Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Wardha442001

वर्धा के सरकारी ग्रंथालय में स्वच्छता लूट, छात्रों का गुस्सा चरम पर

MAMILIND ANDE
Sept 23, 2025 10:49:40
Wardha, Maharashtra
वर्धा SLUG- 2309_WARDHA_GRANTHALAY शासकीय ग्रंथालयात उडाला स्वच्छतेचा बोजवारा अभ्यासिकेत सुविधाचा अभाव अभ्यास करणाऱ्या विदयार्थ्यांनी व्यक्त केला संताप अभ्यासिकेत शौचालय, पिण्याचे पाणी, पंखे, आणि लाईटची अवस्था बिकट अँकर : वर्ध्याच्या शासकीय ग्रंथालयात स्वच्छतेचा बोजवारा उडालाय. गेल्या काही महिन्यापासून येथे स्वच्छताच होत नसून ग्रंथालयाच्या इमारतीची देखील दुरावस्था झाली आहेय. सहा वर्षांपूर्वी बांधकाम झालेल्या शासकीय ग्रंथालयाच्या दुरावस्थेमुळे येथे अभ्यासिकेत अभ्यासाला येणाऱ्या विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केला आहेय. जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांना जाब विचारत सुविधांची मागणी केलीय. विवो :  एक कोटी आठ लाख रुपयांचा खर्च करून बांधकाम करण्यात आलेल्या जिल्हा शासकीय ग्रंथालयाच्या इमारतीला गळती लागली आहे. शौचालयाचे दरवाजे तुटले असून सर्वत्र घाण पसरली आहे. देखभाल दुरुस्ती नसल्याने येथे येणारे विद्यार्थी त्रस्त झाले आहेय. येथे अग्निशमन बंब आहे पण त्याची एक्स्पायरी डेट देखील दोन वर्षांपूर्वी संपली आहे. येथील दुरावस्थेवर शिवसेना उबाटा गटाचे निहाल पांडे यांच्यासह विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतलाय. बाईट : नेहाल पांडे, विधानसभा प्रमुख,शिवसेना उबाटा गट विवो : देखभाल दुरुस्ती होत नसल्याने अत्यंत बिकट अवस्था या अभ्यासिकेची झाली आहेय. देखभाल दुरुस्ती साठी निधीच नसल्याचे उत्तर जिल्हा शसकिय ग्रंथालय अधिकाऱ्यांनी दिले आहेय. बाईट: नितीन सोनोने, जिल्हा शासकीय ग्रंथालय अधिकारी
3
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
LBLAILESH BARGAJE
Sept 23, 2025 12:19:14
Pune, Maharashtra:रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- गुणरत्न सदावर्ते फीड 2C Anc- ॲड.गुणरत्न सदावर्ते यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील रस्त्यांच्या प्रश्नावरून थेट नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सुनावले आहे...जीआर आणि कुणबी नोंदी नंतर शोधा आधी रस्त्यांचे काम करा असं सदावर्ते यांनी म्हंटले आहे... वाहतूकदारांना,नागरिकांना, रस्त्यांचा मोठा त्रास होत असल्यामुळे रस्ते दुरुस्त करा अशी मागणी ॲड.गुणरत्न सदावर्ते यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली. बाईट- ॲड.गुणरत्न सदावर्ते Anc- राज्यात झालेल्या पावसामुळे नुकसान हे राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी ॲड.गुणरत्न सदावर्ते यांची सरकारकडे मागणी केलीये...नवरात्र महोत्सव आहे यामुळे सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना देऊन शेतकऱ्यांना मदत मिळेल यासाठी कामाला लावण्याची ॲड.गुणरत्न सदावर्ते यांची मागणी केलीये बाईट:- ॲड.गुणरत्न सदावर्ते Anc- मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे हे शरद पवार यांच्या हातातील बाहुली असून ते जेवढी चावी देतील तेवढेच बोलणारे आहेत असं म्हणत ॲड.गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केलीये..."जितनी चाबी दे उतना चले खिलौना" असं सदावर्ते यांनी म्हंटलंय. बाईट:- ॲड.गुणरत्न सदावर्ते
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Sept 23, 2025 12:17:55
Shirdi, Maharashtra:Shirdi News Flash राज्य सरकारला उच्च न्यायालयाचा दणका... राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीला स्थगिती... साईबाबा संस्थानवर सहा सदस्यीय समिती नेमणूकीसाठी केली होती शिफारस... अनेक वर्षांपासून साईबाबा संस्थानचा कारभार त्रिसदस्यीय समितीकडे... साई संस्थानवर सहा सदस्यीय समिती नेमणूकीसाठी साई संस्थानने उच्च न्यायालयात शिफारस करण्याचे होते राज्य शासनाचे निर्देश... राज्यसरकारच्या निर्णया विरोधात सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी घेतली होती कोर्टात धाव... आज झालेल्या सुनावणीत साईबाबा संस्थानने घेतली माघार... *संभाजीनगर उच्च न्यायालयात झाली आज सुनावणी...* साई संस्थानने प्रस्ताव माघार घेतल्याने राज्य सरकारला झटका... आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानवर विश्वस्त मंडळ स्थापन होणार का? याकडे लक्ष...
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 23, 2025 12:07:16
Pune, Maharashtra:रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- रोहित पवार ऑन सरकार अतिवृष्टी मदत, भोपळा आंदोलन फीड 2C Anc- राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हातात भोपळा घेऊन आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने शेतकऱ्यांना भोपळा दिला असल्याच म्हटलं आहे राज्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या आज झालेल्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय होतील अशी अपेक्षा असताना अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून कसल्याही निर्णय झालेला नाही सरकार कडून आज अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांसाठी भरीव मदत करतील अशी अपेक्षा असताना या प्रश्नाकडे बगल दिली असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे बाईट:- रोहित पवार ,आमदार राष्ट्रवादी SP
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Sept 23, 2025 12:03:39
Satara, Maharashtra:TUSHAR TAPASE 4 FILES SLUG NAME -SAT_PHALTAN_MORCHA सातारा: फलटण येथे रयत क्रांती संघटनेच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर जनावरांना घेऊन शेतकऱ्यांचा धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये शेतकऱ्यांच्या विविध पाच महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या मोर्चात रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आ. सदाभाऊ खोत हे सहभागी झाले होते यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या मध्ये देशी गाईला गोमातेचा दर्जा द्यावा.संकरित जनावरे — जर्सी गाई, हॉलस्टिन, जर्सी बैल — यांना गोहत्याच्या बंदी कायद्यापासून वगळावे. गाईच्या दुधाला प्रती लिटर ४० रुपये दर जाहीर करावा.साखरेची आधारभूत किंमत ४० रुपये निश्चित करावी आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून, नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना १ लाख रुपयांचे अनुदान द्यावे. या प्रमुख मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. बाईट - सदाभाऊ खोत बाईट पॉइंटर “ परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा, कापूस, कडधान्य, ऊस यांसह अनेक पिके उध्वस्त झाली असून शेतीची जमीन सुद्धा खचून गेली आहे. “हाता तोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांच्या हातातून निसटला आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मोठी मदत करावी,” अशी मागणी माजी मंत्री व आमदार सदाभाऊ खोत यांनी केली. खोत म्हणाले की, “शेतकरी देशी गाय विकत नाही, ती लक्ष्मी म्हणून पाळतो. घरात लग्न असेल, संकट असेल, गरिबी असेल तरी देशी गायच शेतकऱ्याला आधार देते. मात्र, जर्सी गाईंची संख्या वाढत चालली असून देशी गाई-म्हशींची संख्या राज्यात चिंताजनकरीत्या घटली आहे. या परिस्थितीचा सखोल अभ्यास सरकारने करणे आवश्यक आहे.” त्यांनी पुढे राज्यातील गोशाळांचा मुद्दा उपस्थित केला. “गोशाळा जनावर सांभाळण्याच्या लायकीच्या आहेत का? तिथे स्वच्छता आहे का? जनावरांना चारापाणी व्यवस्थित मिळते का? पोलिसांकडून ताब्यात घेतलेल्या जनावरांचे नेमके काय होते? या सर्व गोष्टींची काटेकोर चौकशी व्हायला हवी,” अशी ठाम मागणी खोत यांनी केली. यासोबतच त्यांनी गोशाळांवर गंभीर आरोप करताना म्हटलं की, “जेव्हा न्यायालयाचा निकाल लागतो, तेव्हा हे गोशाळेवाले पुन्हा वरच्या कोर्टात वकील लावून का जातात? त्यामागे कोणते स्वार्थ आहेत? सरकारनं अशा बनावट गोशाळांना पाठिंबा देऊ नये. जप्त केलेली जनावरं शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावीत. शेतकऱ्याचं घरटंच खरी गोशाळा आहे, हीच आमची भूमिका आहे,” असे खोत यांनी ठामपणे स्पष्ट केले.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 23, 2025 12:00:53
Pune, Maharashtra:रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- रोहित पवार 121 फीड 2C Anc- सध्या राज्यात पावसामुळे अक्षरशः थैमान घातल आहे... त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे, सरकारनं शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी यासाठी जिल्ह्यातील आंदोलन करणार असल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार रुपये तातडीची मदत करावी तसेच कर्जमाफी करण्याची हीच खरी वेळ आहे... पंजाब सरकार जर शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये मदत देऊ शकते तर महाराष्ट्रात का नाही? असा सवाल देखील रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे आमदार रोहित पवार यांच्याशी बातचीत केली आहे आमची प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी. 121:- रोहित पवार, आमदार राष्ट्रवादी SP
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Sept 23, 2025 11:53:37
2
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 23, 2025 11:53:12
Akola, Maharashtra:Anchor : अकोल्यात शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्यासाठी आझाद फाउंडेशनकडून एक भन्नाट आंदोलन करण्यात आलं. सोयाबीन पिकावर बुरशीजन्य रोगामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं, पण यावेळी आंदोलकांनी ओरडणं, घोषणा देणं, धरणं धरून बसणं याऐवजी थेट "पुंगी वाजवून" प्रशासनाला जागं करण्याचा अनोखा मार्ग अवलंबला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सतत वाजणाऱ्या पुंगीच्या आवाजामुळे अखेर प्रशासनाची झोप मोडली आणि कृषी विभागाने पंचनामे करून अहवाल लवकरच पाठवण्याचं आश्वासन दिलं. मग काय! आंदोलनकर्त्यांनी पुंगी आवरली आणि आनंदाने घरी परतले. आता शेतकरी वर्गात चर्चेचा विषय असा की, "मोर्चा काढण्यापेक्षा पुंगी वाजवली तर लवकर काम होतंय बहुतेक!"
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 23, 2025 11:53:01
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 23, 2025 11:35:24
Yavatmal, Maharashtra:AVB शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन सत्तेत बसलेल्या महायुती सरकारने आतातरी अतिवृष्टी व पुरामुळे उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करावे अशी मागणी करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने यवतमाळमध्ये डफडे वाजवा आंदोलन केले. डफडे वाजवत मोठ्या संख्येने ठाकरे यांचे शिवसैनिक व शेतकरी यांनी तहसील कार्यालयावर धडक दिली. अति पावसामुळे संपूर्ण खरीप हंगाम नष्ट झाला आहे, पशुधन, शेती साहित्य, यासह अनेक घरांचे नुकसान झाले आहे. शेतकरी पुरता कोलमडला आहे. अशावेळी यवतमाळ मध्ये येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना पूर्णतः मदत देऊ अशी घोषणा केली. मात्र तीही फोल ठरत असल्याने प्रशासन व सरकारला जागे करण्यासाठी डफडे वाजवा आंदोलन करण्यात येत असल्याचे शिवसेना युबीटीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. बाईट : संतोष ढवळे
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Sept 23, 2025 11:34:56
Baramati, Maharashtra:JAVED MULANI SLUG 2309ZT_BARAMTIYUGENDR BYTE 1 बारामती : युगेंद्र पवार भाषण पॉईंटर , https://www.facebook.com/share/v/1RyMWXiKk7/ बूथ कमिटी सदस्य नेमायचे आहे,त्यासाठी निष्ठावंत कार्यकर्ते घ्या.. बूथ प्रमुख नेमले आहेत..मतदार याद्या देखील कार्यकर्त्यांनी वाचल्या पाहिजेत. नगरपालिका जिंकायच्या असेल ताकदीने लढले पाहिजे..लोकांमध्ये गेले पाहिजे,त्यामुळे लोकांची कामे केली पाहिजेत.. हा कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून पुढे नेला पाहिजे.. आपल्या पक्षात मरगळ आली आहे,ती झटकून पुढे गेले पाहिजे.. एकदा हरलो तरी तरी संघर्ष करू कधीतरी आपण जिंकू... *दोन खासदारांचा भाजप आता 250 पेक्षा जास्त खासदार निवडून आला आहे,त्यामुळे भाजप ला देखील 50 वर्ष संघर्ष करावा लागला आहे...* ( भाजपचे केले कौतुक ) आपण पण निवडून येऊ कारण आपल्याकडे देखील पवार साहेब आहेतच की ? बारामतीत देखील मतचोरी सुरू आहे,स्थानिक लोक आम्हाला सांगत आहेत.. आपल्याकडे पुरावे नव्हते मात्र आता याबाबत आपण लक्ष देऊन काम केले पाहिजे.. पाऊस पडतोय,सगळे अधिकारी येतात,पंचनामे करून जातात,पुढे त्याच काय होत आहे हे कार्यकर्त्यांनी पाहिले पाहिजे. दर आठवड्याला काहीतरी आंदोलन आपण सुरू ठेवली पाहिजेत..इंदापूर मधील तब्बल 22 हजार लाडक्या बहिणींना योजनेतून वगळले आहे.. सैनिक सन्मान अभिमान अशी सन्मान योजना आपल्या पक्षाच्या माध्यमातून आपण राबवणार आहोत.. याचे अभियान आजपासून सुरू करत आहोत..सगळ्यांनी यात सहभागी झाले पाहिजेत.. 26 जानेवारीला पवार साहेबांच्या उपस्थितीत या योजनेतुन सैनिकांना आपण मदर करणार आहोत.. आणि ही मदत बारामती तालुक्यातील सैनिकांना आपण मदत करणार आहोत.. आपल्याकडे डॅशिंग कार्यकर्ते आहेत,विरोधकांना विरोध करणे एवढं शक्य नाही.. मात्र आपल्या कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास आहे.. आज पण महाराष्ट्र पवार साहेबाच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे.. *लोक घाबरत आहेत,कोणी काय बोलले तरी कार्यकर्त्यांवर दबाव येत आहे..हे वातावरण बारामतीकरांना आवडत नाही..* *हे पवार साहेब कधी करत नव्हते..* त्यामुळे येणारा काळ आपल्या पक्षाचाच आहे..
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 23, 2025 11:32:27
Kalyan, Maharashtra: डोंबिवलीत भाजप आक्रमक! प्रकाश उर्फ मामा पगारे' यांना भर रस्त्यात साडी नेसवून विरोध ​ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो मॉर्फ करून साडीमध्ये दाखवल्याने भाजप कार्यकर्ते संतापले. ​ डोंबिवलीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश उर्फ मामा पगारे यांना भाजप पदाधिकाऱ्यांनी भर रस्त्यात साडी नेसवली. ​ काँग्रेस नेत्याने केलेल्या कृत्याचा भाजप स्टाईलमध्ये निषेध, परिसरात तणावाचे वातावरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ​ फोटो मॉर्फ करून व्हायरल केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ. ​पुन्हा असे कृत्य केल्यास भाजपची स्टाईल दाखवू,' असा कार्यकर्त्यांनी दिला इशारा. ​ भर रस्त्यातील या घटनेमुळे शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता. Byte.. नंदू परब कल्याण जिल्हा अध्यक्ष
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top