icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
421301
ABATISH BHOIR3 Aug 2025, 07:35 am

भाजपचा महापौर हवा, कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी चव्हाण यांचा पुकार!

Kalyan, Maharashtra:कल्याण डोंबिवलीच्या विकासाचे ग्रहण दूर करण्यासाठी भाजपचा महापौर हवा - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण* Anc...कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला लागलेले विकासाचे ग्रहण दूर करण्यासाठी इकडे भाजपचा महापौर असणे आवश्यक आहे असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी कल्याणात व्यक्त केले. कल्याणातील दिग्गज सामाजिक कार्यकर्ते जतिन प्रजापती यांच्यासह अनेक इतर पक्षाच्या भाजप पक्षप्रवेशानिमित्त झालेल्या सोहळ्यात ते बोलत होते. Vo..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात विकासाचा झंजावात सुरू असून अनेक पक्षांतील पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. तर कल्याणचा हा संपूर्ण परिसर आपल्याला भाजपमय करायचा असून त्यासाठी आपण सर्वांनी संघटनात्मकदृष्ट्या एकत्रित काम करण्याचे आवाहनही प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी यावेळी केले. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते जतिन प्रजापती यांनी आज आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. साउंड बाईट... रवींद्र चव्हाण महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

रायगड़ पुलिस ने 4 करोड़ रुपये अंबरग्रीस जैसी उल्टी के साथ एक आरोपी पकड़ा

Chendhare, Maharashtra:अलीबाग पोलिसांची पहाटे मोठी कारवाई. चार कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जपत. एक आरोपी पोलीसांच्या ताब्यात. रायगड पोलिसांनी वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल चार कोटी रुपयांची व्हेल माशाच्या उलटीसदृश अँबरग्रीस जप्त केले आहे. अलिबाग तालुक्यातील चाळमाळा परिसरात विशेष गस्तीदरम्यान ही धडक कारवाई करण्यात आली असून, याप्रकरणी राहुल पंढरीनाथ हातणी या संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. पहाटे दीडच्या sुमारास पोलिसांना चाळमाळा जेटीजवळ एक संशयास्पद दुचाकीस्वार आढळला. त्याची तपासणी केली असता दुचाकीच्या डिकीत कापडी पिशवीत सुमारे चार किलो वजनाचे अँबरग्रीस सापडले. आंतरराष्ट्रीय बाजारात या पदार्थाची किंमत सुमारे चार कोटी रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याशिवाय संशयिताची दुचाकीही जप्त करण्यात आली असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सव्वाचार कोटी रुपये इतकी आहे. प्राथमिक चौकशीत आरोपीविरुद्ध यापुढे कोणताही गुन्हा नोंद नसल्याचे समोर आले.
0
0
Report
Advertisement

चिपळूण में सावर्डे-डेरवण फाटे पर भीषण सड़क हादसा, चालक गंभीर घायल

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील सावर्डे-डेरवण फाटा येथे दुचाकी आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार शंकर पाटील, जे सावर्डा भुवडवाडी जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत, ते गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. अपघातानंतर सावर्डे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, हा संपूर्ण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
0
0
Report

अकोला के बालापूर में अतिक्रमण हटाने के लिए ग्राम पंचायत ने बड़ी कार्रवाई

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील हाता गावातील आठवडी बाजार परिसरातील अतिक्रमणावर आज ग्रामपंचायत प्रशासनाने मोठी कारवाई केली. बाजाराच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणामुळे नागरिक व व्यापाऱ्यांना ये-जा करण्यास मोठा अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत होत्या. याबाबत अतिक्रमणधारकांना अनेक वेळा नोटिसा बजावूनही त्यांनी अतिक्रमण हटवले नसल्याने अखेर ग्रामपंचायतीने प्रशासनाची परवानगी घेऊन कारवाईचा निर्णय घेतला. तहसील प्रशासन, उरळ पोलीस ठाण्यांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कडक पोलिस बंदोबस्तात ही मोहीम राबविण्यात आली. जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण हटविण्यात आले असून कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ग्रामपंचायतीने सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नसल्याचा इशारा देत भविष्यातही अशाच प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
0
0
Report
Advertisement

पातूर पंचायत समिति के सामने भ्रष्टाचार के विरोध में अनोखा प्रदर्शन; 213 रुपये दान

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील पातूर पंचायत समिती कार्यालयासमोर आज भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ एक अनोखे आंदोलन पाहायला मिळाले. ग्राम दिग्रस बु. येथील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात तत्कालीन ग्रामसेवकावर तात्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार ताले यांनी 'भिक मांगो' आंदोलन छेडले. या आंदोलनाची दिवसभर पंचायत समिती परिसरात चांगलीच चर्चा रंगली.पातूर पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या ग्राम दिग्रस बु. येथे झालेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार ताले यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. 'भिक मांगो' आंदोलनाच्या माध्यमातून नागरिकांकडून जमा झालेली 213 रुपयेांची रक्कम त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. भ्रष्टाचार करणाऱ्या तत्कालीन ग्रामसेवकावर तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दोषींवर लवकरात लवकर कारवाई झाली नाही, तर भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.
0
0
Report

बदलapur की बेकरी में चूहा घूमता मिला; केक बनाने की बर्तनों को संडास के कमोड पर रखा गया

Ambernath, Maharashtra:बदलापुरात केकमध्ये उंदिराची विष्ठा आढळलीये. बेकरीत खारीत उंदीर फिरताना कॅमेरात कैद. केक बनवायची भांडी संडासच्या कमोडवर. आय्यंगार फ्रेश केक बекरीतील किळसवाणा प्रकार. हा प्रकार शहरात समोर आला. नगरसेविका हर्षाली गायकवाड यांच्या घरी पाहुणे बेलवलीतल्या बेकरीतून रवा केक आणला होता. हा केक खाताना उंदराची विष्ठा असल्याचं आढळलं, उलट्या मळमळ झाला. जाब विचारण्यासाठी बेकरीला गेल्या असता कर्मचाऱ्यांनी ती उंदराची विष्ठा नसून चोकोचिप असल्याचं सांगितलं. त्यांनी केक टेस्टिंगसाठी पाठवते, असं कबूल केलं. याचदरम्यान या बेकरीत खारीमध्ये उंदीर फिरत असल्याचा व्हिडीओ समोर आला. नगरसेविका हर्षाली गायकवाड यांनी केक जिथे बनवतात त्या जागेची पाहणी केली असता अस्वच्छ वातावरण आणि केक बनवायची भांडी संडासाच्या कमोडवर ठेवलेली दिसली. नागरिकांच्या जीवाशी खेळणारी ही बेकरी बंद करावी, अशी मागणी झाली.
0
0
Report

बार्शी में कपड़ा व्यापारी पर 10-12 बदमाशों का जीवघेणा हमला

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग: सोलापूरच्या बार्शीत तालुक्यात दिवसाढवळ्या कोयता आणि दगडाने कापड दुकानदारावर 10 ते 12 जणांच्या टोळक्याचा जीवघेणा हल्ला. या संपूर्ण हल्ल्याची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झालीय. सौराभ जाधव असे हल्ल्यात जखमी झालेल्या कापड दुकानदाराचे नाव आहे. जमिनीच्या वादातून काकानेच आपल्यावर हल्ला घडवून आणल्याचा आरोप पिडीत पुतण्या सौरभ जाधव याने केलाय. बार्शी-कुर्डुवाडी रोडवरील जैन मंदिराजवळ ही घटना घडलीय. याविरोधात बार्शी शहर पोलिसात आरोपी भैय्या ढावरे, मुन्ना बोते यांच्यासह 10 ते 12 जणांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. या घटनेमुळे पुन्हा एकदा बार्शीतील व्यापारी असुरक्षित झाल्याचे पाहायला मिळाले. Byte: सौरभ जाधव (जखमी कापडं व्यापारी).
0
0
Report
Advertisement

AI तकनीक से सोलापूर ग्रामीण पुलिस ने आषाढ़ी वारी में 32 लाख वारकऱ्यों की सटीक गिनती की

Pandharpur, Maharashtra:आषाढी एकादशी दिवशी पंढरपूरात 18 लाख 96 हजार भाविकांची उपस्थिती, सोलापूर ग्रामीण पोलिसांनी एआय ड्रोन द्वारे केली अचूक मोजणी, तर वारी काळात 32 लाख वारकऱ्यांची विठोबाच्या पंढरीत हजेरी. आषाढी वारी काळात सोलापूर ग्रामीण पोलिसांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून वारकऱ्यांच्या सुरक्षेसोबत गर्दी व्यवस्थापनात मोठी कामगिरी केली आहे. सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून यंदाच्या वारीमध्ये SentientLogics या तंत्रज्ञान संस्थेच्या मदतीने अत्याधुनिक Cognitive Visual Human Neural AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर करण्यात आला. या AI तंत्रज्ञानाच्या आधारे दिनांक २४ जुलै ते दिनांक २६ जुलै २०२६ या कालावधीत कालावधीत पंढरपूर शहरात आगमन केलेल्या वारक-यांची अचूक मोजणी करण्यात आली आहे. त्यानुसार दिनांक २४ जुलै २०२६ रोजी ६,७५,२७४ वारकरी, दिनांक २५ जुलै २०२६ रोजी १८,९६,५७३ वारकरी व दिनांक २६ जुलै २०२६ रोजी - ६,२६,२८२ असे एकूण ३१,९८,१२९ वारकरी यांनी पंढरपूरमध्ये प्रवेश केल्याचे दिसून आले आहे. यामध्ये प्रामुख्याने दिनांक २५ जुलै म्हणजे आषाढी एकादशी दिवशी १८,९६,५७३ वारकरी यांनी आले असल्याचे दिसून आले. AI तंत्रज्ञानाची अचूक मोजणी पद्धत अशी होती. पारंपारिक कॅमेरा मोजणी पद्धतीत एकच व्यक्ती अनेक कॅमेऱ्यांसमोर आल्यास त्याची वारंवार नोंद होऊन आकडेवारी फुगते. परंतु सोलापूर ग्रामीण पोलिसांनी वापरलेल्या AI प्रणालीने पुढीलप्रमाणे काम करून दुबार नोंद पूर्णपणे टाळली. शहरात प्रवेश करण्याच्या मार्गावर AI कॅमेरे बसवण्यात आले होते. या कॅमे-याच्या मदतीने पंढरपूरमध्ये प्रवेश करणारे प्रत्येक व्यक्तीचा चेहरा, कपड्यंचा रंग आणि टोपी, पगडी यांसारख्या वैशिष्ट्यंचा ताळमेळ लावून प्रत्येक वारक-याची एक युनिक ओळख तयार करण्यात येत होती. त्यावरून त्यांची नोंदणी केली. क्रॉस-कॅमेरा ट्रॅकिंग वारकरी शहरात फिरताना इतर CCTV कॅमेऱ्यांनी त्यांना पुन्हा पुन्हा न मोजता एकाच ओळखीने ट्रॅक केले, ज्यामुळे दुबार मोजणी झाली नाही. एखादी व्यक्ती शहराबाहेर जाऊन पुन्हा आल्यास AI ने जुन्याच ओळखीची शहानिशा करून केवळ नवीनच व्यक्तीची नवीन नोंद घेतली. या मोजणी दरम्याने प्रशासनाकडून नागरिक गोपनीयतेचे तंतोतंत पालन करण्यात आले आहे. भारताचा डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन अॅक्ट आणि GDPR नियमावलीनुसार कोणत्याही व्यक्तीचा फोटो किंवा वैयक्तिक माहिती सर्वहरवर सेव्ह करण्यात आलेली नाही. पंढरपूर आषाढी वारी हा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक आहे. लाखो वारक-यांच्या सुरक्षिततेसाठी आणि योग्य नियोजनासाठी अचूक गर्दीचा अंदाज असणे अत्यंत आवश्यक असते. पारंपारिक पद्धतींमधील त्रुटी दूर करून यंदा सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने AI तंत्रज्ञानाचा वापर करून आषाढी दरम्यान सुमारे 32 लाख युनिक भाविकांची अचूक नोंद केली आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा भविष्यातील गर्दी व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाचा मोठ्या प्रमाणावर होईल.
0
0
Report

अकोला: निर्माण मजदूर संघ के विरोध में एकदिवसीय धरना, शैक्षणिक नियम पुराने बहाल करो

Akola, Maharashtra:Anchor :अकोल्यातील जिल्हाधिक्त कार्यालयासमोर आज बिल्डिंग पेंटर, बांधकाम व इतर असंघटित मजूर संघाच्या अकोला जिल्हा शाखेच्या वतीने राज्य सरकारच्या नवीन शैक्षणिक नियमांविरोधात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. इमारत व बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी लागू करण्यात आलेले नवीन शैक्षणिक नियम तात्काळ रद्द करून जुने नियम कायम ठेवावेत, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. तसेच इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या शैक्षणिक सहाय्य योजनेचे अनुदान दुप्पट करावे, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीचे ५० टक्के प्रोत्साहनपर अर्थसहाय्य पुन्हा सुरू करावे आणि बारावीनंतरच्या सर्व शैक्षणिक योजनाही पूर्ववत सुरू ठेवाव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. नवीन शैक्षणिक धोरणामुळे कामगारांच्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम होणार असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी शासनाचा निषेध व्यक्त केला.
0
0
Report

नागपुर के संविधान चौक पर आयटक-हम सारे भारतीय का प्रदर्शन, बदलाव की मांग

Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपुरातील संविधान चौकामध्ये दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेल्या विद्यार्थ्यांच्या लाठीच्या विरोधात आज आयटक आणि आम्ही सारे भारतीय या सामाजिक संघटनेकडून आंदोलन करण्यात आले. - केवळ राजीनामा देऊन हे प्रश्न सुटणार नाही तर एकंदर केंद्र सरकारची शिक्षा नीती यात मोठा बदल करणे गरजेचे आहे जेणेकरून अशा पद्धतीच्या घटना वारंवार होणार नाही यासह विशिष्ट मागण्यांना धरून संविधान चौकामध्ये हे धरणे आंदोलन करण्यात आले... यामध्ये आयटक सह डाव्या संघटनाच्या प्रतिनिधी आणि नागपूर येथील काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोर्चातील पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं - त्ही लढाई आता संपली असून ही लढाई सुरुवात झाली आहे पुढे आणखी ज्यांना आंदोलन उभं करू असा इशाराही आयटकच्या वतीने देण्यात आला.
0
0
Report
Advertisement

सोलापुर में चश्मे वितरण विवाद: एक दिन पहले जारी वर्कऑर्डर से हड़कंप

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - आषाढी वारीमध्ये चष्मे वाटपात झाला गोंधळ, वारीचा एक दिवस आधी वर्कऑर्डर काढल्याने मोठी खळबळ ( PKG )\n\n- पंढरपूरच्या वारीत चष्मे वाटपाच्या विषयावर उडाला मोठा गोंधळ\n\n- वारकऱ्यांच्या सेवेसाठी केवळ एक दिवस अगोदर चष्म्यांची काढण्यात आली वर्कऑर्डर\n\n- एकीकडे आषाढीवारी यशस्वी करण्यात सरकारला मोठे यश तर दुसरीकडे जिल्हा आरोग्य प्रशासनाचा आंधळा कारभार\n\nAnchor - आषाढी वारीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनासाठी शेकडो किलोमीटर पाऊले चालत वारकरी हे पंढरपूरात दाखल होत असतात. पंढरीची आषाढी वारी यशस्वी करण्यासाठी राज्य सरकारने अहोरात्र प्रयत्न केले आणि वारी यशस्वीदेखील केली. मात्र सध्या सोलापूर जिल्ह्यात वारीतील चष्मे वाटपाची चर्चा भलतीच रंगली आहे. मात्र आरोग्य विभागामार्फत जिल्हा शल्य चिकित्सक वर्षा डोईफोडे यांनी 18 जुलै रोजी काढलेली चष्म्याची निविदा आता चर्चेचा विषय बनली आहे. जिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या मार्फत वारीच्या एक दिवस अगोदर म्हणजेच 24 जुलै रोजी निविदा उघडून कार्यारंभ करण्याचे आदेश देण्यात आले होते. आषाढी वारीसाठी पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांना मोफत चष्मे वाटप करण्यासाठी राज्य शासनाने 50 लाखांची तरतूद केली होती मात्र जिल्हा आरोग्य विभागाच्या आंधळ्या कारभारामुळे चष्मे पोहोचण्याआधीच वारी संपल्याची चर्चा आहे. हा राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वारकऱ्यांची मोफत नेतृत्व पासून करून त्यांना चष्मे मिळावेत हा शासनाचा साफ उद्देश होता मात्र एकादशीच्या आतल्या दिवशी निविदा उघडून वर्क ऑर्डर काढण्यात आल्याने किती वारकऱ्यांना याचा लाभ मिळाला हा प्रश्न आता उपस्थित होतोय. शासनाच्या उद्देशाला हरताळ फासण्याचे काम जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने झाले आहे.\n\nआषाढी वारीच्या निमित्ताने दरवर्षी महाआरोग्य अभियान राबवण्यात येतो मात्र यंदाच्या वर्षी आमच्याकडून थोडीशी घाई झाली मात्र आम्ही शासनाच्या नियमाप्रमाणे पूर्ण प्रक्रिया राबवल्याची माहिती देण्यात आलीय. यासोबतच आम्हाला 25 तारखेला चष्मे मिळाले 50 हजार चस्मे मिळाले. 30 हजार वारक्याकांची नेत्र तपासणी करण्यात आली असून त्यापैकी जवळपास 23000 वारकऱ्यांना आम्ही चष्मांचे वाटप केल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आलीय.\n\nबाईट - \nगणेश इंदूरकर ( नेत्रतज्ञ, जिल्हा रुग्णालय, सोलापूर ) ( चौकडा शर्ट )\nयंदाची आषाढीवारी ही चांगल्या रीतीने पार पाडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बारीक लक्ष ठेवून वेळोवेळी योग्य त्या सूचना दिल्या होत्या. मात्र जिल्हा रुग्णालयाच्या घाईगडबडीमुळे किती वारकऱ्यांपर्यंत चष्मे पोहोचले याबद्दल सामाजिक कार्यकर्त्यांकडून शंका उपस्थित केली जातेय.\n\nबाईट - \nलहू गायकवाड ( सामाजिक कार्यकर्ते ) ( पिवळा शर्ट )\n\nटینڈर हे अचानकपणे काढता येत नाही आणीबाणीचा परिस्थितीमध्ये निघाल तर ठीक आहे. मात्र स्वार्थ ठेवून 50 लाखांचा चष्म्याचा डेंडर काढण्यात आलाय. वारी हे पूर्व नियोजित असताना देखील टेंडर अचानकपणे कसे निघते ? किमान एक महिला अगोदर टेंडर काढणे गरजेचे असल्याचे मत कायदे तज्ञांनी व्यक्त केलय.\n\nबाईट - \nऍड. योगेश पवार ( वकील ) ( पांढरा शर्ट )\n\nमहाराष्ट्र शासन तसेच स्थानिक अधिकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे संपूर्णवारी ही सुरक्षित आणि स्वच्छंद पार पाडली गेली असताना ग्रामीण रुग्णालयाच्या चष्म्यामुळे आणि काही चुकीच्या अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे चर्चेचा विषय ठरली आहे हे मात्र नक्की.....\n\nEnd..\nअभिषेक आदेप्पा \nझी - 24 तास, सोलापूर
0
0
Report

सह्याद्री की हरियाली में ओझर्डे नवजा झरना पर्यटकों का प्रमुख आकर्षण

Satara, Maharashtra:पाटण, सातारा- सह्याद्रीच्या कुशीत पावसाने रंगवलेलं निसर्गाचं अप्रतिम चित्र... हिरवागार डोंगर, धुक्याची शुभ्र चादर आणि त्या चादरीतून दिमाखात कोसळणारा ओझर्डे-नवजा धबधबा... हे दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची पावलं आता मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वळू लागली आहेत. सह्याद्रीच्या उंच कड्यावरून फेसाळत कोसळणारा हा धबधबा, त्याच्या सभोवतालचं मनमोहक वातावरण आणि निसर्गाने उधळलेली हिरवाई पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालत आहे. पावसाळ्यात खुललेलं हे निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी राज्यभरातून पर्यटक येथे दाखल होत असून, ओझर्डे-नवजा धबधबा सध्या पर्यटनाचे प्रमुख आकर्षण ठरत आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top