icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
413002
AAABHISHEK ADEPPA6 Jul 2025, 03:30 am

सोलापुरात बालदिंड्या: विठ्ठल गजरात पारंपारिक वेशभूषेत निघाल्या!

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात विठ्ठल नामाचा गजर करत पारंपारिक वेशभूषेत निघाल्या बालदिंड्या - सोलापुरात विविध शाळांमध्ये आषाढी सोहळ्यानिमित्त काढण्यात आल्या बालदिंड्या - विठ्ठल रुक्मिणी, ज्ञानोबा, तुकोबा, मुक्ताई, सावता आदी संतांच्या तसेच वारकऱ्यांच्या पारंपारिक वेशभूषेत बालचिमुकल्यांचा उत्स्फूर्त सहभाग - ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत राज मेमोरियल शाळेच्या वतीने शहर परिसरात काढण्यात आली बालदिंडी - भगवा पताका हाती घेतलेले विद्यार्थी तर डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या विद्यार्थिनी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते - बालदिंड्यांचा रिंगण सोहळ्याने समारोप
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

कोल्हापुर में पाटील के बयान के बाद नेहरू-मोदी तुलना पर बहस बढ़ी

Kolhapur, Maharashtra:मंत्री चंद्रकांत पाटील ऑन पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवाहरलाल नेहरूंच्या खूपच पुढे आहेत कोल्हापुरात मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे वक्तव्य मोदी यांची पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याशी तुलना होऊ शकत नाही शरद पवार नेहमी गुगली टाकत असतात शरद पवारांना हेच म्हणायचं होतं की मोदी, मोदी आहेत त्यांची कशी नेहरून सोबत तुलना होईल, नाही होऊ शकत नेहरू स्वातंत्र्याच्या आधी जन्माला आले आणि मोदी स्वातंत्र्यानंतर जन्माला आले त्याला आपण काय करूया? पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीमध्ये खूप संघर्ष केला स्वातंत्र्यापूर्वी देशासाठी मेले पाहिजे हा नारा होता, आता देशासाठी चांगलं जगलं पाहिजे हा नारा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगामध्ये देशाचं नाव चांगल्या पद्धतीने कमावले आहे
0
0
Report

पुणे स्टेशन पर रविवार को 9 घंटे का मेगाब्लॉक, यात्रा प्रभावित

Varsoli, Maharashtra:पुणे रेल्वे स्थानकावर रविवारी ९ तासांचा मेगाब्लॉक; लोणावळा–पुणे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार असून पुणे–दौंड लोहमार्गावरील पायाभूत सुविधांच्या महत्त्वाच्या कामांसाठी रेल्वे प्रशासनाने रविवारी पुणे स्थानकाच्या यार्डमध्ये विशेष ९ तासांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा ब्लॉक राहणार असल्याने पुणे, लोणावळा, तळेगाव तसेच मुंबई मार्गावरील अनेक रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे.. ब्लॉकच्या कालावधीत पुणे स्थानकावरील फलाट क्रमांक ३ आणि ४ हे मुंबईकडून येणाऱ्या गाड्यांसाठी उपलब्ध नसणार आहेत. त्यामुळे अनेक लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या अंशतः रद्द किंवा पर्यायी स्थानकांवर थांबविण्यात येणार आहेत..यामध्ये पुणे–तळेगाव, तळेगाव–पुणे लोकल सेवा, बारामती–पुणे आणि पुणे–दौंड डेमू तसेच डेक्कन एक्स्प्रेस, नागपूर–पुणे एक्स्प्रेस यांसारख्या महत्त्वाच्या गाड्यांचा समावेश आहे. तर लोणावळा–पुणे मार्गावरील काही लोकल गाड्या शिवाजीनगर स्थानकापर्यंतच धावणार असून पुणे स्थानकात प्रवेश करणार नाहीत. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी प्रवासापूर्वी गाड्यांचे वेळापत्रक तपासूनच नियोजन करावे, असे आवाहन केले आहे. मेगाब्लॉकमुळे रविवारी पुणे विभागातील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून प्रवाशांना काहीसा मनस्ताप सहन करावा लागू शकतो.
0
0
Report
Advertisement

गडचिरोली के आलापल्ली-सीरोंचा मार्ग के अपूर्ण रहने पर नागपुर हाईकोर्ट में जनहित याचिका

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यातील आलापळ्ली ते सिरोंचा अपूर्ण रस्ता संदर्भात नागपूर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. कंत्राटदाराने केलेले गैरप्रकार आणि भ्रष्टाचार याबाबत सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोन्डावार यांनी कोर्टाचे लक्ष वेधले. राज्यात 6 वर्षानंतरही 16 किमी रस्ता 57 कोटींच्या निधी असूनही अपूर्ण आहे; गडचिरोलीकरांना मनस्ताप. न्यायालयाने राज्य सरकार आणि संबंधित कंत्राटदारांना नोटीस दिली असून चार आठवडे उत्तर मागितले. रस्ता अजूनही अपूर्ण, खड्डे पडले आहेत; धुळीमुळे आरोग्याचे प्रश्न, अनेक अपघात झाले; याचिकाकर्त्यांनी गेल्या काही वर्षांत आंदोलने केली आहेत; स्वतंत्र उच्चस्तरीय समिती नेमून प्रत्यक्ष पाहणीची मागणी केली.
0
0
Report

Congress accuses BOT contract and electrical maintenance deal of price-related scam

Yavatmal, Maharashtra:यवतमाळ नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शहराच्या मध्यवस्तीतील बाजारपेठेत बीओटी तत्वावर दुकान संकुल बांधकाम करण्याचे काम 90 वर्षाच्या लिजवर 95 कोटी रूपयामध्ये देत असल्याच्या विषयावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. या जागेच बाजार मुल्यांकन सुमारे 350 कोटीचे असताना फक्त 95 कोटीमध्ये ही जागा देण्याचे ठरविले आहे. कंत्राटदाराला एकूण रकमेच्या 20% रक्कम नगर परिषदेकडे जमा करावयाची आहे. बांधकामाचा कालावधी दोन वर्षाचा आहे. त्यामुळे नगर परिषदचे आर्थीक नुकसान होणार आहे. असा आरोप काँग्रेसने केला आहे. शिवाय शासनाने 42 कोटीमध्ये 10 वर्षासाठी बीएसी ईन्फ्राटेक व व्हिनीक ग्लोबल या कंपनीला विद्युत देखभाल व दुरूस्ती व इतर अनुषंगीक कामे देण्याचे ठरविले आहे. सदर काम फक्त 20 कोटीचे असून त्यांना 22 कोटी रूपये जादा देण्यामागे नगर परिषदचे फार मोठे नुकसान आहे. असाही दावा काँग्रेसने केला आहे.
0
0
Report

हिंजवाड़ी में ड्रग्स रैकेट का पर्दाफाश; 61.70 ग्राम MD समेत तीन गिरफ्तार

Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने हिंजवडी परिसरात एक मोठी कारवाई करत अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ६१.७० ग्राम एमडी अंमली पदार्थ जप्त केला असून, या प्रकरणी अक्षय प्रदीप धायगुडे, दयानंद उत्तम धायगुडे आणि महेश पुनराम किचड या तिघांना रंगेहात अटक केली आहे. हिंजवडीतील लक्ष्मी चौक परिसरात हे आरोपी अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर गोपीनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाने या भागात सापळा रचला आणि संशयास्पदरीत्या आलेल्या या तिघांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून ६१.७० ग्रॅम एमडी अंमली पदार्थांसह गुन्ह्यात वापरलेली एक चारचाकी गाडी,_three महागडे मोबाईल फोन आणि ५५ हजार रुपयांची रोख रक्कम असा लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे.
0
0
Report
Advertisement

गौशाला में मृत जानवर आदिवासी महिला के खेत में: प्रशासन चुप्पी

Bhandara, Maharashtra:गौ शाळेतील मृत जनावरे आदिवासी महिलेच्या शेतात फेकले जातात...भकटे कुत्रे मृतक जनावरांचे लचके तोडतात...परिसरात दुर्गंधी... मजूर वर्ग शेतावर जाण्यास धजावतात... गराडा येथील गौ शाळेतील संचालकांची मनमानी...आदिवासी महिलेने शासकीय कार्यालयात तक्रार देऊन उंबरठे झिजवले...कारवाई मात्र शून्य...अधिकाऱ्यांची उदासीनता की गौ संचालक मंडळासोबत साठगाठ... Anchor : गौ शाळेतील जनावरे शेतकऱ्यांच्या शेतात किव्हा बांधावर सोडून देण्याचे प्रकार महाराष्ट्रामध्ये अनेकदा समोर आले आहेत. मात्र भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील गराडा गावात गौशाळेतील मृतक जनावरे आदिवासी महिलेच्या शेतात अपूर्ण जमिनीत पुरत असल्याचे वास्तव्य पहिल्यांदाच समोर आले असून आदिवासी महिलेने अनेकदा शासकीय कार्यालयाचे दरवाजे ठोठावले पण अद्यापही कारवाई करण्यात आली नाही... अधिकाऱ्यांची उदासीनता की गो संचालक मंडळा सोबत साठगाठ असा प्रश्न उपस्थित आहे..... Vo : भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील गराडा या गावात गोशाळा अनेक वर्षापासून आहे. या गोशाळेमध्ये बहुतांश प्रमाणामध्ये जनावरांची संख्या जास्त असून उत्तम व्यवस्था असल्याने पोलिस कारवाईत मिळालेले जनावरे याच ठिकाणी आणून दिले जातात... गोशाळेला जागा असून सुद्धा मृत जनावरे ही गोशाळे समोरील वंदना करपते यांच्या शेतात अपूर्ण अवस्थेत पुरली जात असल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर आले आहे. विशेष म्हणजे पीडित वंदना करपते यांच्या शेतात गोशाळेतील खत सुद्धा फेकले जात असून याच खतामध्ये मृत जनावरे पुरले जात आहे. त्यामुळे भटके कुत्रे हे मृतक जनावरांचे लचके तोडून इतरत्र करतात त्यामुळे त्या परिसरातील शेतामध्ये जनावरांचे हाडे सुद्धा दिसून आले आहेत तर या परिसरामध्ये जनावरे पूरक असल्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून शेतकरी तसेच मजूर वर्ग शेतावर काम करण्यासाठी जाण्यास धजावत आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी शेती कशी करावी असा सुद्धा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. ज्या जागेवर मृतक जनावरे फेकली जातात याचा नोटीस देखील ग्रामपंचायतीने संबंधित गो शाळेला पत्र पाठविला आहे. तरी पण गो शाळचालक नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत मृत जनावरे उघड्यावर फेकून देत आहे..
0
0
Report

नंदूरबार में पीएम किसान: 31 जून तक ई-केवाईसी अनिवार्य, बैंक खाता लिंक जरूरी

Dhule, Maharashtra:नंदूरबार जिल्ह्यातील पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी ३१ जून च्या अगोदर ई-केवायसी पूर्ण करणे गरजेचे अनिवार्य करण्यात आला आहे. पी एम किसान योजनेमुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना याच्या फायदा होत असतो तर शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाशी बँक खाते लिंक असणे आणि अॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करणेही आवश्यक आहे. ई-केवायसी न केल्यास शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा पुढील हप्ता जमा होणार नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना तातडीने ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकरी सीएससी केंद्र, बँक किंवा पीएम किसान पोर्टलच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. पीएम किसान योजनेचा लाभ अखंडित ठेवण्यासाठी मुदतीपूर्वी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
0
0
Report
Advertisement

एल निनो से बारिश देरी, किसानों को 75–100 मिमी के बाद ही पेराई की सलाह

Dhule, Maharashtra:पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करू नयेत असा सल्ला धुळे जिल्हा कृषी विभागाचे कृषी अधीक्षक सुरज जगताप यांनी दिला आहे. यंदा एल निनो चा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून येत असून एल निनोमुळे पाऊस लांबला आहे. धुळे जिल्ह्यासह खानदेशात सरासरी सात जून पासून पेरण्यांना सुरुवात होते. मात्र यंदा पाऊस लांबला असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीयुक्त पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नयेत असा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे. सरासरी 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्यात. दरम्यान ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन च्या माध्यमातून कापसाची लागवड करावी. असा सल्ला कृषी अधीक्षक जगताप यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
0
0
Report
Advertisement

शिंदे की शिवसेना पर भाजपा के विसर्जन का दावा, विनायक राउत के गंभीर आरोप

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे विसर्जन होणार? विनायक राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप! गरज संपली की भाजप शिंदेंच्या पक्षाची तोडमोड करणार - राऊतांचा दावा आणखी स्पष्ट: भाजपचे वैशिष्ट्यच 'गरज सरो और वैद्य मरो' असे आहे. वेळेपुरते कोणालाही सोबत घ्यायचे आणि नंतर त्याचा पूर्ण वापर करून त्याचे विसर्जन करायचे, ही भाजपची जुनी पद्धत आहे. आगामी काळात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचीही अशीच अवस्था होणार असून, भाजप त्यांच्या पक्षाची तोडमोड करून टाकेल, अशी घणाघाती टीका विनायक राऊत यांनी केली आहे.
0
0
Report

द क्लब गोल्फ मैदान में अवैध उत्खनन, वृक्षतोड़: संयुक्त पंचनामा के निर्देश

Satara, Maharashtra:सातारा - महाबळेश्वर येथील ऐतिहासिक वारसा असलेल्या ‘द क्लब’ गोल्फ मैदान परिसरात मोठ्या प्रमाणावर उत्खनन, वृक्षतोड आणि अनधिकृत बांधकामे केल्याचा आरोप होत असून या प्रकरणाची प्रांताधिकाऱ्यांनी संयुक्त पंचनाम्याद्वारे चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. हेरिटेज दर्जा प्राप्त असलेल्या या मैदानात मातीचे ढिगारे टाकणे, रस्ते तयार करणे तसेच परिसरातील अनेक झाडे तोडल्याची तक्रार पर्यावरणप्रेमींनी केली आहे. प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून महसूल, नगरपरिषद आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना संयुक्त पंचनामा करण्याच्या निर्देश दिले आहेत. दरम्यान, संबंधित कामांची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचे समोर आले असून चौकशीअंती अनधिकृत बाबी आढळल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top