Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421306

केडीएमसी कल्याण में एक्सपायर्ड ड्रिंक्स पर बवाल, आचार्य अत्रे थिएटर में हंगामा

ABATISH BHOIR
Sept 19, 2025 01:16:01
Kalyan, Maharashtra
केडीएमसीच्या कल्याणातील चार्य अत्रें नाट्यगृहातील उपहारगृहात प्रेक्षकांना विकले "Expiry coldirnk" उपहारगृह चालकाचा बेजबाबदारपणा नागरिकांनी केला उघड .व्हिडीओ वायरल Anchor :- केडीएमसीच्या कल्याण मधील आचार्य अत्रे रंग मंदिर नाट्यगृहात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला .आचार्य अत्रे नाट्यगृहात आज रात्रीच्या सुमारास जिग्नेश भाई ठक्कर या नाटकाचा प्रयोग सुरू होता .साडेदहा वाजता इंटरवल झाल्यावर प्रेक्षक नाट्यगृहातील उपहारगृहत गेले . काही प्रेक्षकांनी या उपहारगृहातून कोल्ड्रिंक्स बॉटल विकत घेतल्या. 20 रुपये किंमत असलेल्या बॉटल या उपहारगृह चालकाने त्यांना 25 रुपयाला दिल्या . प्रेक्षकांनी देखील वाढीव किंमत देऊन या बॉटल्स घेतल्या. मात्र काही जणांनी हे कोल्ड्रिंक पिल्यानंतर बॉटल पाहिले असता त्या बॉटलवर एक्सपायरी डेट दिसली .ती पाहून त्यांना धक्काच बसला या बॉटलची एक्सपायरी पंधरा-वीस दिवसापूर्वीच झाली होती. प्रेक्षकांनी याबाबत उपहारगृह चालकाला जाब विचारला यावेळी अत्रे रंग मंदिरात एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं .उपाहारगृह मालकाने आपली चूक कबूल केली मात्र प्रेक्षकांनी एक्सपायरी डेट मुदत संपलेले कोल्ड्रिंक विकल्याने उपहारगृह चालकाची मात्र चांगलेच करडपट्टी काढली तसेच त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.
3
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRANAV POLEKAR
Sept 19, 2025 03:17:50
Ratnagiri, Maharashtra:राजापूर रानतळे येथे मोकाट गुरांमुळे भीषण अपघात – चालक सुखरूप, म्हैशीचा मृत्यू राजापूर तालुक्यातील रानतळे येथील पोल्ट्री फार्म जवळ आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास मोकाट गुरांमुळे भीषण अपघात घडला. बारसू येथील युवा ठेकेदार दीप्तेश कदम यांच्या चारचाकी वाहनाला रस्त्यावर आलेल्या गुरांमुळे जोरदार धडक बसली. या धडकेनंतर गाडी पलटी होऊन रस्त्याच्या बाजूला गेली. सुदैवाने वाहनचालकाला कोणतीही दुखापत झाली नाही. त्यांनी सीटबेल्टचा वापर केल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र या अपघातात एक म्हैस जागीच ठार झाली असून दुसरे जनावर गंभीर जखमी झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून मोकाट गुरांचा प्रश्न सातत्याने सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि नागरिकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला होता. तरीदेखील ठोस कारवाई न झाल्यामुळे हा अपघात घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी मोकाट गुरांचे मालक शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच अपघातातून बचावलेल्या वाहनचालकावर कोणतीही जबाबदारी टाकू नये, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 19, 2025 03:16:32
Parbhani, Maharashtra: अँकर- यंदा सतत होत असलेल्या अति मुसळधार पावसामुळे खरीप हंगाम वाया जाण्याची वेळ आलीय, हिंगोली जिल्ह्यात तर पावणे तीन लाख हेक्टर वरील पिक अतिवृष्टीमुळे खराब झालीयेत. निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांचे संपूर्ण कष्ट वाया गेले असून मोठे आर्थिक नुकसान झाल आहे. परभणीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून त्यांना लवकरच मदत दिली जाईल असा म्हटलंय, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नयेत यासाठी शेतकर्यांना कर्जमाफी देण्याची गरज असल्याचा ही पुनरुच्चार मंत्री झिरवाळ यांनी केलाय, त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी 121- नरहरी झिरवाळ- पालकमंत्री,हिंगोली
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 19, 2025 03:04:06
2
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 19, 2025 03:03:04
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 19, 2025 03:02:27
Beed, Maharashtra:बीड : दिव्यांग कर्मचाऱ्यांवर भेदभाव थांबवा, सीईओंचे विभागप्रमुखांना कारवाई करण्याचे आदेश Anc : बीड जिल्हा परिषदेचा अत्यंत संवेदनशील निर्णय घेण्यात आलाय. दिव्यांग कर्मचाऱ्यांवर यापुढे कोणत्याही प्रकारचा भेदभाव सहन केला जाणार नाही. सर्व अधिकारी, विभागप्रमुख आणि कार्यालय प्रमुखांनी दिव्यांग कर्मचाऱ्यांशी सौजन्यपूर्ण, सन्मानपूर्वक आणि सकारात्मक वर्तन ठेवणे बंधनकारक असल्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी दिले आहेत. या आदेशामुळे दिव्यांग कर्मचाऱ्यांना आत्मसन्मान, कामकाजाची उर्जा आणि समानतेची हमी मिळणार आहे. सरकारी यंत्रणेमध्ये दिव्यांग कर्मचाऱ्यांचे योगदान महत्वाचे असून त्यांच्यासाठी सुरक्षित आणि आदरयुक्त वातावरण तयार करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याची चर्चा होत आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Sept 19, 2025 03:01:22
Yeola, Maharashtra: अँकर:- शिक्षण हक्काचं असलं तरी त्यासाठी विद्यार्थ्यांना दररोज धोक्याचा सामना करावा लागत असेल, तर हा विषय किती गंभीर आहे हे लक्षात येतं. अशीच एक परिस्थिती समोर आली आहे नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातल्या गारखेडा गावात. इथं जिल्हा परिषद शाळेत शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, मात्र शाळेत जाण्याचा रस्ता चिखलमय झाल्याने विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.'गारखेडा ते गवंडगाव रस्ता गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून दुर्लक्षित असून या रस्त्यावर खड्ड्यांच साम्राज्य पसरले आहे पावसाळ्यात चिखल साचून पायी चालणे देखील मुश्किल होत आहे. त्यात गारखेडा गावच्या विद्यार्थ्यांचा हा प्रश्न शिक्षणात अडथळा ठरत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेतीमाल बाजारात नेण्यात देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणं गरजेचं आहे. या संदर्भात घटनास्थळावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी....
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 19, 2025 02:48:44
4
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 19, 2025 02:32:35
Parbhani, Maharashtra: अँकर- हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील भेंडेगाव येथील काही व्यक्तीनी मनोज जरांगे पाटील यांच्या बद्दल आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर पोस्ट केल्याने जरांगे समर्थक हिंगोलीत आक्रमक झाले होते, काल रात्री शेकडो जरांगे समर्थक कुरुंदा पोलीस ठाण्यात जमले होते,त्यांनी आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. व्हिडिओच्या आधारे अश्लील भाषेत व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या भेंडेगाव येथील तिघा जणांवर कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय, दोन समाजात तेढ निर्माण करून सामाजिक द्वेष आणि शत्रुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केलाय. त्यामुळे नागरिकांनी कुठल्या ही अफवांवर विश्वास ठेवू नये असे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलय. 121-रामदास निर्दोडे- साह्यक पोलिस निरीक्षक कुरुंदा
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Sept 19, 2025 02:32:15
Bhandara, Maharashtra:Pravin Tandekar Bhandara Slug - 1909_BHA_PROSTITUTION FILE - 1 VIDEO 1 IMAGE *वेश्याव्यवसाय रॅकेटचा भंडारा पोलिसांनी केला पर्दाफाश दोघांना अटक....दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई* Anchor :- दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाने तुमसर शहरात सुरू असलेल्या एका मोठ्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून,त्यांच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई भंडारा येथील दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाने केली आहे. दहशतवाद विरोधी शाखेला एका गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. Vo : तुमसर येथील वैभव बोरकर (४०, रा. आंबेडकर वार्ड, तुमसर जि. भंडारा) आणि भारत कोल्हाडकर (३६, रा. शिवाजी वार्ड, तुमसर जि. भंडारा) हे दोघे मिळून मेहेगाव येथे बांधकाम सुरू असलेल्या घरामध्ये वेश्याव्यवसायाचा अड्डा चालवत होते. हे दोघे आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना या व्यवसायात ढकलत होते. माहितीची खात्री पटल्यानंतर, तुमसरचे उपविभागीय पोलिस अधिकारी मयंक माधव यांच्या आदेशानुसार ही कारवाईची योजना आखण्यात आली. या कारवाईसाठी गोबरवाही पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शरद शेवाळे यांची विशेष पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. पथकाने बनावट ग्राहक पाठवून या माहितीची पडताळणी केली. बनावट ग्राहकाने दिलेल्या माहितीनुसार,आरोपी वैभव बोरकर आणि भारत कोल्हाडकर हे दोघे महिला पुरवत होते आणि ग्राहकांकडून पैसे घेत होते. पुराव्यांची खात्री झाल्यानंतर,पोलिस पथकाने पंचांसमक्ष त्या घरात छापा टाकला. छाप्यात पोलिसांनी वेश्याव्यवसायासाठी वापरले जाणारे साहित्य आणि रोख रक्कम जप्त केली. तसेच,या अड्ड्यामध्ये सापडलेल्या एका महिलेची सुटका करण्यात आली. त्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ती भारत कोल्हाडकर याच्या सांगण्यावरून येथे येत होती आणि ग्राहकांकडून मिळणाऱ्या पैशांतील काही भाग त्याला देत होती. या कारवाईनंतर आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर कलम ३, ४, ५, अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Sept 19, 2025 02:31:25
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 19, 2025 02:16:50
Raigad, Maharashtra:स्‍लग - निम्‍मी नोकरी संपल्‍यावर शिक्षकांवर आता टीईटी परीक्षेचे ओझे ........... सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्णयामुळे मोठा पेच ........ अन्‍यथा शिक्षकांना नोकरी गमावण्‍याची भीती ........ राज्‍यातील सर्व शिक्षक संघटना एकवटल्‍या ........... सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करण्‍याची मागणी ......... अँकर – सेवेत कायम रहायचं असेल तर शिक्षकांना आता टीईटी म्‍हणजे शिक्षक पात्रता परीक्षा पास होणं बंधनकारक करण्‍यात आलंय. वयाची ५२ वर्षे उलटून गेलेल्‍या शिक्षकांना यातून वगळण्‍यात आलंय. मात्र सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या एका निर्णयामुळे शिक्षकांपुढे मोठा पेच निर्माण झालाय. परीक्षा पास झाले नाही तर शिक्षकांवर नोकरी गमावण्‍याची वेळ येवू शकते. या विरोधात आता राज्‍यातील शिक्षक संघटना एकवटल्‍या आहेत. निम्‍मी नोकरी झाल्‍यावर शिक्षकांनी पात्रता परीक्षा द्यायची का असा सवाल या संघटनांनी उपस्थित केलाय. राज्‍य सरकारने सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या या निर्णया विरोधात पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी शिक्षक संघटनांची मागणी आहे. बाईट – राजेश सुर्वे, राज्‍याध्‍यक्ष महाराष्‍ट्र राज्‍य शिक्षक परीषद, प्राथमिक
2
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 19, 2025 02:16:04
Kalyan, Maharashtra:केडीएमसीच्या मुख्यालयात अग्नीशस्त्रे घेऊन फिरायला परवानगी? अप्रिय घटना घडल्यास जबाबदार कोण ? कल्याण : केडीएमसीच्या मुख्यालयात अनेकदा राडे झाले आहेत.याच राड्यावरुन पालिका प्रशासनाला लक्ष्य केले गेले आहे होते.त्यामुळे पालिका मुख्यालयात येत असताना कोणत्याही प्रकारचे अग्नीशस्त्र बाळगू नये असा नियम काढला गेला होता..मात्र आज केडीएमसीत काही विषयावर आयुक्तांसोबत बैठक होती. या बैठकीसाठी स्थानिक काही नेते मंडळी आली होती.त्यांच्यासोबत अग्नीशस्त्रे घेऊन काही अंगरक्षक मुख्यालयात परिसरात उघडपणे फिरताना दिसली. त्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडल्यास त्याचा जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत केडीएमसीच्या उपायुक्त वंदना गुळवे यांना पत्रकारांनी विचारणा केली महापालिका आवारात अग्नीशस्त्रे घेऊन येण्याची पवानगी आहे का? त्यावर त्यांनी सांगितले की, आम्ही माहिती घेऊन सांगतो, मात्र कॅमरासमोर बोलण्यास नकार दिलाय...
2
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 19, 2025 02:15:53
Jalna, Maharashtra: FEED NAME | 1909ZT_CSN_NCP(10 FILES) छत्रपती संभाजीनगर: आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करा; पोलिस ठाण्यात ठिय्या जयंत पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्यावरून वाद, रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात ठिय्या अँकर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आमदार गोपिचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सिडको पोलिस ठाण्यात ठिय्या दिला.पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. त्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे, प्रदेश सरचिटणीस सलीम शेख, राजेश पवार, शहरकार्याध्यक्ष आशिष पवार, विद्यार्थी शहराध्यक्ष सुशील बोर्डे, जिल्हाध्यक्ष भूषण तांबे, प्रदेश सचिव प्रकाश इंगळे यांनी रात्री सिडको पोलिस ठाणे गाठत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सिडको पोलिसांनी पडळकर यांनी जेथे वक्तव्य केले, तेथे तक्रार अर्ज वर्ग केला जाईल, असे सांगून अर्ज स्वीकारला. त्यानंतर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.
1
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 19, 2025 01:16:19
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... स्किप्ट ::- आरक्षणाच्या लढाईत जसा नियम इतरांना लावला तोच नियम ओबीसी समाजालाही लावा.... मंत्री पंकजा मुंडे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेणार मंत्री पंकजा मुंडे मंगळवारी भेट.... AC ::- आरक्षणाच्या लढाईत जसा नियम इतरांना लावला आहे तोच नियम ओबीसी समाजालाही लागू व्हावा या मागणीसाठी मंगळवारी मंत्री पंकजा मुंडे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री यांच्याशी भेट घेऊन त्यांना विनंती करणारा असल्याचे माहिती पंकजा मुंडे यांनी दिले आहे. लातूरच्या भरत कराड यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांशी मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट घेऊन सांत्वन केलं. यावेळी त्यांनी गावकऱ्यांना संबोधित करताना मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं सांगितला आहे. साऊंड बाईट ::- मंत्री पंकजा मुंडे
5
comment0
Report
Advertisement
Back to top