Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

नवरात्र में येवला में दुर्गा माता दौड़, Sambhaji Bhide के मार्गदर्शन में

SKSudarshan Khillare
Sept 26, 2025 01:02:09
Yeola, Maharashtra
अँकर:- नवरात्र उत्सवानिमित्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीने येवला शहरांमध्ये श्री दुर्गा माता दौड आयोजन करण्यात येत असून सकाळच्या सुमारास ही दौड काढण्यात येते. या दुर्गा माता दौडचे शहरवासीय औक्षण करून स्वागत करत असतात..नवरात्राच्या पहिल्या माळीपासून सुरू झालेली ही दौड दसऱ्यापर्यंत रोज सकाळी काढण्यात येणार आहेत. संभाजी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही श्री दुर्गा माता दौड येवला शहरातून काढण्यात येते.
3
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KPKAILAS PURI
Sept 26, 2025 04:33:12
Pimpri-Chinchwad, Maharashtra:महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार....! pimpri ncp s kailas puri pune 26 9 25 feed by 2c Anchor - ... पिंपरी चिंचवड मध्ये महापालिका निवडणूक यांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी दोन दिवसांचा जनसंवाद दौरा आणि राष्ट्रवादी मिलन कार्यक्रम केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही निवडणुकीसाठी कंबर कसली असून नुकतीच शरद पवार यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत निवडणुकांची रणनीती आखली. आगामी महापालिका निवडणुका हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी लढेल अशी चर्चा आहे. दरम्यान पिंपरी चिंचवड शहरात महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार असून त्या संदर्भात चर्चा शेवटच्या टप्प्यात असल्याचं शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांच्याशी याच मुद्द्यावर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी....! kailas 1 to 1 + vis
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 26, 2025 04:32:03
Parbhani, Maharashtra:अँकर- परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीने शेती पिकांच होत्याच नव्हतं झालं असतांना माजलगाव आणि जायकवाडी धरणांमधून गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केल्या जात असल्याने परभणी जिल्ह्यातील अनेक गावांना पुराचा वेढा पडलाय,पाथरी,गंगाखेड,सोनपेठ,पालम आणि पूर्णा या तालुक्यातील ही गाव बाधित झाली आहेत, लोकांच्या घरामध्ये पाणी शिरून संसार उपोयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी गंगाखेड विधानसभेचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी सुनेगाव,सायळा भागात बोटी मधून केली. पुरग्रस्थाच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यांनतर त्यांनी मदत व पुनर्वसन मंत्री आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे ओला दुष्काळ आणि कर्जमाफी करण्याची मागणी केलीय... बाईट- रत्नाकर गुट्टे- रासप आमदार,गंगाखेड
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 26, 2025 04:31:52
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 26, 2025 04:30:27
Washim, Maharashtra:वाशिम: File:2609ZT_WSM_TURMERIC_CROP_DAMAGE रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर:वाशिम जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाचा तडाखा शेतीला बसला आहे.यात सोयाबीन,कपाशी, तूर,उडीद, मूग यासह हळद पिकाला सुद्धा या पावसाच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे.वाशिम जिल्ह्यात यावर्षी हळदीच्या लागवडीत दुप्पट वाढ झाली होती हळदीला मिळत असलेला भावामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हळद लागवड केली असताना या अतिवृष्टीच्या पावसात जिल्ह्यातील ४२९ हेक्टरवरील हळद पिकांचे नुकसान झालं आहे.हळद पिकाच्या आशेवर उभा असलेला शेतकरी व या आपत्तीमुळे हतबल झाला आहे.शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 26, 2025 04:18:28
Nashik, Maharashtra:nsk_kumbhmela feed by 2C anchor आगामी सिंहस्थ कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर साधूग्रामसाठी तपोवनातील २६८ एकर जागा कायमस्वरूपी संपादित करण्याचा निर्णय सरकारने केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार, जागाधारकांना मोबदला म्युनिसिपल बॉण्डद्वारे चार टप्प्यांत दिला जाणार आहे. यासाठी अंदाजे दोन हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून दरवर्षी ५०० कोटी निधी भूसंपादनासाठी वितरित केला जाईल. सध्या मनपाकडे ९४ एकर जागा ताब्यात असून २८३ एकर संपादन बाकी आहे. यातून २६८ एकर क्षेत्र संपादित होणार आहे. या निर्णयामुळे सिंहस्थासाठी साधूग्रामची सुविधा कायमस्वरूपी उपलब्ध होणार आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Sept 26, 2025 04:18:16
Amravati, Maharashtra:Feed slug :– AMT_MURDER दोन फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 सख्ख्या चुलत भावानेच दिली भावाची दहा लाखात मारण्याची सुपारी; पेट्रोल पंप चालकाची हत्या कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा प्रकार उघड अँकर :– अमरावतीच्या बडनेरा मधील जुनी वस्ती येथील पेट्रोल व्यावसायिकाच्या हत्येने सर्वत्र खळबळ उडाली आहे. हत्येसाठी चुलत भावाकडूनच दहा लाखांची सुपारी देण्यात आल्याची माहिती उघडकीस आल्याने अमरावतीत कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा प्रकार उघडकीस आला आहे. मालमत्तेचा वाद विकोपाला गेल्याने हे हत्याकांड घडल्याच समोर येत आहे. काही दिवसापूर्वी मृतक मिलिंद आणि चुलत भाऊ आरोपी विक्रम यांचा मालमत्तेवरून झाला होता वाद झाला होता या वादातून ही हत्येची घटना घडल्याचं पोलीस तपासात समोर आल आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 26, 2025 04:16:16
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करा - मंत्री जयकुमार गोरे Anchor - सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात तब्बल तीन वेळा अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यांना महापुराचा देखील मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची एक इंच ही जागा न सोडता त्यांना नुकसान भरपाई मिळाले पाहिजे अशा सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तालुकास्तरीय बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. बार्शी तालुक्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या भागांना भेटी दिल्यानंतर वैराग मध्ये प्रशासनातील विविध अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले असून कोणतीही अट ताट न ठेवता शेतकऱ्यांना सहकार्य करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. बाईट - जयकुमार गोरे, पालकमंत्री, सोलापूर
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 26, 2025 04:16:00
Washim, Maharashtra:वाशिम: File:2609ZT_WSM_FARMER_SITUATION_SHOW रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर: वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील प्रेमविलास नवदुर्गा उत्सव मंडळाने यंदा शेतकऱ्यांच्या कठीण परिस्थितीवर आधारित देखावा साकारला आहे.शेतकऱ्यांना लागलेला उत्पादन खर्चही शेतीतून वसूल होत नाही.दिवसेंदिवस बियाणे व रासायनिक खतांच्या किमतींमध्ये भरमसाठ वाढ होत आहे.त्यात मजुरीच्या खर्चातही मोठी वाढ झाल्यामुळे शेतकरी हतबल होत आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे शेती करणे कठीण झाले आहे, तर दुसरीकडे शेतमालाला योग्य भाव मिळत नाही.या सगळ्या परिस्थितीत अनेक शेतकरी आत्महत्या करण्याच्या टोकाला पोहोचत आहेत.हे वास्तव जनतेसमोर आणून शेतकऱ्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठीच मंडळाने हा देखावा साकारला आहे. मात्र, अद्याप सरकारकडून या समस्यांकडे आवश्यक तेवढे लक्ष दिले जात नसल्याची भावना शेतकऱ्यांत व्यक्त होत आहे. बाईट:प्रेमविलास नवदुर्गा उत्सव मंडळ, पदाधिकारी, कामरगाव
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Sept 26, 2025 04:15:19
Pune, Maharashtra:Reporter name : Chaitralli Raajapurkar Location ; Maval File.name : 2609ZT_MAVAL_SIT Total files : 02 Headline : मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मास्टरमाइंडचा शोध घेण्यासाठी एसआयटीची स्थापना गृह राज्यमंत्र्यांच्या आदेशानंतर एसआयटीची स्थापना Anchor : मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट मागील काळामध्ये उघडकीस आला होता. तसेच तळेगाव परिसरामध्ये वाढत असलेल्या गुन्हेगारी घटनांचा सखोल तपास करण्यासाठी व या कटा मागे नेमकं कोण आहे याचा शोध घेण्यासाठी शासनाकडून विशेष तपास पथकाची (एसआयटी) नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड झोन दोनचे उपायुक्त विशाल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड झोन दोनचे उपायुक्त विशाल गायकवाड हे समितीचे प्रमुख असणार आहेत. यामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे, तळेगाव दाभाडे पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात, गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख, पोलीस उप निरीक्षक रवींद्र खामगळ, पोलीस हवालदार अंकुश लांडे, सचिन बेंबाळे, सुनील सगर यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. या कट प्रकरणातील सात आरोपींना नऊ पिस्तूल, ४२ काडतुसे, कोयते अशा हत्यारांसह पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी अटक केलेले आरोपी पुणे, जालना, मध्य प्रदेश येथील गुन्हेगार आहेत. या आरोपींवर खून, खंडणी, वाहनांची तोडफोड, जाळपोळ, बेकायदेशीर हत्यार बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी सुरुवातीला दोघांना अटक करून त्यांच्याकडून चार पिस्तूल जप्त केले. त्यानंतर आणखी तिघांना अटक करून पाच पिस्तूल आणि काडतुसे जप्त केली. त्यानंतर या आरोपींना फंडिंग करणाऱ्यासह दोघांना अटक करण्यात आली होती. हे गुन्हेगार मध्य प्रदेशात गेले. उत्तर प्रदेश मधील देवराज नावाच्या कुख्यात गुन्हेगाराकडून या आरोपींनी मध्य प्रदेश मधून हत्यारे आणली होती. हे आरोपी जामिनावर कारागृहातून बाहेर आल्यानंतर पुन्हा तळेगाव परिसरामध्ये दिसून आल्याबाबत तक्रार देखील दाखल झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आमदार सुनील शेळके यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये 4 जुलै रोजी लक्षवेधी उपस्थित करत या गंभीर विषयावर चर्चा करण्याची व तपास पथक स्थापन करण्याची मागणी केली होती. त्यावेळी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या बाबीची एसआयटी मार्फत सखोल चौकशी केली जाईल असे आश्वासन दिले होते. त्यानंतर ही एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. ही एसआयटी आता सुनील शेळके यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मास्टरमाईंडचा शोध घेणार आहे. बाईट : सुनील शेळके, आमदार, मावळ (file no.02)
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Sept 26, 2025 04:03:49
Pimpri-Chinchwad, Maharashtra:pimpri battary kailas puri pune 26/9/25 feed by 2c Anchor - पिंपरी चिंचवड शहरातील चिखली मध्ये बॅटरी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.रातोरात तब्बल 10 चारचाकी गाड्यांच्या बॅटरींची चोरी करण्यात आली आहे.त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे.. या भागामध्ये पोलिसांची रात्र गस्त करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत. रातोरात दहा बॅटरी चोरीला गेल्यामुळे वाहन चालकांच मोठ आर्थिक नुकसान झाल आहे. मध्यरात्री एकच्या नंतर या सर्व बॅटरी चोऱ्या झाल्या आहेत.यामध्ये चारचाकी कार, ट्रकचा सहभाग आहे. चोरीची घटना तेथील एका CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आता पोलिस या सीसीटीव्ही च्या मदतीने करणार आहेत.
1
comment0
Report
KPKAILAS PURI
Sept 26, 2025 04:03:40
Pimpri-Chinchwad, Maharashtra:शेअर मार्केट मधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून दीडशेहून अधिक नागरिकांची वीस ते पंचवीस कोटींची फसवणूक pimpri share m kailas puri Pune 26-9-25 feed by 2c Anchor - शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून जवळपास दीडशे हून अधिक नागरिकांची फसवणूक करून त्यांच्याकडून जवळपास 20 ते 25 कोटी रुपये उकळल्याचा प्रकार पिंपरी चिंचवड शहरातील सायबर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.तर यामध्ये एका महिला आरोपीचा देखील समावेश आहे. काही दिवसापूर्वी एका आयटी अभियांताला अशाच प्रकारच आमिष दाखवून त्याच्याकडून जवळपास 90 लाख रुपये घेऊन त्याला त्या पैशांचे नऊ कोटी रुपये झाल्याच भासवण्यात आल होत. मात्र त्यानी रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता त्याला वेगवेगळे टॅक्स,चार्जेस लागणार असे सांगून त्याची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली. फसवणूक झाल्याचे कळता आयटी अभियंत्याने सायबर विभागात गुन्हा नोंद केला. त्यानंतर सायबर पोलिसांकडून तपास केला असता या सर्व घटनेचा छडा लागला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे अशाच प्रकारे अजूनही काही नागरिकांना या टोळीने गंडा घातल्याचा संशय पोलिसांना असून पुढील तपास सायबर पोलिस करत आहेत.
3
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 26, 2025 04:00:51
Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू परिसरात गाडी पार्किंगच्या किरकोळ कारणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये झालेला वाद थेट हिंसक स्वरूप धारण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुकानासमोर कार उभी केल्याच्या रागातून एकाने याने हातात तलवार घेऊन कार फोडण्याचा प्रयत्न केला. तर दुसऱ्या व्यक्तीने दगड मारून वाहनाचा समोरील काचा फोडला. हा संपूर्ण प्रकार कारचालकांच्या मोबाईलमध्ये कैद झाला असून, याची थेट तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.तक्रारीनंतर बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली असून, या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. किरकोळ वादातून निर्माण झालेल्या या गंभीर प्रकारामुळे नागरिकांत एकच खळबळ उडाली होती.
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top