Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur416005

नागपूरमध्ये वाघांच्या हल्ल्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता!

AKAMAR KANE
Jul 13, 2025 04:02:26
kolhapur, Maharashtra
बावनकुळे यांचा बाईट जोडला आहे ------------- *मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलण्यात आलेय* *कृत्रीम बुद्धीमत्त्तेचा आता होणार चपखल वापर* --- *पेंच, ताडोबा-अंधारी, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाजवळील गावात 3 हजार 150 कॅमेरे व सायरन करणार वाघ आणि वन्यजीव प्राण्याची निगराणी* -- गावात वाघ वा वन्यजीव शिरताच वाजणार वस्त्यांमध्ये सायरन -- *राज्य सरकारचा ‘मार्वल’ कंपनी समवेत सामंजस्य करार* विदर्भातील नागपूर वनविभाग, पेंच, ताडोबा-अंधारी, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाजवळील गावांमध्ये वाघांच्या हल्ल्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी जातात... हे टाळण्यासाठी यावर उपाययोजनेसाठी महत्वाचे पाऊल उचलण्यात आलेय... याबाबत मार्वलमार्फत एक विशेष सामंजस्य करारावर नागपूर येथे स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत मार्वलचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. हर्ष पोद्दार व व्याघ्र प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी यांनी कराराचे आदानप्रदान केले. *कृत्रीम बुद्धीमत्तेचा प्रभावी वापर करुन अपघाताचे, गुन्ह्याचे प्रमाण कमी व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे* *नागपूर वन विभाग, पेंच, ताडोबा-अंधारी, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाजवळील गावात कॅमेरे व सायरन करणार वाघांची निगराणी* *या करारांतर्गत व्याघ्र प्रकल्पाच्या भोवताली असलेल्या गावाच्या सीमेवर एकूण 3 हजार 150 कृत्रीम बुद्धीमत्तेवर आधारलेले हे कॅमेरे लावण्यात येतील* . *गावाच्या दाट वस्तीच्या ठिकाणी सायरन उभारुन ते वायरलेसद्वारे या कॅमेरांशी जोडले जातील. वाघ,बिबट्या यांना स्वतंत्र ओळखतील असे तंत्रज्ञान या कॅमेऱ्यात असणार आहे*. वाघ अथवा बिबट्या कॅमेऱ्यात कैद झाल्याबरोबर गावामध्ये याकॅमेऱ्याशी जोडलेले सायरन गावकऱ्यांना सावध करतील. *करारानुसार पेंच व्याघ्र प्रकल्पात 875, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात 525, नवेगाव व्याघ्र प्रकल्पात 600 तर नागपूर वनक्षेत्रात 1 हजार 145 हे कॅमेरे व सायरन जोडले जातील*. -------- बाईट
10
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top