Back
डॉक्टर तरुणीसोबत लैंगिक अत्याचार: आरोपी अटकेत!
SNSWATI NAIK
FollowJul 10, 2025 02:02:14
Navi Mumbai, Maharashtra
Story slug - डॉक्टर तरुणीवर लैंगिक अत्याचार करुन तिचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल करणारा आरोपी अटकेत
Doctor women blakmeal story
Ftp slug - nm khargher crime story
Shots- aaropi
Reporter- swati naik
Navi mumbai
Anchor - नवी मुंबई खारघरमध्ये राहणाऱया एका 28 वर्षीय डॉक्टर तरुणीला गुंगीकारक कोल्ड्रींग पाजुन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱया तसेच तिचे अश्लिल व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करणाऱया 23 वर्षीय टुरिस्ट गाईड तरुणाला खारघर पोलिसांनी अटक केली आहे. आनंद दादाभाऊ गते असे या आरोपी तरुणाचे नाव असून खारघर पोलिसांनी मंगळवारी सापळा रचून त्याला अटक केली आहे. तसेच पीडित तरुणीचे अश्लिल व्हिडीओ असलेला त्याचा मोबाईल जफ्त केला आहे.
या प्रकरणातील आरोपी आनंद गते हा पुण्यातील भिमाशंकर येथे राहण्यास असून तो टुरिस्ट गाईड चे काम करत आहे, डॉक्टर असलेली पीडित तरुणी खारघरमध्ये राहण्यास आहे. आरोपी आनंद गते याने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सोशल मीडियावरुन पीडित डॉक्टर तरुणीसोबत मैत्री केली होती. त्यानंतर हे दोघे खारघरमध्ये भेटले असता, आरोपी आनंद गते याने पीडित तरुणीला गुंगीकारक कोल्ड्रींग पाजले होते. त्यानंतर त्याने पीडित तरुणीला सातारा येथील राज लॉजमध्ये नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले होते.
त्यावेळी आरोपी आनंद गते याने त्याच्या मोबाईलवरुन पीडित तरुणीच्या लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ रेकॉर्ड केले होते. त्यानंतर आरोपीने पीडित तरुणीचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करण्यास सुरुवात केली. तसेच पीडित तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून तिच्यावर अनेकवेळा लैंगिक अत्याचार केले. दरम्यानच्या काळात पीडित तरुणीने आरोपीसोबत शरीर संबधास नकार दिल्यानंतर त्याने काही दिवसापुर्वी पीडित तरुणीच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करुन त्याद्वारे पीडित तरुणीचे व्हिडिओ व्हायरल केले होते.
हा प्रकार पीडित तरुणीला समजल्यानंतर तीने गत सोमवारी खारघर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आरोपी आनंद गते याच्या विरोधात बलात्कारासह बीएनएस कलम 64,123,सह माहीती तंत्रज्ञान कायदा 67 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला पीडित तरुणीच्या माध्यमातून संपर्क साधुन त्याच्यासोबत शरीरसंबधाची तयारी दर्शवून त्याला खारघर येथे बोलावून घेतले होते. त्यानुसार मंगळवारी तो खारघरमध्ये आला असताना, दबा धरुन बसलेल्या पोलिसांनी त्याला अटक केली. तसेच त्याचा मोबाईल जफ्त केला आहे.
आरोपी आनंद गते याने पीडित तरुणीचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल केल होते, ते व्हिडीओ क्लिप त्याच्या मोबाईलमध्ये सापडले आहेत. पनवेल न्यायालयाने या आरोपीची तीन दिवसांच्या पोलीस कोठडी रवानगी केली आहे.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement