Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune410401

चैत्राली राजापुरकर की रिपोर्ट: मावल केशवनगर में गोलीकांड, स्कूल से घर तक भय

CRCHAITRALI RAJAPURKAR
Sept 10, 2025 09:46:11
Pune, Maharashtra
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File.name : 1009ZT_MAVAL_FIRING Total files : 05 Headline : शाळेतून घरी सोडल्याचं किरकोळ कारण आणि तरुणावर थेट गोळीबार Anchor: मावळ तालुक्यातील वडगाव परिसरातील केशवनगर भागात एका शालेय विद्यार्थिनीला घरी सोडल्याच्या किरकोळ कारणावरून तरुणांमध्ये वाद होऊन गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. वडगाव मधील न्यू इंग्लिश शाळेच्या समोर दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला काही तरुणांनी चारचाकी गाडीमध्ये घेत बेदम मारहाण केली. यावेळी या विद्यार्थ्यांचा चुलत भाऊ त्या ठिकाणी आला आणि चारचाकी मधील तरुण आणि विद्यार्थ्यांचा चुलत भाऊ यांच्या बाचाबाची झाली. मात्र या मारहाणीचं कारणही तितकच चक्रावणार होतं. या शाळेतील विद्यार्थ्यांना त्याच्या ओळखीच्या विद्यार्थिनीला तिच्या घरी सोडलं होतं याचाच राग मनात धरून या विद्यार्थिनीच्या नात्यातील तरुणांनी या विद्यार्थ्याला चार चाकी मध्ये घेत मारहाण केली होती. VO 1 : पण हे प्रकरण इतक्या सहजासहजी मिटलं नाही. विद्यार्थिनीच्या नात्यातील या तरुणांनी या विद्यार्थ्याच्या चुलत भाऊ असलेल्या अक्षय मोहिते वरती केशवनगर मधील एकविरा चौकात दुचाकीवरून येत गोळीबार केला. मात्र या दुर्घटनेमध्ये तो सुखरूप बचावला. अखेर या प्रकरणी अक्षय मोहिते यांनी वडगाव मावळ पोलिसात फिर्याद दिली आणि घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी या प्रकरणी विद्यार्थिनीचे नात्यातील तरुण अभिषेक राजाराम ओव्हाळ, रणजीत ओव्हाळ आणि प्रथमेश सुरेश दिवे या तिघांना अटक केली. त्यांच्यावरती शस्त्र अधिनियम कायदा तसेच तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल केला आहे . BYTE: कुमार कदम, पोलिस निरिक्षक, वडगाव मावळ (file.no.05) END VO: नात्यातील विद्यार्थिनीला घरी सोडण्याचे शुल्लक कारण एखाद्याच्या जीवावर ही बेतू शकल असता हे या घटनेतून अधोरेखित झाला आहे. मात्र किरकोळ कारणासाठी अशाप्रकारे हत्यारांचा वापर कितपत योग्य हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. असं असलं तरी या तरुणांकडे हे पिस्तूल आलं कुठून हा तपास आता वडगाव पोलिस करत आहे.
5
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KPKAILAS PURI
Sept 10, 2025 13:21:00
Pimpri-Chinchwad, Maharashtra:
pimpri cinema kailas puri Pune 10-9-25 feed by 2c for web also Anchor - पिंपरीचिंचवड मधल्या एका चित्रपटगृहात सिनेमा पाहताना 'स्टोरी आधी सांगू नका' आणि शांत बसण्याची विनंती केल्यामुळे एका २९ वर्षीय तरुणाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित तरुणाने चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, एका दाम्पत्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण आपल्या पत्नी आणि बहिणीसोबत चित्रपट पाहत होता. त्यावेळी त्याच्या मागील सीटवर बसलेल्या एका दाम्पत्याने सिनेमाची स्टोरी सांगणे आणि गोंधळ घालणे सुरू केले. त्यामुळे तरुणाने त्यांना 'स्टोरी आधी सांगू नका' आणि 'शांत बसा' अशी विनंती केली. यामुळे संतापलेल्या आरोपीने तात्काळ तरुणाची कॉलर पकडून त्याला मारहाण केली आणि जमिनीवर पाडले. आरोपीने त्याला लाथा-बुक्क्यांनी मारले, यात तरुणाच्या डाव्या हाताला, चेहऱ्याला आणि पोटाला दुखापत झाली. भांडण सोडवण्यासाठी त्याची पत्नी पुढे आल्यावर आरोपी आणि त्याच्या पत्नीने तिलाही मारहाण केली आणि दोघांना शिवीगाळ केली. या घटनेनंतर पीडित तरुणाने चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावरून अकिब जावेद निसार पटेल, व एक महिला यांच्या विरोधात चिंचवड पोलिसांत भारतीय न्याय संहिता 117 , 115, 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे,पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 10, 2025 13:02:00
Akola, Maharashtra:
Anchor : अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पटवी ज्वेलर्सच्या दुकानात चोरीची घटना घडली.तीन महिला ग्राहक असल्याचे भासवून दुकानात आल्या त्यांनी दागिने पाहण्याच्या बहाण्याने दुकानदाराचे लक्ष विचलित केले. दुकानदाराने त्यांना वेगवेगळे पेंडेंट दाखवले तेंव्हा त्यातील एका महिलेने हात चालाखी दाखवत एक आकर्षक पेंडेंट शांतपणे चोरून नेले.काही वेळाने दुकानदाराच्या लक्षात हे आले, त्यानंतर त्यांनी सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल होऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तेथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांची आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित महिलांना ताब्यात घेतले आणि चौकशीसाठी सिटी कोतवाली पोलिस स्टेशनला नेले आहेत.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 10, 2025 13:00:52
Yavatmal, Maharashtra:
हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या अशी मागणी करीत यवतमाळ मधील बंजारा समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाद्वारे धडक दिली. मराठ्यांना हैदराबाद गॅजेट लागू होत असेल तर सर्व पुरावे असणाऱ्या बंजारांना तर ते लागू झालेच पाहिजे. असे बंजारा समाज संघटनांनी म्हटले आहे.
0
comment0
Report
Sept 10, 2025 12:55:17
Darwha, Maharashtra:
अकोला येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ दारव्हा शहरात भोई समाज, सकल हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. ६ सप्टेंबर रोजी तौहीद खान समीर खान याने चाकूचा धाक दाखवून हा अत्याचार केला. मोर्चाद्वारे आरोपीला तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला, पीडितेला २५ लाखांची आर्थिक मदत आणि सामाजिक सुरक्षेची मागणी करण्यात आली. उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात हजारो कार्यकर्ते सहभागी
2
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 10, 2025 12:47:25
Yavatmal, Maharashtra:
जनसुरक्षा विधेयकाविरोधात यवतमाळ मध्ये महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून बसस्थानक चौकात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. राज्य शासनाने प्रस्तावित केलेले “महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४” हे अत्यंत अन्यायकारक, लोकशाही विरोधी व मूलभूत नागरिक स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे. या विधेयकाच्या अंमलबजावणीमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वैयक्तिक गोपनीयता आणि संविधानाने हमी दिलेली नागरी हक्के गंभीरपणे बाधित होण्याची भीती आहे. हे विधेयक लोकशाही मूल्यांना धरून नाही. त्यामुळे जनतेच्या भावना व लोकशाही मूल्यांचा विचार करता “महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४” तत्काळ रद्द करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. बाईट : वर्षा निकम जिल्हाध्यक्ष राकॉ शप किशोर इंगळे, जिल्हाप्रमुख शिवसेना उबाठा
2
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Sept 10, 2025 12:45:38
Ratnagiri, Maharashtra:
फुरूस–पोयनार रस्त्याला मोठे भगदाड; खाली भुयार, वाहतूक ठप्प खेड तालुक्यातील फुरूस–पोयनार रस्त्याच्या मध्यभागी मोठे भगदाड पडल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले होते. खेड-दापोली मुख्य मार्गालगत असलेल्या फुरूस गावातून पोयनारकडे जाण्यासाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, या भगदाडाखाली मोठ्या स्वरूपाचे भुयार देखील तयार झाले आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना मोठा धोका निर्माण झाला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोयनार गावाला खासदार सुनील तटकरे यांची सासरवाडी म्हणून देखील एक वेगळी ओळख आहे. नुकत्याच बांधण्यात आलेल्या या रस्त्याची झालेली दुर्दशा हा कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारा प्रकार असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये रंगली आहे.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 10, 2025 12:37:34
Nanded, Maharashtra:
Satish Mohite Slug - Ned_BanjaraMorcha Feed on - 2C ------------------------------ Anchor - हैद्राबाद गॅझेट नुसार बंजारा समाजाचा समावेश एस टी प्रवर्गात करावा आणि आरक्षणाची अबकड वर्गवारी करण्यात यावी या मागणीसाठी बंजारा समाजातर्फे हदगाव येथे मोर्चा काढण्यात आला. हैद्राबाद गॅझेट नुसार मराठा समाजाचा समावेश कुणबी म्हणून ओबीसी मध्ये करावा अशी मागणी मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी केली होती. त्यानंतर बंजारा समाजाचे एक जात प्रमाणपत्र व्हायरल होत आहे. बंजारा समाज हा एस टी प्रवर्गात असल्याचे हे प्रमाणपत्र आहे. या नंतर पुन्हा एकदा बंजारा समाज एस टी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी रस्त्यावर उतरलाय. हदगाव तहसील कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला. मोर्चात मोठ्या संख्येने बंजारा समजबांधव सामील झाले होते. बंजारा समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश करावा ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. आरक्षणाचे अबकड वर्गीकरण करावे म्हणजे कोणावरही अन्याय होणार नाही अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली. Byte - आंदोलक ----------------
1
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 10, 2025 12:31:10
Shirur, Maharashtra:
Feed 2C Slug: Ozar Ganpati File:01 Rep: Hemant Chapude(Junnar) Anc: संकष्टी चतुर्थी निमित्त अष्टविनायक ओझर विघ्नहर नगरी भाविक भक्तांनी फुलली असून चतुर्थी निमित्त लाडक्या बाप्पाचा गाभारा आकर्षक अशा विविधरंगी फुलांनी सजविण्यात आला आहे, चतुर्थी निमित्त महाआरती सह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया जुन्नर पुणे...
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 10, 2025 12:27:16
Nashik, Maharashtra:
स्टोरी पॅकेज (नाशिक – इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब उद्घाटन कार्यक्रम) अँकर: नाशिकमध्ये आज केंद्र सरकारच्या इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅबचे उद्घाटन केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला व्यासपीठावर मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत. मात्र, या कार्यक्रमापूर्वीच श्रेयवादावरून राजकीय वाद पेटला आहे. Vo 1 गेल्या दहा वर्षापासून ऑटोमोबाईल औद्योगिक क्षेत्रासाठी वरदान ठरणारी ही सी पी आर आय लॅब... या लॅबमुळे नाशिक परिसरातील औद्योगिक क्षेत्राला मोठा फायदा होणारे..या लॅब साठी जागा मिळवून देण्यासाठी माजी खासदार हेमंत गोडसे यांनी प्रयत्न केले त्यातून 100 एकर जागा उपलब्ध झाली... मात्र आता छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लॅब चा उद्घाटन कार्यक्रम आज आयोजित केला होता...त्यासाठी गोडसे यांना साधे निमंत्रणही देण्यात आले नाही. त्यामुळे वैतागलेल्या गोडसे यांनी पत्रकार परिषद घेत भुजबळ यांच्यावर आरोप प्रत्यारोप करत त्यांच्या श्रेय घेण्याच्या या कृतीचा निषेध केलंय Byte Vo 2 छगन भुजबळ यांनी दिलेल्या जाहिरातीत अजित पवार यांचाही फोटो नसल्याने नेमके महायुतीत चालले काय असा प्रश्न निर्माण झालाय. त्यात अजित पवार ही उद्घाटनाला नसल्याने शंकाकुशंका व्यक्त झाल्या. कार्यक्रमाला स्थानिक राजकीय नेते तसंच गायरान जमिनी देणाऱ्या ग्रामस्थांना विश्वासात घेण्यात आले नाही त्यामुळे नाराजी अधिकच होती. Byte 2 Vo 3 शिंदे सेना आणि एनसीपी नेत्यांमध्ये श्रेयवादावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अखेर भुजबळ यांनी याबाबत आपल्या भाषणात टीकाटिपणी करत प्रत्युत्तर दिले Byte Vo 4 विकासकामाच्या उद्घाटनातही श्रेयवादामुळे राजकारण रंगताना दिसतये .
3
comment0
Report
MAMILIND ANDE
Sept 10, 2025 12:27:02
Wardha, Maharashtra:
वर्धा SLUG- 1009_WARDHA_PROTEST वर्ध्यात जनसुरक्षा विधेयकाविरुद्ध विविध पक्ष उतरले रस्त्यावर धरणे आंदोलनातून घोषणाबाजी जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याची मागणी अँकर : जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात बहुपक्षीय नेते आणि कार्यकर्ते आज धरणे आंदोलनात सामील झालेय. वर्ध्याच्या जमनालाल बजाज चौकात हे धरणे आंदोलन करण्यात आले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, माकपा पक्षाचे नेते या आंदोलनात सहभागी झाले. विधेयकाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मोठ्या संख्येने या आंदोलनात. कार्यकर्ते सहभागी झाले आहेय. जिल्ह्यातील अनेक संघटन या धरणे आंदोलनात सहभागी झाल्या आहेय. लोकशाही विरोधी व नागरी हक्कांवर गदा आणणारे विधेयक तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहेय. बाईट- अभुदय मेघे,काँग्रेस नेते,वर्धा बाईट - शैलेश अग्रवाल काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक
1
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 10, 2025 12:16:54
Ambernath, Maharashtra:
दोन सोनसाखळी चोरांना लावला 'मोक्का' बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात दाखल होते सोनसाखळी चोरीचे गुन्हे  Bdl mococa Anchor उल्हासनगर परिमंडळाच्या चार चे पोलीस उपयुक्त सचिन गोरे यांनी दोन सोनसाखळी चोरांवर मोक्का गुन्ह्या अंतर्गत कारवाई केली आहे. बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात सोन साखळी चोरीच्या गुन्हयातील आरोपी तुशार उर्फ प्रेम व्यंकटेष ढगे आणि आकाश  उर्फ बटला राजु सिंग यांचेविरूध्द ही कारवाई करण्यात आली आहे. सोनसाखळी  च्या घटनांना आळा बसावा तसेच आरोपींवर दहशत निर्माण व्हावी यासाठी ही कारवाई करण्यात आली असल्याचं पोलिसांनी सांगितलं , चंद्रशेखर भुयार  ,बदलापूर
2
comment0
Report
MAMILIND ANDE
Sept 10, 2025 12:15:51
Wardha, Maharashtra:
वर्धा SLUG- 1009_WARDHA_JAWANDHIYA जे नेपाळमध्ये होत आहे, तेच भारतातही होण्याची शक्यता - विजय जावंधीया - वर्ध्यात शेतकरी नेते विजय जावंधिया यांचं खळबळजनक वक्तव्य - जनसुरक्षा विधेयक विरोधी आंदोलनात विजय जावंधिया यांनी व्यक्त केला संताप ...अन्यथा गावागावातील युवक नक्षलवादी होईल.. अँकर - शेतकऱ्याची, शेतमजुराची अशीच उपेक्षा सुरू राहिली तर देशातील गावातला युवक नक्षलवादी होईल,आता तशी परिस्थिती निर्माण झाली आहे...जे नेपाळ मध्ये होत आहे तेच येथे सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे खळबळजनक वक्तव्य शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी  वर्ध्याच्या  जनसुरक्षा विधेयक विरोधी आंदोलन सभेत बोलताना केले. व्हिओ - वर्ध्याच्या जमनालाल बजाज चौकात जनसुरक्षा विधेयक विरोधात धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी जावंधीया यांनी संताप व्यक्त केलाय. मला वाटते आपल्या देशातील लोकांची सहनशक्ती मोठी आहे. त्याचाच फायदा राजकीय लोक घेत आहे. गणपती दूध प्यायला होता हे माहित झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी गणपतीला दूध पाजण्याकरिता गेले होते. हा मास मीडियाचा ट्रायल होता, लोकांना कसं आकर्षित करता येईल हे  पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षात आल्यानंतर सुंदर फायदा त्यांनी करून घेतला..आणि रोज खोटं बोलतात तरी सुद्धा देशात लोकप्रिय आहे, याचंच मला आश्चर्य वाटतं.. गावागावात दहा पंधरा भिंतीं रंगून पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक काळात दिलेल्या वाचनाची आठवण करून देण्याची गरज असल्याचं विजय जावंधिया यांनी म्हटलं आहे... बाईट : विजय जावंधीया, शेतकरी नेते
1
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 10, 2025 12:07:36
Nashik, Maharashtra:
nsk_cpriinauguration feed by live u 51 Anchor नाशिक जिल्ह्यात शिलापूर येथे देशातील तिसऱ्या सी पी आर आय लॅब चे उद्घाटन केले जातेय.यासाठी केंद्रीय उद्योगमंत्री मोहनलाल खट्टर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ हे उपस्थित आहेत . थोड्याच वेळेत छगन भुजबळ त्यानंतर मुख्यमंत्री बोलतील
1
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Sept 10, 2025 12:00:59
Nala Sopara, Maharashtra:
Date-10sep2025 Rep-prathamesh tawade Loc-nalasopara Slug-NALASOPARA DEATH Feed send by 2c Type-Av Slug- नालासोपाऱ्यात नेत्रहीन वृद्धाचा पालिकेच्या तलावात बुडून मृत्यू तलावाला सुरक्षा ग्रील न लावल्यामुळे वृद्धाचा बळी नालासोपारा येथील पालिकेच्या तलावात फेरफटका मारणाऱ्या 70 वर्षीय नेत्रहीन वयोवृत्ताचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पालिकेच्या तलावाची सुरक्षा ग्रील तुटलेल्या अवस्थेत असल्याने पालिकेचा निष्काळजीपणामुळे वयोवृद्धाला जीव गमवावा लागला आहे.. भरतकुमार मिस्त्री अस या वृद्धाच नाव आहे.. या घटनेची माहिती पोलीस व अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह बाहेर काढला... जिथे हा अपघात झाला तिथे अपंगांची काठी देखील आढळली आहे... त्यांच्या खिशात सापडलेल्या आधार कार्डवर दहिसर येथे राहण्याचा पत्ता आहे..वसई विरार महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे हा जीव गेल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे...
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 10, 2025 11:47:22
Pandharpur, Maharashtra:
10092025 Slug - PPR_AVATADE_OFFICER file.01 ----- Anchor - पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत नागरिकांनी आमदार आणि प्रशासन अधिकाऱ्यां समोर अडीअडचणीचा पाढा वाचला.अनेक गावातील नागरिकांनी तक्रारी लेखी आणि तोंडी स्वरूपात मांडल्या. आमदार अवताडे यांनी शासनाच्या घरकुल आणि अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना तसेच शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत विना अडथळा पोहोचवाव्यात अशा सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शेततळ्यासाठी अधिकचे अनुदान मिळावं यासाठी आपण सभागृहात कृषी मंत्र्यांकडे पाठपुरावा करू असे आश्वस्त केले. जलजीवन अंतर्गत होणारी कामे दर्जेदार पद्धतीने करून घ्यावीत. घरकुल योजनेतील लाभार्थ्यांचे घरकुल कोणत्याही परिस्थितीत रद्द करू नये जागेची समस्या असल्यास त्यावर तोडगा काढून जागा उपलब्ध करून द्याव्या अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या
4
comment0
Report
Advertisement
Back to top