Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413001

नाशिक में पत्रकारों पर हमला: संघ ने तीखी निषेध जताई

AAABHISHEK ADEPPA
Sept 20, 2025 13:01:31
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने नाशिक येथील पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा व्यक्त करण्यात आला तीव्र निषेध Voice - नाशिक येथील त्रंबकेश्वरला साधू महंतांच्या बैठकीच्या कव्हरेजला गेलेल्या तीन पत्रकारांना गावगुंडांकडून बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील पुढारी न्युजचे किरण ताजणे, झी 24 तासचे योगेश खरे, साम टीव्ही चे अभिजीत सोनवणे यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आलाय. सदर घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाव गुंडांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गावगुंडांवर कारवाई न झाल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांनी दिलाय. बाईट - मनीष केत ( प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ )
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Sept 20, 2025 14:02:09
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 2009ZT_CHP_DISTT_CREATION ( single file sent on 2C)  टायटल:-- राज्यात 81 तालुके आणि सुमारे 20 जिल्हे निर्मितीचा प्रस्ताव आहे, जनगणना झाल्यावर भौगोलिक स्थिती पाहून निर्णय घेऊ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची चंद्रपुरात माहिती अँकर:-- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या चंद्रपूर दौऱ्यात राज्यातील जिल्हे आणि तालुका निर्मिती बाबत मोठे विधान केले आहे. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्र परिषदेत त्यांनी 81 तालुके आणि सुमारे 20 जिल्ह्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे असल्याचे सांगत जनगणना झाल्यावर , जागांची पुनर्रचना लक्षात घेतल्यावर या संबंधात भौगोलिक परिस्थिती पाहून आवश्यक असेल त्या ठिकाणी निर्णय घेऊ असे सांगितले.  बाईट १) चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 20, 2025 13:46:24
Washim, Maharashtra:वाशीम: File3:2009ZT_WSM_BRIDE_CRIME WSM_Bride_Crime_Hindi_BT WSM_Bride_Crime_Marathi_BT रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर:लग्नासाठी मुलगी पाहिजे या आमिषाने एका ३५ वर्षीय युवकाची तब्बल १ लाख २५ हजार रुपये रोख, सोन्याचे दागिने आणि महागडे कपडे घेऊन नवरी पहिल्या रात्रीच फरार झाल्याची धक्कादायक घटना वाशिमच्या रिसोड येथून उघडकीस आली आहे.या प्रकरणी रिसोड पोलिसांनी मोठी कारवाई करत आंतरराज्यीय फसवणूक टोळीतील तीन महिला व एक पुरुष आरोपीना अटक केली आहे.एका संस्थानावर झालेल्या या विवाहासाठी मेजवानीसोहळा,सोन्याचे दागिने आणि नवरीसाठी महागडे कपडे अशी थाटामाटाची तयारी करण्यात आली होती.मात्र,लग्नाची पहिली रात्र नवऱ्या मुलाच्या आयुष्यातील काळी रात्र ठरली.नवरी दागिने,कपडे आणि रोख रक्कम घेऊन पलायन झाली.युवकाने दुसऱ्याच दिवशी रिसोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.पोलिसांच्या तपासाची चक्रे फिरवून तीन आरोपी महिलांना व एक पुरुष अशा चार जेरबंद करण्यात आले असून सोन्याचे दागिने हस्तगतकरण्यात आले आहेत.या आरोपी महिलांविरोधात महाराष्ट्रासह इतर राज्यांतही गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.रिसोड पोलिसां कडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून या टोळीत अजून किती जण सहभागी आहेत,याचा शोध रिसोड पोलीस घेतला जात असल्याचे पोलीस उपअधिक्षक नवदीप अग्रवाल यांनी सांगितले. बाईट:नवदीप अग्रवाल,पोलीस उपअधिक्षक वाशिम
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 20, 2025 13:45:34
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 2009ZT_CHP_BAWANKULE_4 ( single file sent on 2C)  टायटल:-- महसूलमंत्री बावनकुळे यांनी नाशिक येथे पत्रकार मारहाण प्रकरण गंभीर असल्याची दिली प्रतिक्रिया, दोषींवर कारवाई करण्याचे दिले आश्वासन   अँकर:-- महसूलमंत्री बावनकुळे यांनी चंद्रपुरात बोलताना नाशिक येथे पत्रकार मारहाण प्रकरण गंभीर असल्याची  प्रतिक्रिया दिली. मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, मीडियाकर्मींना अशा प्रकारची मारहाण होणे अत्यंत दुर्दैवी आहे, निंदाजनक आहे, जे कोणी आरोपी आहे त्यांना कडक शिक्षा होईलच, मी आत्ताच नाशिक सिपींसोबत बोलणार आहे, गृह विभाग याची गंभीर दखल घेईलच बाईट १) चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Sept 20, 2025 12:31:58
Virar, Maharashtra: Date-20sep2025 Rep-prathamesh tawade Loc-virar Slug-VIRAR MURDER Feed send by 2c Type-AVb Slug- विरार मध्ये मित्राकडूनच मित्राची हत्या मनवेल पाडा परिसरात घटनेने खळबळ अँकर - विरार पूर्व मनवेलपाडा परिसरातील जळबावाडी येथे एका मित्राने मित्राची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.. नशेमध्ये असताना ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे... मेहुल सहा असं मयत तरुणाचे नाव असून अनिकेत गायकवाड असं आरोपी तरुणाचे नाव आहे...या दोघांमध्ये नशेवरून वाद झाला होता या वादातून अनिकेतने मेहुल याची जळबाव वाडी येथील झाडाझुडुपात चाकूने भोसकून हत्या केली.. स्थानिक नागरिकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर लक्षात आला.. विरार पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अवघ्या काही तासातच आरोपीला अटक केली आहे... बाईट- स्थानिक नागरिक.
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Sept 20, 2025 12:22:03
Ratnagiri, Maharashtra: *भरत गोगावले पालकमंत्री पद* ,,,, पालकमंत्री असलो आणि नसलो तरी आमचे आम्ही काम करत आहोत,,, इच्छाशक्ती आमची प्रबळ आहे, काही अडचणी वरच्या लेवलला नेतेमंडळींना असू शकतात. नवरात्र झाल्यानंतर याच्यावर मार्ग निघेल. *भरत गोगावले ऑन सुनील तटकरे,,,* कोकणामध्ये सुनील तटकरे यांच्या फक्त एक सीट आहे,,,, त्यांच्या हिश्यात आलेला भाग आहे तो त्यांना दिला जात आहे,,, एकच उणीव आहे ती पण होईल,,, ऑन राऊत आणि कल्याणचे आमदार यांच्यातला वाद,,,, नाहक संजय राऊत काही गोष्टी अंगावर उडवून घेतात,,, आमचे लोक उगाच बोलत नाहीत,,, ज्या वेळेला असे काही शब्द येतात तेव्हा आमच्या आमदारांना खासदारांना बोलावं लागतं,,,, त्यांनी तारतम्य सोडलं लिमिट सोडलं त्यामुळे आमच्या अशा मावळ्याला असे उद्गार काढावे लागतात,,,, *भरत गोगावले ऑन स्वबळावर लढणे* ,,, विधानसभा निवडणूक लढलो,,, पण जर काही मंडळींना असे वाटत असेल त्यांना का बरोबर घ्यावं जर काही ठिकाणी अशा गोष्टी घडणार असतील तर आमची तयारी आहे आम्हीही मेलेल्या आईची दूध प्यायलो नाही आम्ही पण मर्द मराठ्यांची बच्चे आहोत. *गोगावले ऑन निधीवाटप,,,* एकनाथ शिंदे साहेबांच्या काळामध्ये प्रचंड कामे मिळाली,,,, नवीन आलेले आमदार आहेत त्यांना आधी प्राधान्य द्यायचे असे आमचे ठरले आहे. ऑन लाडकी बहीण,,,, लाडके बहिणींचे पैसे कधी बंद होणार नाहीत ज्यांच्यामुळे आम्हाला सरकार मिळाले आहे त्यामुळे त्यांचे पैसे बंद होणार नाहीत... *ऑन पालकमंत्री पद,,,,* देवीला जर वाटत असेल मी तिचा भक्त आहे तर ती माझ्यावर प्रसन्न होईल आणि मला पालकमंत्री पद मिळेल, कुठल्याही गोष्टीला घाबरायचे नाही, मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे बाळासाहेबांच्या म्हशीत वाढलेला आहे दिघे साहेब आणि शिंदे साहेबांचा मी खनता समर्थक आहे,,, पण काही कारण आहेत की आम्हाला हक्काने मिळणे गरजेचे आहे,,,,
1
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 20, 2025 12:21:02
Beed, Maharashtra:बीड: नवगण राजुरी येथील पर्यायी रस्ता वाहून गेला, वाहतूक पूर्णतः बंद... Wkt Anc- बीड जिल्ह्यात गेल्या पाच दिवसापासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. जिल्ह्यात सर्वदूर पूर परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक प्रकल्प तुडुंब भरून वाहतात तर दुसरीकडे अनेक रस्ते वाहून गेल्याने वाहतूक खोळंबली आहे. बीडच्या नवगण राजुरी येथील राज्य महामार्गावरील पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे याठिकाणी पर्यायी रस्ता करण्यात आलेला होता. तोही रस्ता मुसळधार पावसात वाहून गेला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसापासून इथली वाहतूक पूर्णतः बंद आहे. सध्या या परिसरातील अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. रस्ताच नसल्याने वाहत्या पाण्यातूनच जीव धोक्यात घालून ग्रामस्थ प्रवास करताना पाहायला मिळतात. त्यामुळे लवकरात लवकर पर्यायी पूल दुरुस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे. नवगणराजुरी हे गाव बीडचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्या आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेंद्रकुमार मुधोळकर यांनी... Wkt
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 20, 2025 12:02:23
Manchar, Maharashtra:Feed 2C Slug: Manchar Pola Tayari File:01 Rep: Hemant Chapude(Manchar) Anc -उद्या भाद्रपद बैलपोळा सण साजरा होत असल्याने मंचर शहरात बैलांना सजविण्याच्या साहित्याने दुकाने सजलेली पाहायला मिळत असून हे साहित्य खरेदीसाठी शेतकरीही गर्दी करत आहेत.  Vo - बैलपोळ्याच्या दिवशी बैलांच्या नियमित वापराच्या वस्तू बदलण्याची पद्धत आहे. त्यामुळे या दिवशी बैलांना नवीन कासरे, गंडे, वेसण, मोरखी घालण्यात येते. तर बैलपोळ्याच्या मिरवणुकीसाठी बैलांना सजविताना बैलांना फुले, घुंगरे, कवड्या असलेले गंडे वापरले जातात, तर बैलांच्या शिंगांना लावण्यासाठीही विविधकलर, फुलांचे गोंडे असणारे किंवा मोरपंख असणारे तुरे वापरले जातात. भाद्रपद बैलपोळा सण जवळ आल्याने मंचर परिसरात बैलांना नियमित वापरण्यात येणाऱ्या साहित्याने व सजविण्याच्या साहित्याने दुकाने सजली असून शेतकरीही साहित्य खरेदीसाठी गर्दी करत आहेत. Byte - संदीप संचेती, बैलांच्या साहित्याचे विक्रेते प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया मंचर पुणे...
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Sept 20, 2025 11:50:14
Pimpri-Chinchwad, Maharashtra:pimpri ajit p kailas puri Pune 20-9-25 feed by 2c/what's app अजित पवार *ऑन जनसंवाद* आम्ही मिरवण्यासाठी जनसंवाद घेतले नाहीत. आमची जबाबदारी आम्ही पार पाडली. *ऑन आजोबांची समस्या* आता अधिकाऱ्यांवर बोललो तर तुम्ही तिकडून ही बोलता अन कारवाई करा असे ही म्हणता. *ऑन रोहित पवार* संविधानाने सर्वांना अधिकार दिलेला आहे. कोणी कशा पद्धतीने काम करायचं. कोणी कसं बोलायचं, कसं वागायचं हे ठरवायचं असते. यशवंतराव चव्हाण साहेबांची शिकवण विसरू नये. *ऑन पत्रकार हल्ला* पत्रकार पत्रकारांचे काम करतात, कोणी ही कायदा हातात घेता कामा नये. मात्र मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोलतो, चूक करणाऱ्यांवर कारवाई करु. *ऑन परिवार मिलन द्वारे पालिकेची तयारी* राजकीय पक्ष प्रत्येक गोष्टीची तयारी करतात. संपर्क ठेवावा लागतो, जनतेच्या अडचणी समजून घ्यावा लागतात. म्हणूनचं इथल्या नागरिकांनी 2017चा अपवाद वगळता माझ्यावर आणि पक्षावर विश्वास टाकलेला आहे. त्यामुळं संपर्क कायम ठेवण्यासाठी मी आलेलो आहे. *ऑन पवार कुटुंब मिलन होणार का?* सजेशन फॉर ऍक्शन *ऑन एससी-एस टी* एससी आणि एसटी मध्ये समाविष्ट करुन घेण्याचा सर्वाधिक अधिकार केंद्राला आहे. अनेक घटकांना समाविष्ट करून घेण्याची मागणी होते. कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षण दिले जातात. तशी काळजी घेऊन निर्णय घेतले जातात. *ऑन जयंत पाटील* नाही रे बाबांनो, मुख्यमंत्री आणि मी जे बोलायचं ते बोललो आहे. असं टार्गेट करुन कोणी कोणत्या पक्षात प्रवेश करत असतो का? *ऑन भारत-पाकिस्तान मॅच* दोन मत प्रवाह आहेत, हे मागेच मी म्हणालो आहे. काही म्हणतात खेळू नये, क्रीडा प्रेमी खेळावं असं म्हणतात. आता यात आपण काही मत व्यक्त केली की दुसरा वर्ग म्हणतो असं कसं काय बोलले. मात्र निष्पपांना जीव गमवावा लागला, याचं दुःख संबंध भारताला आहे. नजीकच्या काळात घडलेल्या घटनेची जखम ताजी असते, त्यावेळी अशी चर्चा असते. *ऑन ट्रम्प व्हिसा* डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहे. त्यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार आहे. मात्र त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे पडसाद जगावर उमटतात. आता मध्येचं ते काहीही निर्णय घेतात, मोदी साहेबांना फोन ही करतात. त्यांचं नेमकं काय सुरु असतं कळत नाही. पण सर्वांनी गुण्यागोविंदाने राहावे. *ऑन हायड्रोजन बॉम्ब* विरोधक जिंकले की मतांची चोरी होत नाही, ईव्हीएम मशीनचा मुद्दा उपस्थित होत नाही. मात्र त्यांचा पराभव झाला की मग ते फेक नरेटिव्ह सेट करतात. संविधान बदलण्याचा फेक नरेटिव्ह केला, त्यात त्यांना काही प्रमाणात यश आलं. म्हणून आता नव्यानं फेक नरेटिव्ह सेट करतायेत.
2
comment0
Report
Advertisement
Back to top