431213
अंतर वालीत जल्लोष! महिलांनी फुगडी खेळून आनंद साजरा केला
Jalna, Maharashtra: FEED NAME : 0209ZT_JALNA_ANTARWALI(19 FILES) जालना : अंतर वाली सराटी येथील जरांगे यांच्या उपोषण स्थळी जोरदार जल्लोष महिलांनी फुगडी खेळून साजरा केला आनंद ग्रामस्थांनी गुलाल उधळून केला जल्लोष साजरा तरुणांनी नाचून साजरा केला आनंद अँकर : अंतर वाली सराटी येथील जरांगे यांच्या उपोषण स्थळी जोरदार जल्लोष करण्यात आला आहे.मराठा आंदोलक असलेल्या महिलांनी फुगडी खेळून आनंद साजरा केलाय.ग्रामस्थांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला आहे. यावेळी तरुणांनी डान्स करत आनंद साजरा केला.राज्य सरकारने जरांगे यांच्या 8 पैकी 6 मागण्या पूर्ण केल्या.हैद्राबाद गॅझेट बाबत देखील सरकारने जीआर काढला.त्यामुळे अंतर वालीत देखील जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला आहे0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
लासलगांव में रामदेवजी बाबाजी का दशहरी उत्सव भक्तिमय वातावरण में जोर-शोर से मनाया गया
Lasalgaon, Maharashtra:लासलगाव येथे श्री रामदेवजी बाबांची वार्षिक दशमी उत्सव भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने सकाळी पालखी मिरवणूक काढण्यात आली. बाजारपेठ, राम मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, शिंपी गल्ली, झेंडा चौक, शिवजी चौक आणि मंडे गल्ली या प्रमुख मार्गांवरून पालखीची मिरवणूक पार पडली. मिरवणुकीत भाविक व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जयघोष आणि भक्तिगीतांनी परिसर भक्तिमय झाला. मिरवणुकीनंतर महापूजा, आरती व प्रसादाचे वाटप करण्यात आले.0
0
Report
यूरोप में गणेश उत्सव: हंगेरी के मराठी मित्रमंडल ने गरबा-डोल से रंगी मिरवणूक
Pandharpur, Maharashtra:युरोप खंडात सुद्धा गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे युरोप खंडातील हंगेरी देशात सुद्धा तिथे वास्तव्य असणाऱ्या मराठी मित्रमंडळाने गणेश उत्सव साजरा केलेला आहे. बुडा पेस्ट मध्ये गणेश उत्सवाचे हे आता 10व वर्ष आहे.यावेळी पारंपारिक पद्धतीने गणरायाची ढोल ताशा आणि वाद्य वाजवत महाराष्ट्रीयन पोशाख करून मिरवणूक काढल्याच आपल्याला पाहायला मिळते. परदेशात राहून हे तिथं आपली भारतीय संस्थेची जमण्याबरोबर ती तुमच्याकडे पर्यंत मोठे वास्तव्यस असणारे मराठी लोक करत आहेत. गणेश मिरवणुकीमध्ये पारंपारिक लेझीम फुगडी गरबा आणि गणपती बाप्पा मोरया अशा घोषणा देऊन आनंद साजरा केला.0
0
Report
सोलापुर में सूखे की चपेट: खरीफ पिके करपल, पेयजल व चारे की किल्लत
Solapur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची छाया गडद. जिल्ह्यातील अनेक तलाव, विहिरींनी गाठला तळ; जनावरांसाठी 3 महिन्यांचाच चारा शिल्लक. सोलापुरात मागील वर्षी महापुराचे संकट; यंदाच्या वर्षी कोरड्या दुष्काळाचे संकट. जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती तात्काळ जाहीर करण्याची मागणी. पाणीपातळी कमी झाल्यानं विहिरी व बोअरवेलांचे पाणी कमी; पिण्याच्या पाण्यासोबत शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर. सोयाबीन, तूर यांसह खरीप पिकांना मोठा फटका. पेरणीशिवाय पाऊस न झाल्यामुळे पिकांची वाढ खुंटली. पेरणी, बियाणे, खते, औषधे आणि मजुरीवर झालेला खर्च वाया जाण्याची भीती. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, पीकविमा आणि पंचनाम्याबाबत ठोस निर्णयाची मागणी. प्रशासनाने दुष्काळ पाहणी सुरू केली असून जिल्ह्यातल्या विविध भागात माहिती गोळा केली जात आहे.0
0
Report
Advertisement
वाशिम में सूखा भारी, खरीप फसलें बर्बाद; किसान मुआवजे की मांग तेज
Washim, Maharashtra:वाशिम: अँकर : वाशिम जिल्ह्यात मागील ५० दिवसांहून अधिक काळ पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे संकट गडद झाले आहे.पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे सोयाबीन,कपाशी आणि तूर या प्रमुख खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.सोयाबीनच्या झाडांना शेंगा लागल्या आहेत, मात्र शेंगांमध्ये दाणे भरलेले नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या हातात यंदा उत्पादन येण्याची शक्यता मावळली आहे.त्यामुळे लागवडीसाठी केलेला खर्चही निघणार नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.या परिस्थितीत शेतकऱ्यांनी जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली आहे. पावसाअभावी शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत。0
0
Report
नांदगाव में साबुन से भरा ट्रक आग लगने से स्टॉक खाक; 40 लाख का नुकसान
Nashik, Maharashtra:नांदगाव (नाशिक) विशाल मोरे - साबणाने भरलेला ट्रक पेटला.. - नांदगाव - येवला रस्त्यावरील बेलदारवाडी शिवरातील घटना.. - साबुनासह संपूर्ण ट्रक जाळून खाक ; 40 लाखांचे नुकसान.. Anc - संभाजीनगर येथून चाळीसगावकडे साबुनाची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकने मध्यरात्री अचानक पेट घेतला..या आगीत ट्रकमधील साबन, अगरबत्ती, हॅन्ड वाश आदींसह संपूर्ण साहित्य जळून खाक झाले..नांदगाव - येवला रस्त्यावर बेलदारवाडी शिवारात ही घटना घडली..मध्यरात्री अग्निशमन दल व ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग नियंत्रणात न आल्याने गाडीतील 40 लाखांचे साहित्य व संपूर्ण ट्रक जळून खाक झाला..नांदगाव - येवला रस्त्यावर काही काळ वाहतुक कोंडी निर्माण झाली होती..0
0
Report
कोयना डैम: दो दरवाजे एक फुट खुले, कुल 3983 क्यूसेक विसर्जन
Satara, Maharashtra:सातारा - सांगली पाटबंधारे विभागाकडून पाण्याची मागणी झाल्यामुळे आज सकाळी 8 वाजल्या पासून कोयना धरणाचे दोन वक्र दरवाजे १ फूटाने उघडून 2933 क्युसेक विसर्ग कोयনা नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू असून त्याद्वारे 1050 क्युसेक विसर्ग देखील सुरू आहे असा एकूण 3983 क्युसेक विसर्जन कोयना नदीपात्रात सुरू झाला आहे. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत आला आहे.0
0
Report
Advertisement
निफाड में मोकाट कुत्तों से भीषण खतरा, 800 नागरिकों को रेबीज टीका
Niphad, Maharashtra:निफाड में मोकाट कुत्तों की समस्या दिन-ब-दिन गंभीर होती जा रही है। निफाड उप-जिला अस्पताल में पिछले साढ़े पांच महीनों के दौरान लगभग 800 नागरिकों को रेबीज प्रतिबंधक टीका दिया गया है। नगरसेवक सचिन मोरे ने सूचना के अधिकार से यह जानकारी मांगी थी। खास बात यह है कि मोकाट कुत्तों के मुद्दे पर आंदोलन करते समय नगरपंचायत कार्यालय में कुत्ते छोड़ने वाले पांच आंदोलकों के खिलाफ अपराध दर्ज किया गया है। निफाड शहर में मोकाट कुत्तों का प्रश्न सामने आया है। सड़कें, गलियाँ मोहल्ले और रिहायशी इलाकों में बड़ी संख्या में कुत्ते घूम रहे हैं, जिससे नागरिकों में डर का माहौल बन गया है। बच्चों से लेकर बुजुर्गों तक कई लोग खतरे में हैं और अब ऐसे आंकड़े सामने आए हैं। कुत्तों के कारण नागरिकों की सुरक्षा का मुद्दा पैदा हो गया है और किसी बड़ी दुर्घटना के होने की प्रतीक्षा किए बिना प्रशासन को त्वरित उपाय करने चाहिए, यह नागरिकों की मांग है। कुछ दिनों पहले निखाड़ में अनोखी प्रदर्शन के जरिए प्रशासन का ध्यान आकर्षित किया गया। शिवसेना (ठाकरे) युवा सेना के जिलाप्रमुख विक्रम रंधवे ने साथियों के साथ सीधे निफाड नगरपंचायत कार्यालय पहुंचकर मोकाट कुत्तों के मुद्दे पर प्रशासन का ध्यान दिलाने के लिए नगरपंचायत के मुख्याधिकारी कक्ष में कुत्ते छोड़कर प्रदर्शन किया। इस प्रदर्शन से नगरपंचायत परिसर में कुछ समय के लिए हलचल मची। प्रशासन ने इसके बाद कारवाई की है। नगरपंचायत कार्यालय में कुत्ते छोड़कर प्रदर्शन के मामले में पांच आंदोलकों के विरुद्ध अपराध दर्ज किया गया है। एक तरफ नागरिक सुरक्षा की मांग है, दूसरी तरफ प्रदर्शन के तरीके को लेकर प्रशासन ने कानूनन कार्रवाई की है।0
0
Report
अमरावती में 69 तहसीलों में सूखा भीषण, किसानों ने तुरंत राहत की मांग
Amravati, Maharashtra:अमरावती जिल्ह्यात ६९ महसूल मंडळांतील पीकपाण्याची स्थिती भीषण; दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी अमरावती जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट अधिक गडद होताना दिसत आहे. पावसाने सातत्याने ओढ दिल्याने जिल्ह्यातील ९२ पैकी तब्बल ६९ महसूल मंडळांमध्ये पीकपाण्याची स्थिती भीषण झाली आहे. ऑगस्टमध्ये जिल्ह्यातील आठ तालुक्यांना दुष्काळाचा पहिला ट्रिगर लागू करण्यात आला होता. मात्र सप्टेंबरमध्ये परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या १८ दिवसांत अपेक्षित ९७.२ मिलिमीटर पावसाच्या तुलनेत केवळ ६१.७ मिलिमीटर पाऊस झाला. नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे आणि अंजनगाव सुर्जी हे तीन तालुके वगळता उर्वरित ११ तालुक्यांत जून ते सप्टेंबरमधील पर्जन्यमान ७५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. पिकांची प्रत्यक्ष स्थिती, पर्जन्यमानातील तूट, जमिनीतील ओलावा आणि भूजल पातळीचा आढावा घेऊन दुष्काळाच्या तीव्रतेचे मूल्यांकन करून तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.0
0
Report
रत्नागिरी के राजापूर रेलवे स्टेशन पर मुंबई वापसी के लिए कोकणवासियों की भारी भीड़
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी - राजापूर रेल्वे स्थानकावर मुंबईला परतीच्या प्रवासासाठी कोकणवासीयांची गर्दी गणपती स्पेशल गाड्यांसह नियमित धावणाऱ्या गाड्या देखील उशिरा यंदा देखील लाखो कोकणवासीयांना परतीच्या प्रवासासाठी करावी लागतेय कसरत ग्रामीण भागातून येणारा प्रवाशांना वाहतुकीचे पर्याय किंवा कोकण रेल्वेचे पर्याय आणि संख्या कमी असल्यामुळे होतात हाल जादा गाड्या सोडल्यानंतर देखील तिकीट कन्फर्म मिळण्यासाठी अनंत अडचणी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, राजापूर आडवली, विलवडे, संगमेश्वर सारख्या प्रमुख स्थानकांवर होतेय गर्दी0
0
Report
Advertisement
पुणे-नाशिक रेल्वे का गणेशोत्सव डेकावा; किसानों की बाजार माँग तेज
Barav, Maharashtra:पुणे-नाशिक रेल्वेचा गणेशोत्सवात देखावा; शेतमालाला बाजारपेठ मिळण्यासाठी युवकांचा अनोखा संदेश याच पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या निमित्ताने जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार येथील सारंग बाबा नवतरुण मित्र मंडळाने पुणे-नाशिक रेल्वेचा देखावा सादर केला आहे. या देखाव्यामध्ये पुणे-नाशिक रेल्वेचा प्रस्तावित मार्ग खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा आणि संगमनेर या मार्गे दाखवण्यात आला आहे. या माध्यमातून परिसरातील युवकांनी रेल्वे मार्गाची आवश्यकता आणि त्यामागची स्थानिक शेतकऱ्यांची भावना मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला स्थानिक बाजारपेठेपलीकडे देशातील विविध बाजारपेठांमध्ये योग्य भाव मिळावा, तसेच शेतमालाची वाहतूक सुलभ आणि कमी खर्चात व्हावी, यासाठी पुणे-नाशिक रेल्वे मार्ग महत्त्वाचा ठरू शकतो, अशी भावना मंडळातील युवकांनी व्यक्त केली आहे. गणेशोत्सवाच्या देखाव्याच्या माध्यमातून मांडलेली ही संकल्पना sadhya जुन्नर तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे。0
0
Report
नाशिक के देवळा में अनिकेत जाधव ने eco-friendly जेजुरी प्रतिकृति दिखाकर गणेश उत्सव की नई पहचान बनाई
Nashik, Maharashtra:गणपती स्पेशल: देवळा ( नाशिक ) विशाल मोरे - नाशिकच्या देवळ्यात घरातच साकारलीय जेजुरी... - गणेशोत्सवानिमित्त शाळकरी मुलाने केला देखावा... - गणरायाची दिले खंडेराव महाराजांचा लुक... नाशिकच्या देवळा येथील अनिकेत किशोर जाधव या बारावीच्या विद्यार्थ्याने गणेशोत्सवानिमित्त खंडेराव महाराजांच्या प्रसिद्ध जेजुरी गडाच्या प्रतिकृतीचा देखावा सादर केला आहे. विशेष म्हणजे हा देखावा पूर्णपणे इको फ्रेंडली असून, पुठ्ठा व घरातील साहित्यापासून अनिकेतने जेजुरी गडाची उभे उभ प्रतिकृती सादर केलीय. तर श्री.गणेशाच्या मूर्तीलाही आकर्षक पेहराव करून खंडेराव महाराजांचा लुक दिलाय.अनिकेतने साकारलेल्या देखाव्यामुळे जणू घरात जेजुरी अवतरली.हा देखावा पाहण्यासाठी गणेशभक्त गर्दी करताहेत. यापूर्वीही अनिकेतने विविध आशयाचे देखावे सादर केलेय.0
0
Report
35 से अधिक शहरों में शांतिपूर्ण पदयात्रा, मानव श्रृंखला से एकता का संदेश
Nashik, Maharashtra:संपूर्ण भारतभरात ३५ हून अधिक शहरांमध्ये आणि १०० हून अधिक ठिकाणी शांतता पदयात्रा आणि मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रव्यापी मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाने शांततेचे प्रतीक बनावे, असा संदेश देण्यात आला. या उपक्रमात विविध आध्यात्मिक संस्था, समुदाय आणि शैक्षणिक संस्थांचे नागरिक एकत्र येऊन शांतता, एकता आणि मानवी बंधुभावाचा संदेश देत आहेत. या मोहिमेचा एक भाग म्हणून आज नाशिकमध्ये गंगापूर रोडवरील बाळासाहेब ठाकरे उद्यानाजवळ शांतता पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेत विविध जाती-धर्मांचे नागरिक, तरुण, ज्येष्ठ नागरिक, तसेच विविध संस्था आणि प्रतिष्ठीत संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रत्येकाने शांतता प्रस्थापित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे, असा संदेश यावेळी देण्यात आला. एक भारत, हम भारत, वसुधैव कुटुंबकम् एक जग, एक कुटुंब या उद्दिष्टासह हा प्रवास सुरू आहे.0
0
Report
Advertisement
अकोला के चांद खा प्लॉट में देर रात भिड़ंत, पुलिस ने स्थिति काबू की
Akola, Maharashtra:अकोला शहरातील चांद खा प्लॉट परिसरात रात्री उशिरा दोन गटांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली. दोन्ही गटांकडून किरकोळ दगडफेक करण्यात आली. तर काही दुचाकी वाहनांची तोडफोडही करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलीस आणि आरसीपीचे जवान घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सौम्य लाठीमार करत परिस्थिती नियंत्रणात आणली.या घटनेमुळे चांद खा प्लॉट परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, दोन्ही गटांमध्ये नेमका वाद कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी या प्रकरणी काही जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.0
0
Report
परभणी के मुळी बांध से लाखों लीटर पानी बर्बाद, गेट नहीं बंद
Hingoli, Maharashtra:अँकर -परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. बंधाऱ्याचे गेट क्रमांक सात पूर्णपणे बंद होत नसल्याने लाखो लिटर पाणी गोदावरी पात्रातून वाया जात असल्याने पाण्याची नासाडी होत आहे एकीकडे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने पाणीटंचाईची शक्यता असताना प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे नदीपात्रातील कचरा गेटमध्ये अडकल्याने गेट पूर्णपणे बंद होत नसल्याचे पाण्याची नासाडी होत आहे याबंधाऱ्याच्या पाण्यावर परिसरातील शेती आणि ग्रामस्थ अवलंबून असल्याने ही गळती तातडीने थांबवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.0
0
Report
नाशिक के ग्रामीण इलाकों में सूखा संकट, किसानों को तुरंत सहायता की मांग
Nashik, Maharashtra:मालेगाव (नाशिक) विशाल मोरे - नाशिकच्या ग्रामीण भागात दुष्काळाचे सावट..! - दीड महिन्यापासून पावसाची दडी.. - पावसाअभावी पिके हातातून गेली.. शेतकरी हवालदिल.. - कोरडा दुष्काळ जाहीर करून मदतीची शेतकऱ्यांची मागणी पावसाळा सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटला, तरी नाशिकच्या ग्रामीण भागात अद्यापही सलग जोरदार पाऊस झालेला नाही. गेल्या 50 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने या भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी शेकडो हेक्टरवरील बाजरी, मका यासह इतर पिकांना मोठा फटका बसला असून, अनेक पिके हातातून गेली आहेत. डोळ्यादेखत पिके करपल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.आधीच शेतीच्या वाढत्या खर्चामुळे आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता उत्पादनाचे मोठे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शासनाने मालेगाव सह नाशिकच्या ग्रामीण भागात कोरडा दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.0
0
Report
Advertisement
