icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
402305
PPPRAFULLA PAWAR13 Aug 2025, 02:52 pm

भरत गोगावले: आदित्य ठाकरेंना दिले खडे बोल, मंत्रीपद सोडणारा मी मावळा!

Raigad, Maharashtra:स्लग - भरत गोगावले यांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर ...... मंत्रिपद सोडलं तिथं पालकमंत्री पद काय चीज आहे ? ....... स्वतः मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी मुलाला मंत्री केले ....... गोगावले यांनी सुनावले खडे बोल ....... अँकर - अडीच वर्षासाठीचे मंत्रीपद सोडणारा मी मावळा आहे जिथे मंत्रीपद सोडले तिथे पालकमंत्री पद काय चीज आहे असे प्रत्युत्तर मंत्री भरत गोगावले यांनी आदित्य ठाकरे यांना दिले सेनेचे मंत्री स्वतःला पालकमंत्रीपद मिळावे या स्वार्थापोटी भांडत असल्याची टिका आदित्य ठाकरे यांनी केली होती या टिकेला गोगावलेंनी उत्तर दिलंय . उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना स्वतःच्या मुलाला मंत्री केले एकनाथ शिंदेनी तसे केले नाही असे खडे बोल देखील सुनावले. बाईट - भरत गोगावले
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

पेपर लीक मामले में अब नया कानून, दोषी किसी हालत में बख्शे नहीं जाएंगे

Mumbai, Maharashtra:एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते आपला वाढदिवस समाज उपक्रम राबवून साजरे करत असतात रामदास कदम यांच्या वाढदिवसानिमित्त सिद्धेश कदम यांनी शासन आपल्या दारी उपक्रम राबवला वीस हजार पेक्षा अधिक लोकांना याचा लाभ झाला पेपर लीक होणं ही दुर्दैवी घटना याचे गांभीर्य पंतप्रधानांनी घेतलं पेपर लीग करणारे सर्व आरोपी अटक आहेत सीबीआय त्याची चौकशी करत आहे उद्या यावर नवा कायदा येईल यात दोषी असणारा कोणीही सुटणार नाही धर्मेंद्र प्रधान यांनी देखील आपले नैतिकता समजून राजीनामा दिला आहे विद्यार्थ्यांचा आंदोलन हे नॉन पोलिटिकल होत काही लोकांनी ते राजकीय आंदोलन केलं काही लोक जंतर-मंतरवर न जाता प्रधानमंत्री यांच्या निवासस्थानावर गेले पंतप्रधानांचे घर हे हाय सिक्युरिटी झोन मध्ये येतं इंदिरा गांधीजींची हत्या झाल्यानंतर एसपीजीने विशेष कायदा केला पंतप्रधानांच्या घराच्या परिसरात आंदोलन करण्यास बंदी असताना देखील राहुल गांधींनी तिथे हजारो लाखो लोकांना बोलावलं पंतप्रधानांच्या घरात घोषणा मोठा घातपात करणे त्यांची मनशा होती नेहमी म्हणतात बांगलादेश होईल नेपाळ होईल श्रीलंका होईल देशात अराजकता पसरवण्याचा त्यांचा उद्देश आहे यापूर्वी देखील देशाने दोन पंतप्रधान गमावले आहेत आंदोलन जंतर मंतरवर असताना ते पंतप्रधान आवास आकडे लाखो लोकांना बोलवत होते त्यांचा दुष्ट हेतू होता त्याचा मी कठोर शब्दात निषेध करतो महाराष्ट्रातील काही लोकांना जनतेने नाकारला आहे (ठाकरे बंधूंवर) ते पेटवा पेटवीची भाषा करत होते आता आग लागलेली आहे भिजून देऊ नका त्यांचा असं झालं बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना (ठाकरेंना टोल) विद्यार्थी देशाचे भविष्य आहेत त्यांचा आंदोलन यशस्वी झालंय त्यामुळे त्यांचे दुष्ट हेतू असफल ठरले आहेत विद्यार्थ्यांनी आपल्या व्यासपीठाचा राजकीय वापर होऊ देऊ नये
0
0
Report

गडकरी के बयान पर सियासी घमासान, विपक्ष ने सवाल उठाए

Mumbai, Maharashtra:सचिन अहिर दुर्दैवी आहे वरात कुणाची घोडा कोणाचा आणि बसतोय कोण याचा श्रेय झेनझिनचा आहे दुसरा श्रेय सरकारने ही गोष्ट मान्य केली मोठी गोष्ट आहे तुम्ही त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने नाव ठेवत होते हीच लोकशाही आहे लोकशाही संपली आहे लोकशाही दोन्ही बाजूने दाखवली आहे नाहीच केलं असतं तर त्यांचा प्रश्न रास्त राहील असतं काही लोक असं दाखवत आहेत आमच्यामुळेच राजीनामा झाला आहे झेंझि लीडर नी सांगितलं मला श्रेय देऊ नका. हे श्रेय लोकांचा आहे शिक्षण क्षेत्रात कमतरता आहे केंद्र सरकार राज्य सरकारने बदल करान सकारात्मक बाब आहे काही लोक राजकीय भांडवल करत आहेत झेंझि हुशार आहे त्यांना माहित आहे कोण वापर करतोय कोण गैरवापर करत आहे विजय मेळावा केला त्याला जास्त काही महत्त्व राहणार नाही जास्त काही टिकणार नाही ऑन नितीन गडकरी काल पर्यंत कौतुक करत होते आज अचानक बोलाव लागलं विरोधक म्हणून बोलाव लागत नंतर फोन वर त्यांच्याशी बोलून मी का बोलो का बोलू नये असे होता कामा नये युती मध्ये असताना चांगला मंत्री म्हणून कौतुक करायचं परिस्थिती नुसार आपण टीका करायला गेलो तर त्यांच्या चांगल्या कामाला अन्याय होईल सर्व खासदारांना माहिती नितीन गडकरी यांच्या सारखा काम कोणीच करू शकत नाही
0
0
Report
Advertisement

विखे पाटील ने ठाकरे बंधूंवर प्रहार, कहा—उनका राजनीतिक अस्तित्व खत्म

Satara, Maharashtra:कराड : मुंबईतील ठाकरे बंधूंच्या जल्लोष सभेनंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. ठाकरे बंधूंनी केलेल्या टीकेला आता राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कराडमधून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "ठाकरे बंधूंच्याच झिंज्या लोकांनी उपटल्या आहेत," असा घणाघात विखे पाटील यांनी केला. कराडमध्ये माध्यमांशी संवाद साधताना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे बंधूंवर सडकून टीका केली. "ठाकरे बंधूंचं राजकीय अस्तित्व आता संपलं आहे. सध्या त्यांची ही अस्तित्वाची लढाई सुरू आहे. महाराष्ट्रासह मुंबईतील जनतेने त्यांना नाकारलं आहे. त्यांच्या झिंज्या लोकांनीच यापूर्वी उपटल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारची भाषा त्यांच्या तोंडी शोभत नाही," असा टोला विखे पाटील यांनी लगावला.दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर मात्र विखे पाटील यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं.
0
0
Report
Advertisement

कोळीवली पेट्रोल पंप के पास चलती मोटरसाइकिल में अचानक आग लगने से चालक ने सुरक्षित बाहर निकल लिया

Kalyan, Maharashtra:कोळीवली पेट्रोल पंपाजवळ चालत्या दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना घडली. दुचाकीतून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत वाहन रस्त्याच्या कडेला थांबवून तातडीने खाली उडी मारली. काही क्षणांतच दुचाकीने पेट घेतला स्थानिक नागरिकांनी आणि अग्निशमन दलाला तातडीने माहिती दिल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. दुचाकीचे संपूर्ण जळून खाक झाली आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्टसर्किट किंवा तांत्रिक बिघाडाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
0
0
Report

दहिसर समेत छह केंद्रों में 11 हजार उत्तर भारतीयों को मराठी सिखाने की पहल

Mumbai, Maharashtra:दहिसर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल ११ हजार उत्तर भारतीय नागरिकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी विशेष प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. परिवहн मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा आली बोलता आली पाहिजे असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच, महाराष्ट्रात वास्तव्यास असणाऱ्यांनी मराठी भाषा शिकावी, अशी भूमिका विविध स्तरांवरून मांडली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मागाठाणे विधानसभा मतदारसंघात मराठी शिकवण्याचा व्यापक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. दहिसर, बोरीवली, कांदिवली, मालाड आणि गोरेगाव परिसरातील उत्तर भारतीय नागरिकांसाठी विशेष मराठी प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या उपक्रमासाठी दहिसर आणि बोरिवली परिसरात एकूण सहा प्रशिक्षण केंद्रे उभारण्यात आली असून, आतापर्यंत सुमारे ११ हजार नागरिकांनी या वर्गांमध्ये सहभाग नोंदवला आहे. शिक्षक शिवाजी शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली सहभागी नागरिकांना मराठी भाषा बोलणे, वाचणे आणि दैनंदिन व्यवहारात वापरण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. मराठी भाषेचा प्रचार-प्रसार आणि सामाजिक सलोखा वाढवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले. मराठी भाषा शिकण्याबाबत उत्तर भारतीय नागरिकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, हा उपक्रम भाषिक ऐक्य आणि परस्पर संवाद अधिक मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानला जात आहे.
0
0
Report
Advertisement

नवी मुंबई एपीएमसी के फलों से फेंके गए कचरे से सड़क पर बिक रहे फलों का वीडियो सामने आया

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई स्थित एपीएमसी फळ मार्केट मद्ये फेकून दिलेल्या फळांच्या बॉक्स मधून फळ उचलून नवी मुंबई ,ठाणे ,मुंबई येथील रस्त्यावर विकली जात असल्याचा व्हेएडिओ समोर आला है, पावसामुळे अनेक फळे खराब होत आहेत, यामुळे ही सडलेली फळे बाजार समिती के आवारात फेकली जात आहेत, या फेकलेल्या सडक्या फळातून फळे वेचून ती विकण्यासाठी आल्याचा व्हेएडिओ समोर आला है। यात सफरचंद मोठ्या प्रमाणात फेकली असून, या सडक्या सफरचंद मधून काही सफरचंद काढली जात आहेत, असा व्हेएडिओ समोर आला है। ही सफरचंद रस्त्यावर 100 ते 200 रुपये ने विकली जात आहे। सामाजिक कार्यकर्ता नागमणी पांडे यांनी हे व्हेएडिओ काढले आहेत.
0
0
Report

मेळघाट के टिटवा आश्रम स्कूल में फूड पॉइजनिंग, अदिती तटकरे ने क्या कहा?

Amravati, Maharashtra:AMT_ADITI_BYYE तीन फाईल आहे रिपोर्टर :- अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 लाडकी बहीण योजनेचा हप्ता जास्त वाढवायचा का या संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील - अदिती तटकरे अदिती तटकरे ऑन मेळघाट फूड पॉयझनिंग. मेळघाट मधील टिटवा आश्रम शाळेत फूड पॉइजनिंग झाल्याची घटना माहिती मिळाली या संदर्भात डॉक्टरांशी मी संवाद देखील साधला.. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आलं यासंदर्भात आदिवासी मंत्री यांच्याशी देखील मी चर्चा करणार आहे.. सेंट्रल किचन मध्ये कोणतं जेवण आणलं गेलं होतं या संदर्भात चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आले आहे ऑन दिल्ली आंदोलन.. देशात लोकशाही आहे लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकत असेल तर ती लक्षात आणून देणे ते लोकशाहीमध्ये अधिकार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधारणा बिल आणण्याचे पावले उचललेले आहेत विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या हे सरकार सकारात्मक पद्धतीने सोडवेल आपली शिक्षण व्यवस्था अधिकाधिक चांगल्या पद्धतीने सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलते ऑन लाडकी बहीण योजना.. लाडकी बहीण योजनेतील ई केवायसी करण्यासाठी सरकारने सहा महिन्याची मुदत दिलेली आहे ज्या महिलांनी एक केवायसी पूर्ण केली मात्र त्यात काही उनिवा राहून गेल्यात त्यांना दुरुस्त करण्याची संधी देण्यात आली आहे लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या राबविली जाणार लाडकी बहीण योजनेचा हप्ता जास्त वाढवायचा का या संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील
0
0
Report

किसानों को 2 लाख तक की कर्जमाफी, 2026 के राहत पैकेज का ऐलान

Chandrapur, Maharashtra:कर्जमुक्त शेतकऱ्यांच्या याद्या पोचल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे, याद्या नागरिकांना पाहता याव्यात, यासाठी गाव, चावडी, संबंधित बँक शाखा, सहकारी संस्था, विविध कार्यकारी संस्था आदी ठिकाणी लावण्याचे काम सुरू झाले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना - 2026' जाहीर केली आहे. या योजनेत आता सर्व पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच विधानसभेत केली. पात्र शेतक-यांच्या कर्जमुक्तीच्या याद्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला प्राप्त झाल्या आहेत. याद्या नागरिकांना पाहता याव्यात, यासाठी गाव, चावडी, संबंधित बँक शाखा, सहकारी संस्था, विविध कार्यकारी संस्था आदी ठिकाणी लावण्याचे काम सुरू झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 72 हजार 388 खातेदारांची माहिती पोर्टल वर अपलोड करण्यात आली असून यात 43 हजार 816 खातेदार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तर 28 हजार 572 खातेदार हे राष्ट्रीयीकृत बँकेचे आहेत. यापूर्वी महात्मा ज्योतिराव फूले कर्जमाफी योजनेत लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी असलेली 50 हजार रुपयांची अट आता पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यतची कर्जमाफी मिळणार आहे. तसेच 2026-27 मधील नियमित परतफेडीची अट सुद्धा रद्द करण्यात आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होईपर्यंत त्यांच्या थकीत पीककर्जावर कोणतेही व्याज आकारू नये, असे स्पष्ट निर्देश सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांना दिले आहेत.
0
0
Report
Advertisement

NEET में कम अंक से छात्रा ने की आत्महत्या, परिवार ने कहा मानसिक तनाव के कारण

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील अंकिता सांगळे या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीये...नीट परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्यानेच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे तिच्या घरच्यांचे म्हणणे आहे...अंकिता हिला नीट परीक्षेत 166 गुण मिळाले... अपेक्षित गुण मिळाले नाहीत म्हणून मानसिक तणावात तिने काल सायंकाळी साडेचार वाजता गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे घरच्यांचे म्हणणे आहे...अंकिता हिला अभ्यासासाठी स्वतंत्र खोली देण्यात केलेली होती आणि ती त्यामध्येच बसून अभ्यास करत होती...बराच वेळ झाला तिचा काही आवाज किंवा हालचाल दिसली नाही म्हणून तिच्या घरच्यांनी खोलीचा दरवाजा उघडून पाहिलं तर अंकिताने गळफास घेतल्याचे समोर आले...त्यानंतर पोलीस प्रशासनाला माहिती कळवण्यात आली...याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये अण्णा सांगळे यांच्या माहितीवरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
0
0
Report

नाशिक के गड्ढों ने चार महीनों में तीन लोगों की जान ली—ठेकेदार-प्रशासन पर सवाल

Nashik, Maharashtra:अँकर नाशिक शहरात सुरू असलेल्या रस्ता खोदकामामुळे खड्यात पडून सातपूरमध्ये माजी सैनिक गायकवाड यांचा मृत्यू झाला. त्या पाठोपाठ अशा प्रकारे खड्यांमुळे गाडी आदळून अपघात झाल्याने गंभीर जखमी असलेल्या पंचवटीतील दीपाली बेळे यांची तब्बल ३९ दिवसांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पंचवटीत यापूर्वी उज्ज्वला गायकवाड यांचाही खड्ड्यांमुळे अपघात होऊन मृत्यू झाला त्यानंतर सातपूर येथेही दुर्घटना घडल्यानंतर आता हा तिसरा बळी आहे... गेल्या चार महिन्यात या खड्ड्यांमुळे तीन जणांचा बळी गेलाय तर दोन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.... दिंडोरीरोडवरील विकासकामांनंतर खोदलेले खड्डे योग्यप्रकारे न बुजविल्याने उज्ज्वला गायकवाड आणि दीपाली बेळे या दोघींचाही बळी गेला आहे. या दोन्ही घटनांना संबंधित ठेकेदार आणि प्रशासन जबाबदार असून, मृतांच्या कुटुंबीयांना महापालिकेने आर्थिक मदत द्यावी, यासाठी लवकरच महापालिका आयुक्तांची भेट घेऊन निवेदन देणार असून, महासभेतही लक्षवेधी मांडण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिली.याप्रकरणी शिंदेसेनेचे नगरसेवक प्रवीण जाधव यांनी संबंधित ठेकेदार आणि दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यावर मंत्री नरहरी झिरवाळांनी देखील प्रतिक्रिया दिली असून शहरात पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत असल्याची कबुली हिरवळ यांनी दिलीये सिंहस्थ कुंभमेळ्याचे काम हे अत्यंत उशिरा सुरू झाल्याचं देखील झिरवाड्यांनी म्हटलं तर अशी परिस्थिती उद्भवली नसती अशी प्रतिक्रिया मंत्री झिरवाळ यांनी दिली... मंत्री नरहरी झिरवाळ हे देखील मखमलाबाद परिसरात राहत असून त्यांना देखील या खड्डेमुळे रस्त्यातूनच प्रवास करत लागत असल्याची दृश्य समोर आली आहे... याबाबत मंत्री नरहरी झिरवळ हे नाशिक महापालिका आयुक्तांना पत्र पाठवणार असल्याचे देखील म्हटलले रस्त्यांच्या खोदकामांमुळे नाशिककरांना खड्डेदुखीला सामोरे जावे लागत आहे. चार महिन्यांत या खड्ड्यांनी तिघांचा बळी घेतला आहे. तर दिलीप काळे नामक व्यक्तीची ६ दिवसांपासून मृत्यूशी झुंज सुरू आहे.
0
0
Report

बालापूर की छात्रा की मौत: आरोपी पुलिस कर्मी पवन वडकावे की गिरफ्तारी मांग तेज

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर परिसरात संतापाची लाट उगली आहे. लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या पोलीस कर्मचारी पवन वडगावे याला तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी आजही नागरिक रस्त्यावर उतरले. पीडित मुलीवर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी अकोला नाक्यावर तब्बल एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेणारा हा रिपोर्ट... काही महिन्यांपूर्वी बाळापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी पवन वडगावे याने एका विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे शारीरिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपीने लग्नास नकार दिल्याने संबंधित मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादम्यान मृत्यूशी झुंज देत असलेल्या या पीडित मुलीचा अखेर काल मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण बाळापूर शहरात संताप व्यक्त होत असून आरोपी अद्याप फरार असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. पीडित मुलीला न्याय मिळावा आणि आरोपी पोलीस कर्मचारी पवन वडगावे याला तात्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय मोर्चाही काढण्यात झाला होता. आज अंत्यसंस्कारापूर्वी संतप्त नागरिकांनी अकोला नाक्यावर एक तास रस्ता रोको आंदोलन करत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.दरम्यान, खासदार अनुप धोत्रे यांनी आंदोलनस्थळी भेट देत या प्रकरणाचा पाठपुरावा मुख्यमंत्री स्तरावर केला जाईल, आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात येईल तसेच हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यासाठी आणि सक्षम सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले. त्यानंतर पीडित मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी दोन विशेष पथके तयार केली असून फरार आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती दिली आहे. आरोपीला लवकरच अटक करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासनही पोलिसांकडून देण्यात आले आहे. विद्यार्थिनीच्या मृत्य्यानंतर या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आता आरोपीला नेमके कधी अटक होते आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी तपास किती वेगाने पुढे सरकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जयेश जगड, झी मीडिया, अकोला
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top