Back
सांगली एसटी आगारासाठी 200 बसेसची मागणी, फक्त 65 पुरविल्या!
SMSarfaraj Musa
FollowJul 12, 2025 01:32:15
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - सांगली एसटी आगारासाठी 200 बसेसची मागणी, मात्र आल्या केवळ 65 बसेस,एसटी सेवेवर पडतोय ताण..
अँकर - सांगली जिल्ह्यातल्या एसटी आगाराला एसटी बसेसची मोठी कमतरता जाणवू लागली आहे.जिल्ह्यातल्या 10 आगारांसाठी 697 एसटी बसेस उपलब्ध आहेत.यापैकी 109 एसटी बसेस डिसेंबर अखेर कालबाह्य होऊन भंगारात जाण्याच्या मार्गावर आहेत.त्यामुळे 200 एसटी बसेसची मागणी एसटी प्रशासनाकडून राज्य सरकारकडे करण्यात आली होती.यापैकी राज्य सरकारने केवळ 65 बसेस सांगली आगारासाठी दिल्या आहेत,एका बाजूला गेल्या काही वर्षात राज्य सरकारने विविध सवलती,त्याच बरोबर महिलांसाठी अर्धे तिकीट,यामुळे एसटीकडे प्रवाशांचा ओढा वाढला आहे.मात्र तुलनेने एसटी बसेस उपलब्ध नसल्याने एसटी प्रशासनाला एसटी सेवा देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे,अनेक मार्गांवर एसटी सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांची देखील मोठी गैरसोई होत आहे, त्यामुळे राज्य सरकारने सांगली एसटी आगारासाठी नव्या बसेस तातडीने उपलब्ध करून द्याव्यात,अशी मागणी होत आहे.
14
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRATHAMESH TAWADE
FollowJul 12, 2025 05:31:46Mira Bhayandar, Maharashtra:
Date-12july2025
Rep-prathamesh tawade
Loc-bhayander
Slug-BHAYANDER CRIME
Feed send by 2c
Type-AVB
Slug- मीरा-भाईंदर शहरात खुलेआम विकला जातोय ड्रग्ज
अँकर - काशीमीरा येथील हाटकेश परिसरात राहणाऱ्या एका जागरूक युवकाने ड्रग्ज विकणाऱ्या एका तरुणाला पकडून काशिगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.सदर युवकाने पेडलरकडून तब्बल ४० ड्रग्जच्या पुड्यांची जप्ती केली होती.मात्र, काशिगाव पोलिसांनी या पेडलरवर कोणतीही कठोर कारवाई न करता त्याला पुन्हा सोडून दिले.
या ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीने "ब्लड १०७ गँग" असे नाव घेऊन परिसरातील भिंतींवर नशेची जाहिरात सुरू केली आहे.
"ब्लड १०७ गँग" या टोळीने दररोज नशा करण्यासाठी तरुणांना प्रेरित करणारे संदेश भिंतींवर लिहले असून, पोलिसांचा अपमान करत पोलिसांचे चित्र काढून बंदूक दाखवून खुलेआमपणे पोलिसांना आव्हान दिलं आहे....
जागरूक युवकाच्या म्हणण्यानुसार, काशीमीरा हाटकेश भागात सलमान कुरेशी नावाच्या टोळीचे गुंड खुलेआम ड्रग्ज विक्री करत आहेत.मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने आरोपी सलमान कुरेशी याला तडीपार केलेले आहे. असे असताना देखील ड्रग्स विक्रीचा व्यवसाय मीरा-भाईंदर मध्ये तेजीत सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे..
बाईट- जागरूक युवक
3
Share
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 12, 2025 05:04:31Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - बार्शीत शाळेत जाण्यासाठी सोय नसल्यामुळे घोड्याचा आधार, नववीत शिकणाऱ्या मुलाची अनोखी शक्कल
Anc : ग्रामीण भागात शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी एसटी किंवा स्कूल बस याचा वापर आपण पाहत असतो. मात्र अनेक ग्रामीण भागातील शाळकरी मुलांना दुर्गम भागातून शाळेची वाटचाल खडतर पणाने पार करावी लागते. मात्र बार्शी तालुक्यातील एका शाळकरी विद्यार्थ्यांनी शाळेची वाट सुखकर व्हावी यासाठी घोड्यावरून शाळेची वाट धरली आहे. वस्तीवरून शाळेपर्यंत जाण्यासाठी एसटी आणि इतर वाहनांची सोय नसल्यामुळे अनोखी शक्कल लढवली आहे.. शिक्षणाची जिद्द कायम ठेवत रोज शाळेला जाण्यासाठी घोड्यावरून जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांची जोरदार चर्चा आहे. आदेश साळुंखे असं घोड्यावरून जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांचे नाव आहे.
आदेश हा वैराग येथील साधना विद्यालयात इयत्ता नववीचे शिक्षण घेत आहे. वैराग जवळील लाडोळे वस्तीवर आदेश राहतो. लाडोळे ते वैराग चार किलोमीटरचे अंतर तो घोड्यावरून पार करत असतो.. वैराग परिसरातील अनेक वस्त्यांवर एसटीची सोय नसल्यामुळे शाळकरी मुलांची गैरसोय होते. मात्र या सर्वांवर मात करत शिक्षणाची जिद्द आणि चिकाटी असलेल्या आदेशाने घोड्यावरून शाळा गाठत विद्येचे ज्ञान घेताना दिसत आहे.. घोड्यावरून आल्यावर घोडा हा शाळेजवळील चिंचेचा झाडाला बांधतो. दिवसभर शाळेत गेल्यानंतर तो घोडा त्या झाडालाच बांधून असतो. शाळा सुटली की परत वैराग वरून वस्तीकडे घोड्यावरूनच जातो.
आदेश याचे आजोबा हे शेतात शेतीपालना बरोबर घोडे पाडले आहे.. आजोबा प्रभाकर साळुंखे यांच्याकडे दीडशे शेळ्या आणि सात घोडे आहेत. आदेश याला लहानपणीच आजोबांनी घोडेस्वारी शिकवली आहे. आदेश हा आजोबांसोबत घोड्याची देखभाल ही करतो. आदेश हा अभ्यासात हुशार असल्याचेही शिक्षकांकडून सांगण्यात आलं आहे. आदेश हा घोड्यावरून शाळेत येत असताना त्याचा आनंद मोठा असतो. मात्र अशा अनोख्या शक्कलमुळे आदेशची घोडेस्वारी मात्र चांगलीच चर्चेत आली आहे.
Byte : आदेश साळुंखे, घोडेस्वार विद्यार्थी
Byte : शिक्षक..
1
Share
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJul 12, 2025 05:04:18Yavatmal, Maharashtra:
Anchor : भाजपच्या केंद्रीय आणि राज्य नेतृत्वावर सडकून टीका करत निघालेल्या बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा पदयात्रेत यवतमाळच्या केळापूर चे भाजप आमदार राजू तोडसाम यांच्या पत्नी प्रिया तोडसाम सहभागी झाल्या.
दिग्रस च्या धानोरा येथे प्रिया तोडसाम यांनी पदयात्रेत सहभागी होत बच्चू कडू ना पाठिंबा दर्शविला. त्यामुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. प्रिया तोडसाम ह्या आमदार राजू तोडसाम यांच्या दुसऱ्या पत्नी असून त्या राजकीय मंचावर व भाजप पक्षीय संघटनेत सक्रिय असतात. सध्या भाजपवर तोंडसुख घेणाऱ्या बच्चू कडूंच्या पद यात्रेत प्रिया तोडसाम यांनी एन्ट्री केल्याने त्यांच्या मतदारसंघात कुजबुज वाढली आहे.
1
Share
Report
PPPRANAV POLEKAR
FollowJul 12, 2025 05:04:07Ratnagiri, Maharashtra:
Anchor - कोकणात येणाऱ्या पर्यटकांना आता रत्नागिरी जवळच्या मिऱ्या समुद्रकिनारी असलेले स्टार बसा हे जहाज पाहता येणार नाहीये. त्या ठिकाणी सेल्फी घेता येणार नाहीये. कारण हे जहाज आता भंगारात काढले जाणार आहेत. त्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या मिळाल्या असून पुढील काही दिवसांमध्ये या जहाजाच्या तोडकामाला सुरुवात होईल. साधारणपणे पाच वर्षांपूर्वी निसर्ग चक्रीवादळादरम्यान खोल समुद्रात भरकटलेले हे जहाज मिऱ्या किनारी आले. परिणामी हळूहळू हे ठिकाण पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. रिल्स, सेल्फी, फोटो, व्हिडिओ शूट करून आपला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला पोस्ट करण्यासाठी अनेकांनी त्याला पसंती दिली. पण आता हे जहाज भंगारात काढले जाणार असल्यामुळे स्वाभाविकपणे सर्वांची निराशा होणार आहे.
0
Share
Report
KJKunal Jamdade
FollowJul 12, 2025 05:03:57Shirdi, Maharashtra:
Anc_ अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार भगवतीपूर परिसरामध्ये सध्या डाळिंब चोऱ्या प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. रात्रीच्या अंधारात अज्ञात चोरटे बागांमधून तयार झालेले डाळिंब वाहनांमध्ये भरून पसार होत आहेत. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या घासावर चोरटे डल्ला मारीत आहेत यामुळे मोठा आर्थिक फटका बसत आहे. दोन दिवसांत परीसरात राजेंद्र दळे यांच्या अडीच एकर बागातून सहा लाख रुपयांचे पाच टन डाळिंब, विलास गणपत दळे यांच्या दोन एकर बागातून तीन लाख रुपयांचे दोन ते तीन टन डाळिंब, काळा मळा शिवारातील मधुकर दादा खर्डे यांच्या तीन एकर बागातून तीन लाख रुपयांचे तीन टन डाळिंब चोरी गेले. या तीन शेतकऱ्यांचा मिळून साधारणपणे १२ लाख रुपयांचा डाळिंब शेतीमाल चोरून अज्ञात चोरटे पसार झाले. या शेतकऱ्यांनी डाळिंब चोरीबद्दल लोणी पोलीस ठाण्यात जाऊन रितसर तक्रार दाखल केली.
0
Share
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 12, 2025 05:02:20Ambernath, Maharashtra:
अंबरनाथमध्ये चेन स्नॅचिंग करणाऱ्या दुकलीला बेड्या!
अंबरनाथ आणि ठाकुर्लीतील २ गुन्ह्यांची झाली उकल
१५ ग्रॅम सोनं आणि एक दुचाकी हस्तगत
Amb aarest
Anchor : अंबरनाथमध्ये पोलिसांनी चेन स्नॅचिंग करणाऱ्या दुकलीला बेड्या ठोकल्या असून २ गुन्ह्यांची उकल करत चोरलेला मुद्देमालही हस्तगत केला आहे. या दोघांनी झटपट पैसे कमावण्यासाठी या चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे.
Vo : अंबरनाथमध्ये मॉर्निंग वॉक करून घरी परतणाऱ्या महिलेचं मंगळसूत्र खेचून नेल्याची घटना २ जुलै रोजी घडली होती. या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी जय ग्यानचंदानी आणि जितेंद्र कांबळे या दोघांना बेड्या ठोकल्या. यावेळी त्यांनी अंबरनाथसह ठाकुर्लीत एक चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली. या दोघांकडून पोलिसांनी १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि एक दुचाकी हस्तगत केली असून त्यांनी आणखी कुठे गुन्हे केले आहेत का? याचा तपास पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती डीसीपी सचिन गोरे यांनी दिली आहे.
Byte : सचिन गोरे, डीसीपी
चंद्रशेखर भुयार ,अंबरनाथ
0
Share
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 12, 2025 04:35:11Ambernath, Maharashtra:
अल्पवयीन मुलाला लिफ्टमध्ये मारहाण केल्याचं प्रकरण
आरोपी कैलास तनवाणीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अंबरनाथमध्ये ४ जुलै रोजी घडली होती घटना
Amb boy beating arrest
Anchor : अंबरनाथमध्ये एका अल्पवयीन मुलाला सोसायटीतील रहिवाशाने लिफ्टमध्ये मारहाण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी कैलास तनवाणी याला बेड्या ठोकल्या आहेत.
Vo : अंबरनाथ पूर्वेच्या पालेगाव परिसरातील पटेल झियन सोसायटीत ४ जुलै ही घटना घडली होती. या सोसायटीत राहणारा एक अल्पवयीन मुलगा सायंकाळी क्लासला जात असताना लिफ्टमध्ये कैलास तनवाणी याने या मुलाला तब्बल ५ कानशिलात लगावत त्याच्या हाताचा चावा घेत होता. हा सगळा प्रकार लिफ्टच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच तनवाणी फरार झाला होता, मात्र अखेर २ दिवसांनी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्याची माहिती डीसीपी सचिन गोरे यांनी दिली आहे.
Byte : सचिन गोरे, डीसीपी
चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
14
Share
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 12, 2025 04:34:52Ambernath, Maharashtra:
उल्हासनगरात दिवसाढवळ्या किराणा दुकानांतून ५३ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास
चोरीचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Ulh theft cctv
Anchor उल्हासनगर कॅम्प नंबर ५ च्या सह्याद्री नगर परीसरात एका किराणा दुकानातून तब्बल ५३ हजार रुपयांची रोख रक्कम चोरी झाल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय,आता ह्या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत,
Vo पवन रमेशलाल बजाज यांचं सह्याद्री नगर परिसरात किराणा दुकान आहे, ८ जुलै रोजी एक बाईकस्वार तरुण आणि त्याचा साथीदार हे दुकानाबाहेर मोटारसायकल उभी करून काही किराणा वस्तू खरेदी करण्याच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवून ठेवलं,यानंतर एक चोरटा
लक्ष विचलित लरून दुकानात शिरून ५३ हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन पोबारा करतोय ,ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय,आता ह्याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे,
चंद्रशेखर भुयार , उल्हासनग
12
Share
Report
KJKunal Jamdade
FollowJul 12, 2025 04:34:29Shirdi, Maharashtra:
Rahta News Flash
*राहाता तालुक्यातील लोणी खुर्द गाव आज कडकडीत बंद...*
हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या बंदला व्यावसायिकांचा प्रतिसाद...
*लोणी गावात आज मोर्चाचे आयोजन...*
चिकन विक्रेत्याच्या व्हायरल व्हिडिओनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक...
चिकनविक्रेता चिकन धुण्यासाठी वापरत असलेल्या पाण्यात लघुशंका करत असल्याचा आरोप...
*आरोपीवर कठोर कारवाईसह दुकानावर तोडक कारवाईची मागणी...*
सकाळी 11 वाजता होणार मोर्चाला सुरुवात...
लोणी पोलिस ठाण्यावर धडकणार हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा...
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर लोणी खुर्द गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त...
9
Share
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 12, 2025 04:33:41Beed, Maharashtra:
बीड: वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत यशश्री मुंडे यांनी भरला अर्ज
Anc: वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव बँकेच्या निवडणुकीनिमित्त यशश्री मुंडे यांनी अर्ज केला आहे. परळी वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी माजी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यशश्री मुंडे या भगिनींसह 71 अर्ज दाखल झाले.
14 जुलैला छाननी आणि 15 ते 19 जुलै दरम्यान अर्ज मागे घेण्याचा कालावधी असून यानंतरच याचे चित्र स्पष्ट होणार आहे. एकूण 17 जागांसाठी ही निवडणूक होत असून 10 ऑगस्टला मतदान तर 12 रोजी मतमोजणी होणार आहे.
5
Share
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 12, 2025 04:33:25Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर जिल्ह्यात 93% खरीपाच्या पेरण्या, मात्र पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
- सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील 93 टक्के पेरण्या पूर्ण, जिल्ह्यात दमदार पावसाची शेतकऱ्यांना अपेक्षा..
- जिल्ह्यात मका पिकाला शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती तर उडदाच्या क्षेत्रात यंदा वाढ..
- मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाची दमदार तयारी..
- मका पिकाची जिल्ह्यात सरासरी 44 हजार 885 हेक्टरवर पेरणी पूर्ण
- बाजरी : 15978 हेक्टर,तूर : 50597 हेक्टर , उडीद : 68229 हेक्टर वरील पेरणी पूर्ण..
- मे महिना पूर्ण आणि जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणावा तसा पाऊस न पडल्यामुळे पिके कोमेजू लागली आहेत
- यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट, शेतकऱ्यांना सोलापूर जिल्ह्यात दमदार पावसाचे अपेक्षा आहे..
7
Share
Report
PNPratap Naik1
FollowJul 12, 2025 04:33:17Kolhapur, Maharashtra:
Story :- panhala world heritage
feed :-2C
Anc :- जागतिक वारसास्थळांच्या यादीत कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा किल्ल्याचा समावेश झाल्यानंतर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत पन्हाळा किल्ल्यावर शुक्रवारी रात्री आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांनी पन्हाळगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरातील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले, तसेच शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि वीर शिवा काशीद यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
0
Share
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJul 12, 2025 04:30:29Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Shirur Amble Theft Open
File:01
Rep: Hemant Chapude(Shirur)
Anc: शिरूर तालुक्यातील आंबळे येथे जबरी दरोडा प्रकरणाचा अवघ्या काही तासात छडा लावण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला आणि शिरूर पोलिसांना यश आले असून पोलिसांनी संजय गायकवाड आणि सागर शिंदे या दोन सर्राईत गुन्हेगारांना अटक केलीय,आंबळ्यातील दरोड्यासह एकूण सहा गुन्हे उघडकीस आलेत त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांच्या कामगीरीचं कौतूक होतंय.
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया शिरूर पुणे...
0
Share
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowJul 12, 2025 04:30:17Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_KAMAL_WKT नऊ फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
अमरावतीच्या वडाळी तलावात फुलले कमळ; संपूर्ण तलावात पाहायला मिळतात कमळच कमळ
अँकर :- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने रिपरिप लावली आहे. त्यामुळे सर्वत्र हिरवळ पसरली असून सर्वत्र आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे. अशातच अमरावतीच्या वडाळी तलावात कमळ फुलले असून तलावाच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. त्यामुळे संपूर्ण तलावात कमळच कमळ पाहायला मिळत आहे. मात्र लॉकडाऊन पासून वडाळी गार्डन आणि तलाव पर्यटकांसाठी बंद केला आहे. त्यामुळे हे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक मुकले आहे. दरम्यान हे तलाव आणि गार्डन सुरू करण्याची मागणी पर्यटक करत आहे. गेल्या पाच वर्षापासून तलाव आणि गार्डन बंद असल्याने संपूर्ण परिसराला जंगलाचे स्वरूप आले असून तलाव आणि गार्डन संपण्याच्या मार्गावर आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी..
WKT
0
Share
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowJul 12, 2025 04:05:56Latur, Maharashtra:
लातूर....
स्किप्ट ::- नांगर घेऊन निघालेल्या शेतकऱ्याच्या पाठीशी राहण्याचा ग्रामसभेचा ठराव....धानोरा बुद्रुक विशेष ग्रामसभेत शेतकरी सहदेव व्हनाळे यांना दिला पाठींबा.....
AC ::- अहमदपूर ते विधान भवन खांद्यावर नांगर घेऊन पायी वारीसाठी निघालेल्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहण्यासाठी धानोरा बुद्रुक ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा घेतली. त्यात त्यांच्या मागण्यांना पाठींबा देण्याचा ठराव करण्यात आला.
महाराष्ट्रातील शेतकर-याना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी सहदेव व्होनाळे अहमदपूर ते मुंबई विधान भवन पायी यात्रा करत आहे. त्यास गावकऱ्यांचा संपूर्ण पाठींबा असा ठराव मांडला. त्यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी ठराव घेऊन पाठिंबा दर्शविला आहे. या शेतीचे निवेदन ग्रामपंचायत मार्फत तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
0
Share
Report