम्यान काही युवक चारचाकीवर धोकादायक स्टंट करताना दिसले. पुण्याहून साताऱ्याकडे येताना वाहनधारकांनी हा प्रकार पाहून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.या प्रकारामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून, संबंधित युवकांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
8
Report
AAASHISH AMBADE
Aug 04, 2025 05:19:50
Chandrapur, Maharashtra:
Attn Desk:-- This is peekpani story Feed slug :--- 0408ZT_CHP_BAMBOO_FARMING ( single file sent on 2C)  टायटल:-- पारंपरिक पिकांना फाटा देत चंद्रपूर जिल्ह्यातील पांढरकवडा येथील  शेतकऱ्याने आपल्या १२ एकर शेतीत रुजविला बांबू अँकर :- आधुनिक युगात बांबूपासून तयार होणाऱ्या निरनिराळ्या  देखण्या वस्तू आणि बांबूची वाढती मागणी  लक्षात घेता, चंद्रपूर जिल्ह्यातील पांढरकवडा येथील आशिष दीक्षित या तरुण शेतकऱ्याने धान, सोयाबीन, कापूस अशा पारंपरिक पिकांना फाटा देत आपल्या १२ एकर शेतीत बांबूची लागवड केली. आधुनिक युगात बांबू पासून निर्माण होणाऱ्या निरनिराळ्या सुबक वस्तू , परिसरातील कागद उद्योगात बांबूची मागणी, पारंपरिक पिकांवर उद्भवणारे आसमानी संकट, शेतमजुरांची कमतरता अश्या विविध बाबी लक्षात घेता, आशिष दिक्षित यांनी आपल्या १२ एकर शेतात बांबूची लागवड केली असून त्याकरिता त्यांना फक्त ५० हजाराचा खर्च आला असून साधारण तीन ते साडेतीन वर्षात हे बाबू पिक कापणीला येते. याकरिता अतिरिक्त रासायनिक खतांचा वापर करावा लागत नसल्याने बांबू लागवडीचा खर्च इतर पिकांच्या तुलनेत कमी  येतो. त्यामुळे आपण पारंपरिक पिकांना फाटा देत आपल्या १२ एकर शेतीत बाबू शेती केल्याचं आशीष दिक्षित सांगतात. त्यांचा हा प्रयोग आगामी काळात ईतर शेतकऱ्यांना नक्कीच फायद्याचा ठरू शकतो.  बाईट १) आशिष दीक्षित, शेतकरी  बाईट २) विलास कोसनकर, विभागीय वन अधिकारी,बांबू प्रशिक्षण केंद्र, चंद्रपूर आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
10
Report
SRSHRIKANT RAUT
Aug 04, 2025 05:19:29
Yavatmal, Maharashtra:
नागपूर तुळजापूर महामार्गाच्या कामासाठी सद्भाव कंपनीने यवतमाळ उमरखेड जवळ उभारलेल्या कॅम्प मधून कंपनीचे मॅनेजर व फायनान्स मॅनेजर यांनी सात वाहनांची परस्पर विक्री करून चोरी केल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली आहे. प्रोजेक्ट मॅनेजर ने दिलेल्या तक्रारीनुसार चार जणांविरुद्ध गुन्हा देखील दाखल झाला आहे. या महामार्गाचे काम काही वर्षांपासून रखडले होते, आता ते पूर्णत्वास येत असताना कंपनीच्या मशिनरी प्लांट च्या सर्वेसाठी हेड ऑफिस चे अधिकारी आले, यावेळी कंपनीची मशिनरी, हायवा, टी एम, पाणी टँकर अशी दुरुस्त व नादुरुस्त वाहने उभी होती. मात्र दुसऱ्या दिवशी ही वाहने तिथे नव्हती. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ही वाहने विक्री केल्याचे समोर आले.
14
Report
TTTUSHAR TAPASE
Aug 04, 2025 05:19:20
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE 1 FILES SLUG NAME -SAT_YAVTESHWAR सातारा: श्रावण महिन्यातील आज दुसऱ्या सोमवार निमित्त साताऱ्यातील यवतेश्वर येथे प्रसिद्ध श्री यवतेश्वर महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या मंदिराची स्थापना 11 व्या शतकात झालेली आहे. या मंदिराला पांडवकालीन इतिहास आहे त्याचबरोबर या मंदिराला विशेष प्राचीन ऐतिहासिक महत्त्व असल्याने मोठ्या संख्येने भाविक या यवतेश्वरच्या महादेवाच्या दर्शनासाठी गर्दी करत आहेत.
13
Report
SMSarfaraj Musa
Aug 04, 2025 05:16:23
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
Sng_bibtya स्लग - येलूर परिसरात बिबट्याचा वावर,घराच्या बाहेर असणाऱ्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करत केले थाट,घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. अँकर - सांगलीच्या वाळवा तालुक्यातील येलूर येथे एका बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करत ठार केल्याचा प्रकार घडला आहे. येलूर गावातील शिवाजी विठ्ठल पाटील यांच्या शेतातील घराबाहेर बांधलेल्या एका पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हा हल्ला केला असून सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे,या हल्ल्यात कुत्र्याचा मृत्यू झाला आहे. येलूर-कुरळप वेशीवर शेतात घर असलेले शिवाजी पाटील यांच्या घराबाहेर एक कुत्रा साखळीने बांधलेला होता.मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने दबा धरून कुत्र्यावर हल्ला केला.बिबट्याने कुत्र्याला फरफटत नेण्याचा प्रयत्न केला,मात्र साखळीला बांधलेला असल्यामुळे तो त्याला दूरवर घेऊन जाऊ शकला नाही. ही संपूर्ण घटना पाटील यांच्या घरावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.मात्र बिबट्याच्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा,अशी मागणी करण्यात येत आहे.
14
Report
VKVISHAL KAROLE
Aug 04, 2025 05:01:55
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
csn suicide photo attchez मोबाईल न दिल्याच्या रागात 16 वर्षीय मुलाची डोंगरावरून उडी आत्महत्या खावडा डोंगरावरून घेतली उडी, ANCHOR: मोबाईल घेऊन दिला नाही, या कारणावरून 16 वर्षीय मुलाने थेट खवडा डोंगरावरून उडी मारून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत तरुणाचे नाव अथर्व गोपाल तायडे असून तो मूळचा जळगाव जामोद, जि. बुलढाणा येथील रहिवासी आहे. सध्या तो स्वातिक सिटी, साजापूर शिवार, वाळूज येथे राहत होता. तो पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेत होता. आईकडे मोबाईल मागितला, पण तीने नकार दिला. रागाच्या भरात अथर्वने तिसगाव येथील खावडा डोंगरावरून उडी मारली. ही घटना पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी अवस्थेत असलेल्या अथर्वला तातडीने दवाखान्यात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेनंतर आईने फोडलेला हंबरडा हृदयद्रावक होता. वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्या तपास सुरुय...
12
Report
PPPRANAV POLEKAR
Aug 04, 2025 05:01:06
Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी हातखंबा येथे HP गॅस टॅंकरचा अपघात ग्रामस्थ आक्रमक, ग्रामस्थांनी केला महामार्ग रास्ता रोको गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा आजचा दुसरा अपघात
12
Report
ADANIRUDHA DAWALE
Aug 04, 2025 05:00:55
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_DAM_WKT तीन फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणात केवळ 50 टक्के जलसाठा; अमरावतीकरांची वाढली चिंता, पर्यटकांचीही निराशा अँकर :- अर्धा पावसाळा संपलेला आहे तरीही पश्चिम विदर्भात पुरेसा पाऊस न झाल्याने संपूर्ण पश्चिम विदर्भात पावसाची तूट जाणवायला सुरुवात झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील अप्पर वर्धा धरण पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ धरण आहे. या धरणातून अमरावती शहराला पिण्याचा पाणीपुरवठा केला जातो. तसेच पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांना सिंचनासाठीही याच धरणातून पाणीपुरवठा होतो. मात्र यंदा अर्धा पावसाळा संपला असून या धरणात केवळ 50 टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त केल्या जात आहे. दरम्यान या धरणावरील विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल होत असून अर्धा पावसाळा संपला असूनही या धरणाचा एकही दरवाजा अजून न ऊघडल्याने पर्यटकांच्या पदरी निराशा पडत आहे. धरण परिसरातून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी WKT
14
Report
PPPRASHANT PARDESHI
Aug 04, 2025 04:17:30
Dhule, Maharashtra:
Anchor - अक्कलकुवा तालुक्यातील मोठी राजमोही या शिवारात बिबट्या मृत झाला, मोठी राजमोही शिवारातील संजयसिंग वळवी यांचा गुरांच्या गोठ्यात शेजारील आंब्याच्या झाडावर चढत झोपलीत उडी मारत असताना बिबट्याचा अपघात झाला आणि त्यात त्याच्या मृत्यू झाला आहे. अक्कलकुवा, तळोदा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बिबट्या आहेत. त्यामुळे या बिबट्याच्या अपघात झाला की घातपात झाला याबाबत वन विभागाकडून तपास सुरू आहे. परंतु मृत्यू अवस्थेत सापडलेल्या बिबट्याच्या पंचनामा करत या बिबट्याच्या अंतिम संस्कार करण्यात आला आहे. अक्कलकुवा तळोदा तालुक्यातील बिबट्याने अनेकांच्या जीव घेतला आहे. तर पाळीव प्राणी देखील ठार केले आहेत. मात्र वन विभागाकडून कठोर अशा उपायोजना केल्या जात नाहीत, त्यामुळे मोठी राजमोही या शिवारात बिबट्याच्या झालेल्या मृत्यू संदर्भात वनविभागाकडून आता सखोल तपास केला जाणार असून याबाबत खरंच अपघात झाला की घातपात याबाबत तपास होणार आहे. प्रशांत परदेशी, नंदुरबार.
14
Report
GMGANESH MOHALE
Aug 04, 2025 04:17:25
Washim, Maharashtra:
वाशिम: File:0408ZT_WSM_LABOURER_DEATH रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर: वाशीम च्या मालेगाव तालुक्यातील सुकांडा येथील रमेश आंधळे या शेतमजुराचा विहिरीत बुडून मृत्यू झाला.शेतात दिवसभर मजुरी केल्यानंतर ते पोहण्यासाठी विहिरीत उतरले होते.पोहत असताना तोल गेल्यामुळे ते विहिरीत बुडाले.पाण्याचा स्तर अधिक व मृतदेह खोलवर गेल्याने तो बाहेर काढणे कठीण झाले.ग्रामस्थांच्या मदतीने प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण केले. एक तासाच्या प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला.हलाखीच्या परिस्थितीत रमेश आंधळे रोजमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.त्यांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठवला असून याबाबचा अधिक तपास मालेगाव पोलीस करीत आहेत.
14
Report
AKAMAR KANE
Aug 04, 2025 04:16:42
kolhapur, Maharashtra:
नागपूर लिंक assingment ला पाठवली त्यातील Tc ---- Tc (19.53 तो 20.55) विदर्भातील रोजगाराच्या संधी अजून वाढवायच्या आहे.त्यामुळे विदर्भाची गरिबी दूर करायची आहे. सुखी, समृद्ध, संपन्न.विदर्भ बनेल ज्यावेळेस कृषी आणि उद्योग क्षेत्रात चांगला विकास होईल.. इथल्या लोकांच्या आकांक्षा विकासासोबत जोडलेल्या आहे. गांधी आणि नेहरूंच्या दोन बाबी खूप प्रसिद्ध आहेत. नेहरू जी म्हणायचे की आम्हाला जास्तीत जास्त उत्पादन हवे आहे... तर गांधीजी म्हणायचे जास्तीत जास्त लोकांचा समावेश करून अधिकाधिक उत्पादन हवे.. रोजगार निर्मिती करणे हीच आमची सगळ्यात मोठी प्रायोरिटी असल्याचे गडकरींनी सांगितले कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीस नागपूर कार्यालयाचे गडकरीच्या हस्ते उदघाट्न झाले.. यावेळी ते बोलत होते.. देशात चांगले रसते झाल्यामुळे लॉजिस्टिक कॉस्ट 16 वरून 10 टक्क्यावर आलीय... ती डिसेंबरपर्यंत 9 टक्क्यावर आणू असेही गडकरी म्हणाले..
14
Report
PPPRASHANT PARDESHI
Aug 04, 2025 04:16:31
Dhule, Maharashtra:
ANCHOR - धुळे जिल्ह्यामध्ये पारंपारिक कानबाई उत्सवाची धूम पाहायला मिळाली. कानबाई उत्सवानिमित्त घरोघरी विधिवत मातेची पूजन करण्यात आले. तसेच यावेळी सर्व कुटुंब एकत्र येत एकमेकांच्या भेटीगाठी घेतात. कानबाई माता ची स्थापना झाल्यानंतर ठिकठिकाणी रात्रभर नृत्य गीतांसह भक्तीचा जागर केला जातो. या निमित्ताने सर्व कुटुंब परिवार एकत्र आले असल्याने एक वेगळंच उत्साहाच आणि आनंदाच वातावरण खानदेशात दिसून येतं. विशेष म्हणजे पारंपरिक व विविध पद्धतीने मातेची स्थापना केल्यानंतर कानबाई मातेला रोटांचा नैवेद्य दाखवला जातो. हा प्रसाद कुटुंबातील सदस्यांना दिला जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कानबाई मातेची विधिवत मिरवणूक काढत विसर्जन केल जातं. प्रशांत परदेशी, धुळे.
14
Report
Advertisement
Back to top