Back
नाशिक जेलरोडवर धाडसी दरोडा: घरात घुसून काढले पैसे!
SGSagar Gaikwad
Jul 31, 2025 07:52:43
Nashik, Maharashtra
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_daroda
Nashik daroda story
*नाशिकच्या जेलरोड भागात दिवसाढवळ्या दरोडाच्या प्रयत्न झाल्याने खळबळ*
अँकर
नाशिकच्या जेलरोड भागातील भारत भूषण सोसायटी येथे दिवसाढवळ्या धाडसी दरोडाचा करण्यात आला आहे.आज सकाळच्या सुमारास एसी रिपेरिंग करण्याच्या बहाना करून हेल्मेट घातलेले दोन इसमांनी रामदास गोविंद पगारे यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर अजून दोन जणांनी बंदुकीसह घरात शिरकाव केला.रामदास पगारे व त्यांची सून नीलम संदीप पगारे हे दोघेच घरात होते. नीलम यांचे पती संदीप पगारे, आई प्रमिला, भाऊ शेखर व त्याची पत्नी रोहिणी पगारे हे सर्व कामानिमित्त बाहेर गेले होते.दरोडेखोरांनी सोने नाणे व पैशाची विचारणा केली, परंतु आमच्या घरात तुम्हाला काही मिळणार नाही ..सर्व बँकेत असल्याचे सांगितल्यावर दोघांनाही तोंडाला पट्ट्या बांधून मारहाण करण्यास सुरवात केली.. तसेच बाथरूम मध्ये कडी लावून कोंडून ठेवले. चोरट्यांनी संपूर्ण घर तपासले परंतु त्यांच्या हाती कपड्यां व्यतिरिक्त काही मिळाले नाही. जाता जाता एका चोरट्याचे हेल्मेट गेटवर लावलेले आढळून आले आहे....दिवसा ढवळ्या झालेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व गुन्हे शोध पथकाच्या टीमने धाव घेतली. पुढील तपास सुरू आहे...
बाईट- रामदास पगारे...
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowAug 01, 2025 04:02:04Kolhapur, Maharashtra:
पत्नी समजून दुसऱ्याच महिलेवर अंत्यसंस्कार, कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर इथली धक्कादायक घटना
कोल्हापूर ( प्रताप नाईक ) कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर इथं स्वतःची पत्नी समजून दुसऱ्याच महिलांवर अंत्यसंस्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित महिलेवर अंत्यसंस्कार केल्यानंतर पत्नी गावात हजर झाली आणि त्यानंतर अंत्यसंस्कार झालेली महिला कोण याचा शोध सुरू झालाय. बेवारसपणे सापडलेल्या महिलेच्या गालावर असलेल्या तिळावरून संबंधित पतीने बेवारस मृतदेह आपल्याच पत्नीचा असल्याचं पोलिसांना सांगितलं होतं, त्यानंतर हा सर्व प्रकार घडला आहे.
याबाबत अधिक ची माहिती अशी जयसिंगपूर शहरातून 37 वर्षीय महिला बेपत्ता झाली होती. तिच्या पतीने पोलिसात पत्नी बेपत्ता असल्याची फिर्याद दिली होती. यानंतर दहा दिवसांनी सांगली जिल्ह्यातील बामणी नदीपात्रात एका महिलेचा सडलेला मृतदेह पोलिसांना आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी ज्या पतीने पत्नी हरवल्याची फिर्याद दिली होती त्या पतीला संबंधित महिलेची ओळख पटवण्यासाठी बोलावून घेतलं. त्यावेळी संबंधित पतीने महिलेच्या गालावरील तीळ आणि नेसलेली साडी पाहून आपलीच पत्नी असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर सर्व कुटुंबीयांनी मिळून त्या माहिलेवर अंत्यसंस्कार केले. बुधवारी सकाळी या महिलेचे रक्षा विसर्जन देखील पार पडले. यादरम्यान कुटुंबीय, पै पाहुण, मित्र मंडळी दुःखात असताना अचानक संबंधित पतीची पत्नी बचत गटाचा कर्जाचा हप्ता भरण्यासाठी घरी हजर झाली.. त्यावेळी सर्वांनाच धक्का बसला. यावेळी या महिलेला आपण समजून पत्नीने दुसऱ्याच महिलेवर अंत्यसंस्कार केल्याची माहिती मिळताच ती पत्नी पुन्हा घरातून निघून गेली. त्यामुळे अंत्यसंस्कार केलेली महिला नक्की कोण असा प्रश्न उपस्थित राहिला. पोलिसांना या संदर्भात माहिती मिळताच ते देखील खडबडून उठले, त्यांनी संबंधित महिलेला शोधून ती जिवंत असल्याची खात्री केली, पण त्यानंतर जयसिंगपूर पोलिसांनी अंत्यसंस्कार झालेल्या महिलेचा शोध सुरू केलाय. पण बेवारस आणि सडलेल्या अवस्थेत असलेल्या मृतदेहाच्या गालावरील एका तीळाने पती, पत्नी, कुटुंबीय आणि पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली आहे.
0
Report
PPPRANAV POLEKAR
FollowAug 01, 2025 04:01:33Ratnagiri, Maharashtra:
फुणगुस येथे पुन्हा त्याच ठिकाणी अपघात, ट्रक दरीत कोसळला
गुगल मॅपने केला पुन्हा घात
संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस येथील अवघड वळणावर पुन्हा त्याच ठिकाणी सकाळी 10 वाजता दुसरा अपघात झाला आहे. गोव्याहून वसईकडे जाताना गुगल मॅप द्वारे फुणगुस मार्गे हा ट्रक चालला होता. फुणगुस येथील अवघड वळणार गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाला. सुदैवाने चालकाने गाडीतून उडी मारल्यामुळे जीवितहानी टळली. दोन दिवसापूर्वी याच ठिकाणी केमिकल टँकरचा अपघात झाला होता. 15 दिवसातील हा तिसरा अपघात आहे. वारंवार घडणाऱ्या या अपघाताने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
सविस्तर वृत्त असे की, पार्लेजी पेपर रॅपिंग रोल घेऊन ट्रक (एम एच 48 जीबी 2930) घेऊन गोव्याहून वसईकडे चालला होता. यामध्ये 7 टन माल होता. फुणगुस येथे आला अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक थेट 30- 40 फूट खोल दरीत कोसळला. यावेळी चालकाने गाडीतून उडी मारल्याने बचावला. अपघाताच्या मोठ्या आवाजाने ग्रामस्थानी धाव घेतली आणि मदत केली. चालकाला दरीतून वरती आणत पाणी दिले. ग्रामस्थ किरण भोसले, साहीम खान, प्रशांत थुळ, सुभाष लांजेकर, जमीर नाईक,गावातील ग्रामस्थ यांनी मदत केली. यापूर्वी दोन दिवसापूर्वी देखील अशीच घटना घडली होती त्यावेळेला गावातील ग्रामस्थ किरण भोसले आणि साहिल खान दोन दिवस अहोरात्र मेहनत घेतली.
0
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowAug 01, 2025 04:01:18Beed, Maharashtra:
बीड : वाहतूक पोलिसांची संयुक्त कारवाई, वाहनधारकांच्या कागदपत्रांची केली तपासणी
Anc : बीड जिल्हा वाहतूक विभाग, परळी शहर पोलीस आणि संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने परळी शहरात राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात वाहनधारकांवर धडक कारवाई केली. दुचाकी, चारचाकी आणि ऑटो रिक्षा यांच्यावर लक्ष केंद्रित करत, वाहनचालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स, वाहनांची कागदपत्रे, तसेच पूर्वी केलेले दंड तपासण्यात आले. वाहतूक शिस्तीचा भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करत नागरिकांमध्ये शिस्तीचे भान ठेवण्याचा प्रयत्न या कारवाईतून करण्यात आला आहे.
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 01, 2025 04:00:20Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Shirur Peacock Dance
File:01
Rep: Hemant Chapude(Shirur)
Anc :-नाच रे मोरा आंब्याच्या वनात... या बालकवींची ओळ शिरुर तालुक्यातील चांडोह गावच्या माळरानावर खऱ्या अर्थानं जिवंत झाल्यासारखी वाटलीय..
Vo :- हिरवं गार माळरान, पावसाच्या सरी पडताच चांडोह येथे एका खुल्या शेतमळ्यात मोराने थाटात आपला पिसारा फुलवला आणि वाऱ्याच्या तालावर मोहक नृत्य सुरु केलंय
शंभर रंगांनी नटलेला हा निसर्गकलाकार जणू पावसाचं स्वागतच करतच होता.
हा विडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, निसर्गप्रेमींसाठी हा एक अविस्मरणीय अनुभव ठरत असुन मोराच्या नृत्याने जिवंत दृश्य उभं केलं, जिथे प्रत्येक थेंबात आणि प्रत्येक पिसाऱ्यात सौंदर्य खुललं...!
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया शिरूर पुणे...
0
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 01, 2025 03:47:50Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी शिवसेना युबीटी आणि काँग्रेसला धक्का दिला आहे, नेर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पवन जयस्वाल यांना गळाला लावत त्यांनी नेर तालुक्यात शिवसेना युबीटीला खिंडार पाडले आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. विधानसभा निवडणुकीत पवन जयस्वाल यांना उद्धव ठाकरेंनी राठोड यांच्या विरोधात उमेदवारी दिली होती, परंतु ऐन वेळेवर महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला सुटली आणि जयस्वाल यांचा पत्ता कट झाला होता. तत्पूर्वी लोकसभा निवडणुकीत देखील शिवसेना युबीटी खासदार संजय देशमुख यांच्या सोबत जयस्वाल होते, मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने राठोडांनी मोठी खेळी करीत खासदार संजय देशमुख यांना हादरा दिला. अनेक जिल्हा परिषद सदस्य, तसेच माजी नगराध्यक्ष आणि बाजार समितीच्या संचालकांनी शिवसेना प्रवेश केला.
3
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowAug 01, 2025 03:47:18Parbhani, Maharashtra:
अँकर- हिंगोली जिल्ह्यात वाळू माफियाने महसूल पथकावर हल्ला करीत त्यांच्या ताब्यात असलेला हायवा घेऊन पळाल्याची घटना घडलीय. सेनगाव येलदरी रोडवरील भानखेडा परिसरातील ही घटना असून उपविभागीय अधिकाऱ्यांनी तैनात केलेल्या महसूल पथकाने रात्री बाडे बारा वाजता अवैध वाळू उपसा करणारे वाळूने भरलेला हायबा ताब्यात घेतला होता. सदर हायवा पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना पांढऱ्या आणि काळया चार चाकी मधून आलेल्या सहा वाळू माफियांनी महसूलच्या पथकाला दगडाने मारहाण करून हायवाच्या खाली उतरवले, त्यांच्या ताब्यात असलेला वाळू ने भरलेला हायवा घेऊन वाळू माफिया पसार झाले,या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून वाळू माफियांना किती मस्ती आली आहे,यांना नेमका कुनाचा वरदहस्त आहे, अशी चर्चा आज रंगलीय, ग्राम महसूल अधिकारी अजय चोरमारे यांच्या फिर्यादीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात वाळू माफिया शुभम खिलारे नवनाथ राठोड आणि अज्ञात चार जनावर शासकीय कामात अडथळा केल्यासह ताब्यातील वाळू आणि वाहन मारहाण करून पसार झाल्याच्या कलमासह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत...
3
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowAug 01, 2025 03:46:33Raigad, Maharashtra:
स्लग - नातवानेच केला वृद्ध आजोबांचा खून ...... म्हसळा शहरातील भरवस्तीतील घटना ....... अनोळखी व्यक्तीने खून केल्याचा रचला बनाव ....... पोलिसांनी ठोकल्या नातवाला बेड्या ......
अँकर - रायगडच्या म्हसळा शहरात नातवानेच वृध्द आजोबाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शौकत परदेशी असे मृत आजोबाचे नाव आहे. तर खून करणारा नातू मोहंमद अली परदेशी याला पोलिसांनी अटक केली आहे. अनोळखी व्यक्तीने तोंडावर रुमाल बांधून घरात प्रवेश केला आणि आजोबांचा खून केला आपण त्याचा पाठलाग केल्याचा बनाव नातवाने रचला होता मात्र पोलिस चौकशीत आपणच खून केल्याची कबुली त्याने दिली आहे. थ्रिलर चित्रपट पाहून नातवाने हे कृत्य केल्याचं तपासात पुढे आलं आहे.
2
Report
PPPRANAV POLEKAR
FollowAug 01, 2025 03:33:25Ratnagiri, Maharashtra:
ब्रेकिंग :
प्रशासनाच्या वादात चिपळूणचे नागरिक वेठीस....नाट्यमय वादाची जिल्हाभर चर्चा.
चिपळूण मध्ये नगर परिषद आणि महावितरणच्या आपसातील वादात शहर 3 तास अंधारात.....व्यापारी वर्गाचा प्रशासनाच्या विरोधात संताप.
महावितरणची 22 लाखांची थकबाकी राहिल्यामुळे नगर परिषदेचा वीजपुरवठा महावितरण कडून खंडित.
तर वीजपुरवठा खंडित केल्याच्या रागातून नगर परिषदेने महावितरण कडून थकीत कराचे कारण देत सब स्टेशन केलं सील...
दोघांच्या वादात महावितरणचा सब स्टेशन मध्ये दुरुस्तीसाठी जाण्याचा मार्गच बंद झाल्यामुळे शहरातील नागरिकांसह व्यापाऱ्यांना बसला मोठा फटका. जवळपास तीन तासांहून अधिक काळ शहरातला वीजपुरवठा राहिला खंडित.
महावितरण आणि नगर परिषदेचा वाद पोचला थेट पोलिस स्टेशन मध्ये.जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर प्रकरण तात्पुरते निवळले.
प्रशासनात तू तू मैं मैं....नागरिकांची गोची.
1
Report
PNPratap Naik1
FollowAug 01, 2025 03:33:18Kolhapur, Maharashtra:
Kop Amababai
File
Anc :- अंबाबाई मंदिर व परिसर पुनर्विकास आराखडाच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारने समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी अपर मुख्य सचिवांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांचाही समावेश करण्यात आलाय. भूसंपादनाचे अन्य पर्याय वापरून कशाप्रकारे भूसंपादन करावे याचे धोरण ठरवणे आणि भूसंपादनाचा खर्च कमी करणे असे या समितीचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
4
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 01, 2025 03:32:37Ambegaon, Maharashtra:
Feed 2C
Slug: Malin Adivare Waterfall
File:02
Rep: Hemant Chapude (Ambegaon)
Anc: आंबेगाव तालुक्याच्या अडिवरे परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे उंचकड्याच्या डोंगरावरून पांढरे शुभ्र धबधबे खळखळून वाहू लागलेत,हिरवागार निसर्ग बहरलाय दाट धुके दाटून येताय, पावसाच्या हि जोरदार सरी कोसळताय,हे सार विलोभनीय दृश्य मन प्रसन्न करून टाकतंय,या मनमोहर दृश्यांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी
Wkt: हेमंत चापुडे(प्रतिनिधी)
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया आंबेगाव पुणे..
2
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 01, 2025 03:31:56Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरातील होटगी गावात सराफाचे दुकान फोडून सात लाखांचा मुद्देमाल लंपास
- सोलापूर जवळील होटगी गावात चोरट्यांनी सराफाचे दुकान फोडले, सात लाख रुपयांचा मुद्देमाल केला लंपास
- सोलापूर रस्त्यावरील बेनक गणपती ज्वेलर्स रात्री साडेतीनच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना
- सराफाच्या दुकानाचे शटर उचकटून सोने आणि चांदीचे दागिने नेले चोरून
- वळसंग पोलिसांकडून श्वान पथकाच्या माध्यमातून चोरट्यांचा मागावा घेण्याचा करण्यात आला प्रयत्न
- सराफ सिद्धाराम हुडे यांनी वळसंग पोलीस ठाण्यात दिली फिर्याद
- याप्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल
Byte: अनिल सनगले, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वळसंग पोलीस ठाणे
1
Report
PNPratap Naik1
FollowAug 01, 2025 03:31:49Kolhapur, Maharashtra:
Kop Chori
Feed :-2C
Anc :- कोल्हापूर जिल्ह्यातील कागल पंचतारांकित एमआयडीसी मध्ये सुरक्षा रक्षकाचे काम करणाऱ्या व्यक्तीने मित्राच्या मदतीने तेरा लाखाचे साहित्य चोरल्याचे प्रकरण समोर आले आहे. कागल मधील मेट्रो हायटेक टेक्स्टाईल पार्क मधून चोरट्यानी शिलाई मशीनचे 29 बॉक्स चोरले होते. चोरलेल साहित्य विक्रीसाठी नेत असताना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करत तिघा जणांना अटक केली आहे. याप्रकरणी विजयकुमार सिंग, शफातुला खान, अफजल खान या तिघांना अटक करण्यात आली आहे.
2
Report
DPdnyaneshwar patange
FollowAug 01, 2025 03:17:29Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_ATTACK_R1
खंडणीसाठी पवनचक्कीचा कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला,
हल्ल्यात कर्मचारी गंभीर जखमी .
पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
Anchor
धाराशिव- खंडणीसाठी हल्ल्याचं बीड जिल्ह्यातील लोन आता धाराशिव पर्यंत येऊन पोहोचला आहे. लोहारा तालुक्यातील पवनचक्की मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर खंडणीसाठी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. खंडणीसाठी गुंडांच्या टोळक्याने लाट्या काठ्याने या कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला केला यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत . लोहारा तालुक्यातील मोगा शिवारात नंदीपाठी ते धानोरी रस्त्यावर पवनचक्की प्रकल्प सुरू आहे या प्रकल्पावर काम करणाऱ्या विशाल विश्वनाथ पांचाळ या कर्मचाऱ्यावर लाट्या काठ्याने जीवघेणा हल्ला केला एवढेच नव्ह तर त्या ठिकाणी असलेल्या आणखी चार कर्मचाऱ्यांनाही बेदम मारहाण केली. या प्रकरणी लोहारा पोलिसांनी अजित मुसंडे, शंकर मुसांडे ,सुरत साळुंखे ,नरहरी बाबर विशाल जमादार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात देखील घेतला आहे या घटनेमुळे खंडणीसाठी हल्ला केल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे.
5
Report
SGSagar Gaikwad
FollowAug 01, 2025 03:17:13Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_pankja_munde
पंकजा मुंडे दोन दिवस नाशिक दौऱ्यावर
अँकर
भाजपाच्या नेत्या मंत्री पंकजा मुंडे या आज आणि उद्या नाशिक दौऱ्यावर आहे आज दुपारी पंकजा मुंडे नाशिकला पोहोचणार आहे शहरातील क्रेडाईच्या एरोनॉमिक्स 2025 या कार्यक्रमाला त्या उपस्थित असतील यानंतर आमदार सीमा हिरे यांच्या निवासस्थानी जाणार आहे उद्या सकाळी त्रंबकेश्वर येथे त्रंबक राजाचे दर्शन घेऊन आयमा आणि निमा यांच्या उद्योग करांशी बैठक घेणार आहे... बैठक आटपून ते तपोवन येथील सांडपाणी प्रकल्पाची पाहणी करणार असल्याचा दौऱ्यात नमूद करण्यात आला आहे यानंतर ते रात्री बीडच्या दिशेने रवाना होणार आहे... पंकजा मुंडे यांचे दोन दिवस भरगच्च कार्यक्रम नाशकात असणार आहे..
3
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 01, 2025 03:17:08Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सरसंघचालक मोहन भागवत यांना धरून आणण्याचा आदेश होता
- मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील एटीएसचे निवृत्त पोलीस अधिकारी महिबूब मुजावर यांचा मोठा गौप्यस्फोट
- सरसंघचालक मोहन भागवत यांना धरून आणण्याचा होता आदेश
- तपासासाठी राज्यातील कोणतेही कर्मचारी निवडण्याचे स्वातंत्र्य महिबूब मुजावर यांना देण्यात आले होते
- पण हा आदेश न पाळल्याने मला खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आले
- त्यावेळी एटीएसचे मुख्य सूत्रधार परमबीरसिंह हेच माझे वरिष्ठ होते
- सात-आठ वर्षानंतर मी गुन्ह्यातून निर्दोष सुटलो असं देखील एटीएसचे माजी निवृत्त अधिकारी महिबूब मुजावर यांनी म्हटलं आहे
बाईट -
महिबूब मुजावर ( मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील एटीएसचे निवृत्त तपास अधिकारी )
4
Report