Back
भंडारा जिल्ह्यात पावसामुळे पूल बंद, नागरिकांना सावध राहण्याचा इशारा!
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 08, 2025 03:34:45
Bhandara, Maharashtra
Pravin Tandekar Bhandara
Slug - 0807_BHA_RAINFALL
FILE - 3 VIDEO
बावनाथडी नदीवरील बपेरा पूल वाहतुकीसाठी बंद.... अनेक छोटे नाल्यांवरून वाहत आहे पाणी.... नागरिकांनी पुराच्या पाण्यात जाऊ नये जिल्हा प्रशासनाचा इशारा.....
Anchor :- भंडारा जिल्ह्यात मागील 24 तासापासून पावसाची संततदार सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदी, नाले, ओसंडून वाहन आहेत. तर ग्रामीण भागातील छोटे नाले हे दुतळी भरून वाहत असून अनेक नाल्यांवरून पाणी वाहत आहे. तुमसर तालुक्यातील सीलेगाव - वाहनी येथील नाल्यावर दोन फूट पाणी असल्यामुळे दोन्ही गावांचा ये जा करण्याच्या संपर्क तुटलेला आहे. तर बावनथडी नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या पुलावर पाणी असताना नागरिकांनी पुलावरून जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तर अनेक शेतकऱ्यांची शेती सुद्धा पाण्याखाली गेली असून या पावसाचा फटका शेतकऱ्यांना सुद्धा बसलेला आहे.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowJul 08, 2025 07:03:28Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File name : 0807ZT_MAVAL_PIKPANI
Total files : 02
Headline -समाधानकारक पावसाने दारूब्रे गावात भात लागवड जोरात
Anchor:
मावळ तालुक्यातील दारूब्रे गावात भात लागवड मोठ्या प्रमाणात शेतकरी करत आहे. सध्या पाऊस ही पोषक पडत असल्याने भात लागवडीना वेग आला आहे. दारूब्रे येथील शेतकरी रामदास सोरटे यांनी कृषि अधिकारी विकास गोसावी यांच्या मार्गदर्शना खाली इंद्रायणी वाणाच्या भाताची दोन एकर क्षेत्रात चारसूत्री पद्धतीने लागवड केली. या पद्धती मध्ये रोपे कमी लागत असून लावणीला वेळ ही कमी लागतो. उत्पादनात दुप्पट वाढ होऊन आर्थिक फायदा होतो. पवन मावळ भागातील इंद्रायणी भात चवीला चांगला असल्याने या भाताला मुबई, पुणे, पिंपरी-चिंचवड बाजारपेठेत ग्राहकांची मागणी जास्त असते.
0
Share
Report
KJKunal Jamdade
FollowJul 08, 2025 07:02:26Shirdi, Maharashtra:
Anc - उद्यापासुन शिर्डी साई मंदिरातील तिन दिवसीय गुरूपोर्णिमा उत्सवाला सुरूवात होणार असुन उत्सवाच्या पार्श्वभुमीवर साईबाबा संस्थानने जय्यत तयारी केलीय...मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई तसेच फुलांची सजावट करण्याच काम अंतिम टप्प्यात असुन उत्सवाच्या दरम्यान विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.पावसाची शक्यता लक्षात घेता ठिकठिकाणी मंडप उभारण्यात आले आहेत...साईबाबांना गुरूस्वरूप मानून लाखो साईभक्त गुरूपोर्णिमा उत्सवात साईदर्शनासाठी येत असतात. गुरु पौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी साईमंदिर रात्रभर खुले राहणार आहे... साई मंदिर परिसरातून गुरु पूर्णिमा उत्सवाच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनीधी कुणाल जमदाडे यांनी..
wkt - कुणाल जमदाडे शिर्डी
0
Share
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 08, 2025 07:00:58Pandharpur, Maharashtra:
08972025
Slug - PPR_MUKTAI_MAULI
feed on 2c
file 02
-----
Anchor - आषाढीच्या पर्वकाळात आज पंढरपूरमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याकडून संत मुक्ताईला साडी चोळीचा आहेर भेट देण्यात आला. ज्ञानेश्वर महाराजांकडून देण्यात आलेली साडी संत मुक्ताई यांना दिवाळीच्या भाऊबीजेला परिधान केली जाते. माऊली आणि मुक्ताई यांची पंढरपुरातच भेट होत असते. त्यामुळे वारीच्या पर्वकाळातच भाऊबीज संपन्न होते. शेकडो वर्षापासून बहिण भावाच्या भेटीचा आणि साडी चोळीआहेर देण्याची परंपरा आजही पंढरपुरात अबाधित आहे. आळंदी संस्थानच्या वतीने विश्वस्त डॉ भावार्थ देखणे यांनी संत मुक्ताई यांची विधिवत पूजा करून त्यांच्या पादुकांवर साडी चोळीचा आहेर भेट दिला. या निमित्ताने संता मधील असणाऱ्या बहीण भावाच्या नात्यातील गोडवा आषाढी वारीच्या निमित्ताने पुढे आला.
Byte :- डॉ भावार्थ देखणे ( विश्वस्त , संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी )
0
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 08, 2025 06:31:25Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - तीन तीन दिवसापासून गायब असलेल्या अडीच वर्षाच्या बालकाचा अखेर लागला शोध..
अँकर - सांगलीच्या तासगाव तालुक्यातल्या पाडळी येथून बेपत्ता झालेल्या अडीच वर्षाच्या बालकाचा अखेर तीन दिवसानंतर शोध लागला आहे. शंभूराजे शशिकांत पाटील असे या बालकाचे नाव असून तो आपल्या वडिलांसोबत दोन दिवसांपूर्वी शेतामध्ये गेला होता.मात्र त्या ठिकाणाहून तो बे पत्ता झाला दरम्यान शशी कांत पाटील यांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार तासगाव पोलीस ठाण्यामध्ये दिली होती.यानंतर सलग दोन दिवस शंभूराज याचा पोलीस,पाडळी ग्रामस्थ, रेस्क्यू टीम आणि शंभूराजच्या नातेवाईकांकडुन शोध घेण्यात येत होता.शंभुराज याचे अपहरण झाले की अन्य काही घटना घडली आहे,याबाबत तर्कवितर्क सुरू होते.मात्र दिवसानंतर तो ज्या ठिकाणाहून तो गायब झाला होता,तिथून एक किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या म्हसोबा देवाच्या मंदिरामध्ये तो खेळत असताना सुखरूप आढळला आहे,त्यामुळे सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला आहे.
0
Share
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJul 08, 2025 06:04:45Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळ मध्ये एक महिला व तिच्या अल्पवयीन मुलीला घरात डांबून त्यांच्यावर अघोरी उपचार करणाऱ्या एका भोंदू चा पर्दाफाश झाला आहे. वंजारी फैल परिसरात पोलिसांनी भोंदू महादेव पालवे याच्या घरी धाड मारली असता पोलिसही हादरले. घरात भोंदूची पत्नी व मुलीचे वास्तव्य असून शेजारीच असलेल्या टीनाच्या शेड मध्ये एक महिला आणि तिची अल्पवयीन मुलगी गंभीर अवस्थेत दिसून आल्या, पती पासून विभक्त असलेल्या या महिलेला दृष्टात्म्याची करणी झाल्याची बतावणी करून भोंदू महादेवने जाळ्यात ओढले, तिला व तिच्या मुलीला घरी आणून डांबले, सात महिन्यांपासून त्यांना शौच व लघुशंकेसाठीही बाहेर जाण्यास मनाई होती. उपचाराच्या नावावर दोघींना गरम सळाखीचे चटके दिल्या जायचे. त्यामुळे दोघींच्याही शरीरावर अनेक जखमा आढळल्या. शिवाय
घरात शेकडो बाहुल्या, धागे, गंडे, दोरे एक शवपेटी व अनेक आक्षेपार्ह वस्तूंसह आठ लाख रुपयांची रोकड मिळाली. घरातच खड्डे देखील खोदलेले आहे, गुप्तधनासाठी गुरु पौर्णिमेला या दोघी मायलेकींचा बळी देण्याचा त्याचा प्रयत्न असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी छापा मारताच भोंदू महादेवने स्वतःच्या गळ्यावर चाकूने वार करून आत्महत्येचा देखील प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्याला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. तर पीडित महिला व तिच्या मुलीला देखील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनुसार महादेव पालवे विरोधात बाल संरक्षण अधिनियम आणि जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
बाईट : रामकृष्ण जाधव : पोलिस निरीक्षक
0
Share
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowJul 08, 2025 05:40:54Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_KADU_YATRA_2 पाच फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
शेळ्या, मेंढ्या घेऊन धनगरांच्या वेशात बच्चू कडूंच्या सातबारा कोरा कोरा पदयात्रेला सुरुवात; दुसऱ्या दिवशी भर पावसात हजारो शेतकरी साले सहभागी
अँकर :- शेतकऱ्यांचा संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासाठी बच्चू कडू यांनी कालपासून अमरावती जिल्ह्यातील स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापळ येथून पायदळ यात्रेला सुरुवात केली आहे. आज बच्चू कडू यांच्या पायदळ यात्रेचा दुसरा दिवस आहे. आज बच्चू कडू शेळ्या मेंढ्या घेऊन धनगरांच्या वेशात पदयात्रेत सहभागी झाले आहे. बच्चू कडू यांनी खांद्यावर घोंगडी व डोक्यावर फेटा बांधत आज या यात्रेला सुरुवात केली आहे. आज ही पदयात्रा यवतमाळ जिल्ह्यातील दारवा तालुक्यातील उंबरडा बाजार येथून सुरू झाली आहे. दरम्यान काल पासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून भर पावसातही हजारो शेतकरी बच्चू कडू यांच्या पदयात्रेत सहभागी होत आहे जोपर्यंत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत यात्रा सुरू राहणार असल्याचा बच्चू कडू यांनी सांगितलं आहे.
0
Share
Report
SMSATISH MOHITE
FollowJul 08, 2025 05:33:31Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Police
Feed on - 2C
-------------------------
Anchor - चैन स्नॅचिंग, दुचाकी चोरी, घरफोड्या करण्यासह गावठी पिस्तूल विक्री करणाऱ्या आंतरराजीय टोळीला नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या टोळीने नांदेड, हिंगोली सह तेलंगना राज्यात चोऱ्या केल्या होत्या. तेलंगणा राज्यात या टोळीवर चार गुन्हे दाखल आहेत. गावठी पिस्तूलसुद्धा ही टोळी विक्री करत होती. टोळीतील तिघांबद्दल माहिती मिळाल्ल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नांदेड शहराजवळील आसना जवळून त्यांना अटक केली. त्यांच्याकडुन इतर तिघांबद्दल माहिती मिळाली. पोलीसांनी तरोडा शिव रोड येथून त्यांनाही अटक केली. या आरोपीकडे चार गावठी पिस्तूल आणि काडतुस आढळले. या सहा आरोपीकडून जवळपास सात लाख रुपयांचा चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. यातील पाच आरोपी हे अवघे 21 ते 25 वयोगटातील आहेत तर एक आरोपी 30 वर्षाचा आहे.
Byte - अबिनाशकुमार - पोलीस अधीक्षक
------------------
0
Share
Report
HPHARSHAD PATIL
FollowJul 08, 2025 05:32:22Palghar, Maharashtra:
Anch - महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसची दुरावस्था दिवसेंदिवस समोर येत असून यातच पालघर मधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे . बोईसर आगारातून नाशिककडे जाणाऱ्या बस मध्ये पावसाचे पाणी थेट आत मध्ये गळत असल्याने प्रवाशाला चक्क बसमध्ये छत्री घेऊन बसावा लागला आहे . बोईसर आगारांमधून निघणारी ही बस नाशिक कडे जात असताना मोखाड्याजवळ अचानक पाऊस बसमधील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाल्याच पाहायला मिळालं.
0
Share
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 08, 2025 05:32:03Beed, Maharashtra:
बीड: वादळी वाऱ्याने गेवराई तालुक्यातील सुशी वडगाव येथे घरावरील पत्रे उडाली तर झाडे उन्मळून पडली
Anc: बीडच्या गेवराई तालुक्यातील वडगाव सुशी गावात वादळी वाऱ्याने घरांची पडझड तर काही झाडे उन्मळून पडली. सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस बरसला.. या प्रचंड वादळी वाऱ्यात घरावरील पत्रे हवेत उडाली. अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने ग्रामस्थांची धांदल उडाली होती. वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांच्या शेतातील सोलर पॅनलचे देखील नुकसान झाले आहे.
0
Share
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 08, 2025 05:06:22Beed, Maharashtra:
बीड : गांधीपुतळ्याची विटंबना.. गांधीजींच्या पुतळ्यांना अभिवादन करून काँग्रेसचे निषेध आंदोलन
Anc : महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या सुरज शुक्ला या माथेफिरूविरोधात संतापाचा भडका उडाला आहे. पुण्यातील या घृणास्पद प्रकाराचा बीडमध्ये तीव्र निषेध नोंदवण्यात आला. काँग्रेससह विविध सामाजिक संघटनांनी गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन करून निषेध आंदोलन छेडलं. आंदोलनकर्त्यांनी सुरज शुक्लावर कठोरात कठोर कारवाईची मागणी केली. अशा प्रवृत्ती समाजात विष पसरवत असून त्यांना वेळीच रोखणं आवश्यक असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
0
Share
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 08, 2025 05:05:03Lasalgaon, Maharashtra:
अँकर :- नाशिकच्या निफाड तालुक्यातील लासलगावसह सोळा गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन गाजरवाडी परिसरात फुटल्याने पाईपलाईनच्या कामासाठी गेल्या पंधरा-सोळा दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्यामुळे भर पावसाळ्यात 16 गावातील नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे मात्र आज पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे काम पूर्ण होणार असल्याने उशिरा रात्रीपर्यंत पाणीपुरवठा सुरू होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा समितीने दिली आहे
0
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 08, 2025 05:03:54Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0807ZT_WSM_TREE_RALLY
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर : जुलै महिन्यात दरवर्षी साजरा होणाऱ्या वनमहोत्सवाच्या निमित्ताने वाशिममध्ये वृक्षदिंडी आणि वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला. राष्ट्रीय हरित सेना, एस.एम.सी. इंग्लिश स्कूल आणि सामाजिक वनीकरण विभाग, वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यामुळे वृक्षलागवडीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये वृक्षलागवडीबाबत आत्मीयता निर्माण व्हावी आणि पर्यावरण विषयक जनजागृती व्हावी, या उद्देशाने शाळेच्या निसर्ग ईको क्लबच्या विद्यार्थ्यांनी वाशिम शहरातून वृक्षदिंडी काढली. या माध्यमातून त्यांनी वाशीमकरांना पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.
0
Share
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJul 08, 2025 05:03:35Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळच्या पाटणबोरी येथील नॅशनल हायवे ४४ च्या उडान पुलाखाली बायपास वणी मार्ग आहे. याठिकाणी जीवघेणा खड्डा तयार झाला असून अपघाताचा धोका बळावला आहे. शिवाय झरीजामणी, पाटण, मुकुटबन, वणी-चंद्रपूर जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे. याच मार्गावरून शाळेच्या अनेक स्कूल बसेस, बैलगाडी, शेतातील मजूर, महिला मजूर ये-जा करतात. मोठमोठी वाहनेसुद्धा या मार्गावरून जातात. हा मार्ग नागपूर-हैद्राबाद चालत असल्याने मोठमोठी ओव्हरलोड वाहनेसुद्धा याच मार्गावरून जातात. मात्र खड्यांमुळे अनेक अपघात घडत आहेत. संबंधित बांधकाम विभाग याकडे लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये रोष आहे.
0
Share
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 08, 2025 05:03:24Beed, Maharashtra:
बीड: कोंबड्या घ्या... पण जलजीवन योजनेचं पाणी द्या!
मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांचं अनोखं आंदोलन..!!
Anc- केंद्र सरकारची ‘हर घर जल’ ही महत्वाकांक्षी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत राबवली जात आहे. मात्र, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात या योजनेची पुरेशी अंमलबजावणी झालेली नाही. अनेक गावांमध्ये अद्याप पाण्याचा थेंबसुद्धा पोहोचलेला नाही. या पार्श्वभूमीवर मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी "कोंबड्या" घेऊन पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करत शासन व प्रशासनाचं लक्ष वेधलं आहे..
अधिकारी चिरीमिरी घेतल्याशिवाय कोणतंही काम करत नाहीत. त्यामुळेच आम्ही आज त्यांना पार्टीसाठी कोंबड्या भेट देत आहोत. त्यांनी कोंबड्या घ्याव्यात, पण जलजीवन योजनेतला भ्रष्टाचार थांबवून गावागावात पाणी पोहोचवावं अशी मागणी दरेकर यांनी केलीय. या अनोख्या आंदोलनाची चर्चा परिसरात चांगलीच रंगली आहे.
बाईट: कैलास दरेकर, मनसे शेतकरी जिल्हाप्रमुख
0
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 08, 2025 05:03:06Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0807ZT_CHP_FARMER_PROBLEM
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात शेतकरी सरकारी चुकांमुळे अडचणीत, राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात रोडचे व नालीचे बांधकाम सुरू असल्याने शेतकऱ्यावर मोटर पंप लावून शेतातील पाणी काढण्याची आली वेळ
अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील शेतकरी सरकारी चुकांमुळे अडचणीत आलेत. राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात रोडचे व नालीचे बांधकाम सुरू असल्याने शेतकऱ्यावर मोटर पंप लावून शेतातील पाणी काढण्याची वेळ आली आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील ब्रह्मपुरी-वडसा महामार्गावर हा प्रकार नजरेस पडलाय. नालीचे बांधकाम शेत पातळीपेक्षा उंच असल्याने रोड लगतचे शेत पूर्ण जलमय झाले. शेतकऱ्यावर मोटर पंप लावून पाणी काढण्याची वेळ आली आहे. यंदा या भागात अस्मानीसोबत सरकारी चुकांमुळे शेतपिके बाधित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report