icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
421301
ABATISH BHOIR31 Jul 2025, 03:18 am

डोंबिवलीत भाजप महिला मोर्चाची रणनिती: ५०% आरक्षणाचा योग्य वापर!

Kalyan, Maharashtra:डोंबिवलीत भाजप महिला मोर्चाची रणनिती ठरली ५०% महिला आरक्षणाचा योग्य वापर कसा करता येईल भाजप नेत्या चित्रा वाघ याचे सखोल मार्गदर्शन डोंबिवली जिमखाना येथे भाजप महिला आणि पुरुष पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला भाजप नेत्या चित्रा वाघ उपस्थित होत्या. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिला मोर्चा कसा सज्ज असावा आणि ५०% आरक्षण तसेच विभागांचा आढावा कसा घ्यावा, यावर त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिला मोर्चाची रणनीती कल्याण-डोंबिवलीतून अनेक कार्यकर्ते मुंबईला येत असतात, याकडे लक्ष वेधत वाघ म्हणाल्या, "पालिका निवडणुका तोंडावर असताना महिला मोर्चा म्हणून आमची काय नीती असली पाहिजे याबद्दलची आज बैठकीत चर्चा झाली. ५०% आरक्षण आहे, कित्येक जणी माझ्या सहकारी यावेळेला नगरसेविका होतील काय आणि कशा पद्धतीने करायला पाहिजे या विषयावर महत्त्वाची चर्चा झाली आणि यातूनच येणाऱ्या निवडणुकीची दिशा ठरणार आहे."असे मत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले मोदीजींनी विरोधाकांना एका गाडीत भरून सीमेवर पाठवून द्यायला पाहिजे, तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की सैन्य आपल्यासाठी काय करत आहे....चित्रा वाघ यांचा काँग्रेसवर निशाणा: 'ऑपरेशन महादेव' आणि 'सिंदूर'वरून पलटवार यावेळी चित्रा वाघ यांनी 'ऑपरेशन महादेव' आणि 'ऑपरेशन सिंदूर' यावर टीका करणाऱ्या काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. "ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव हे आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या आणि २६ जणांचे कुंकू पुसणाऱ्यांचा बदला केंद्र आणि मोदी सरकारने घेतला आहे. मात्र वाईट आणि चुकीचे या गोष्टी वाटतात की, इतर देश आपल्यासोबत असताना आपल्या देशातील विरोधक मात्र प्रत्येक वेळेला सरकारवर अविश्वास दाखवत आहेत. त्यांचे ते कामच आहे म्हणा, परंतु त्यांनी देशाच्या सैनिकांबद्दल त्या पद्धतीने अविश्वास दाखवला आहे हे निंदनीय, संतापजनक आणि निषेधार्ह आहे. आज आपले सैन्य सीमेवर आहे म्हणून तुम्ही, मी आणि विरोधक सुद्धा सुरक्षितपणे आपल्या घरी राहू शकतात. मला तर असे वाटते की मोदीजींनी या विरोधाकांना एका गाडीत भरून सीमेवर पाठवून द्यायला पाहिजे, तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की सैन्य आपल्यासाठी काय करत आहे. सैन्याचा अपमान खपवून घेतला जाणार नाही," असे वाघ म्हणाल्या. प्रणिती शिंदेंवर हल्लाबोल: 'अक्कल ठिकाणावर आहे की नाही?' प्रणिती शिंदे यांच्या विधानावर बोलताना चित्रा वाघ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. "काल प्रणिती शिंदे यांनी तमाशा मंडळ म्हटले, त्यामुळे अक्कल ठिकाणावर आहे की नाही असे विचारण्याची वेळ आली आहे. विरोधाला विरोध केला हे चुकीचे आहे. आज ज्या पद्धतीने मोदीजींच्या नेतृत्वात 'नया भारत' आमच्याकडे वाकड्या नजरेने बघाल तर आम्ही पिशवी पण आणि मारू पण हे दाखवून दिले आहे. सैन्याबद्दल भारतातील सगळ्यांना अभिमान आहे आणि त्यांच्याबद्दल अविश्वास दाखवला गेला तर सहन करू शकणार नाही," असे खडे बोल त्यांनी सुनावले. कोण कोणासोबत जात आहे हे आमच्यासाठी महत्त्वाचे नाही. जनतेसाठी काम करणारं सरकार जे काम करते ते जनतेपर्यंत पोहोचवणे हे आमच्या साठी महत्वाच उद्धव-राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर भाजपची भूमिका उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य एकत्र येण्याबद्दल विचारले असता, वाघ यांनी स्पष्ट केले की, "दोन्ही एकत्र येण्याबद्दल आमचे नेते, आमचे मुख्यमंत्री सगळ्यांनी उत्तर दिले आहे. कोण काय करते, कोण कोणासोबत जात आहे हे आमच्यासाठी महत्त्वाचे नाही. जनतेसाठी काम करणारं सरकार जे काम करते ते जनतेपर्यंत पोहोचवणे ही आमची प्राथमिकता आहे. आमचे सरकार हे 'देवा भाऊचे' सरकार आहे. जे सर्वसामान्यांसाठी काम करतात ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचे काम आहे आणि ते आम्ही करतोय." byte.. चित्रा वाघ भाजपा नेत्या
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

यवतमाळ में बायो-बीज के फर्जीपन पर छह मुकदमे, कंपनियों के खिलाफ कार्रवाई

Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीनचे बियाणे उगवण न झाल्याप्रकरणी सहा गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहे. बूस्टर, पार्श्व जेनेटिक्स आणि विगर कंपनी विरोधात हे गुन्हे दाखल झाले आहेत. दारव्हा, बाभूळगाव, दिग्रस, आर्णी आणि यवतमाळ मध्ये हे गुन्हे दाखल झाले आहेत. कृषी विभागाच्या गुणनियंत्रक विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे बोगस बियाण्यांचा शिरकाव झाला, ते बियाणे शेतकऱ्यांना विक्री केल्या गेले. ज्यात त्यांची फसगत झाली. जिल्ह्यात लाखो हेक्टर वरील सोयाबीन बियाण्यांची उगवण झाली नसल्याने या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं.
0
0
Report
Advertisement

देहू संस्थान ने पंजीकृत वारकऱ्यों के दुखद निधन पर एक लाख मदद की घोषणा

Varsoli, Maharashtra:Headline: वारकऱ्यांसाठी देहू संस्थानचा मोठा निर्णय आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पालखी सोहळ्यात दिंडीत चालणाऱ्या नोंदणीकृत वारकऱ्याचा अपघाती मृत्यू किंवा हृदयविकाराच्या झटक्यामुळे दुर्दैवी निधन झाल्यास, संबंधित वारकऱ्याच्या कुटुंबाला संस्थानच्या वतीने एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. देहू संस्थानने स्पष्ट केले आहे की, ही मदत दुःखाची भरपाई नसून संत तुकाराम महाराजांच्या सेवाभावातून वारकरी कुटुंबाला दिलासा देण्याचा एक प्रयत्न आहे. दरम्यान, या आर्थिक मदतीसाठी काही नियम व अटी लागू असणार आहेत. संबंधित वारकरी हा श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात नोंदणीकृत दिंडीत सहभागी असणे आवश्यक असल्याचे संस्थानने स्पष्ट केले आहे.
0
0
Report

मालाड कुरार पुलिस ने तलवारधारी युवक को रंगेहात पकड़ा, बड़ा हादसा टला

Mumbai, Maharashtra:मालाडमध्ये कुरार पोलिसांची मोठी कारवाई; तलवारधारी तरुणाला अटक करून मोठी दुर्घटना टळली मालाड पूर्व येथील कुरार पोलिसांनी धाडसी कारवाई करत एका तलवारधारी तरुणाला रंगेहात अटक केली आहे. राधेय राजेंद्र राणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या कारवाईमुळे परिसरात होणारी एक मोठी दुर्घटना टळल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कुरार येथील नुतन स्कूलजवळ दोन गटांत जोरदार हाणामारी सुरू होती. याच दरम्यान आरोपी राधेय राणे हातात उघडी तलवार घेऊन विरोधी गटावर जीवघेणा हल्ला करण्याच्या उद्देशाने पुढे धावला. घटनास्थळी उपस्थित असलेले पोलीस उपनिरीक्षक (PSI) सचिन पांचाल यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, अत्यंत हुशारीने आणि जीवाची पर्वा न करता आरोपीला झडप घालून पकडले. त्याच्याकडची तलवारही जप्त करण्यात आली.
0
0
Report
Advertisement

नाशिक में Ring Road के विरोध में किसान आमरण उपोषण पांचवें दिन

Nashik, Maharashtra:कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आमरण उपोषण सुरू आहे. आज या उपोषणाचा पाचवा दिवस असून गेल्या पाच दिवसांपासून या ठिकाणी हे शेतकरी उपोषण करत आहेत. रिंग रोडची अलाइनमेंट नवीन मार्गाने न घेता जुन्या मार्गाने घ्यावी या प्रमुख मागणी सह शेतकऱ्यांवर लाठी चार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांची निलंबन करण्यात यावे. या सह विविध मागण्यासाठी आंदोलन केले जात असून मुख्यमंत्र्यांची भेट न झाल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा देखील या आंदोलकांकडून देण्यात आलाय. आढावा घेतला घेत उपोषणकर्ताांशी बातचीत के लिए आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी...
0
0
Report

अभिजित बिचुकले बोले: आषाढ़ी वारी का खर्च सरकार उठाएगी, एकता दिखे वारकरी

Satara, Maharashtra:सातारा - आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अभिजित बिचुकले यांनी वारकरी संप्रदायाच्या एकतेचे कौतुक करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरू असलेल्या वारीच्या परंपरेत सर्व जाती-धर्मांचे वारकरी कोणताही भेदभाव न ठेवता एकत्र पंढरपूरकडे मार्गक्रमण करतात. त्यामुळे समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या राजकारण्यांनी वारकऱ्यांकडून एकतेचा आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. माऊलीच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी अभिनेते अभिजित बिचुकले आले होते.वारीसाठी उभारण्यात येणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या स्वागत कमानींवर टीका करत, हा निधी वारकऱ्यांच्या अन्न, पाणी आणि मूलभूत सुविधांवर खर्च केला असता त्याचा अधिक फायदा झाला असता, असेही त्यांनी म्हटले. शासन वारकऱ्यांच्या सेवेत कमी पडत असल्याचा आरोप करत, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो तर आषाढी वारीचा संपूर्ण खर्च शासनामार्फत उचलणार आणि वारकऱ्यांच्या सेवेत कोणतीही कमतरता राहू देणार नाही,अशी घोषणा अभिजित बिचुकले यांनी केली.
0
0
Report
Advertisement

लोडशेडिंग के विरोध में किसानों का आक्रोश, खामखेडा में बिजली उपकेंद्र के पास प्रदर्शन

Nashik, Maharashtra:- लोडशेडिंग विरोधात शेतकऱ्यांचा हुंकार... - नाशिकच्या देवळा तालुक्यातील खामखेडा वीज उपकेंद्रावर शेतकऱ्यांचा अंधार जनआक्रोश मोर्चा गेल्या पाच-सहा दिवसांपासून शेतशिवारातील वारंवार होत असलेल्या लोडशेडिंगमुळे संतप्त झालेल्या खामखेडा व परिसरातील शेतकरी, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी देवळा तालुक्यातील खामखेडा येथील ३३/११ केव्ही महावितरण वीज उपकेंद्रावर "अंधार जनआक्रोश मोर्चा" काढत महावितरणच्या कारभाराचा तीव्र निषेध केला. हातात मेणबत्त्या आणि टेंभे घेऊन काढण्यात आलेल्या या आंदोलनात शेकडोच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी लोडशेडिंगच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत “अंधार नको, वीज हवी!”, “लोडशेडिंग बंद करा, शेतकऱ्यांना न्याय द्या!” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
0
0
Report

दापोली के सुतारवाडी में दराड-खतरे से लोग सुरक्षित स्थानों पर रवाना

Ratnagiri, Maharashtra:दापोली/ रत्नागिरी दापोलीत सुतारवाडीवर दरड कोसळण्याचे संकट दोन किलोमीटरपर्यंत भेगा; डोंगर कोसळण्याच्या भीतीने सुतारवाडीतील नागरिकांचे स्थलांतर सुरू अँकर : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मळे-सुतारवाडी येथे मुसळधार पावसामुळे डोंगराला तब्बल दोन किलोमीटरपर्यंत भेगा पडल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी या भेगांची खोली दोन ते चार फूट असल्याचे प्राथमिक पाहणीत समोर आले आहे. संभाव्य दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन महसूल प्रशासनाने घटनास्थळी पाहणी करत नागरिकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत भूवैज्ञानिक तज्ज्ञांच्या पथकाला पाचारण करण्यात आले असून त्यांच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, डोंगर कोसळण्याच्या भीतीने सुतारवाडीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
0
0
Report
Advertisement

चंद्रपूर में फिर टस्कर हत्ती: किसान दहशत में, प्रशासन सतर्क

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील उमरी तलाव परिसरात पुन्हा एक टस्कर हत्ती दाखल झाला आहे. हा हत्ती सामदा-सोनापूर नदीमार्गे गडचिरोली जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात आला. सध्या या हत्तीने सावली तालुक्यातील उमरी तलाव परिसरातील जंगलात ठिय्या मांडला आहे. या हत्ती पाठोपाठ कळपातील इतर हत्ती सुध्दा परत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिसरात हत्ती दाखल होताच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 2 महिन्यांपूर्वी 30 रानटी हत्तींच्या कळपाने उमरी तलाव क्षेत्रातील जंगलात ठिय्या मांडला होता. 1 जुलैला इतर हत्ती वैनगंगा नदीला पार करून गडचिरोली जिल्ह्यात परत गेले. त्यातील टस्कर हत्ती सुद्धा परतीच्या मार्गावर असतांना त्याने केलेल्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. उमरी जंगल परिसरात 3 मोठे तलाव आणि घनदाट जंगल असल्यामुळे हत्तीसाठी पोषक वातावरण आहे. कदाचित त्याच कारणामुळे हत्ती पुन्हा याच परिसरात परत आले असावे असा अंदाज वन विभागाद्वारे वर्तविला जात आहे. खरीप हंगाम सुरू असतानाच हत्तींच्या आगमनामुळे पिकांवर मोठे संकट ओढवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.हत्तींच्या आगमनामुळे शेतजाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या जंगल परिसरात पाथरी , आसोला- चक, उसरपार- चक, उसरपार/ तुकूम, मंगरमेंढा, पालेबारसा, सायखेडा ही गावे आहेत. हत्तीच्या आगमनाने गावांतील सामान्य नागरिकांचेही दैनंदिन जीवन प्रभावित झाले आहे.
0
0
Report

आषाढ़ी एकादशी के लिए 225 विशेष बसें, पंढरपूर यात्रा सुरक्षित

Akola, Maharashtra:आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला विभागाने विशेष नियोजन केले आहे. भाविकांच्या सोयीसाठी अकोला विभागातून ७ विशेष एसटी बस पंढरपूरकडे रवाना करण्यात आल्या आहेत. तर संपूर्ण अकोला विभागासाठी एकूण २२५ विशेष बस चालविण्याचे नियोजन करण्यात आले असून, यात्रेच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने या बस सेवा उपलब्ध राहणार आहेत. अकोला, अकोट, मूर्तिजापूर, कारंजा, मंगरुळपीर, वाशिम, रिसोड, व तेल्हारा आगारांमधून या बस चालविण्यात येणार आहेत. तसेच ४५ किंवा त्यापेक्षा अधिक प्रवासी असल्यास आगाऊ आरक्षणासह गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष बसची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात्रेकरूंनी वेळेत आरक्षण करून सुरक्षित आणि सुखकर प्रवासाचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top