Back
पीकविम्याचा लाभ घेण्यासाठी डिजिटल नोंदणी अनिवार्य!
Raigad, Maharashtra
स्लग - ॲपवर नोंदणी असेल तरच पीकविम्याचा लाभ ....
फार्मर आयडी देखील बंधनकारक ..........
अँकर - डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲपवर पिकाची नोंदणी असेल तर पीकविम्याचा लाभ मिळणार आहे. शिवाय फार्मर आयडी देखील बंधनकारक आहे. कोकणात यंदाच्या खरीप हंगामात भात आणि नाचणी पिकाला विम्याचा लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी 31 जुलैची मुदत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - मिरजेत पेटबुल जातीच्या श्वानाचा बैलावर हल्ला,भर रस्त्यात बैलाच्या तोंडांचे तोडला लचका..
अँकर - सांगलीच्या मिरजेत एका पिटबुल जातीच्या श्वानाने बैलावर हल्ला करत बैलाच्या तोंडाचे लचके तोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.बैलगाडीला बांधलेला बैलावर हल्ला चढवत पिटबुल जातीच्या श्वानाने बैलावर हल्ला चढवला आणि त्यानंतर अक्षरशः बैलाच्या तोंडाचे लचके तोडत त्याच्या मानेचा देखील चावा घेतला, कुत्र्याच्या तावडीतून बैलाला वाचवण्यासाठी यावेळी नागरिकांकडून प्रयत्न प्रयत्न करत बैलाची सुटका केली,त्यानंतर महापालिकेच्या डॉग व्हॅन पथकाकडून कुत्र्याला ताब्यात घेण्यात आलाय,सदर घटनेमध्ये बैल गंभीर जखमी झाला आहे, दरम्यान प्रकरणी बैलाच्या मालकाने कुत्र्याच्या मालका विरोधात महात्मा गांधी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे.
0
Share
Report
Rajapur, Maharashtra:
रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील सागवे गावात ब्लॅक पॅंथरचा वावर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. घरातील अंगणात वावरत असणाऱ्या एका कुत्र्याची शिकार ब्लॅक पॅंथरने केली आहे. सर्व घटना घराच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ब्लॅक पँथरन कुत्र्याची शिकार केलीय.
0
Share
Report
Niphad, Maharashtra:
अँकर:-निफाड तालुक्यातील चांदोरी येथील नागापूर फाटा जवळ शाळेत जात असलेल्या सिद्धी मंगेश लुंगसे या सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला भरधाव वेगात असलेल्या डंपरने धडक देऊन चिरडले या अपघातात विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला तर शेजारून जात असलेल्या एका पती-पत्नीला देखील या डंपरने कट मारल्याने तेही जखमी झाले या अपघातानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी चांदुर येथे नाशिक संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको केला दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना समजतात पोलिसांनी अपघात रस्ता डंपर ताब्यात घेतला असून चालकाचा शोध घेतला जात आहे या डंपर चालकावर कठोर कारवाई करावी या मागणीवर संतप्त नागरिक ठाम होते
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 3006ZT_JALNA_PIKPANI(6 FILES)
जालना | पीकपाणी
पावसाची उघडीप, शेती मशागतीला वेग
अँकर | जालना जिल्ह्यात दोन दिवस भिज पावसानं हजेरी लावल्यानंतर आता पावसानं पुन्हा विश्रांती घेतली आहे.यामुळे शेती मशागतीला पुन्हा वेग आलाय.जिल्ह्यात अनेक ठिकाणी कपाशीची खुरपणी सुरु झालीय.तर कपाशी बरोबरच सोयाबीनवर औषध फवारणीची कामं सुरू झालीय.जमिनीत ओलावा चांगला असल्यानं मका पिकाला खताची मात्राही देण्याचं काम शेतकऱ्यांनी सुरु केलं आहे.दरम्यान,खरीप पिकांची खुंटलेली वाढ चांगल्या पद्धतीने होण्यासाठी अजूनही पावसाची आवश्यकता आहे.जिल्ह्यातील अनेक भागात अजूनही पाऊस नसल्यानं पिकांची वाढ खुंटल्यानं शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
बाईट | रमेश सुसर,शेतकरी(टी शर्ट वर असलेले शेतकरी)
बाईट | उध्दव धबडकर,शेतकरी (गळ्यात रुमाल असलेले शेतकरी)
0
Share
Report
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
2 FILES
SLUG NAME -SAT_URMODI_WKT
सातारा जिल्ह्यामध्ये सध्या पावसाचा जोर हा कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये पाण्याची आवक सुद्धा मोठ्या प्रमाणात होते आहे. साताऱ्यातील उरमोडी या धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्यामुळे धरण प्रशासनाने धरणाच्या चार वक्र दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्या त आला आहे. या धरणाचे चारही वक्र दरवाजे उघडण्यात आले असून दरवाजातून 1500 क्युसेक आणि पायथा वीजगृहातून 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. उरमोडी धरण परिसरातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी
wkt
0
Share
Report
Shirdi, Maharashtra:
Shirdi News Flash
अभिनेता सुनील शेट्टी साईदरबारी...
सहा वर्षांनंतर शिर्डीला येत लावली साईदर्शनाला हजेरी...
माझी जन्मभूमी कर्नाटक आहे , माझी कर्मभूमी मुंबई आहे..
मला मराठी नाही आली तरी चालतं मात्र मी मराठी भाषेत बोलल्यावर तुम्हाला चांगलं वाटतं सर्वांना बरं वाटतं...
मी कर्मभूमीत राहून मराठीत नाही बोललो तर दुसऱ्यांना त्रास व्हायला नाही पाहिजे तो त्रास मला व्हायला पाहिजे...
मला वाटायला पाहिजे मला मराठी शिकायचं आहे आणि तुम्ही सर्वजण बोलतात तसे मराठी बोलायचं आहे...
अभिनेता सुनील शेट्टीचे मराठी भाषेला समर्थन...
शिर्डीत अभिनेता सुनील शेट्टीची प्रतिक्रिया...
ऑन साईदर्शन
मी गेल्या कित्येक वर्षांपासून साईदरबारी दर्शनाला येतो...
माझी पत्नी दरवर्षी साईंच्या दर्शनाला येत असते मात्र मी सहा वर्षांनंतर साईदरबारी आलोय...
मी वर्षानुवर्ष वेगवेगळ्या मंदिरात दर्शनासाठी जात असतो त्या ठिकाणची व्यवस्था अधिकच सुलभ होत चालली आहे...
माझ्या परिवारासह देशातील जनतेची काळजी घ्यावी हीच प्रार्थना मी साईंच्या चरणी केलीय...
साईबाबा जेव्हा बोलावतात तेव्हा प्रत्येकजण दर्शनाला येतो , साईंच्या दर्शनांवेळी डोळे भरून येतात...
ऑन हेराफेरी 3
हेराफेरी पिक्चर जेव्हा प्रदर्शित होईल तेव्हाच मी त्याबाबत बोलेल तोपर्यंत मी काहीही बोलणार नाही...
हेराफेरी 3 बाबत अभिनेता सुनील शेट्टीची प्रतिक्रिया...
आम्ही सर्व चित्रपट परिवाराला बघता येतील अशीच प्रदर्शित केली आहे...
आपल्या सर्वांनी स्वतःपासून बदलायला सुरुवात केली तर यंत्रणा बदलेल...
ऑन पाकिस्तान कलाकार
जेव्हा आपल्याला त्रास होतो त्यावेळीपासून आपण त्या लोकांच्या संपर्कात राहायला नको...
प्रत्येकाचे वयक्तिक संबंध असतात ते बदलत असतात..
पहेलगाम मध्ये जी घटना झाली त्यानंतर मी सांगितलं पाकिस्तानी कलाकारांना बंदी व्हायला हवी...
मी कुठल्याही एकाच गोष्टीवरून बोलत नाहीये कुठल्याही बाबींपासून दूर व्हायला हवं...
मी माझा निर्णय सांगत आहे , मी आपल्या देशाबाबत बोलतो आहे..
अभिनेता सुनील शेट्टीची शिर्डीत प्रतिक्रिया...
Bite - सुनील शेट्टी , अभिनेता
0
Share
Report
Navi Mumbai, Maharashtra:
story slug -सायन पनवेल मार्गावरील उरण फाटा उड्डाणपुलावर चार गाड्यांचा अपघात
सायन पनवेल मे चार गडीयो का अपघात
FTP slug - nm accident
shots-
reporter- swati naik
navi mumbai
anchor-पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान, सायन पनवेल महामार्गावरील उरण फाटा उड्डाणपुलावर, चार वाहनांचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही, किंवा कोणाचाही मृत्यू झाला नाही. मात्र अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची वाहतूक कोंडी झाली होती. या अपघातामुळे सीबीडी ते उरण फाटा उड्डाणपूल या मार्गावरही वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. सध्या वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे।
gf-
---------------------------------
0
Share
Report
Ambernath, Maharashtra:
उल्हासनगरात धावत्या टेम्पो वर झाडं कोसळल
सुदैवाने जीवितहानी नाही मात्र गाडीचं नुकसान
Ulh tree collaosed
Anchor उल्हासनगर कॅम्प नंबर ४ च्या वेल्फेअर हायस्कूल जवळील रस्त्यावरील भलंमोठं झाड धावत्या टेम्पोवर कोसळल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे,सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही मात्र गाडीचं नुकसान झालंय, सद्या एकतर्फी रस्ता बंद करण्यात आला असून अग्निशमन दलाच्या जवानांकडून रस्त्यावरील झाड बाजूला करण्याचं काम सुरू आहे ,
चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
0
Share
Report
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
csn theft cctv av
cctv fees attched
छत्रपती संभाजीनगरात मोमोज खाणे चांगलेच महागात पडले...
मोमोज खायला थांबले आणि 15 मिनिटात कारमधील २० लाख लंपास..
Anc..
भूक लागल्याने मोमोज खायला थांबल्यावर कार लॉक करणे विसरल्याची चूक इंजिनिअरिंग कंपनीच्या अकाउंटंटला तब्बल २० लाखाला भोवली.कंपनीचे पैसे असलेली बॅग त्यांच्या कारमधून चोरट्यांनी लांबवली आहे. हा प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरातील हडको कॉर्नर येथील डी- मार्टसमोर घडला.या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सिसीटवी मध्ये हा सगळा प्रकार कैद झाला आहे...
0
Share
Report
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
2 FILES
SLUG NAME -SAT_SAJJANGAD_ROAD
सातारा - साताऱ्यातील सज्जनगड रस्त्यावर झाड पडलं आहे.
यामुळे सज्जनगडकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतो आहे त्यामुळे घाट रस्त्यावर दरड आणि झाडं पडतायत.सज्जनगड रस्त्याला झाड पडून बराच वेळ होऊन देखील अद्याप प्रशासन अद्याप त्या ठिकाणी पोहचलेले नाही त्यामुळे काही भाविक गडावर अडकून पडले आहेत .
0
Share
Report