Back
भाजपच्या दुटप्पी धोरणावर अरविंद सावंतांची तिखट टीका!
SRSHRIKANT RAUT
FollowJul 12, 2025 14:05:58
Yavatmal, Maharashtra
Anchor :
On भाजप प्रदेशाध्यक्ष वक्तव्य
मुंबई महानगरपालिका भाजपच्या तावडीत जाणार नाही, कारण मुंबईतील मराठी माणूस पेटून उठला आहे. तुम्ही जे सगळ्यांना आंदन देता, ते मराठी माणसाला कळलं आहे. भाजपने महाराष्ट्राला लाचार करून ठेवलं आहे. 106 हुतात्म्यांनी प्राणाहुती देऊन मिळवलेली मुंबई तुम्ही कोणाच्या तरी हाती देत आहे, हे मराठी माणसाला कळलं असून हेच भाजपचं दुटप्पी धोरण असल्याची टीका शिवसेना युबीटीचे खासदार अरविंद सावंत यांनी केली. 2017 साली शिवसेनेचा महापौर झाला यात भाजपचे उपकार नाहीत, उलट शिवसेनेचेच अनंत उपकार भाजपवर आहेत शिवसेना देशभरात वाढली असती, आजही केरळ ते कन्याकुमारी आणि गुजरात पर्यंत शिवसेनेच्या शाखा आहेत. तिथे बाळासाहेबांचा फोटो आहे, आणि उद्धव ठाकरे यांना मानणारे शिवसैनिक आहेत. जे निष्ठावान आहेत. भाजप मित्रांना मारण्यात पारंगत आहे, इंग्रजांची नीती घेऊन जन्माला आलेली ही लोकं आहेत, शिडीवर चढायचं आणि त्या शिडी ला लाथ मारायची अशी वृत्ती आणि नीती ही भाजपची असल्याची टीका अरविंद सावंत यांनी केली.
On संजय शिरसाट प्रकरण -
संजय शिरसाठ यांना अब्रू असेल तर नुकसानीचा दावा करावा, लाचारांना अब्रू असते का, ही कमरेखाली वाकलेली लोकं आहेत असा टोला शिवसेना युबीटी खासदार अरविंद सावंत यांनी लगावला आहे. यांना अब्रू असती तर सुरत, गुवाहाटी, गोव्याला पळाले नसते. अब्रू नसल्यामुळेच हे लोक पळत सुटले आहेत.
असेही सावंत म्हणाले.
बाईट : अरविंद सावंत
On पश्चिम विदर्भ दौरा -
शिवसेना निवडणुका डोक्यात ठेवून फिरत नसून 80 टक्के समाजकारण हे शिवसेनेचे कार्य आहे. शिवसैनिकांनी नाउमेद न होता हा वारसा पुढे नेला पाहिजे. जय पराजयाची चिंता न करता, हार न मानता काम करत राहायचे. असा संदेश देण्यासाठी पश्चिम विदर्भाचा दौरा करतोय असे अरविंद सावंत यांनी सांगितले.
शिंदेंकडे गेलेले आता परत शिवसेनेत येत आहेत. आमिष आणि भाई दाखवून जे लाचारांच्या फौजेत गेले त्यांना काही मिळालं नाही. जाताना त्यांनी विचारलं नाही त्यामुळे येताना त्यांच्या स्वागताला उभे राहण्याची गरज नाही. ज्यांना यायचं ते येतील असेही सावंत यांनी स्पष्ट केले.
बाईट : अरविंद सावंत
On मुंडेची तिसरी कन्या राजकारणात -
प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे हे युतीचे शिल्पकार होते, शिवसेनाप्रमुखांना ते भेटत राहत. मात्र शिवाजी राजांना फसविणारे होते हे संभाजी राजांना कळालं. तसं शिवसेना प्रमुखांना फसवलं हे आमच्या संभाजी राजांना कळालं आहे. त्यामुळे त्यांच्यापासून चार हात दूर आहोत याचा आनंदच आहे असे अरविंद सावंत म्हणाले.
12
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement