Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423104

अज्ञातांकडून कादवा नदीत मृत कोंबड्या फेकण्यात आल्या, आरोग्य धोक्यात!

SKSudarshan Khillare
Aug 15, 2025 01:01:09
Manmad, Maharashtra
अँकर-नाशिकच्या दिंडोरी तालूक्यातील भनवड व वारी शिवारतील कादवा नदी पात्रात गेल्या दिवसांपासून अज्ञातांकडून नदीपात्रात मृत कोंबड्या फेकण्यात येत असल्याचा प्रकार घडत असल्याने नदीचे पाणी प्रदुषित होत असल्यामुळे परिसरातील नागरीकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.तर या मृत कोंबड्यांमुळे भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने या कुत्र्यांमुळे नागरिकांसह जनावरांवर हल्ले होत असल्याच सांगण्यात येत आहे.त्यामुळे मृत कोंबड्या फेकणा-यांचा त्वरीत बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Aug 15, 2025 02:47:22
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn rain av Feed attached मध्यरात्रीपासून छत्रपती संभाजीनगर मध्ये जोरदार  पावसाने हजेरी लावली आहे,  यंदाच्या पावसाळ्यामध्ये पहिल्यांदा एवढा मोठा पाऊस  पडलाय त्यामुळं माना टाकलेल्या पिकांना या पावसामुळे  जीवनदान मिळाले आहे.. मोठा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, अनेक शेतांमधून  पाणी वाहू लागलाय,  जिल्ह्यात आजही चांगला पावसाची अपेक्षा आहे..
2
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Aug 15, 2025 02:45:45
Raigad, Maharashtra:
स्लग - साखर सुतारवाडीतील दरडग्रस्तांचे आंदोलन स्थगित ....... मंत्री भरत गोगावले यांचे आश्वासन ....... दरड ग्रस्तांनी दिला होता आत्मदहनाचा इशारा ...... अँकर - रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्या आश्वासनानंतर पोलादपूरच्या साखर सुतारवाडीतील दरडग्रस्त कुटुंबांनी आजचे आत्मदहन आंदोलन स्थगित केले आहे. दरड ग्रस्तांना घरे बांधण्यासाठी सरकारने देऊ केलेले 2 लाख 30 हजार रुपये अधिक 10 लाख रुपये मिळवून देण्याचे आश्वासन मंत्री गोगावले यांनी दिलं. दरड दुर्घटनेला 4 वर्ष उलटून देखील आपलं पुनर्वसन होत असल्याने ग्रामस्थानी गावातच सरण रचून स्वातंत्र्य दिनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. बाईट - भरत गोगावले, मंत्री
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Aug 15, 2025 02:31:22
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn high court munde av Feed attached धनंजय मुंडे यांना औरंगाबाद खंडपीठाने दहा हजार रुपयाची कॉस्ट लावली आहे , निवडणुकी याचिके सुनावणी वेळी वारंवार वेळ लागूनही लेखी उत्तर सादर केलं नाही त्यामुळे कोर्टाने मुंडे यांना ही कॉस्ट लावली आहे मुंडे यांच्या विरोधात करुणा मुंडे आणि राजाभाऊ फड यांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे त्यात निवडणुकीत गैरप्रकार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे याबाबत कोर्टात सुनावणी सुरू आहे, याबाबत आता पुढील सुनावणी 19 ऑगस्ट रोजी होणार आहे..
2
comment0
Report
ABATISH BHOIR
Aug 15, 2025 02:30:54
Kalyan, Maharashtra:
कल्याण-डोंबिवली मनपा मुख्यालयाबाहेर मोठा बंदोबस्त; चिकन-मटण विक्री विरोधात आंदोलनाचा इशारा ​अँकर: आज, १५ ऑगस्ट रोजी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) मुख्यालयाबाहेर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पालिका प्रशासनाने चिकन-मटण विक्री संदर्भात घेतलेल्या निर्णयाला विरोध करत खाटीक समाज आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलनाचा इशारा दिल्याने हा बंदोबस्त लावण्यात आला आहे. ​कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सकाळपासूनच पालिका मुख्यालयाबाहेर मोठ्या संख्येने पोलीस आणि सुरक्षा रक्षक उपस्थित आहेत. १५ ऑगस्ट निमित्त ध्वजारोहणासाठी पालिका आयुक्त येथे येणार आहेत. याचवेळी आंदोलक एकत्र येण्याची शक्यता असल्याने खबरदारी म्हणून कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. ​पालिकेच्या या निर्णयामुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी असून, याविरोधात आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी Wkt... आतिश भोईर कल्याण
1
comment0
Report
SKSACHIN KASABE
Aug 15, 2025 02:30:44
Pandharpur, Maharashtra:
15082025 Slug - PPR_MANDIR_INDEPENDENCE file 01 --- Anchor - भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त. , श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सुंदर फुलांच्या सजावटीने सजले श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात झेंडू, गुलाब, शेवंती, ऑर्केट, ब्लुडीजी, जिप्सो इत्यादी फुलांचा वापर करून आकर्षक व नवीन रम्य सजावट करण्यात आली आहे. यासाठी जवळपास दोन टन फुलाचा वापर केला असून, सदरची सजावट पुण्यातील भाविक सचिनअण्णा चव्हाण श्रीमंत मोरया प्रतिष्ठान, पुणे यांनी सेवाभावी तत्त्वावर मोफत करून दिली आहे.
4
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Aug 15, 2025 01:30:28
Yavatmal, Maharashtra:
यवतमाळच्या पांढरकवडा येथील हैदराबाद हायवेवर असलेल्या नामवंत तृप्ती फॅमिली रेस्टॉरंट, गणेश हॉटेलला रात्रीचे सुमारास आग लागली. किचन मधून आगीची ठिणगी चिमणीतून बाहेर पडली व वरच्या मजल्यावर असलेल्या बांबू ने क्षणार्धात पेट घेतला. याठिकाणी बाबू चा उपयोग करून सौंदर्यीकरण केले होते. जे आगीच्या विळख्यात आले. आग लागल्याची बाब तेथे जेवण करत असलेल्या ग्राहकाला लक्षात येतात त्यांनी तात्काळ याची सूचना हॉटेल मालकास दिली, त्यानंतर अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत संपूर्ण बांबू चे काम असलेला मजला आगीमुळे भस्मसात झाला. यात हॉटेल मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही.
14
comment0
Report
SKSudarshan Khillare
Aug 15, 2025 01:00:55
Yeola, Maharashtra:
अँकर-नाशिकच्या मनमाड जवळील घाट माथ्यावर असलेल्या माळेगाव कार्यात,नारायणगाव,घडगेवाडी या परिसरात उभ्या असलेल्या मका पिकावर रानडुकरे कळपाने शेतात घुसून पिकांचे नुकसान करत असल्याच्या घटना घडत असून नारायणगाव येथील देविदास उगले-पाटील यांच्या मक्याच्या शेतात रात्रीच्या सुमारास रानडुकरांच्या कळपाने नासधूस केल्याने त्यांचे नुकसान झाले असून वनविभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करून नुकसान भारपाईची मागणी केलीय
13
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Aug 14, 2025 17:17:58
Raigad, Maharashtra:
स्लग - साखर सुतारवाडी ग्रामस्थाचा आत्मदहनाचा प्रयत्न ग्रामस्थ आणि पोलिसांनी वेळीच लक्ष दिल्यामुळे मोठी दुर्घटना टळली हक्काची घर मिळाली नाहीत, पुर्नवसन झाले नाही, शासनाकडून होणाऱ्या दिरंगाई कंटाळून तरूण पेटत्या सरणावर झोपला अँकर - पोलादपूर तालुक्यातील साखर सुतार वाडी येथील दरड ग्रस्त तरुणाने आज आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थ आणि पोलिसांनी वेळीच लक्ष दिल्याने मोठा अनर्थ टळला. दरड दुर्घटना होऊन चार वर्षे झाली तरी पुनर्वसन न झाल्याने ग्रामस्थानी सरण रचून स्वातंत्र्य दिनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. मात्र गावातील एका तरुणाने आजच सरण पेटवून आत्मदहनाचा प्रयत्न केला.मात्र ही बाब लक्षात आल्याने ग्रामस्थ आणि पोलिसांनी त्याला सरणावरून बाहेर काढले.
14
comment0
Report
ABATISH BHOIR
Aug 14, 2025 17:17:48
Kalyan, Maharashtra:
वोटचोरीच्या विरोधात कल्याण मध्ये काँग्रेसच्या वतीने कॅन्डल मार्च.. हातामध्ये मशाल घेऊन आणि सत्ताधारी पक्षाविरोधात जोरदार घोषणाबाजी Anc..लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपकडून मोठ्या प्रमाणात मतांची चोरी झाल्याचा आरोप करत त्याच्या विरोधात कल्याणमध्ये जिल्हा काँग्रेसतर्फे कॅन्डल मार्च काढण्यात आला. vo..विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मतदार यादीमध्ये घोळ असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगावर दबाव टाकून त्यांच्या मदतीने मतदार यादीमध्ये फेरफार करून मतांची चोरी करत ही सत्ता मिळवल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. याविरोधात संपूर्ण देशभरात स्थानिक पातळीवर आंदोलन छेडण्याचे निर्देश राहुल गांधी यांनी दिले असून कल्याण काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली कल्याणात कॅन्डल मार्च काढण्यात आला. कल्याण स्टेशन परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत हा मार्च काढण्यात आला. यावेळी हातामध्ये मशाल घेऊन आणि सत्ताधारी पक्षाविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत जे दाखले दिले त्याचा अर्थ नरेंद्र मोदी हे वोटचोरी करून देशाचे पंतप्रधान झाले असून या वोट चोरीमुळे देशाची वाट लागली असल्याचा आरोप यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी केला. तसेच येणाऱ्या महापालिका निवडणुकीत अशा प्रकारची वोट चोरी आम्ही होऊन देणार नाही आणि याहीपेक्षा जोरदार आंदोलन आम्ही करणार असल्याचा इशाराही त्यांनीअनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. Byte.. सचिन पोटे कल्याण जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी
14
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Aug 14, 2025 17:15:35
Palghar, Maharashtra:
पालघर - पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाला तिरंगाची विद्युत रोषणाई . तिरंगाच्या विद्युत रोषणाईने पालघरच जिल्हाधिकारी कार्यालय झळकलं . विद्युत रोषणाई पाहण्यासाठी पालघरकरांची गर्दी . आकर्षक विद्युत रोषणाईने पालघर जिल्हाधिकारी कार्यालय उजळल .
14
comment0
Report
JMJAVED MULANI
Aug 14, 2025 16:47:25
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI SLUG 1408ZT_INDAPURMASHAL BYTE 1 इंदापूरकरांकडून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मशाल रॅली..... शेकडोच्या संख्येने इंदापूरकर रॅलीत सहभागी..... मशाल मिरवणुकीला 45 वर्षाची परंपरा.... Anchor_देशाच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संधीला पुण्याच्या इंदापूर शहरातून प्रदीप दादा गारटकर मित्र परिवाराच्या वतीने भव्य मशाल मिरवणूक काढण्यात आली.यामध्ये शेकडोंच्या संख्येने इंदापूरकर सहभागी झाले होते. याला 45 वर्षाची परंपरा आहे..... शहरातील विविध भागातून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली परंपरेनुसार हातात शेकडो मशाली घेवून, ही क्रांतीची मशाल रॅली काढण्यात आली. या मशाल मिरवणुकीत शहरातील तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण सहभागी झाले होते. बाईट_प्रदीप गारटकर आयोजक तथा पुणे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
14
comment0
Report
JMJAVED MULANI
Aug 14, 2025 16:32:49
Baramati, Maharashtra:
JAVED MULANI SLUG 1408ZT_INDAPURUJNI FILE 5 स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला उजनी धरणावर साकारली आकर्षक विद्युत रोषणाई..... विद्युत रोशनाईतून साकारली तिरंग्याची लक्षवेधी प्रतिमा.... उजनी धरणावर स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रध्वजाच्या रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई .. उजनीत सध्या १०२ टक्के पाणीसाठा... Anchor : पुणे ,सोलापूर आणि अहिल्यानगर ,जिल्ह्याचे वरदान ठरलेल्या उजनी धरणावर देशाच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून राष्ट्रध्वजाच्या रंगाची आकर्षक विद्युत रोशनी करण्यात आलीय. ती पाहण्यासाठी नागरिक व पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गांवरिल भिमा नदीवरील पुलावर प्रवासी थांबून छायाचित्र टिपण्यासाठी सायंकाळी व रात्रीच्यावेळी गर्दी करीत आहेत. उजनी धरणात सध्या १०२.४५ टक्के पाणीसाठा असून ११८. ५४ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. धरण ९ ऑगस्ट रोजी शंभर टक्के भरले आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त मागील वर्षी १५ ऑगस्टला अशीच आकर्षक विद्युत रोषणाई केल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या ट्विटरवरून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकुन कौतुक केले होते.
14
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Aug 14, 2025 16:32:40
Yavatmal, Maharashtra:
विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून भाजपा युती सरकार सत्तेत आले आहे. असा आरोप करीत यवतमाळ मध्ये काँग्रेसने भव्य मशाल मोर्चा काढला. निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपने मतांवर दरोडा टाकलेला असून या मतचोरीची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. निवडणूक आयोगाने निष्पक्ष व पारदर्शी निवडणूका घेणे त्यांचे कर्तव्यच आहे पण त्यांच्यावरच संशयाचे ढग जमा होत असतील तर ते लोकशाही साठी घातक आहे. लोकशाही व्यवस्था अबाधित रहावी व निवडणूक आयोगावर निर्माण झालेले हे संशयाचे ढग दूर करण्यासाठी विधानसभा निवडणुकीतील मॅच फिक्सिंगची चौकशी करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. या आंदोलनात आमदार बाळासाहेब मांगुळकर माजी मंत्री वसंत पुरके आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. संविधान चौकातून निघालेल्या या मशाल यात्रेत 'मत चोर, खुर्ची सोड' अशा घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहराच्या प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण केले.
15
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Aug 14, 2025 16:32:31
Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज.... स्किप्ट ::- लातूर शहर आणि परिसरात पावसाची दमदार हजेरी... तिन तासांपासून जोरदार पाऊस.... AC ::- मागील अनेक दिवसापासून पाठ फिरवलेल्या पावसाने आज लातूर जिल्ह्यातील अनेक भागात हजेरी लावली आहे.लातूर शहर आणि परिसरात मागील अनेक दिवसापासून पावसाने दडी मारली होती..पावसाने नाही म्हणायला काही वेळा नावालाच हजेरी लावली होती..मोठा पावसाची मागील अनेक दिवसांपासून पासून लातूरकर प्रतीक्षा करत होते..आज दुपारी काही वेळ पावसाच्या मध्यम सरी पडून गेल्या होत्या.मात्र रात्री सात नंतर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या तिन तासांपासून जोरदार पाऊस पडत आहे... मागील 30 दिवसानंतर पावसाने दमदार हजेरी लावली आहे.हा पाऊस लातूर शहर आणि काही भागातच पहावयास मिळाला आहे..आज ही जिल्ह्यात मोठ्या पावसाची प्रतीक्षा केली जात आहे ...
14
comment0
Report
Independence Day
Advertisement
Back to top